काव्यशिल्प Digital Media: कृषी उत्पन्न बाजार समिती

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label कृषी उत्पन्न बाजार समिती. Show all posts
Showing posts with label कृषी उत्पन्न बाजार समिती. Show all posts

Tuesday, July 17, 2018

चंद्रपूरकर खात आहे सांडपाण्यातला भाजीपाला

चंद्रपूरकर खात आहे सांडपाण्यातला भाजीपाला

नागपूर/ ललित लांजेवार:
जर तुम्ही चंद्रपुरात राहत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.कारण चंद्रपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नागरिकांच्या जीवाशी खेळ-करण्यात येत असल्याचा विडीओतून समोर आला आहे. चंद्रपूर येथील दाताळा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समिती(भाजीपाला मार्केट)म्हणून ओळखल्या जातो. येथे जिल्हाभरातून व जिल्ह्याच्या बाहेरून भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध होतो.अश्यातच मंगळवारी बाजार सामितीतला एक विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजला. ज्यात भाजीपाला विक्रेता साचलेल्या सांड पाण्यात सांबार धुत असल्याचे दिसत आहे. हे भाजी विक्रेता १ नव्हे २ नव्हे तर ५ व्यक्ती हे या दुषित पाण्यात हा सांबार धुतांना दिसले.यात एकाने तर चक्क पत्नीला आज भाजीत सांबार न टाकण्याचे सूचना देणार असल्याचे म्हटले आहे. 
विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बाजार समितीत असलेल्या शौचालयासमोर साठलेल्या दुषित गडूळ पाण्यात भाजीपाला धुतला जात असून तो नागरिकांना जेवणात वापरण्या करिता विकला जात असल्याचे निदर्शनात आले.
बाजार समितीत भाजीपाला स्वच्छ करण्याकरिता टाके देण्यात आले आहे.मात्र काही भाजीपाला विक्रेत्यांच्या कामगारांनी त्या ठिकाणी भाजी न धुता साचलेल्या सांड पाण्यात भाजीपाला धुतला. या गंभीर प्रकाराबाबद बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांना विचारणा केली असता दोषींवर संपूर्ण चौकशी करून त्या व्यापाऱ्याचा परवाना काही दिवसांकरिता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती चोखारे यांनी काव्यशिल्पशी बोलतांना दिली. विक्रेत्यांच्या अश्या या व्यवहारामुळे चंद्रपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Sunday, March 18, 2018

 रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या दुकान गाळयांचे लोकार्पण

रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या दुकान गाळयांचे लोकार्पण

कोल्हे यांच्या नियुक्तीचे आमदारांकडून समर्थन
रामटेक तालुका प्रतिनिधी- 
रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार  समीतीच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या 22 दुकानगाळयांचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते होणार होते मात्र ऐनवेळी ते नआल्याने आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते ही वास्तु लोकार्पीत करण्यात आली.
यावेळी जेष्ठ सहकार नेते श्रीराम  अस्टनकर,माजी सभापती बालचंद बादुले,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,तालुका भाजपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोक, मुख्यप्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रशासक किशोर रहांगडाले,नगरसेवक विवेक तोतडे,बाजार समीतीचे सर्व प्रशासक व तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येत यावेळी उपस्थित होते.
यावेळी संबोधित करतांना आमदार रेड्डी म्हणाले की,बाजार समीचे मुख्यप्रशासक अनिल कोल्हे हे अतिशय अभ्यासू व्यक्ती असून सहकार क्षेत्रांत त्यांनी भरीव कामगीरी केली आहे. संजिवनी सहकारी पत संस्था व कालीदास सहकारी पतसंस्था स्थापन करण्यापासून त्या नावारूपास आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याची स्तुतीसुमने त्यांनी उघळली. कोल्हे यांच्या बाजार समीतीच्या मुख्यप्रशासक पदावर केलेल्या निवडीचे त्यांनी यावेळी समर्थन केले.श्रीराम अस्टनकर,बालचंद बादुले यांचीही यावेळी समयोचित भाषणे  झाली.
यावेळी बाजार समीतीचे अनिल कोल्हे यांनी प्रास्ताविकातून बाजार समीतीच्या विकास कामांची माहीती दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समीतीचे सचिव हनुमंता महाजन,लेखापाल निक्की महाजन,उमराव मेश्राम,विकास महाजन,प्रकाश लेंडे,अष्विनी उईके,शिल्पा शेंडे  व अन्य सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Monday, January 15, 2018

रामटेक येथे शेतकर्‍यांना शासकीय माहितीचे धडे

रामटेक येथे शेतकर्‍यांना शासकीय माहितीचे धडे

रामटेक/प्रतिनिधी:
                    कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे प्रांगणात शासकीय योजनांची माहिती कार्यशाळेचे आयोजन पार पडले. कार्यक्रमाला आ. रेड्डी, मुख्य प्रशासक अनिल कोल्हे, उपमुख्य प्रशासक किशोर रहांगडाले, नगरसेविका वनमाला चौरागडे, अडतिया संघाचे अध्यक्ष सोहनलाल यादव तालुका खेरदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल गुप्ता संपूर्ण प्रशासक मंडळ व शेतकरी वर्ग योजनांची माहिती करून घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होता. यावेळी नववर्ष २0१८ या कॅलेंडरचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
                                                     बाजार समिती मुख्य प्रशासक अनिल कोल्हे यांनी यावेळी शासनाच्या विविध योजना व बाजार समितीच्या भावी योजनांची माहिती दिली. त्यात शेतकर्‍यांना मिळणार्‍या शेतमाल तारण कर्ज योजना, संत शिरोमणी, श्री सावतामाळी शेतकरी आठवडी बाजार अभियान, कृषी पणन मित्र मासिक, शासकीय खरेदी हर्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स, बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकर्‍यांचा सहभाग याविषयी सविस्तर व अभ्यासपूर्ण माहिती दिली.
                                                 बाजार समितीच्या वतीने लवकरच धरम काट्याची व्यवस्था करणे, संपूर्ण बाजार आवाराचे काँक्रिटीकरण करणे, सुलभ शौचालयाची व्यवस्था करणे, शेतकर्‍याकरिता बळीराजा निवास योजना व भोजन व्यवस्था करणे, शेतकर्‍यांच्या शेतमाल साठवणुकीकरिता व शेतमाल तारण योजना राबविण्याकरिता गोदाम व्यवस्था करणे, समितीच्या कार्यक्षेत्रातील मौजा देवलापार येथे उपबाजार निर्माण करणे अशा स्वरुपाचा बाजार समितीचा भावी योजनांची माहिती दिली. मला शेती आणि शेतकर्‍यांचा विकास करावयाचा असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून परिपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात शेतकर्‍यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकर्‍यांचे व्यापक हित साधणार आहे, असे मत मुख्य प्रशासक अनिल कोल्हे यांनी व्यक्त केले.  
                                         आ. रेड्डी यांनी कृउबा समितीच्या नवनियुक्त प्रशासन मंडळाने शेतकर्‍यांच्या हितासाठी प्रयत्न करावे. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त सुविधा मिळवून द्यावा तसेच शेतकर्‍यांचा हितासाठी नव नवीन व प्रभावी उपायांची अंमलबजावणी करण्यासही मंडळास सुचविले. संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची उपस्थिती शेतकर्‍यांनी प्रशंसा केली. नवनियुक्त प्रशासक मंडळाने शेतकर्‍यांसाठी तसेच त्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही मत यावेळी व्यक्त केले. संचालन सचिव हनुमंता महाजन, आभार प्रदर्शन चरणसिंग यादव तर आयोजनासाठी निक्की महाजन, उमराव मेर्शाम, प्रकाश लेंदे, विकास महाजन, अश्‍विनी उईके, शिल्पा शेंडे, गुलाब अडमाची इतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.
                                          यावेळी शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याकरिता आमचे प्रशासक मंडळ नेहमी कार्यरत राहणार असल्याचे आश्‍वासन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे, उपमुख्य प्रशासक रहांगडाले, क्रि ष्णा माल, चरणसिंग यादव, दिगांबर वैद्य, दुर्गावती सरियाम, महेश ब्रह्मनोटे, सुंदरलाल ताकोद, चंद्रभान धोटे, संजय गुप्ता, प्रकाश मोहारे, सुधीर धुळे, खेलन पारखी, कृष्णा मस्के, मोतीराम तरारे, कृष्णा रेड्डी, बाबुलाल बरबुडे यांनी यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधताना दिले.