সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 19, 2018

नैसर्गिक संसाधनांच्या बचतीसह महानिर्मितीची वीज उत्पादन क्षमता अधिक वाढीस लागणार:चंद्रशेखर बावनकुळे

तीन अभिनव वीज प्रकल्प देशाला प्रेरणादायी ठरणार 
उर्जावान मंत्र्यांचा वीज क्षेत्रात विकास कामांचा झंझावात 
नागपूर/प्रतिनिधी:
कोळसा पाईप कन्व्हेयरमुळे कोळशाचा दर्जा अधिक उत्तम मिळणार असल्याने वीज उत्पादनातील भारांकात वाढ होण्यास मोठा हातभार लागणार आहे. सुमारे ६५०० मेगावट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पांसाठी अशाप्रकारची योजना साकारत असल्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. वेकोलिच्या नागपूर जिल्ह्यातील पाच कोळसा खाणींतून एकत्रितरित्या पाईप कन्व्हेयरद्वारे कोराडी व खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रांना कोळसा पुरवठा करण्याबाबत नामदार पीयूष गोयल केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी स्वत:हून महानिर्मिती मुंबई मुख्यालयात बैठक घेऊन या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. हा देशातील पहिला व प्रेरणादायी असा प्रकल्प असून अत्याधुनिक पद्धतीने रिमोटच्या साहाय्याने मॉनेटरिंग करण्यात येणार आहे. 
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली महानिर्मितीचे हे तीन महत्वाकांक्षी प्रकल्प साकारत असल्याचा सार्थ अभिमान बावनकुळे यांनी व्यक्त केला. तर नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे गुणगौरव करताना ऊर्जावान उर्जामंत्री असे गौरवोद्गार काढले. 
नागपूर जिल्ह्यातील महानिर्मितीच्या तीन प्रकल्पापैकी, भांडेवाडी येथील सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातून १५० दशलक्ष घनलिटर पाणी कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला घेण्यात येणार आहे. यामुळे नागनदीत शून्य निसरा, गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषण कमी होण्यास मदतच होणार आहे. आगामी काळात उमरेड येथील प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्पासाठी देखील सांडपाण्याचा वापर करण्यात येणार आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर करुन वीज निर्मिती करण्यासोबतच उद्योगांना देखील हे पाणी देण्याचे काम नागपूरमध्ये होत आहे. पाण्याचा पुनर्वापर, या पाण्यापासून महसूल आणि प्रदूषणमुक्तीचे काम करण्यात येणार आहे. कोळसा खाणीतील पाण्याच्या पुनर्वापरामुळे नागपूर जिल्ह्यातील शेती सिंचनाखाली येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
कार्यक्रमाला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, मराविम सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महानिर्मिती, वेकोली, महामेट्रो, रेल्वे, आणि महानगर पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.