Saturday, August 04, 2018
प्रत्येक सरपंचाने स्वच्छ सर्वेक्षणात आपल्या गावाचे योगदान द्यावे:अहिर
Thursday, July 05, 2018
जि.प.अध्यक्षांचा जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद
Thursday, November 23, 2017
भावी पिढी सक्षम करण्यासाठी ग्राम नियमित स्वच्छ राखा - जितेंद्र पापळकर
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 23/11/2017 सावली तालुक्यातील निमगाव येथे नुकतीच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत ग्राम हागणदारीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सभा घेण्यात आली. भारतात उघड्यावरच्या हागणदारी मुळे दर वर्षी डायरीयामुळे एक लक्ष मुलांचा मृत्यु होतो. ही योग्य बाब नसुन, भावी पिढी ख-या अर्थाने सक्षम करायची असेल तर गावातील प्रत्येकांनी आपले ग्राम नियमीत स्वच्छ राखले पाहिजे. असे मत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ग्रामस्थांना सभेद्वारा मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
जिल्हा हागणदारी मुक्त च्या अंतीम टप्प्यात असुन, गावक-यांचा स्वच्छतेच्या कामात सहभाग वाढावा म्हणुन, गावा-गावात जनजागरणपर कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असुन, याच प्रकारे सावली तालुक्यातील आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर सहभागी झाले. यावेळी जिल्हा परीषदचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार,गटविकास अधिकारी अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)रविंद्र मोहिते,निमगावच्या सरपंच व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, गावातील उघड्यावरची हागणदारीची प्रथा ही काही भुषणावह बाब नसुन, गावातील प्रत्येक घराचा परीसर तसेच सार्वजनिक परिसर नियमित स्वच्छ राहल्यास त्यागावातील लोकांचे आरोग्यमान सुधारण्यास मदत होते, यातुनच गावाचा विकास होत असतो. यासाठी गावातील प्रत्येकांनी गाव शाश्वत स्वच्छ राखण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. जिल्हा परीषदचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी ग्रामविकासाची खरी सुरुवात ही ग्राम स्वच्छतेतुनच होते . ग्राम शाश्वत स्वच्छ करणे ही ग्रामविकासाचे पहिले पाऊल असुन, याकामात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे . असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी केले. कार्यक्रमात स्थानिक कलावंताचा कलापथकाचा प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला .याद्वारा स्वच्छतेचे महत्व मनोरजनांच्या माध्यमातुन माडंण्याचा प्रयत्न केला गेला .याशिवाय एका शौचलयाचे भुमिपुजन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
Friday, November 17, 2017
गावागावात होणार शौचालय दिन
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक - 17 / 11 / 2017 दर वर्षी ''19 नोव्हेंबर '' हा जागतीक शौचालय दिन म्हणुन साजरा केला जात असुन, यावर्षी सुद्धा चंद्रपुर जिल्ह्यातील गावा-गावात विविध उपक्रमांचे आयोजन करुन, जागतिक शौचालय दिनाचे आयोजन करण्याच्या सुचना जिल्हा परिषद कडुन सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार 19 नोव्हेंबर ला गावा-गावात शौचालय दिन आयोजित केल्या जाणार आहे.
स्वच्छतेचे जिवनात फ़ार महत्व असुन,स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी असल्यास 80 टक्के आजार नाहिसे होतात. याचाच एक भाग म्हणुन , गावस्तरावर स्वच्छते विषयी गाव स्तरावर जनजागरण व्हावे व प्रत्येकाला स्वच्छतेचे मह्त्व कळावे यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस जगात जागतिक शौचालय दिन म्हणुन साजरा करण्यात येत आहे. चंद्रपुर जिल्हा हागणदारी मुक्तच्या अंतिम टप्प्यात असुन, हागणदारी मुक्तीकडे मार्गक्रमण करित आहे . जिल्हातील गावा-गावात शौचालय दिनाचे आयोजन करुन, सभा,गृहभेटी, लोककलावंताचे कार्यक्रम, स्वच्छता फ़ेरी,मार्गदर्शन सभा अशा विविध कार्यक्रमा द्वारा गावस्तरावर स्वच्छतेचे वातावरण निर्माण करुन, जनमानसाच्या मना-मनात स्वच्छतेचे मह्त्व वृध्दीगत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निर्देश देण्यात आले असुन, प्रत्येक गावाकरिता तालुका पातळीवरुन संपर्क अधिकारी नेमण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. जागतिक शौचालय दिनाचे गावस्तरावर भव्य आयोजन करुन, गावस्तरावर विविध उपक्रमातुन ग्रामस्थांना शाश्वत स्वच्छते विषयी अभिप्रेरित करावे असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
युनिसेफ अधिका-यांनी केली पिपर्डा व मंगीची पाहणी
स्वच्छ भारत मिशनच्या कामाची पाहणी
गावात विदेशी अधिका-यासह युनिसेफ़ मुंबई कार्यालयाचे जयंत देशपांडे, प्रायमो पुणेचे महेश कोडगिरे, उपमुख्य अधिकारी पांणी व स्वच्छता रविंद्र मोहिते, कोरपणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ संदिप घोन्सीकर, सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे, राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, प्रकाश उमक, साजिद निजामी, पंचायत समिती कोरपनाचे गट समन्वयक रवी लाटेलवार,लारेन्स खोबरागडे युनिसेफ़ चमुसह कोरपना तालुक्यातील पिपर्डा व राजुरा तालुक्यातील मंगी या गावात हजर होते. गावात विदेशातील अधिकारी आल्याचे पाहुन गावक-यांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले होते. आलेल्या विदेशी मान्यवरांचे स्वागत गावांच्या पारंपारीक पध्दतीने करण्यात आले. चमु कडुन गावाची पुर्ण पाहणी करुन गावक-यांशी गावात केलेल्या विकास कामा विषयी चर्चा करुन माहिती जाणुन घेतली. याशिवाय गावातील शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केन्द्र,ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. गावातील घरी जावुन शौचालय वापर व स्वच्छतेच्या सवयी विषयी माहिती घेण्यात आली. पिपर्डा या गावातील सामाजिक कार्यकर्ता आबिद अली यांनी विदेशातुन आलेल्या अधिकारी यांचे गावात स्थानिक संस्कृती नुसार स्वागत करण्यात आले व गावाचा संपुर्ण परिसर दाखवुन , गावात केलेल्या विकास कामाची माहीती दिली. यावेळी दोन्ही गावात ग्रामपंचायतचे सरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावातील महिला ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यादौ-या दरम्यान युनिसेफ़च्या चमुने जिल्हा परिषदला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदच्या जनपद सभागृहात छोटे खाणी मिटिंग घेवुन, जिल्हात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालु असलेल्या कामा विषयी व जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या यशस्वी नियोजना विषयी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)रविन्द्र मोहिते यांनी सादरीकरण करुन चमुला माहिती दिली. चंद्रपुर जिल्हा यशस्वीपणे हागणदारीमुक्त कडे वाट्चाल करित असल्याचे पाहुन इंग्लंड वरुन आलेल्या विदेशी महिला अधिकारी इम्मा हेनरीऒन जिल्हा परिषदचे कौतुक केले.
''19 नोव्हेंबर'' जागतिक शौचालय दिवस
चंद्रपूर - '19 नोव्हेंबर'' आज जगात जागतिक शौचालय दिवस म्हणुन साजरा केल्या जातो. मुळात ही संकल्पना आली ती सन 2001 साली स्थापन झालेल्या जागतिक शौचालय संघटनेच्या (WORLD TOILET ORGANIZATION WTO)माध्यमातुन ! ज्यावेळी जगात सर्वत्र दिसत असणारी उघड्यावरची हागणदारी आणी त्यामुळे होत असलेले विविधांगी महाभयावह आजार विशेषता पाण्याची अशुध्दी आणी त्यातुन पसरणारी रोगराई हा उघड्यावरील हागणदारीमुळे निर्माण होणारा प्रमुख अपायकारक घटक WTO च्या नजरेत आला. सन 2001 साला पासुन WTO शौचालय आणि त्यांच्या संबंधित स्वच्छता यावर सतत कार्य करीत राहिले. हे सर्व करीत असतांना WTO संघट्नेने शौचालयाची असुविधा ,त्यापासुन होणारे आजार,आणि मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणा-या शौचालयाला जगभर कसे निष्काळजीपणे हाताळण्यात येते ,हे सयुक्त राष्ट्रसंघाच्या पटलावर मांडले.
शेवटी 2013 साली राष्ट्र संघाने शौचालय हि अन्न - वस्त्र - निवारा याच प्रमाणे मानव जातीची महत्वाची गरज आहे. अशा निर्णयाप्रत येवुन, शौचालयास महत्वाचे स्थान मिळवुन देण्याच्या दृष्टीने मान्येता दिली. शौचालय विषय जरी राष्ट्रसंघाच्या मान्येतेत आला असला तरी, घरी शौचालय असण्याला आजही थोड्याफ़ार काही प्रमाणात अस्पृश्या सारखे मानले जाते . ग्रामीण भागात फ़िरत असतांना बरेच अनुभव लोकान कडुन ऍकायला मिळतात. घराच्या आवारात शौचालय सुविधा असणे योग्य की अयोग्य आजही समजावुन सांगाव लागत .हे खुप मोठे दुर्भिक्ष आहे. उघड्यावर शौचास जाण्याच्या सवयीमुळे प्रत्येक्ष अप्रत्येक्ष आजाराचे ,साथीचे प्रमाण हे सतत वाढत असते .त्यामुळे मनुष्याची शारिरीक, मानसिक आर्थिक,या सोबतच सामाजिक हानी होते.. हे सर्व कळुन सुध्दा वळत नसल्यासारखी बाब स्वच्छते विषयी होत आहे.ऍकीकडे घरात चॅनीच्या वस्तुचा सहज उपभोग घेतल्या जातो.यासाठी कुठ्लीही शासनाची योजना नाही,मात्र शौचालय बांधा ,शौचालयाचा नियमित वापर करा,घराचा परिसराची स्वच्छता राखा ,हात नियमित साबणाने स्वच्छ धुवा हे पटवुन सांगण्या करीता शासनाला योजना करावी लागते. याचा कुठे तरी मना पासुन विचार मंथन होणे गरजेचे आहे. प्रत्येक घरी शौचालय सुविधा निर्माण करुन, त्याचा नियमित वापर करणे, व स्वच्छतेच्या सवयी अंगवळणी बाळगणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे .यादिशेने मानसिक परिवर्तन घडुन आणण्याची खरी गरज आहे.
कुपोषण, बालमृत्यु, रोगराई,साथीचे विविध आजार यावर शासन अहोरात्र झटत असत .जर का सर्वांनी स्वच्छता राखली ,स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगवळणी लावल्या आजाराचे प्रमाण निश्चितच कमी झाल्याचे दिसुन येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले की, उघड्यावर हागणदारीत जाणे हे मानसाची रित नसुन वानराची रित आहे. अशीच उघड्यावर हागणदारी होत राहिली तर मानसात व वानरात फ़रक काय ? चला तर मग आज जागतिक शौचालय दिनी सर्वांनी मिळुन एकच संकल्प करुया.....
येथुन पुढे उघड्यावर शौचास जाणार नाही व कुणास उघड्यावर जावु देणार नाही. नियमित शौचालयाचा वापर करेल व शेजारी मित्र सर्वांना शौचालय वापर करण्यास भाग पाडेल. असा सर्व मिळुन चंद्रपुर जिल्हा स्वच्छ,सुंदर, स्वस्थ,आरोग्यदायी करण्याचा संकल्प करुया.
•कृष्णकान्त खानझोडे , आयईसी सल्लागार,स्वच्छ भारत मिशन,जि.प.चंद्रपुर.
Friday, November 10, 2017
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील मुख्याध्यापक निलंबित
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील शाळेत आठ वर्षापासून रामचंद्र निरगुडे कार्यरत होते. तेव्हापासून त्यांनी शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करणे, शालेय कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारींना न बोलावणे, वारंवार रजेवर जाणे, महिला सरपंचांशी असभ्य वर्तन करणे, विद्यार्थी कडून शाळेत कामे करवून घेणे आदी तक्रारी होत्या.