काव्यशिल्प Digital Media: सोलापूर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label सोलापूर. Show all posts
Showing posts with label सोलापूर. Show all posts

Sunday, November 19, 2017

चहाचा घोटच ठरला अखेरचा

चहाचा घोटच ठरला अखेरचा

तीन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

सोलापूर : चहाची तलफ लागल्याने चहा पिण्यासाठी बाइकवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हे तिन्ही विद्यार्थी ठार झाले. आज पहाटे ही दुर्देवी घटना घडली.संगमेश माळगे, दीपक घुमडेल आणि अक्षय आसबे अशी या तिन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिघेही सोलापूरजवळील तळे हिप्परगाजवळ आर्किड महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेत होते. ते तिघेही शनिवारी रात्री ग्रंथालयात अभ्यासासाठी गेले होते. पहाटे तीनच्या सुमारास चहा पिण्यासाठी ते तळे हिप्परगा येतील कँटीनवर आले होते. यादरम्यान रस्त्यावरून जाणार्‍या ट्रकने तिघांना उडविले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. पोलीस तसेच ग्रामस्थांनी या तिघांना जखमी अवस्थेत सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.अपघातात ठार झालेला दीपक हा सोलापूरच्या रेमंड शोरुमच्या मालकाचा मुलगा आहे. तर अक्षय आसबे हा पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील रहिवाशी आहे. अपघाताचे वृत्त समजताच रुग्णालयात नातेवाईक तसेच त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही रुग्णालयात भेट देवून पाहणी केली.

Sunday, November 05, 2017

सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव

सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव

अखेर ना. महादेव जानकर यांच्या लढ्याला यश... 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

नागपूर/संजय कन्नावार -
२००५ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकरांच्या नेतृत्वात सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्यासाठी महामोर्चा काढला होता. १९९९ साली दिल्लीत धनगर आरक्षणासाठी पहिला मोर्चा महादेव जानकरांनी काढला होता. जानकर आज सत्तेत असले तरी ह्या मागण्यांसाठी असलेला त्यांचा हट्ट आजही कायम आहे. आज नागपूर मध्ये धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी या मागण्यांचा पुन्हा उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांनी आजच सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर धनगरआरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. नामकरणाप्रमाणेच ना. जानकर धनगर आरक्षणासाठी लढा कायम ठेवतील, हा समाजाचा विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. महादेव जानकर यांचे धनगर समाजातर्फे सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याबद्दल स्वागत करण्यात आले.