विविध
मागण्यांना घेऊन आज रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या वतीने जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्रिपुरा येथील क्रांतिकारक लेनिन
यांच्या पुतळ्याची विटंबना, मेरठ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याची विटंबना व तामिळनाडू येथील पेरियार स्वामी नायकर यांच्या
पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना त्वरित अटक काण्यात यावी. भीमा
कोरेगाव येथे जातीय दंगल घडविणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना
तात्काळ अटक करावी, राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज बिनशर्त माफ करण्यात यावे,
शासकीय कार्यालयातील नोकरभरती ठेकेदारी पद्धतीने बंद करण्यात यावी,पेट्रोल
डिझेल वर जीएसटी लागू करण्यात यावी,वीज बिलातील विजेशिवाय इतर आकारणी कमी
करण्यात यावी.चार वर्षांपासून बंद केलेली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती
पुन्हा सुरु करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्यांना घेऊन आज रिपब्लिकन
पक्ष (खोरिपा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात
आले. या धरणे आंदोलनात देशक खोब्रागडे, सत्यजित खोब्रागडे, जीवन
बागडे,संतोष रामटेके यांच्या सह इतर नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी
आंदोलनकर्त्या शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना आपल्या
मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
Showing posts with label रिपब्लिकन. Show all posts
Showing posts with label रिपब्लिकन. Show all posts