धामना (लिंगा) येथील विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात दि.२७ जूलै ला दुपारी दोन वाजता गुरूपौर्णिमा व तंबाखू मुक्त दिन संपन्न झाला.
विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक निळकंठ बोपटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे स्वागत करून "गुरूची क्रुतज्ञता" व्यक्त केली. यावेळी वर्ग ५ ते १० च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गुरूची महत्ता पटवून दिली. यावेळी शिष्य एकलव्य व गुरु द्रोणाचार्य यांच्या नाथ्याची माहिती विषद केली व शिष्य व गुरुचे पवित्र नाते असते हे कथन केले.
यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त राहण्याची शपथ दिली व तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या हाणीची माहिती दिली यात तंबाखू पासून कँसर सारखे आजार होतात व अती सेवनाने तोंडाचा आजार होतात हे पटवून दिले.
ह्यावेळी मंचावर सहा. शिक्षक श्री. दयाराम राऊत, राजेंद्र दुधबडे, उमेश कट्यारमल, लेखनदास किटूकले, सुरेंद्र वानखेडे, हे होते.ह्यावेळी शालेय उपक्रम प्रमुख श्री. विजय खडतकर व दिलीप लाखे यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खांडेकर, देवराव वासेकर, आकाश देपट,विनोद क्षिरसागर यांनी अथक प्रयत्न केले.