সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, August 31, 2018

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी  महावितरणचा मदतीचा हात

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचा मदतीचा हात

नागपूर/प्रतिनिधी:
केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधिची रक्कम स्टेट बॅकेच्या अधिका-यांना हस्तांतरीत करतांना महावितरणचे कर्मचारी
केरळ राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणच्या मौदा विभागातील अभियंते, अधिकारी आणि कर्मचा-यांनी पुढाकार घेत केरळ मुख्यमंत्री मदत निधीसाठी 25 हजार रुपयांची रक्क्म स्टेट बॅकेच्या मौदा शाखेत हस्तांतरीत केली.
नुकतेच केरळ राज्यात महापुराने थैमान घातले. यात निसर्ग संपन्न केरळ राज्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. देशभरातून केरळकडे मदतीचा ओघ सुरू आहे. आपत्तीसमयी नेहमी मदतीची भूमिका घेणा-या महावितरणच्या मौदा विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांनीही या संकटकाळी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेत केरळ मुख्यमंत्री मदत निधीसाठी 25 हजार रुपये गोळा केले. महावितरणच्या मौदा विभागा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून ही रक्कम एकत्रित करण्यात आलेली ही रक्कम मौदा विभागातील उपव्यवस्थापक (मानव संसाधन) सुहास भोयर यांचेसह चेतन लोंडबैले आणि अश्विनी धानके यांनी स्टेट बॅंके मौदा शाखेच्या व्यवस्थापिका स्नेहा गणवीर यांच्या सुपूर्द केला. या मदतनिधीत विभागातील अभियंते, अधिकारी आणि कर्मचा-यांनी वैयक्तिकरित्या स्वयंस्फ़ुर्तपणे दिलेल्या राशीचा समावेश आहे.

वीज ग्राहकांसाठी खुशखबरी;आता वीज बिलाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना अनेक पर्याय

वीज ग्राहकांसाठी खुशखबरी;आता वीज बिलाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना अनेक पर्याय

नागपूर/प्रतिनिधी:
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फ़े संपुर्ण राज्यात आक्रमकतेने राबविली जात असून येणा-या सुट्ट्यांचा काळ बघता वीजबिलाचा भरणा कसा करायचा असा यक्षप्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत असला तरी बिलांचा भरणा सुलभतेने व्हावा म्हणून ग्राहकांना मोबाईल ॲप आणि संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने शिवाय अनेक सहकारी बॅंका, महावितरण आणि खासगी वीजबिल भरणा केंद्रांतून विजेचे बिल भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली असल्याने ग्राहकांनी नियमितपणे वीजबिलांचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले आहे.
महावितरणच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून (www.mahadiscom.in) किवा महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे ग्राहक विजेचे बिल ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे बिलाचा भरणा केल्यास शुल्क आकारण्यात येत असून. उर्वरित इतर सर्व पद्धतींच्या माध्यमातून (नेटबँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) वीज बिलाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाइलवर 'एसएमएस'द्वारे त्वरित पोच मिळते; महावितरणच्या या संकेतस्थळावर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास वीजबिल भरल्याचा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाइन वीजबील भरणा पद्धत अत्यंत सुरक्षित असून, यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधू शकतात. 
एसएमएस दाखवूनही वीजबिलाचा भरणा शक्य
अनेकदा वीजबिल मिळालेच नसल्याची किंवा उशीरा मिळाल्याची ग्राहकांकडून होणारी ओरड लक्षात घेता वीजबिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली असून हा एसएमएस वीजबिल भरणा केंद्रावर दाखवून त्याअनुषंगाने वीजबिलाचा भरणा करता येणे शक्य असल्याने आता ग्राहकाला त्याच्या वीजबिलाची वाट बघत बसण्याएवजी महावितरणकडे केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यास येणा-या एसएमएसच्या आधारे त्याला त्याच्या वीजबिलांचा भरणा वेळीच करणे शक्य झाले आहे. याशिवाय ठाराविक मुदतीत पैसे भरून विजबिलात मिळत असलेल्या प्रॉम्प्ट पेमेंट सवलतीचा लाभ घेणेही शक्य झाले आहे.
कृषी वर्गवारीचे ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीच्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा नियमितपणे वीजदेयके दिली जातात, मात्र काही कारणास्तव ग्राहकाला वीज बिल उपलब्ध न झाल्यास ग्राहकाने संबधित उपविभागीय कार्यालयामध्ये वा शहरी भागामध्ये मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र येथे ग्राहक क्रमांक दिल्यानंतर तात्काळ वीज देयकाची दुसरी प्रत त्यांना तात्काळ मिळेल, याशिवाय ज्या ग्राहकांकडे मोबाईल ॲप नाही त्यांच्याकरिता महावितरणच्या वीजबिलावर ‘क्युआर’ (क्यूक रिसापॉन्स) कोड देण्यात आला असून मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाउनलोड केलेल्या क्‍यूआर कोड रीडरच्या माध्यमातून वीजबिलावरील हा कोड स्कॅन करता येतो. त्यावरून महावितरणची मोबाईल ॲपची लिंकही मिळते. वीजबिलावरील क्‍यूआर कोड हा अँड्राइड, आयओएस, विंडोज मोबाईलसाठी उपलब्ध आहे. सोबतच राज्यातील अनेक भागात प्रायोगित्क स्तरावर फ़िरते वीज बील भरणा केंद्रही सुरु करण्यात आले असून साप्ताहिक बाजाराचे दिवशी या केंद्रावर जाऊन ग्राहकांना त्यांचे वीजबिल भरणा करणे शक्य आहे.
ग्राहकांनी वीज बिलभरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून बील भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या नि:शुल्क ऑनलाइन सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
आदिवासींच्या न्याय्य हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा : आ.अशोक उईके

आदिवासींच्या न्याय्य हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करा : आ.अशोक उईके

अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या दौऱ्याला प्रारंभ 
रात्री उशिरापर्यंत विविध विभागाची आढावा बैठक
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 आदिवासीबहुल असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीच्या बहुसंख्येला लक्षात घेता, या ठिकाणी आदिवासींच्या न्याय हक्काचे संरक्षण काटेकोरपणे झाले पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, वनविभाग, पोलीस विभाग व अन्य सर्वच विभागांमध्ये राज्य शासनाच्या अनुसूचित जमाती बद्दलच्या प्रचलित कायद्याची अंमलबजावणी सक्षमतेने करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधावे, असे निर्देश महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक उईके यांनी गुरुवारी दिले.
राज्‍य शासनाची विशेषाधिकार असणारी 15 विधीमंडळ सदस्यांचा सहभाग असणारी अनुसूचित जमाती कल्याण समिती सध्या तीन दिवसांच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहे. आज सकाळी या समितीचे चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, राजूराचे आमदार ॲड. संजय धोटे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृहावर स्वागत केले. अनुसूचित जमातीच्या विविध योजनांवर अनौपचारिक चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या या समितीने एव्हरेस्ट सर करणाऱ्या दहा आदिवासी विद्यार्थ्यांचे शहरात आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम कौतुक केले. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी समितीचे स्वागत केले. यावेळी अप्पर आदिवासी आयुक्त ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. या समितीमध्ये डॉ. अशोक उईके यांच्यासह आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकुर, आमदार श्रीकांत देशपांडे यांचेही स्वागत करण्यात आले.
नियोजन भवनात आढावा
समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनांमध्ये झाली. समिती सदस्यांना यावेळी गोंड राज्याच्या वैभवशाली वारशाची सचित्र गाथा सांगणारे मुलूख चांदा हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. समितीने सर्वप्रथम जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचा आढावा घेतला. समितीच्या कार्यपद्धतीप्रमाणे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची मंजूर पदे, त्यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष तसेच जात पडताळणी याविषयी समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांनी सादर झालेल्या आढावा व माहिती घेऊन तपासणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, चंद्रपूर महानगरपालिका, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, एसटी महामंडळ आदी ठिकाणच्या आस्थापनातील अनुसूचित-जमातीच्या न्याय हक्कावर चर्चा केली. समितीच्या अनेक सदस्यांनी या चर्चेत सहभागी होत प्रशासनाने जात पडताळणी अनुशेष, भरती, बढती आरक्षण, याबाबतीत अधिक सतर्कतेने काम करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, सर्व मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या सत्राचा समारोप करताना डॉ.अशोक उईके यांनी चंद्रपूर जिल्ह्याला गोंड राजाचा दैदिप्यमान इतिहास राहिला आहे. त्यामुळे आदिवासीबहुल असणाऱ्या या भागांमध्ये प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व विविध पदाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या न्याय्य हक्काचे रक्षण, त्यांच्या अधिकाराची योग्य अंमलबजावणी आणि प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय असला पाहिजे, यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे, कुणाच्याही हक्कावर गदा येणार नाही. यासाठी कायद्याचा काटेकोरपणे वापर करावा, असे निर्देश दिले.
जिल्हा परिषदेचाही आढावा 
दुपारी 3 नंतर समितीने जिल्हा परिषदेच्या आवारातील सभागृहामध्ये जिल्हा परिषदेतील अनुसूचित जमाती संदर्भातील पदभरती, बढती, आरक्षण, जात पडताळणी याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असल्याचा आढावा घेतला. याठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जात पडताळणी च्या संदर्भात व बिंदुनामावली प्रमाणित करण्याबाबतच्या नियमावर चर्चा करण्यात आली. यावेळी समिती सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रलंबित असणाऱ्या अनेक प्रकरणावरही चर्चा केली.
शनिवारी पुन्हा आढावा
कल्याण समितीने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये आढावा घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा पुन्हा जिल्हा नियोजन भवनात उर्वरित विभागाच्या आढाव्याला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत हा आढावा सुरू होता. तत्पूर्वी गुरुवारी झालेल्या आढाव्यामध्ये अनेक विभागाला काही माहिती सादर करायचे निर्देश समितीने दिले आहेत. शनिवारी पुन्हा यासंदर्भात आढावा घेतला जाणार आहे. ज्या विभाग प्रमुखांनी आज समितीपुढे माहिती सादर केली नाही किंवा समितीने संपूर्ण माहिती सादर करण्याबाबत पुन्हा सांगितले आहे. त्या सर्व विभाग प्रमुखांसोबत पुन्हा एकदा शनिवारी 1 सप्टेंबरला समितीपुढे चर्चा होणार आहे. एकत्रित आढावा घेण्यापूर्वी ज्या विभागात सोबत आज बैठक वेळे अभावी होऊ शकली नाही. त्यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. त्यानंतर 1 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता समितीची आढावा बैठक सर्व अधिकाऱ्यांसोबत होणार आहे.
दरम्यान, उद्या जिल्ह्यातील चंद्रपूर, चिमूर प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या तालुकानिहाय आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कामांची पाहणी समिती करणार आहे. क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा देखील समिती करणार आहे. 15 आमदारांच्या या समिती सोबत उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव संजय कांबळे, कक्ष अधिकारी दामोदर गायकर यांच्यासह विभागीय जात पडताळणी व अन्य विभागाचे शीर्षस्थ अधिकारी आलेले आहेत.
रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांची आता खैर नाही

रिमोटद्वारे वीजचोरी करणाऱ्यांची आता खैर नाही

चंद्रपूर /प्रतिनिधी:
रिमोटद्वारे वीजचोरीकरणाऱ्यांविरोधात राज्यभरातमहावितरणच्या वतीने दि. 01सप्टेंबर 2018 पासून विशेषमोहिम राबविण्यात येणारअसून यात संबंधित ग्राहकांसहरिमोटची निर्मिती करणाऱ्याकंपनी विरोधातही कठोरकारवाई करण्यात येणार आहे.
महावितरणच्या वतीनेवीजचोरीवर आळाघालण्यासाठी सातत्याने विविधउपाययोजना करण्यात येतात.वीजचोरी रोखण्यासाठी संपूर्णराज्यात विशेष मोहीम राबवूनमोठया प्रमाणात कारवाईकरण्यात येते. परंतूअलीकडच्या काही वर्षातरिमोटद्वारे वीजचोरी होतअसल्याचे आढळून आले आहे.याबाबत मुंबईत आज दि. 30ऑगस्ट 2018 रोजी झालेल्यासंचालक मंडळाच्या बैठकीतअशा वीजचोरीच्या विरोधातविशेष मोहीम राबविण्याचा वकठोर कारवाई करण्याचानिर्णय घेण्यात आला आहे. हीमोहीम दि. 01 सप्टेंबर 2018पासून संपूर्ण राज्यातराबविण्यात येणार आहे. यामोहिमेत रिमोटद्वारे वीज चोरीकरणारे ग्राहक तसेच संबंधितकंपनीविरोधात कठोर कारवाईकरण्यात येणार आहे.
रिमोटद्वारे वीजचोरी होतअसल्याचे निदर्शनास आल्याससंबंधितांनी महावितरणलात्याची माहिती द्यावी. अशावीजचोरीची माहिती देणाऱ्यांनावीजचोरीच्या अनुमानितरक्कमेच्या 10 टक्के रक्कमरोख स्वरुपात बक्षीस म्हणूनदेण्यात येते. तसेच अशीमाहिती देणाऱ्याचे नाव देखीलगुप्त ठेवण्यात येते. त्यामुळेअशा वीजचोरीची माहितीदेण्याचे आवाहन महावितरणनेकेले आहे.
 चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांचा भीमपराक्रम

चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांचा भीमपराक्रम

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी- आ.अशोक उईके
अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी केला गुणगौरव
चंद्रपूर/:
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे अगदी सेलीब्रेटीच्या थाटात अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यांनी कौतुक केले. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम आदिवासी मुलांसाठी रोल मॉडल आहात. तुमचा पराक्रम संधीपासून वंचित असणा-या शेकडो मुलांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे, अशा शब्दात महाराष्ट्र विधी मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार अशोक उईके यांनी कौतुक केले. यावेळी समितीच्या अन्य आमदार सदस्यांनी या मुलांची मुलाखत घेत एव्हरेस्टच्या आठवणींना जागृती दिली. 
चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी आश्रम शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करुन चंद्रपूर जिल्हयात तसेच महाराष्ट्रासह देशात आपले नाव लौकीक केले आहे. अशा या विद्यार्थ्यांचा अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा विधान सभा सदस्य डॉ.अशोक उईके व समितीचे सदस्य आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार शांताराम मोरे, आमदार वैभव पिचड, आमदार पांडुरंग बरोरा, आमदार आनंद ठाकुर, आमदार श्रीकांत देशपांडे, उपसचिव राजेश तारवी, अपर सचिव संजय कांबळे व कक्ष अधिकारी दामोदर गायकर यांनी चंद्रपूरमध्ये आगमन झाल्यानंतर पहिली भेट आदिवासी विक्रमविरांची घेतली. समितीच्या सदस्यांनी यावेळी या मुलांना अनेक प्रश्न विचारले. या मुलांना त्यांच्या योग्यतेनुसार उच्चपदस्थ नौक-या मिळाव्यात. चांगल्या ठिकाणी त्यांना समाजाचे नेतृत्व करता यावे, याची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी समितीचे सदस्य आमदार वैभव पिचड यांनी केले. तर अन्य सदस्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेतले. चंद्रपूर ते एव्हरेस्ट हा प्रवास करतांना आलेल्या अडचणी, शासनाकडून झालेली मदत याबद्दलही समिती सदस्यांनी माहिती घेतली. या मुलांनी आदिवासी समाजाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. 

चंद्रपूर जिल्ह्यातील 10 आदिवासी विद्यार्थ्यांनी 16 मे रोजी एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा रोवला होता. याची दखल प्रधानमंत्र्यांनी थेट लालकिल्ल्यावरुन आपल्या भाषणात घेतली आहे. या विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: भेट घेऊन कौतुक केले आहे. राज्य शासनाने देखील एव्हरेस्ट सर करणा-यांना 25 लाख तर एव्हरेस्टवर चढाई करणा-या उर्वरित 5 विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयाची मदत केली आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात राज्याच्या आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला 'ऑपरेशन शौर्य ' च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. आज या मुलांचे समिती सदस्यांनी कौतुक करतांना अप्पर आदिवासी आयुक्त ऋषीकेश मोडक, प्रकल्प अधिकारी केशव बावनकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. 
समितीच्या सदस्यांनी यावेळी कवीदास काठमोडे, मनीषा धुर्वे, परमेश आडे, विकास सोयाम, आकाश मडावी, शुभम पेंदोर, छाया आत्राम, इंदू कन्नाके, अक्षय आत्राम या विद्यार्थ्यांचा आज शासकीय विश्रामगृह येथे सत्कार केला. यावेळी आमदार ॲड.संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदेचे व महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Thursday, August 30, 2018

चंद्रपुरातील दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द

चंद्रपुरातील दोन नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द

जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या राजकारणात खळबळी माजवून देणारी एक बातमी समोर आली आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दोघांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. यात भाजपचे श्याम कनकम आणि बसपच्या रंजना यादव यांचा समावेश आहे. तर आणखी दोन नगरसेवकांचे भवितव्य जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयावर अवलंबून आहे.यात भाजपचे अंकुश सावसाकडे व बसपचे पितांबर कश्यप,यांचा समावेश आहे.येत्या सहा महिन्यात परत निवडणुका घेतल्या जाऊ शकतातअशी माहिती आहे,




इंडिया पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक नागपूर शाखेचे 1 सप्‍टेंबरला केंद्रीय मंत्री गडकरींच्‍या हस्‍ते उद्धघाटन

इंडिया पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक नागपूर शाखेचे 1 सप्‍टेंबरला केंद्रीय मंत्री गडकरींच्‍या हस्‍ते उद्धघाटन

विदर्भातील 11 जिल्‍हयात 11 शाखा व 44 ‘अॅक्से्स पॉईटस्‌’ 1 सप्टेंबर पासून सुरू  होणार


नागपूर, 30 ऑगस्‍ट 2018
      केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्‍या अधीन डाक विभागातर्फे आय.पी.पी.बी. ( इंडियन पोस्‍ट पेमेंटस्‌ बँक ) च्‍या नागपूर शाखेचे उद्धघाटन 1 सप्‍टेंबर शनिवार रोजी जी.पी.ओ. बिल्डिंग, सिवील लाइन्‍स येथे दुपारी 2.30 वाजता केंद्रीय रस्‍ते वाहतूक, महामार्ग व केंद्रीय जलसंपदा मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते होणार आहे. याप्रसंगी राज्‍यसभेचे खासदार डॉ. विकास महात्‍मे, रामटेकचे खासदार श्री. कृपाल तुमाने व नागपूरातील आमदार प्रामुख्‍याने उपस्थित राहतील. आय.पी.पी.बी. बँक स्‍थापन करण्‍याचा उद्देश हा ‘वित्‍तीय समावेशन’ असून तळागाळातील सामान्‍यांना बॅकींग क्षेत्राच्‍या कक्षात आणून त्‍यांचे जीवनमान उंचावणे हा आहे, अशी माहिती नागपूर विभागाचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी जी.पी.ओ.मध्‍ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालक शशिन राय, आय.पी.पी.बी. बँक नागपुरचे शाखा व्यवस्थापक अभिजीत जिभकाटे उपस्थित होते.

देशभरात सुरूवातीला   650 शाखा व 3250 अॅक्‍सेस पॉईटस यांच्‍या माध्‍यमातून 1 सप्‍टेंबर 2018 पासून आय.पी.पी.बी. च्‍या सुविधा सुरू होतील तर 31 डिसेंबर पर्यंत उर्वरित सुमारे 1.55 लाख अॅक्‍सेस पॉईटस कार्यरत होतील.नागपूर विभागातील 11 जिल्‍हयात 11 शाखा व 44 अॅक्‍सेस पॉईटस 1 स्‍प्‍टेंबर पासून सुरू होतील.

 आय.पी.पी.बी. मध्ये कॅशलेस व्‍यवहाराकरिता ‘क्‍यूआर कार्ड’ उपयोगाचे असून व्‍यापारी,व्‍यावसायिक यांना या कार्डद्धारे डिजीटल व्‍यवहार करता येणे शक्‍य होईल.बँकेतर्फे मनी ट्रांन्‍सफर, थेट लाभ हस्‍तातरंण, देयकाचा भरणा व मोबाईल बॅकिंग अॅप, मायक्रो- ए.टी.एम., आर. टी. जी.एस, आय.एम.पी.एस.  या सुविधा अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्‍ध राहतील. आय.पी.पी.बी. च्‍या   ‘क्‍यूआर कार्डचे’ वितरण निवडक खातेधारकांना कार्यक्रमस्थळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्यात येईल. 

या बँकेत खाते उघडण्यासाठी आधार संलग्नित ‘इ-केवायसी’ यंत्रणेचा अवंलब केला जात असल्याने ग्राहकांना कोणतेही कागदपत्र बाळगण्याची गरज नाही. ग्राहक आय.पी.पी.बी. पोर्टलवर जाऊन ऑनलाईन डिजीटल खातेसुद्‌धा उघडू शकतात. आय.पी.पी.बी.  च्या खात्याची जमा क्षमता ही 1 लक्ष असून 1 लक्ष पेक्षा जास्त रक्कम ही त्या ग्राहकाच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये पी.पी.एफ., सुकन्या समृद्‌धी योजना, यासारख्या बचतीच्या साधनांमध्ये वळवली जाते.  आय.पी.पी.बी.  च्या खात्यामधून खातेदारांना पोस्ट ऑफिसच्या स्पीड पोस्ट , पार्सल डिलीव्हरी अशा सेवांचे डिजीटल पेमेंटही करता येईल.

आय.पी.पी.बी चे राष्‍ट्रीय स्‍तरावर उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्‍ते नवी दिल्‍लीतील ताल कटोरा स्‍टेडियम येथे होणार असून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही नागपूरातील कार्यक्रमस्‍थळी दाखविण्‍यात येणार आहे. ‘आपका बँक आपके द्वार’ या ब्रीदवाक्याला अनुसरुन ग्राहकांना थेट बँकींगच्या सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूरात स्थापन होणा-या आय.पी.पी.बी.  च्या उद्‌घाटन कार्यकमाला सर्व व्यावसायिक, दुकानदार, वरिष्ठ नागरिक,विद्यार्थी , निवृत्तीधारक यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन नागपूर विभागाचे पोस्‍टमास्‍टर जनरल श्री. रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.
महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार!

महाबोधी विहारासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणार!


८४ व्या वाढदिवशी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा निर्धार

नागपूर, ता. ३० : जेव्हापासून बुध्द आणि बाबासाहेब समजले तेव्हापासून बुध्द धम्मासाठीच आयुष्य समर्पित केले. हे कार्य पुढेही असेच सुरू राहणार आहे. आज वयाची ८४ वर्षे पूर्ण केली तरी बरेच कार्य पुढे न्यायचे आहेत. बुध्दगया येथील महाबोधी महाविहाराच्या मुक्तीलढ्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणार, असा निर्धार दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केला.

इंदोरा बुध्द विहार सार्वजनिक संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता. ३०) भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा ८४ वा वाढदिवस व ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

इंदोरा येथील बुध्द विहारात आयोजित कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा, नागपूर महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका स्नेहा निकोसे, ममता सहारे, ॲड. भास्कर धमगाये, अमित गडपायले, मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, ॲड. अजय निकोसे उपस्थित होते.

समाजातील सर्व नेत्यांनी पक्षभेद विसरून बुध्दगया महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौध्दांच्या ताब्यात असावे यासाठी उभारलेल्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहनही यावेळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. आज जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुध्दाच्या धम्माची गरज आहे. प्रत्येकाने बुध्द आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात केल्यास उन्नती होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी मंत्री नितीन राऊत म्हणाले, महाबोधी विहाराचा मुक्तीलढा, मनसर येथील उत्खनन, हुसेन सागरातून बुध्दांची मूर्ती काढणे अशा अनेक आंदोलनात भदंत सुरेई ससाई यांच्याशी संपर्क आला. नागपुरात निवासाला असले तरी भदंत ससाई यांनी देशभरात बुध्द व बाबासाहेबांचे विचार रुजविण्यासाठी कार्य केले, त्यांचे कार्य आज पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई वयाच्या १४ व्या वर्षी भिक्खू झाले. त्यांचे नाव तेन्जी ससाई होते. तेन्जी म्हणजे प्रकाश व ससाई म्हणजे पर्वताएवढा. आज भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे कार्य पाहता त्यांनी नावाप्रमाणेच उंची गाठली आहे, अशी भावना यावेळी सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केली. १५ ऑक्टोबर १९५६ ला टाऊन हॉलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकले व धन्य झालो. बाबासाहेबांना जेव्हापासून समजू लागलो तेव्हापासून त्यांचा फोटो खिशात ठेवू लागलो. आज बहुजन समाजाचा उपयोग शस्त्रासारखा होत आहे. त्यामुळे त्या शस्त्रांशी न भांडता शस्त्र पकडलेल्या हातावर वार करण्याची गरज आहे, असे मत इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख यांनी व्यक्त केले. मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये व विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांनीही आपल्या भाषणात भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

जपानमधून भारतात येऊन इथे बौध्द धम्माच्या उत्थानासाठी कार्य करणे ही संपूर्ण भारतवासीयांना प्रेरणा देणारी बाब आहे. आज देशातील परिस्थिती लक्षात घेतल्यास भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी हाती घेतलेले कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यावेळी मनपाचे कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी यावेळी केले.

प्रारंभी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना इंदोरा बुध्द विहार कार्यकारिणीतर्फे शाल, स्मृतीचिन्ह, चिवरदान, पुष्पगुच्छ देउन गौरविण्यात आले. दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त सुधीर फुलझेले, विलास गजघाटे व प्राचार्य डॉ. पी.सी. पवार यांनीही भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सत्कार केला. यावेळी इतिहासकार प्रा. एम.एम. देशमुख, सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठाचे माजी उपकुलपती प्रा. एन.एस. गजभिये, विदर्भ विकास महामंडळाचे सदस्य देवाजी तोफा यांचा भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण नागदिवे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव अमित गडपायले व उपाध्यक्ष ॲड. भास्कर धमगाये यांनी केले. भंते नागघोष यांनी बुद्धवंदना तर अशोक जांभुळकर यांनी संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील अंडरसहारे, ॲड. अजय निकोसे, विजय इंदुरकर, रोशन उके, आनंद राउत, विक्रांत गजभिये, संदीप कोचे, प्रसेनजीत डोंगरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला भिक्खू संघ, नालंदा वसतीगृहातील विद्यार्थिनी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
चंद्रपुरातील सर्व गणेश मंडळाची मीटिंग आज सायंकाळी 6 वाजता

चंद्रपुरातील सर्व गणेश मंडळाची मीटिंग आज सायंकाळी 6 वाजता

चंद्रपुर शहरातील सर्व  गणेश मंडळांना गणपती उत्सवा निमित्य काही महत्त्वाचे सूचना  शहर पोलीस स्टेशन येथे आज  दिनांक,३०/८/२०१८  सायंकाळी ठीक 6 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी नायक यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व गणेश मंडळांंच्या अध्यक्ष व कमिटी मेंम्बर यांनी शहर पोलीस स्टेशन चंद्रपुर येथे हजर राहवे.


वर्ध्यात अस्वलीचा शेतकऱ्यावर हल्ला

वर्ध्यात अस्वलीचा शेतकऱ्यावर हल्ला

वर्धा/प्रतिनिधी:
वर्धा जिल्हातील पारडी,रिधापुर  शिवारात अस्वलाचा धुमाकूळ आज मौझा पारडी येथील श्री प्रभाकर रामराव सरोदे वय 55 धंदा शेती यांच्या जवळ 7एकर कोरडवाहू शेती रिधापुर शिवारात असून सदर शेतकरी आज पत्नी सोबत शेतात गेले असता शेतात अचानक पणे अस्वल अंगावर हल्ला करण्याकरिता धावून आली आणि प्रभाकर सरोदे यांना गंभीर रित्या झखमी केले,सोबत असलेली पत्नी शोभाबाई प्रभाकर सरोदे यांच्या आरडाओरडा केल्याने शेजारी असलेले शेतकरी धावून आले आणि झखमी प्रभाकर यांचा प्राण वाचविण्यास यश आले,सदर प्रकरणाची माहीत वन विभाग तळेगाव यांना देताच घटनास्थळी वनविभाग ची गाडी पाठून झखमी इसमास गव्हमेंट मेडिकल कॉलेज नागपूर  येथे उपचाराकरिता हलविण्यात आले.

    तसेच सुसुंद्रा तालुका कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथील राहुल फुले यांच्या माहितीवरून आज दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान नाना सामटकर वय 40 धंदा शेती हे आज बैल चारण्याकरिता शेतात गेले असता अचानक नाना सामटकर  हांच्या अंगावर अस्वल धावून आली परंतु सुदैवाने इतर शेतकर्यांच्या मदतीने स्वतःचा प्राण वाचविणे शक्य झाले तरी असून अनेक दिवसांपासून अस्वलाचा धुमाकूळ असून कुठलेही उपाययोजना होत नसल्याने अनेक गावा गावात वनविभागविषयी रोष निर्माण होत आहे एकीकडे शेतकरी जगाचा पोशिंदा समजल्या जाते पण शेतकऱ्यांवरच हा अन्याय का हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये तयार झालेला असून सदर वनविभाग तळेगाव यांनी त्वरित अस्वलाचा बंदोबस्त करावा ही विनंती गावातील लोकांकडून करण्यात आली आहे.


राष्ट्रीय क्रीडा दिनी दिले युवकांनी व्यायाम शाळेसाठी निवेदन

राष्ट्रीय क्रीडा दिनी दिले युवकांनी व्यायाम शाळेसाठी निवेदन

वर्धा/प्रतिनिधी:
आपल्या कारंजा नगरीतील युवकांना या जागतिक स्पर्धेचा युगात शारीरिक सूदृष्ट्या जोपसन्याकरीता व्यायाम शाळेची अत्यंत आवश्यकता आहे.
पाणलोट समिती अंतर्गत ग्रामपंचायत ला सन २०१४ ला व्यायाम शाळेचे साहित्य प्राप्त झालेले आहे तरी जागे अभावी व ईमारत नसल्यामुळे ते साहित्य निरोपयोगी ठरत आहे.
   ही बाब लक्षात घेता या स्पर्धेच्या युगात शारीरिक सुदृष्ट्या व्यायाम शाळेकरीता नगर पंचायत कडून ईमारत बांधकामाबाबत मा.मुख्याधिकारी न. पं.कारंजा (घा.)यांच्याकडे युवकांनी  निवेदन सादर केले.
   त्या वेळी नगर पंचायत चे पदाधिकारी उपस्थित असून मुख्याधिकारी सह त्यांनी देखील निवेदन स्वीकारले.



साई मित्र परिवार, कारंजा(घा) चा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात

साई मित्र परिवार, कारंजा(घा) चा केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात

चंद्रपुर/प्रतिनिधी:

कारंजा येथील अनेक वर्षांपासून समाजसेवेचे ब्रीद घेतलेल्या साई मित्र परिवार गृप तर्फे केरळ राज्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने विस्कळीत झालेल्या जनजीवनाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी समाजसेवी युवकांद्वारे माणुसकीचा आधार देत मदतनिधी संकलनाचे कार्य दि.२४/०८/२०१८ ते दि. २७/०८/२०१८ राबविण्यात आले. या काळात युवकांनी कारंजा परिसरातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयांना तसेच गावातील नागरिकांना भेटी देऊन केरळ येथील परिस्थिती समजावून सांगून पूरग्रस्त लोकांच्या मदतीकरिता शक्य तेवढा निधी देण्याची विनंती केली व तेवढाच प्रतिसाद लोकांनी दिल्याने एकूण १४,९५०/-(अक्षरी रुपये चौदा हजार नऊशे पन्नास फक्त) एवढा निधी जमा झाला.
हा निधी जरी तुलनेत कमी जरी वाटत असला तरी माणुसकीचा विचार करता पैशापेक्षाही मनाची मदत व लोकांच्या मनात आपल्या पूरग्रस्त बांधवांसाठी असलेली कळवळ या निमित्ताने दिसून आली.
हा निधी सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ येथील थेट केरळ राज्यात टीम राहत मिशनद्वारे कार्यरत असलेल्या एकूण ५० आजी-माजी विद्यार्थी ज्यात आपल्या महाराष्ट्रातील ३५ युवक व १५ युवतींचा समावेश आहे त्यांना हा निधी पाठविण्यात आला. 
हे युवक सध्या तेथे सक्रिय कार्यरत असल्याने त्यांच्या मदतकार्याला अजून पाठबळ मिळण्यासाठी हा निधी थेट केरळ राज्यात पाठविण्यात आला.
साई मित्र परिवार कारंजा परिसरातील सर्व सन्माननीय नागरिकांनी माणुसकीच्या या कार्याला मदत केल्याबद्दल सलाम करतो व भविष्यात सुद्धा आपणा सर्वांपासून सहकार्य असेच लाभत राहील अशी अपेक्षा करतो.

Wednesday, August 29, 2018

कोलमाफिया हाजी अटक

कोलमाफिया हाजी अटक

यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या कोलमाफिया शेख हाजी शेख सरवरला त्याच्या तीन साथीदारासह पोलिसांनी केली अटक करण्यात आली आहे. शेख हाजीवर यापूर्वी शहर पोलीस स्टेशनमध्ये तीन, घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये दहा, भद्रावतीमध्ये एक, गडचांदूरमध्ये एक गुन्हा आहे.

नेटसर्फ’चा व्यवसाय स्मार्टफोन्सवरून!

नेटसर्फ’चा व्यवसाय स्मार्टफोन्सवरून!

 डोअर-टू-डोअर झाले जुने, आता  जमाना स्क्रीन-टू-स्क्रीन चा

नागपुर, 29, ऑगस्ट 2018:
आज, तंत्रज्ञानाचा परिणाम प्रत्येक बिझनेस मॉडेलवर दिसतो. यामुळे व्यापार वाढीला मोठी गती मिळाली आहे व याला डायरेक्ट सेलिंगचा व्यवसायही अपवाद नाही. डायरेक्ट सेलिंग ही भारतातील एक जुनी आणि साधी उत्पादन वितरण यंत्रणा आहे. या यंत्रणेत, कंपन्या सामान्य व्यक्तींची नियुक्ती करतात, त्यांना डायरेक्ट सेलर्स म्हटले जाते. कोणत्याही विक्री ठिकाणापासून दूर अधिकृत लोक ग्राहकांसाठी उत्पादन विक्रीचे आयोजन करतात. जे प्रदर्शन, नमुने तयार करणे, उत्पादनांच्या साक्षीदारांची मतं प्रसारित करणे अशा पद्धतीच्या विक्री तंत्राभोवती फिरते. ज्यामुळे उत्पादने मित्रपरिवार, नातेवाईक, सहकारी आणि ओळखीच्यांना विकणे शक्य होते. अलीकडे ग्राहकवाद बराच वाढला असल्याने एफएमसीजी उत्पादनांना मागणी झपाट्याने वाढली आहे. संघटीत विक्री हे एक वेगाने वाढणारे क्षेत्र असून त्याने डायरेक्ट सेलिंग उद्योगाच्या आश्वासक वाढीला मार्ग करून दिलेला आहे. डायरेक्ट सेलिंग हे एक उद्योगक्षेत्रच आहे, जे व्यवसायाच्या विविध नैसर्गिक पैलूंच्या शोधाकरिता तंत्रज्ञानाने नेहमीच अद्ययावत राहते.

महाराष्ट्रातील पुणे येथे 2001 मध्ये नेटसर्फची स्थापना झाली असून भारताच्या 22 राज्यांमधील निरनिराळ्या स्तरातील स्त्री-पुरुषांचे मागील 17 वर्षांपासून सबलीकरण घडते आहे. महाराष्ट्रात नेटसर्फचे नेटवर्क नैसर्गिक व जैविक उत्पादने तसेच त्यांच्याशी निगडीत व्यवसाय संधींमार्फत राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये पसरले आहे. नेटसर्फ नेटवर्कने मागील आर्थिक वर्षात रु. 176 कोटींची उलाढाल केली. नेटसर्फचे 9 स्टॉक पॉइंट्स   (अशा जागा जिथून डायरेक्ट सेलर्सना नेटसर्फ उत्पादने विकत घेता येतात) नागपुरात आहेत. अलीकडे आर्थिक वर्ष  2017-18 दरम्यान नेटसर्फची महाराष्ट्रात रु. 59 कोटींची उलाढाल झाली असून यावर्षात नेटसर्फची एकूण उलाढाल 33.3% इतकी नोंदवली गेली.

याप्रसंगी बोलताना नेटसर्फ कम्युनिकेशन्स प्रा. लि.चे सीओओ श्री. केतन गानू म्हणाले की, “भारतीय डायरेक्ट सेलिंग उद्योगक्षेत्राचा मुद्दा येतो तेव्हा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आम्हाला अद्वितीय बनवते. नेटसर्फ तंत्रज्ञानाचा वापर करून डायरेक्ट सेलर्ससाठी डायरेक्ट सेलिंग व्यवसायाच्या प्रत्येक पैलूला सुलभ बनवते. नेटसर्फ व्यवसायाच्या या तंत्रज्ञान विषयक सुलभतेकडे युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाला आहे.

बिझनेस मॉडेल, ग्राहकांची बदलती वागणूक आणि डायरेक्ट सेलर्सच्या व्यापार करण्याच्या पद्धतीत डायरेक्ट सेलिंग उद्योग क्षेत्र अनेक आव्हानांचा सामना करते आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून, नेटसर्फने आपल्या डायरेक्ट सेलर्सच्या अशा अनेक समस्या सोडविल्या.

डायरेक्ट सेलिंगमधील तंत्रज्ञान
अ.   व्यापार करताना सुलभता: 
सुरुवातीला अधिकृत डायरेक्ट सेलर्स त्यांच्या भावी ग्राहकाला स्वत: भेटत असे, त्याला उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखवत असे, जी एक वेळकाढू प्रक्रिया होती. आता तंत्रज्ञान बदलल्यामुळे, नेटसर्फचे डायरेक्ट सेलर्स हे ग्राहकाला उत्पादनांचे व्हिडीओ शेअर करू लागले आहेत. जर उत्पादन चांगले वाटले तर ग्राहकाला ते डायरेक्ट सेलरच्या वेबपेजवरून विकत घेता येते! ग्राहकासाठी खरेदीचा अनुभव उत्तम असावा याची खातरजमा करण्यासाठी उत्पादन 2-4 कार्यालयीन दिवसांत ग्राहकापर्यंत पोहोचते. मागील आर्थिक वर्षात नेटसर्फने आपले डायरेक्ट सेलर्स आणि ग्राहकांकरिता 150 हून अधिक व्हिडीओंकरिता डिजीटल कंटेंट तयार केला आहे.
 
ब.    सेमिनार्सची जागा वेबीनार्स घेत आहे:
डायरेक्ट सेलिंगच्या बाजारात सेमिनार्सचे आयोजन करणे ही एक नियमित गोष्ट मानली जाते. ज्यामुळे डायरेक्ट सेलरला मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळतात. तरीच अलीकडे, वेबीनार्समुळे उद्योगक्षेत्रात सेमिनार तसेच प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याचा संपूर्ण अनुभवच बदलला आहे. शिक्षण हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल.

नेटसर्फमध्ये आम्ही अशी वेबीनार्स घेतो, जिचा फायदा डायरेक्ट सेलर्सना तर होईलच; शिवाय विविध भौगोलिक ठिकाणच्या संभाव्य ग्राहकांच्या मोठ्या संख्येला होईल. हे अतिशय किफायतशीर तसेच डायरेक्ट सेलर्स व ग्राहकाच्या दृष्टीने सुलभ ठरते. नेटसर्फने अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आधीपासूनच फेसबुक लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हची सुरुवात केली आहे. 

क.    व्यवसाय करताना सहजता:
मोबाईल अप्लिकेशन्सने डायरेक्ट सेलिंग व्यापाराच्या पद्धतीत क्रांती घडवली. ‘नेटसर्फ नेटवर्क मोबाईल अॅप’ डायरेक्ट सेलर्सना त्यांचा व्यापार ऑन-द-गो वापरायची संधी देते व ग्राहकांची सर्वोत्तम खरेदी अनुभव घेण्याची इच्छा पूर्ण करतो. आज 125,000 पेक्षा अधिक डायरेक्ट सेलर्स नेटसर्फच्या मोबाईल अँपच्या माध्यमातून त्यांचा दैनंदिन व्यवसाय करत आहेत. नेटसर्फ मोबाईल अॅप त्यांना अनेक कार्ये सहजतेने करण्यासाठी साह्य करते. जसे की, गेस्ट लिस्ट तयार करणे व त्यांची वर्गवारी बनवणे, सेमिनार्सचे आयोजन करणे, पाहुण्यांना सेमिनार्सचे आमंत्रण देणे, सोशल कंटेट सोशल मीडियावर देऊन व्यवसाय निर्मिती करणे, भारतात होणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंगला हजर राहणे, उत्पादनांची पुनर्खरेदी करणे व डिलिव्हरीचे व्यवस्थापन करणे. 

प्रत्येक डायरेक्ट सेलरला अशाच पद्धतीच्या कठीण स्थितीचा सामना ग्राहक लक्ष वेधण्यासाठी करावा लागतो- अनेकदा ग्राहकांना डायरेक्ट सेलिंगची उत्पादने आवडतात, व उत्पादनांची आवश्यकता वाटते आणि त्यांना ती पुन्हा विकतही घ्यायची असतात. मात्र ग्राहक प्रत्यक्षात त्यांची खरेदी करू शकत नाहीत, कारण ज्यांनी सुरुवातीला उत्पादन विकलेले असते, त्या डायरेक्ट सेलरसोबत काही संपर्क उरलेला नसतो. इथेच संभाव्य प्रामाणिक ग्राहक हातातून सुटतो! तर कधी ग्राहक कंपनीने घेतलेल्या डायरेक्ट सेलिंगसाठीच्या मार्केटींग प्रयत्नांनी खेचला जातो व त्याला उत्पादन वापरायची इच्छा असते. परंतु, पारंपरिक बाजारात शेल्फवर उत्पादन उपलब्धच नसते. आता हे उत्पादन मिळवण्यासाठी पुन्हा डायरेक्ट सेलरला कसे गाठायचे हे ग्राहकाला माहीत नसते.

नेटसर्फने जिओ  नावाचा जिओलोकेशन-बेस्ड प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. ज्यामध्ये ग्राहकाचे फिजिकल लोकेशन वॅल्यूएबल डेटामध्ये परावर्तीत करण्यात येते. हा डेटा वापरून संपूर्ण ग्राहक अनुभव सुलभ आणि सहज होऊन जातो. या मंचावर स्पष्टपणे डायरेक्ट सेलर्स (ज्यांच्याकडे विक्री उत्पादनांचा साठा आहे) स्क्रीनवर आसपास दिसतात. ग्राहकांना केवळ सर्वात आश्वासक डायरेक्ट सेलरची निवड करायची असते, जो त्यांना कमीतकमी वेळेत उत्तम सेवा आणि उत्पादनाची किफायतशीर किंमत देईल! अशाप्रकारच्या तंत्रज्ञान आधारीत अद्यायावतीकरणामुळे नेटसर्फ नेटवर्कच्या डायरेक्ट सेलिंग पद्धतीत बरीच पारदर्शकता आणली आहे. ग्राहक हा मंच कोणत्याही स्क्रीनकरिता वापरू शकतात, डेस्कटॉप अथवा स्मार्टफोन्स; दोन्ही! या मंचामुळे केवळ ग्राहकाचे सबलीकरण होत नाही, तर डायरेक्ट सेलिंग व्यवसायालाही चालना मिळते. भारतात वस्तू विक्रीकरिता घरोघरी गेल्यावर मिळणाऱ्या ग्राहकांच्या नकाराला मिळालेले हे ठोस उत्तर आहे. अशा डिजिटल मंचांमुळे कंपन्यांना आपली ग्राहक संख्याबळ (कन्झ्युमर बेस) राखायला मदत होते, हे सांगायची आवश्यकता नाही.

तंत्रज्ञान विकास केवळ व्यवसाय काम आणि सुलभतेसाठी नाही, तर ग्राहक, डायरेक्ट सेलर आणि त्याचवेळी कंपनीचे सबलीकरण करण्यासाठी आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग आणि सोशल मीडिया नेटसर्फ नेटवर्ककडे मोठ्या प्रमाणावर सहस्त्रकातील तरुणांना आकर्षित करत आहेत.
नैसर्गिक, हर्बल ग्राहक उत्पादने
कोणताही डायरेक्ट सेलिंग व्यवसाय हा त्याचा प्रकार आणि कंपनी देऊ करत असलेल्या उत्पादनांचा दर्जा या अनुसार  बाजारात अधिराज्य गाजवतो. नेटसर्फचा कायमच भर हा नैसर्गिक आणि हर्बल उत्पादने तयार करण्यावर आणि त्यांचा प्रसार करण्यावर राहिला आहे. अधिकाधिक ग्राहक हे नैसर्गिक आणि हर्बल जीवनशैली स्वीकारू पाहत आहेत, त्यांच्यासाठी नेटसर्फ’ची उत्पादने अतिशय सुयोग्य आहेत. नेटसर्फ ग्राहक ब्रँड 4 प्रमुख वर्गवारी (एकूण 53 उत्पादने) मध्ये निर्मिती व विपणन करते. उदाहरणार्थ, बायोफिट- अॅग्रीकल्चर ( नागपुरात 46% उलाढाल), नेचरमोअर- हेल्थ केअर (नागपुरात 33% उलाढाल), हर्ब्ज अँड मोअर- पर्सनल केअर (नागपुरात 20% उलाढाल), आणि अलीकडे अनावरण करण्यात आलेला क्लीन अँड मोअर- होम केअर (नागपुरात 1% उलाढाल). नागपुर मध्ये उच्च कामगिरी बजावणारी उत्पादने आहेत, स्टिमरिच, नेचरामोअर फॉर विमेन, बायो-95 इमल्सीफायर, नेचरामोअर वेनिला, SHET

व्यवसाय संधी
नेटसर्फ’ची व्यवसाय संधी अतिशय पारदर्शक आहे, ती समजायला सोपी आणि वापरायला सुलभ आहे. ही प्रत्येकाला त्याच्या/तिच्या स्टाईलप्रमाणे अधिकाधिक वापरायची संधी देते. नेटसर्फ चांगली उत्पादने देऊ करतात आणि या उत्पादनांच्या विपणनाकरिता आम्ही डायरेक्ट सेलर्सना नियुक्त करतो, जे स्वत:च्या उपयोगासाठी सवलतीच्या दरात ही उत्पादने विकत घेतात किंवा ते त्यांच्या सोशल सर्कलमध्ये त्यांची विक्री करतात. या बिझनेस मॉडेलमध्ये, पारंपरिक मॉडेलप्रमाणे वितरक व विक्रेत्यांना कमिशन देण्याऐवजी आपल्या डायरेक्ट सेलर्सना उत्पादनांचा प्रचार-प्रसार केल्याबद्दल नेटसर्फ इन्सेन्टीव्ह देते. 
आज आमच्याकडे 240 हजार कार्यशील डायरेक्ट सेलर्सचे नेटवर्क आहे.
दर महिन्याला नेटसर्फकडे सरासरी 13,200 नवे डायरेक्ट सेलर्स दाखल होतात.
अतिशय संतुलित जनसांख्यिकीसोबत 40% शहरी व 60% ग्रामीण डायरेक्ट सेलर्स आहेत.  \

महिला सबलीकरण
डायरेक्ट सेलिंग ही भारतीय महिलांसाठी सर्वोत्कृष्ट करिअर असल्याचे दर्शविते. कारण त्यामुळे त्या कामकाज आणि आयुष्यात सहज संतुलन साधू शकतात. नागपुरमध्ये नेटसर्फ नेटवर्कमध्ये अंदाजे 11,000 अस्मिता (महिला) डायरेक्ट सेलर्स आहेत. या अस्मिता डायरेक्ट सेलर्सने नागपुरमध्ये आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यानच्या एकूण उलाढालीच्या   30.40 % योगदान दिले आहे.
डायरेक्ट सेलिंगची मार्गदर्शक तत्वे 2016
एक स्वागतार्ह बातमी म्हणजे भारत सरकारने भारतात डायरेक्ट सेलिंगची मार्गदर्शनपर तत्वे लागू केली आहेत. काही कंपन्यांकडून सुरू असलेल्या फसवेगिरीला आळा बसण्याच्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल म्हणावे लागेल. अस्तित्वातच नसलेल्या कंपनीत लोक पैसे गुंतवत जातात आणि अशातऱ्हेने बनाव रचला जातो. नेटसर्फ डायरेक्ट सेलिंग उद्योगक्षेत्राच्या वाढीसाठी प्रेरीत आणि सकारात्मक आहे. हे ग्राहकोपयोगी आहे. नेटसर्फचे कामकाज हे कायदेशीर पद्धतीने चालते. ही उद्योगक्षेत्रातील दुसरी कंपनी आहे, जी डिसेंबर 2016 मध्ये सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स ऑफ इंडियासोबत नोंदणीकृत आहे.

रोजगार निर्मिती
अनेक युवक हे आज वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसाय संधींनिमित्त स्थलांतरीत होत आहेत, ज्यामुळे त्यांना जीवनशैलीशी तडजोड करावी लागते. उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या येते, ज्यामुळे शहरांचा सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय समतोल ढासळतो. डायरेक्ट सेलिंग उद्योगक्षेत्रात आलेल्या डिजीटल क्रांतीसोबत आज डायरेक्ट सेलर्स आपल्या गावांतून भारतात कुठेही उत्पादने विकू शकतात.

केपीएमजी रिपोर्ट अनुसार, महाराष्ट्राच्या डायरेक्ट सेलिंग उद्योगात 2025 मध्ये संभाव्य उलाढाल रु. 7000 कोटींचा टप्पा गाठेल. नेटसर्फ, महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यांमध्ये अस्तित्वात आहे, राज्यातील अनेक घटकांत उलाढाल वाढवायची भक्कम शक्यता डायरेक्ट सेलिंगमध्ये आहे. अद्ययावत तांत्रिक विकासासोबत, नेटसर्फने नवीन पिढीसोबत संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने डायरेक्ट सेलर्ससोबत रिलेशनशीप प्लान तयार केला. नेटसर्फला त्यांचा 17 वर्षांचा व्यवसाय वारसा पुढच्या पिढीकडे सोपवायचा असल्याने या आर्थिक वर्षात सहस्त्रकातील युवा वर्गात डायरेक्ट सेलर्सची संख्या वाढवण्याकडे 100% भर देण्यात येतो आहे. महाराष्ट्रात आर्थिक वर्ष 2018-19 दरम्यान नेटसर्फने 100% वाढ नोंदवली. एकंदर महाराष्ट्रात नागपुरमध्ये देखील अशाच पद्धतीची वाढ अपेक्षित आहे. 2018 मध्ये नेटसर्फची ‘नेटसर्फ डायरेक्ट’ नावाने अमेरिकेतील डायरेक्ट सेलिंग मार्केटमध्ये उतरण्याची योजना आहे. जी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2018 दरम्यान पूर्णपणे कार्यरत होईल. अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणारी ही पहिली भारतीय डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. नेटसर्फची अमेरिकेत गेली 28 वर्षे डायरेक्ट सेलिंग उद्योगात कार्यरत असलेल्या ‘सर्विस क्वेस्ट’सोबत भागीदारी असून, हे नाव या क्षेत्रात नावाजलेले आहे. शिवाय त्यांच्या गाठीशी 700हून अधिक कंपन्यांना लॉन्च केल्याचा अनुभव आहे. 
चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल 
ललित लांजेवार:
हि बातमी शिक्षक वर्गात खळबळ माजविणारी बातमी आहे.चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात असलेल्या एका उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग शिकवणीच्या कारणावरून झालेल्या वादाला भलतेच वळण मिळाले आहे, अन हा वाद पोलीस ठाण्यात पोहचला आहे.
शहरातील लालपेठ परिसरातील प्रगती एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित सूरज हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याधापकावर महिला शिक्षिकेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील सूरज हिंदी उच्च प्राथमिक शाळेत कुणाल(बदललेले नाव) हे गेल्या १५ वर्षाहून अधिक वर्षापासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत,याच शाळेत मोनाली(बदललेले नाव) ह्या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे,या शाळेतील ८ शिक्षक शिक्षिकेचा स्टाफ या मुख्याध्यापकांकडे आहे. अश्यातच मुख्याध्यापकाने वारंवार माझ्या वर्गाकडे नजर ठेवत मला वारंवार शिवणीचा लेखाझोका मागवीत असतात व अश्यातच गेल्या काही दिवसांपासून मला मानसिक व शारीरिक छळ होत आहे, असा आरोप करत महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,महिला शिक्षिकेच्या बयाणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार मी माझ्या मुख्याध्यापकाचे कार्य व्यवस्तीत रित्या पार पाडतो मात्र शिक्षक त्यांचे शिकवणीचे कार्य पार पडत नाही,शासन त्यांना पगार देतो व त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेणे माझी जिम्मेदारी आहे. तक्रारदार महिला शिक्षिका ह्यांच्या वर्गावर मी विद्यार्थ्यांची शिकवणी वर्गात गेल्यावर तपासणी केली असता विध्यार्थ्यांना वाचता लिहिता येत नाही, गणितातले गुणाकार भागाकार येत नाही व त्यामुळे मी त्यांच्या वर्गावर जाऊन विध्यार्थ्यांना विचारपूस केली.व रोजनिशी वही मागविली असता त्या संतापल्या व त्यांनी मला अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.असे सांगितले. 
या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापकावर कलम ३५४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिक्षिकेवर अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कलम २९४,५०६ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील पुढील  तपास शहर पोलीस करीत आहे.

Tuesday, August 28, 2018

बुधवारी नागपुरातील अनेक नागरी भागातील वीज पुरवठा बंद राहणार

बुधवारी नागपुरातील अनेक नागरी भागातील वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर/प्रतिनिधी:
अत्यावश्यक देखभाल दुरुस्ती, मेट्रो रेल्वे तसेच पायाभूत आराखडा योजनेत उभारण्यात आलेल्या वीज वाहिन्यांवर रोहित्र लावण्यासाठी महावितरणकडून बुधवार, दिनांक २९ ऑगस्ट २०१८ रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील अनेक नागरी भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते १० या काळात चुनाभट्टी, मध्यवर्ती कारागृह परिसर, अजनी चौक, माऊंट कॅरामल शाळा, प्रशांत नगर, समर्थ नगर,भगवाघर ले आऊट, काचीपुरा, रामदासपेठ, महाजन मार्केट परिसर, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत राहते कॉलनी, न्याय सहायक प्रयोग शाळा, धंतोली, काँग्रेस नगर, रामदासपेठ कॅनॉल रोड, नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, गजानन नगर,उरुवेला कॉलनी, छत्रपती नगर,सहकार नगर, राजीव नगर,राम नगर,हिल टॉप, मुंजेबाबा आश्रम, वर्मा ले आऊट, सुदाम नगरी, पांढराबोडी, संजय नगर, सुभाष नगर, तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, नाईक ले आऊट, शास्त्री ले आऊट, जयताळा,त्रिमूर्ती नगर,नेलको सोसायटी, दीनदयाल नगर,जीवन छाया सोसायटी, त्रिमूर्ती नगर बगीचा, भामटी, सुजाता ले आऊट, जय हिंद नगर,कापसे ले आऊट, स्वावलंबी नगर,इंद्रप्रस्थ नगर, टेलिकॉम नगर,संचयनी प्रेस्टिज, रवींद्र नगर,बंडू सोनी ले आऊट, कॉसमॉस टाउन,चिंच भवन, वैशाली नगर,राजाराम नगर, कचोरे पाटील नगर, नरसाळा या बहागातील वीज पुरवठा बंद राहील.
सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत तेलंगखेडी, अमरावती मार्ग, मरारटोली, या भागातील वीज बंद राहील. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत माटे चौक, धरमपेठ, आठ रास्ता चौक, लक्ष्मी नगर, भांडे ले आऊट, पन्नास ले आऊट, तपोवन,सोनेगाव, सहकार नगर,जयप्रकाश नगर,नरकेसरी ले आऊट, कन्नमवार नगर,कर्वे नगर,शिवणगाव, भोसले नगर,बिट्टू नगर, अग्ने ले आऊट, सावरकर नगर,खामला येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत अत्रे ले आऊट, सुरेंद्र नगर, तात्या टोपे नगर, सकाळी ९ ते ११ या वेळेत गोपाळ नगर, दुर्गम मंदिर, माटे चौक सकाळी ८ ते दुपारी १२ वेळेत सोनबा नगर, लावा, खडगाव सकाळी ८ ते दुपारी २ या काळात दुर्गंधामना, सुराबर्डी, वडधामणा, तेजस्वी नगर,कृष्णां नगरी येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी.

सार्वजनिक गणेश मंडळांना माफक दरात मिळणार वीज

सार्वजनिक गणेश मंडळांना माफक दरात मिळणार वीज

अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

Image result for ganesh गणेश मंडळ वीजचंद्रपूर/प्रतिनिधी:

सार्वजनिक गणेश उत्सवमंडळांनी सवलतीचा व वहनआकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिटया माफक वीजदराने तात्पुरती वअधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेचगणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबतगांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असेआवाहन महावितरणकडून करण्यातआले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्याबिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरवीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतीलउर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीतपरत करण्याचे निर्देश क्षेत्रियकार्यालयांना देण्यात आलेले आहेत.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिकउत्सवांकरिता तात्पुरत्यावीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये२० पैसे अधिक १ रुपया १८ पैसे वहन(व्हिलींग) आकार असे ४ रुपये ३८ पैसेप्रती युनिट असे वीजदर आहेत. व्हिलींगचार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षाफक्त १३ पैशांनी अधिक आहे तरवाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९० पैसेप्रतियुनिटने कमी आहे. धार्मिकउत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठाघ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिकसुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्यावीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यातआलेला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठीमंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठीलागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीजकंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावीव अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी.वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्सहे वीजभारासाठी सक्षम नसल्यासशार्टसर्किटचा धोका निर्माण होतो.याशिवाय सध्या पावसाळी दिवसअसल्याने तसेच मंडपासाठीटिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्सलूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पणटेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठाखंडित होण्यासह अपघाताची मोठीशक्यता असते.
गणेशोत्सवात वीजपुरवठा आणिजनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणेअत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंदअसताना जनरेटर सुरु केल्यास एकाचन्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज हीलघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणित्यातून जीवघेणे अपघात घडतात.विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्याआणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणिमिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणारनाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावेतयार करावेत.त्यामुळे हजारोभाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेसार्वजनिक गणेश मंडळांनीवीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्येतडजोड करू नये, असे आवाहनमहावितरणने केले आहे.
तातडीच्या मदतीची संभाव्य गरजपाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी,कार्यकर्त्यांनी २४ तास सुरु असणारेटोल फ्री क्रमांक १९१२,१८००१०२३४३५ किंवा१८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्कसाधावा. याशिवाय संबंधित क्षेत्रातीलमहावितरणचे अभियंता यांचे मोबाईलक्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

 महावितरणमध्ये ४०१ पदवीधर, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थीपदाची भरती

महावितरणमध्ये ४०१ पदवीधर, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थीपदाची भरती

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य वीज वितरणकंपनी मर्यादित(महावितरण)च्यावतीने पदवीधर वपदविका प्रशिक्षणार्थी अभियंता यापदांच्या भरतीसाठी जाहिरातदेण्यात आली असून ऑनलाईनअर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेलीआहे. ही संपूर्ण भरती प्रक्रियानियमानुसार व पारदर्शक पध्दतीनेकरण्यात येत आहे.
पदविधर प्रशिक्षणार्थी अभियंतापदासाठी एकूण ६३ जागा तसेचपदविका प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्याएकूण ३३८ पदांसाठी भरती प्रक्रियाराबविण्यात येत आहे. महावितरणचे संकेतस्थळwww..mahadiscom.in यावरभरती प्रक्रियेची संपूर्ण माहितीउपलबध करून देण्यात आली आहे.ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्याचीप्रक्रिया मंगळवार दि. २८ ऑगस्ट२०१८ पासून सुरू झाली असूनप्रवेश अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक१७ सप्टेंबर २०१८ आहे. ऑनलाईनपरीक्षा ऑक्टोबर २०१८ मध्येहोणार असून परिक्षेच्या १०दिवसांपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईनपरिक्षेचे कॉललेटर डाऊनलोड करतायेणार आहे.
या भरतीप्रक्रियेत रिक्तपदांसाठी जाहिरात देताना यापूर्वीअशा पदांची सरळसेवेने करण्यातआलेली भरती, कार्यरत कर्मचारीतसेच सध्यस्थितीतील अनुशेषविचारात घेऊन जाहिरात देण्यातआलेली आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थीअभियंत्यांच्या रिक्त पदांमध्येअनुसूचित जाती, भटक्या विमुक्तजमाती आणि खुल्या प्रवर्गातीलपदांचा अनुशेष उपलब्ध नसल्यानेजाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेलानाही, असे महावितरणने स्पष्ट केलेआहे.

 मालवाहू वाहनांनी वाढीव भारक्षमतेचे प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन

मालवाहू वाहनांनी वाढीव भारक्षमतेचे प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन

Image result for मालवाहू वाहनचंद्रपूर/प्रतिनिधी:
रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 58 (1) मधील तरतूदीनुसार दिनांक 16 जुलै 2018 रोजी जाहिर केलेल्या अधिसुचनेत 16200 किं.ग्र.वजनापेक्षा जास्त माल वाहून नेण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हयातील मालवाहून नेणा-या वाहनांना 16200 कि.ग्रॅ.भारक्षमतेपेक्षा जास्त (जीव्हीडब्ल्यु) भारक्षमता वाढवून देण्यात येणार आहे. तेव्हा नमूद केल्यानुसार वाढीव जिव्हीडब्ल्यु साठी मोटार वाहन कराचा फरक (एक रकमी कर लागू असल्यास त्यासह) वसूल करण्यात येईल आणि कराचा फरक सदर अधिसूचना अंमलात आल्याच्या दिनांकापासून म्हणजेच 6 ऑगस्ट 2018 पासून व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. याची नोंद सर्व वाहन धारकांनी घ्यावी.
तसेच वाहन धारकांना त्यांच्या वाहनांत जिव्हीडब्ल्यू मध्ये वाढ करुन पाहिजे असल्यास अशा वाहन मालकांनी या कार्यालयात को-या कागदावर वाढीव मागणीचा अर्ज सादर करावा. या वाढीव बदलाचे विहित केलेले शुल्क भरल्यानंतर वाढीव जिव्हीडब्ल्यू ची नोंद त्यांच्या प्रमाणपत्र व परवान्यामध्ये घेण्यात येवून आवश्यक शुल्क संबंधीताकडून स्विकारुन दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र व परवाना देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी असे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्हि.एज.शिंदे यांनी कळविले आहे.

कृषी केंद्रावर औषधीच्या नावासह किंमतीचेफलक न लावणा-यांवर कारवाई करा

कृषी केंद्रावर औषधीच्या नावासह किंमतीचेफलक न लावणा-यांवर कारवाई करा

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत एकमुखी मागणी
‘हॅलो चांदा’ 155-398 या क्रमांकाचा तक्रारीसाठी वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 ‍धान, कपाशी व अन्य पिकांवर आलेल्या किडीमुळे शेतकरी एकीकडे संकटात असतांना कृषी विभागाने त्यांना फवारणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. तसेच कृषी केंद्र मालकांनी फवारणी औषधीची उपलब्धता, योग्य औषधी वापरण्याचा सल्ला व त्याच्या किंमतीचे फलक दर्शनी भागात लावावे. या कृषी केंद्राची तपासणी नियमित व्हावी, त्याबाबत प्रत्येक तालुकास्तरीय अधिका-यांनी अंमलबजावणीसाठी पुढे यावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले. 
चंद्रपूर जिल्हयामध्ये यावर्षी पाऊस भरपूर असतांना पिकांवर आलेल्या किडीमुळे शेतकरी चिंतेत आहे. अशावेळी फवारणीचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. शेतक-यांनी कोणती औषधी फवारणीसाठी वापरावी. त्याचे प्रमाण किती असावे, या संदर्भात प्रत्येक कृषी केंद्रावर फलक लावावे, अशी मागणी समितीचे सदस्य गिरीधरसिंह बैस यांनी केली आहे. सोबतच बंदी आणलेल्या औषधीबाबतही जागृती करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अन्य सदस्य सदाशिव सुकारे यांनी औषधी व त्याच्या किंमतीची यादी लावण्याबाबत मागणी केली. आजच्या बैठकीमध्ये विद्युत मंडळाच्यामार्फत येणा-या अवास्तव विद्युत बिलाबाबतही सदस्यांनी तक्रारी नोंदविल्या. काही सदस्यांनी या संदर्भातील लेखी तक्रारी नागरिकांच्या वतीने आणल्या होत्या. विद्युत मंडळाने या संदर्भात लक्ष घालण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील फळे विक्रेत्यामार्फत फळे पिकवतांना होत असलेल्या रासायनिकाच्या वापराबाबत विभागाने सतर्क रहावे व नियमितपणे बैठकीत महिन्याच्या कार्यवाहीचा अहवाल दयावा, असा दंडक घातला. 
याशिवाय शासकीय कार्यालयात मुद्रांक शुल्कासाठी अतिरीक्त पैशाची मागणी होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी समितीच्या सदस्यांनी केली. प्लॉस्टीकच्या बंदीबाबत चंद्रपूर महानगरपालिकेने राबविलेल्या मोहिमेचा आढावाही घेण्यात आला. जिल्हयाभरातील नगर पंचायतीनी देखील हा कित्ता गिरवावा, असे आवाहनही करण्यात आले. या बैठकीचे आयोजन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव आर.आर.मिस्कीन यांनी केले. या बैठकीला मार्गदर्शन करतांना निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी समिती सदस्यांच्या तक्रारीबाबत अतिशय गंभीरतेने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. या समितीने जनतेला त्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या हॅलो चांदा या पालकमंत्री तक्रार निवार यंत्रणेच्या 155-398 या टोल फ्रि क्रमांचा वापर करण्याचे आवाहन केले. या टोल फ्रि क्रमांकावर तक्रार केल्यानंतर प्रशासनामार्फत महिनाभराच्या आत कार्यवाही करण्यात येते,असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला अ.मा.नरवाडे, वा.स.नामपल्लीवार, डॉ.विनोद गोरंटीवार, दत्तात्रेय गुंडावार, आशीष कोट्टावार, सचिन चिंतावार, मनिष व्यवहारे, कविश्वर साळवे, जगदीश रायठ्ठा, डब्ल्यु.जी.कुरेशी, नितीन गुंडेज्या, गिरीधरसिंह बैस, हर्षवर्धन पिपरे, कल्पना बगुलकर, मिनाक्षी गुजरकर, संगीता लोंखडे, सदाशिव सुकारे, सुहास कोतपल्लीवार, डॉ.प्रीती बैतुले, डॉ.अजय गोगुलवार आदींची उपस्थिती होती.

 भोई समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार

भोई समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ चंद्रपूर या भोई समाजाच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करणाऱ्या भोई समाज संस्थेच्या वतीने नुकताच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार पार पडला. या प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून श्री . कृष्णाजी नागपुरे गुरुजी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष वाहिनीचे संयोजक श्री . मुकुन्दाजी अडेवार, भोई समाजाचे प्रा.श्री, राजेश डहारे,जेष्ठ समाज सेवक श्री,वासुदेवराव कोतपल्लीवार, श्रीमती शीलाताई जीझीलवार, श्री.सदाशिवराव पचारे, श्री.बळवंत ठाकरे, केवट समाजाचे श्री. फुलचंद केवट हे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात दहावी च्या ३९, बारावीच्या २२,पदवीचे २२,पदविका ६,पद्युत्तर ५,व काही क्षेत्रातील कलाकार, खेळाडू ,व शिष्यवृत्ती, असे एकूण १०२ विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, दहावीत कुमारी रचना राउत, बारावीत नेहाल मेश्राम, पदविका कु. शुभांगी सहारे, पदवी राज बावणे, पद्युत्तर शंतनू नागपुरे, यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या कार्क्रमात सर्व विध्याथ्यांना गौरव चिन्ह, रोख बक्षीस, व समानपत्र देवून गौरविण्यात आले. 
या प्रसंगी श्री मुकुंद अडेवार यांनी विध्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे महत्व, तसेच शिक्षणाचे महत्व पटवून दिले,आपला समाजाचे विध्यार्थी स्पर्धेत कसे मागे आहेत याची जाणीव करून दिली आणि विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा दिली .प्रा.राजेश डहारे यांनी शिक्षणात यशस्वी होण्याकरिता आधुनिक गोष्टींचा वापर करावा, सतत अभ्यास करावा, व भरपूर मेहनत घ्यावी असा मोलाचा सल्ला दिला. वासुदेव कोतपल्लीवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
या कार्यक्रमाचे कुशल संचालन प्रा.सौ.अर्चना डोंगरे, इंजी.सौ.सुवर्णा कामडे, व सौ. रंजना पारशिवे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी सर्वश्री. रमेशजी नागपूरे ,देविदास गिरडे, देवरावजी पिंपळकर ,प्रकाश कामडे, योगेश दुधपचारे, गुलाब गेडाम , मोरेश्वर खेडेकर, राजेंद्र तुमसरे,राजेश डोंगरे, भगवान सहारे, श्याम नागपुरे ,सुभाष रुयारकर कु. नूतन खेडेकर ,कु रोशनी शिवरकर, श्रीमती ,लक्ष्मी मेश्राम, व इतरांनी अथक परिश्रम घेतले.  

 मॉडेल महाविद्यालयाकडून बिजा रोपण व वृक्षारोपण

मॉडेल महाविद्यालयाकडून बिजा रोपण व वृक्षारोपण

उमेश तिवारी;कारंजा (घाडगे):
नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा तर्फे शहरालगत टेकडीवर बिजारोपण व वृक्षारोपण करण्यात आले.डॉ अविनाश कदम व डॉ रवींद्र सोनटक्के यांच्या नाविन्य पूर्ण संकल्पनेतून साकारलेल्या सीड्सबॉल चे सुद्धा याप्रसंगी बीजारोपण करण्यात आले .झाडे लावा झाडे जगवा आई नारे देत महाविद्यालयातून विद्यार्थी व शिक्षक शहरालगतच्या टेकडीवर पोहोचले तेथे विद्याथ्यांनी जमा केलेल्या विविध प्रकारच्या झाडांचा बियांचे रोपण केले सोबतच आंबा कडुनिंब इत्यादी प्रकारच्या वृक्षाचे रोपण देखिल करण्यात आले . वृक्षारोपण नंतर विद्याथ्याना फळ वाटप करण्यात आले वृक्षारोपांनंतर निसर्गप्रति आपली जबाबदारी पार पडल्याची भावना विद्याथ्यांनी व्यक्त केली .याप्रसंगी डॉ रवींद्र सोनटक्के प्रा सुरेश गोडबोले प्रा दर्शन चांभारे व श्री मंगेश मालधाम व मोठ्या संख्येने विद्याथी उपस्तीत होते


कारंजा पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन चा कार्यक्रम

कारंजा पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन चा कार्यक्रम


कारंजा (घाडगे)उमेश तिवारी:कारंजा पोलीस स्टेशनमध्ये भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा असलेला सन रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला पोलीस कर्मचारी हे रात्र दिवस आपले कर्तव्य बाजवतात ज्यामुळे ते आपल्या बहिनीकडून राखी बंधू शकत नाही याच निमित्ताने आज कारंजा येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना लहान चिमुकल्या नी राखी बांधून उत्सव साजरा केला यावेळी कारंजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार राजेंद्रजी शेटे व कर्मचारी वृंद उपस्थित होते

सावळी खुर्द येथे सामुदायिक रक्षाबंधन

सावळी खुर्द येथे सामुदायिक रक्षाबंधन

वर्धा/प्रतिनिधी:
तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडवी वर्धा व श्रीगुरूदेव सेवा मंडळ सावळी खुर्द च्या संयुक्त विद्यमाने सावळी खुर्द येथे सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सरपंच बेबी विलासराव कडवे, प्रार्थना अध्यक्ष, विष्णूजी कडवे, अमोल घागरे युवा कार्यकर्ते आणि बेबीताई धंडाळे अध्यक्ष महीला बचत गट प्रमुख मार्गदर्शक म्हणून तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडवी वर्धा चे अध्यक्ष गजानन ढोबाळे व ह.भ.प. प्रशांत दादा मानमोडे, श्रीगुरूदेव प्रचारक गुरूकुंज मोझरी उपस्थित होते. 
यावेळी अधिष्ठानाचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. मार्गदर्शनातून गजानन ढोबाळे यांनी रक्षाबंधन सणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्व सांगितले सोबतच संस्थेच्या ऐज्युफ्रेंड प्रकल्पाविषयी माहीती दिली. ह.भ.प. प्रशांत दादा मानमोडे यांनी समुदायीक ध्यान व प्रार्थनेचे महत्व विशद केले , ग्रामगीतेच्या महिलोन्नती अध्यायावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीगुरूदेव सेवा मंडळ सावळी खुर्द च्या कार्यकर्त्यांनी श्रम घेतले. 
सुत्रसंचालन श्रीगुरूदेव सेवा मंडळ चे सचिव श्री महेश पेंधे तर आभार अरूण खवसे यांनी केले.

वर्धा जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा 2018 चे उद्घाटन थाटात संपन्न

वर्धा जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा 2018 चे उद्घाटन थाटात संपन्न

दिनांक 28.08.2018 रोजी सायंकाळी 04.00 वा मा. श्री. निखील पिंगळे, (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे हस्ते वर्धा जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा 2018 चे थाटात उद्घाटन संपन्न झाले.




Sunday, August 26, 2018

चंद्रपुरात १४०० घरातील रक्षाबंधन अंधारात

चंद्रपुरात १४०० घरातील रक्षाबंधन अंधारात

चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर मधील स्थानिक पठानपुरा वॉर्ड मधील कृष्ण बन अपार्टमेंट जवळ महावितरण द्वारा ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या 11 किव्हो वीज वाहिनीवरच मोठ्ठे झाड कोसळल्याने समाधी वॉर्ड व आस पासचा परिसर विजेशिवाय अंधारात गेला आहे.झाड कोसळल्याने 11 किव्हो चे सहा खांब, सहा लघुदाब खांब वाकले तसेच दोन्ही रोहित्रांना नुकसान पोहेचले आहे. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरण द्वारा सात रोहित्रे विलग करण्यात आली असून. त्यावरून होणारा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. नुकसानीमुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाचे स्वरूप बघता 24 ते 30 तास किंवा अधिक कालावधी लागू शकतो.
ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याने नागरिकांत चांगलाच रोष आहे.रक्षाबंधनासाठी प्रत्येक घरी पाहुणे आले असताना संपूर्ण सण अंधारात साजरा करावा लागत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
स्थानिक दादमहाल वॉर्ड, समाधी वॉर्ड, किसान वसाहत इत्यादी परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार असल्याने सध्या परिस्थितीत 1400 ग्रहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. महावितरण सरवोतपरी प्रयत्न करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या टीम कामात जुंपली असल्याचे महावितरणच्या अभियंत्यांचे म्हणणे आहे. ग्राहकांनी कृपया सहकार्य करावे असे आवाहन महावितरण द्वारा करण्यात येत आहे.

ढगाला लागली कळ;महामंडळाची बस टप-टप गळ

ढगाला लागली कळ;महामंडळाची बस टप-टप गळ

ललित  लांजेवार:
नेहमी 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीद घेऊन मिरविणाऱ्या तसेच सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य परिवहन विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ब्रम्हपुरी आगाराच्या बसला भरपावसात लागलेल्या गळतीमुळे प्रवासी न्हावून निघाले आहेत. ब्रम्ह्पुरीवरून चंद्रपूरकडे येणाऱ्या बस क्र ( एम. एच. ४०.एम. ८७७२) मध्ये हा प्रकार घडला.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरू होते. या पावसाचा फटका ब्रम्हपुरी -चंद्रपूर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. बस आगारातून निघाल्यानंतर १०० किमी समोर गेल्यावर मुल जवळ जोरदार पावसाला सुरूवात झाली. बसच्या छतातून पाण्याची गळती झाल्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली. काही प्रवाशांच्या सीटवर पाणी पडू लागल. हे पाणी तुटलेल्या खिडक्यान मधून व बसच्या छतामधून खाली बसलेल्या महिला प्रवाश्यांच्या अंगावर पडू लागले,हा प्रकार एकाच सीटवर घडला नसून बस जवळपास ५ ते ६ ठिकाणहून गळत होती. बसमधील महिला व बालकांना यावेळी मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

ऑक्टोंबर २०१७ मध्ये खराब बसेस वापरल्यास, गळक्या बसेसमुळे प्रवासी भिजल्यास कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार त्यामुळे अश्या गळक्या बसेस न वापरण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिलेले होते मात्र ज्या बसेस सेवेतून बाद झालेल्या आहेत,ज्याची फिटनेस लाईफ संपलेली आहे अश्या बसेस ह्या प्रवाश्यांना डोकेदुखी ठरत आहे, 
एसटीच्या १६ हजारांवर बस रोज राज्यातील विविध १८ हजार मार्गांवर धावतात. आर्थिक डबघाईस आलेल्या परिवहन महामंडळाचे सर्वाधिक प्रवासी ग्रामीण भागातच आहेत. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने नेहमी ओरड होत असते. महामंडळाच्या अनेक बसेसचे छत, साईड बॉडी व खिडक्या खराब असल्याने पावसाळ्यात बसमध्ये पाणी टपकत असते. त्यामुळे प्रवास्यांना गळके पाणी अंगावर घेत प्रवास करावा लागत असल्याचे स्थिती आहे. याबाबत नागरिकांतून व्यक्त होत असलेला रोष लक्षात घेवून मंत्री रावते यांनी ऑक्टोंबर २०१७ मध्ये खराब बसेस न वापरण्याची सूचनाही आगारप्रमुखांना नियंत्रकांना दिल्या होत्या . राज्यात आजही शेकडो बसेस गळक्या व भंगार अवस्थेतल्या रस्त्यांवर धावत आहे मात्र याकडे गांभीर्याने बघितले जात नाही किंवा प्रवाशांच्या जीवाशी एक प्रकारचा खेळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे
बीड विभागात झाली होती पहिली कारवाई
बीड-लातूर मार्गावर गळकी एसटी सोडल्यामुळे बीड विभागाचे विभाग नियंत्रकांनी संबंधित बसचे काम करणाऱ्या शि.सा.लहाने आणि उ.आ.राऊत यांचे निलंबन केले होते. तर वरिष्ठ प्रभारक मो.रा.गोरे आणि सहायक कार्यशाळा अधिक्षक म.प.लोढा यांच्यावर सदोश बस मार्गस्थ केल्याप्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू केली होती.
त्यामुळे आता ब्रम्हपुरी-चंद्रपूर येथील विभाग नियंत्रकांवर काय कारवाई होते ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.

प्रभावी संवादासाठी आदर,सभ्यपणा,स्पष्टता, समयसूचकता व सकारात्मकता हिच गुरुकिल्ली:श्वेता शेलगावकर

प्रभावी संवादासाठी आदर,सभ्यपणा,स्पष्टता, समयसूचकता व सकारात्मकता हिच गुरुकिल्ली:श्वेता शेलगावकर

खापरखेडा/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात नेतृत्व विकास कार्यक्रमा अंतर्गत “३६० डिग्री संवाद व मल्टी टास्किंग (बहुकामे)” या विषयावर मध्य भारतातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका तसेच प्रेरणादायी प्रशिक्षक श्वेता शेलगावकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. महानिर्मितीच्या खापरखेडा प्रशिक्षण उप केंद्रामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम सत्रात “३६० डिग्री संवाद” तर दुसऱ्या सत्रात मल्टी टास्किंग (बहुकामे)” या उपयुक्त विषयांवर त्यांनी प्रभावी सादरीकरण केले. याप्रसंगी खापरखेडा वीज केंद्राचे उप मुख्य अभियंते मनोहर खांडेकर, राजेंद्र राउत आणि प्रशिक्षक श्वेता शेल्गावकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 
३६० डिग्री संवादाविषयी श्वेता शेलगावकर म्हणाल्या कि, सुप्त कलागुण प्रत्येकामध्ये आहेत त्याचा योग्य वापर करून यशाचा मार्ग निवडायला हवा. अनेक व्यक्ती तर दुसऱ्याने आपल्या शक्ती स्थानांची /प्रतिभेची ओळख करून दिल्यानंतर प्रयत्न करायला सुरुवात करतात. नेतृत्व विकासात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे. योग्य संवाद नसल्याने वारंवार समस्या निर्माण होतात. कामकाजाच्या ठिकाणी, दिवसभर सोबत असणाऱ्यांना आपण किती ओळखतो ? औद्योगिक सुरक्षिततेसोबतच भावनिक-मानसिक व भौतिक सुरक्षा देखील तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. 
प्रभावी संवादासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. सांस्कृतिक मूल्यांचा संवादावर उत्तम प्रभाव पडतो. आज माहितीचे विश्व खुले झाल्याने नवनवीन ज्ञान, शिकण्याची उर्मी/वृत्ती जागृत ठेवून, विचारांची स्पष्टता असायला हवी. बोलण्यात स्पष्टता नसल्यास, पाहिजे तसा प्रभाव पाडता येत नाही. विशेष म्हणजे, वागणुकीतून निर्णय क्षमता दिसून यायला हवी. संवादासाठी श्रवण कौशल्य चांगले ठेवल्यास बुद्धी आणि हृद्यावर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. भाषेच्या गोडव्यातून संवादात आपुलकी वाढते, संवाद मोकळा असायला हवा. शब्द आणि शारीरिक हालचाल वचनबद्ध असायला हवी. आभासी दुनियेत जास्त रममाण होण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनाचा आंनंद घेतल्यास तणावरहित जीवन जगता येईल. एकूणच संवादात आदर, सभ्यपणा, स्पष्टता, समयसूचकता, सकारात्मकता असायला हवी असे त्यांनी सांगितले. 
स्पर्धेच्या युगात कामाचा भार सातत्याने वाढतच आहे. कोर्पोरेट क्षेत्रात कमी मनुष्यबळाकडून जास्तीत जास्त कामे करून घ्यायची संकल्पना रूढ झाली असल्याने प्रत्येकाला मल्टी-टास्किंग (बहुकामे) करावी लागतात. मल्टी-टास्किंग करिता शरीर आणि मन सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. विविध कामांचे नियोजन करताना रोजच्या कामाची यादी तयार करून प्राधान्यक्रम ठरवा, छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कामाची विभागणी करा, आळस झटका, बुद्धी आणि शरीराचा आंतरिक आवाज ऐका, समाज माध्यमांच्या मोजका वापर करा, सांघिक भावना जोपासून इतरांच्या योग्यतेवर विश्वास टाका, योग्य वेळी विश्रांती घ्या व विशेषत: सराव, निरीक्षण व अनुसरण करा असे श्वेता शेलगावकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन स्नेहा लालमुंडे यांनी तर आभार प्रदर्शन विजय अढाऊ यांनी केले. 
खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते विलास मोटघरे, बंडावार, जितेंद्र टेंभरे, अर्जुन वानखेडे, कार्यकारी अभियंते, विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
बसल्याजागी पैसे कमवायचे आहेत?मग वाचा संपूर्ण बातमी

बसल्याजागी पैसे कमवायचे आहेत?मग वाचा संपूर्ण बातमी

वीजचोरी कळवा; भरघोस बक्षीस मिळवा
Image result for पैसे कमवानागपूर/प्रतिनिधी:
जर घर बसल्या पैसे कमवायचे असेल तर तुमच्यासाठी महावितरणने सुवर्ण संधी आणली आहे.कारण आता तुमच्या बाजुव्याल्याची किव्हा माहित असलेल्या ठिकाणची चोरीची वीज जर का तुम्ही वितरणच्या कर्मचार्यांना दाखवून दिली तर तुम्हाला रकमेच्या १० टक्के वाटा मिळणार आहे.
वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपुर्वक फ़ेरफ़ार करून होणा-या वीजचो-यांची माहिती असणा-यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणा-याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल, अशी माहीती महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिली आहे.
आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीजचोरी कळवणाऱ्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनाही ही बक्षीस योजना लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुर्वी वीजचोरीची माहिती कळवल्यानंतर एक हजार रुपयांचे बक्षीस होते. मग ती वीजचोरी लाखो रुपयांची का असेना. त्यामुळे साहजिकच हवा तितका प्रतिसाद नव्हता. त्यामुळे आता वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. या उपक्रमात ५० हजार रुपयांपर्यंतच्या बक्षिसाची रक्कम मंजूर करण्याचे अधिकार ‘महावितरण’च्या क्षेत्रीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत. तर एक लाखापर्यंतच्या बक्षिसाचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले आहेत. बक्षिसाची रक्कम एक लाखापेक्षा अधिक होत असल्यास ती देण्याचे अधिकार मुख्य अभियंत्यांना असतील. याशिवाय संचालक (दक्षता व सुरक्षा) यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत.
वीजचोरी कळवणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोखीने देण्यात येईल. तर त्यावरील पैसे नेटबँकिंगच्या माध्यमातून देण्यात येतील. लोकांनी वीजजोरीची माहिती ‘महावितरण’च्या संकेतस्थळावरील ‘रिपोर्ट एनर्जी थेफ्ट’ येथे कळवावी. तर ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी वीजचोरीची माहिती थेट संचालक (दक्षता व सुरक्षा) यांना दूरध्वनीवरून देता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महावितरणच्या https://www.mahadiscom.in/report-energy-theft/ या संकेतस्थळावरील लिंकवर "वीजचोरी कळवा आणि लाखो रुपये मिळवा‘ असा विभाग आहे. तिथे क्लिक केल्यानंतर माहिती कळविण्याबाबतचे आवाहन केले आहे. त्यानंतर "कळवा‘ या शब्दावर क्लिक केल्यानंतर वीज चोराची माहिती ऑनलाइन भरता येते. त्यात संशयिताचे नाव, पत्ता व चोरीची पद्धत लिहायची आहे. त्या खाली स्वत:चे नाव व पत्ता. माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. याचप्रमाणे महावितरणच्या मोबाईल ॲप वरुनही वीजचोरीची माहीती कळविण्यासाठी विशेष लिंक देण्यात आली आहे, वीजचोरीचे छायाचित्र अपलोड करण्याची सुविधाही या ॲपवर देण्यात आली आहे.. खातरजमा केल्यानंतर संबंधित माहिती देणाऱ्याला रोख रकमेचे बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी अडीच लाखांपर्यंत बक्षीस मिळू शकते. वीज चोरीची माहीती कळविल्याच्या एका महिन्यानंतर माहीती देणा-यांनी 022-22619100, 22619200 किंवा 22619300 या क्रमांकावर फ़ोन करून त्यांनी कळविलेल्या वीजचोरीच्या माहीतीवर झालेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर तपशिल दिल्या जाईल. या सुविधेचा लाभ घेत जागरूक नागरिकांनी वीजचोरी रोखण्यात महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही खंडाईत यांनी केले आहे.