সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 30, 2015

पशूपालकांसाठी १८०० २३३ ०४१८ टोल फ्री फोन कार्यान्वित

पशूपालकांसाठी १८०० २३३ ०४१८ टोल फ्री फोन कार्यान्वित

मुंबई दि.30 मार्च : राज्यातील पशू पालकांना जनावरांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन, पशूसंवर्धन विभागाच्या विविध योजना, जनावरांच्या सर्वसाधारण रोगांचे नियंत्रण व लसीकरण इत्यादीबाबत मोफत माहिती देणारा 1800 2300 418 हा नवीन टोल फ्री फोन आज राज्याचे कृषी व पशूसंवर्धन मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधानभवन कार्यालयात कार्यान्वित केला.

या टोल फ्री फोनवरुन पहिले संभाषण करताना एकनाथराव खडसे यांनी, उन्हाळयात व आगामी पावसाळयात पशूंच्या संभाव्य आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या लसी व इतर औषधे तयार ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच प्रश्नकर्त्या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.

खडसे यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, पशूसंवर्धन विभागातर्फे दुधाळ जनावरे, शेळया-मेंढया, कोंबडया यांचे वाटप लाभार्थ्यांना केले जाते. याची माहिती वरील फोन नंबरवर मोफत मिळणार आहे. चारा उत्पादनाचा कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती सुध्दा या फोनवर मिळू शकेल.

राज्यातील पशूपालकांना पशूसंवर्धन विभागाची विविध माहिती http://ahd.maharashtra.gov.inया संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नव्याने कार्यान्वित झालेला टोल फ्री फोन नंबर कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यन्त उपलब्ध राहणार आहे, असे राज्याचे आयुक्त, (पशुसंवर्धन) डॉ.कुंभार यांनी यावेळी सांगितले.

या प्रसंगी पशुसंवर्धन सचिव महेश पाठक, सहआयुक्त डॉ.हरिश्चंद्र गायकवाड व विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Sunday, March 29, 2015

घाटावरचा वाळूमाफिया

घाटावरचा वाळूमाफिया

नागपूर -जिल्ह्यात एकूण 89 वाळूघाट आहेत. यातील 49 घाटांचे लिलाव 30 सप्टेंबर 2015पर्यंतच्या मुदतीसाठी करण्यात आले. जिल्ह्यातील कन्हान, कोलार, सूर, पेंच नद्यांच्या पात्रातून वाळूचा उपसा होतो. मात्र, सर्वच वाळूघाटांवरून परवाना नसतानाही माफियांकडून बिनदिक्कतपणे वाळूची चोरी होत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यासाठी प्रत्येकाचे हप्तेदेखील माफियांनी ठरविले आहेत. तहसीलदारांपासून तर तलाठ्यापर्यंत आणि पोलिसांपासून तर वाहतूक विभागापर्यंत हे हप्ते व्यवस्थित पोहोचविले जातात. वाळूघाटांवरून वाहन पकडल्याची कारवाई होताना दिसत नाही. एखादे वाहन पकडले तरी त्यांच्यावर क्षुल्लक कारवाई करून सोडून दिले जाते. जिल्हा प्रशासन मात्र वाळूघाटांवर नियंत्रण असल्याचा पोकळ दावा करते. वाळूची चोरी पूर्णपणे बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. त्यानंतरही पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रक, ट्रॅक्‍टरच्या कारवाईमुळे वाळूची चोरी सुरू असल्याचा पुरावाच आहे. रात्रीच्या वेळी वाळूची तस्करी करतात. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास त्यांच्या पथकावर हल्लाही केला जातो. वाळूमाफियात आपापसांत स्पर्धा निर्माण होऊन हाणामारी, गोळीबारीच्या घटना घडत आहेत.

कन्हानच्या कुशीतील माथनी

कन्हानच्या कुशीतील माथनी


माथनी हे गाव नागपूर-भंडारा महामार्ग क्रमांक सहावर कन्हान नदीच्या कुशीत वसले आहे. नदीच्या पात्रात परिसरातील तसेच दूरवरून नागरिक अस्थी विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे या गावाला विशेष महत्त्व आहे. मौदा शहराच्या पैलतीरावर वसलेले गाव असले, तरी अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून कोसोदूर आहे. अनेक राजकीय नेत्यांनी निवडणुकीत गाव सुंदर बनविण्याच्या थापा मारल्या. औद्योगिकदृष्ट्या संपन्न मौदा तालुक्‍यात असलेले माथनी गाव लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मागासलेले आहे. गावाशेजारून कन्हान नदी गेली असताना येथे पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही.

Saturday, March 28, 2015

नागपूर: "आजच्या धक्कादायक परिस्थितीत, पाणी सर्वात मौल्यवान संपत्ती जीवन महत्वपूर्ण भाग आहे. पाणी वाचवण्यासाठी आणि महत्वाचे सामग्री रक्षण करण्याची मोहीम आवश्यक आहे. प्रत्येक घरातील पावसाच्या पाण्याची साठवण सर्वाधिक प्राधान्य देण्यात पाहिजे. विदर्भातून पाणी शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा साध्य केले आहे. शनिवारी नागपूर महानगरपालिका पेंच टप्पा-4 पाणी पुरवठा प्रकल्प उपयोगात आणत असताना नागपूर या यशस्वी प्रकल्प आदर्श म्हणून देशभरात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन  "शहरी विकास मंत्री वेंकय्या नाय
डू यांनी केले. 
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता

चंद्रपूर : भारतीय हवामान खात्याने दिनांक २९ मार्चच्या सकाळपासून ४८ तासात जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रमधील पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली येथे तर मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी आणि हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.याबाबत खबरदारीची उपाययोजना म्हणून गारपीट सुरु असतांना बाहेर जाणे टाळावे. दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. शक्य असल्यास ज्या धान्याची कापणी झालेली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. गारपीटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. गारपीट सुरु असताना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असल्याने त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन शासनाने केले आहे.
वनिता आहारची उद्योग भरारी

वनिता आहारची उद्योग भरारी

चंद्रपूर येथील उद्योग वसाहतीत वनिता आहारचा उद्योग असून त्यांचे गुलाब जामून, ढोकळा, उकडपेंढी, मसाले, पापड व लोणचे विदर्भात चांगलेच प्रसिद्ध आहेत. आयएसओ 2200 मानांकन मिळविणाऱ्या वनिता आहारची उद्योग भरारी चकित करणारी आहे. विनायक धोटे यांनी सुरु केलेला हा उद्योग चांगलाच भरभराटीस आला आहे. नुकतीच या उद्योगाला भेट दिली. लघुउद्योगापासून सुरुवात झालेला हा व्यवसाय कसा भरभराटीस आला, याची यशोगाथा थक्क करुन गेली.

अन्नप्रक्रिया अभ्यासक्रमात बीएससी केल्यानंतर श्री. धोटे यांनी नोकरी सुरु केली. मात्र नोकरीत अपयश आल्यावर काय करावे या विवंचनेत असताना 10 किलो शेंगदाने, 10 किलो बेसन व 1 तेलाचा डबा घेऊन लघु उद्योग सुरु केला आणि आज वनिता आहार या ब्रँडसह 10 कोटींच्या वार्षिक उलाढालींसह नावारुपास आला आहे. प्रत्यक्ष 200 तर अप्रत्यक्ष हजारो लोकांना रोजगार दिल्याचे वनिता आहारचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक हरिश्चं0द्र धोटे यांनी अभिमानाने सांगितले.

अन्न प्रक्रिया अभ्यासक्रमात बीएससी बीटेक केल्यानंतर कानपूर येथे नोकरी करणाऱ्या धोटे यांची नोकरी कंपनी बंद पडल्यामुळे गेली आणि आपण छोटा का होईना स्वत:चा उद्योग सुरु करावा अशी कल्पना त्यांना सुचली. यातूनच वनिता आहारची निर्मिती झाल्याचे श्री. धोटे यांनी सांगितले. केवळ तुटपुंज्या पैशात घरगुती मीठाचे पॅकिंग बनविण्याचा व्यवसाय सुरु करुन बाजारात विश्वासार्हता प्राप्त केली. आता वनिता आहार हे नाव ब्रँड झाले आहे. या व्यवसायात त्यांच्या पत्नी श्रीमती वनिता धोटे यांचा सहभाग व खूप मोठा हातभार आहे. वनिता आहारचा प्रशासकीय भार त्यांच्यावरच आहे.

वनिता आहारचा मुख्य ब्रँड गुलाबजामून मिक्स हा असून त्याला पुरक इतर पदार्थ आहेत. राजुरा तालुक्यातील सोंडो या छोट्याशा गावातून येऊन चंद्रपूर सारख्या शहरात आपला ब्रँड विकसित करणारे विनायक धोटे विदर्भभर परिचित आहेत. त्यांना जिल्हास्तरीय उद्योजकता पुरस्कारही प्राप्त झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश व मध्यप्रदेशातील काही भागातील बाजारपेठ वनिता आहारने काबीज केली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन तसेच श्री. धोटे यांच्यासारख्या उद्योजकांकडून प्रेरणा घेऊन आज तरुणांनी उद्योजक होणे ही काळाजी गरज आहे.

- रवी गिते, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

Tuesday, March 24, 2015

सहा तरुणांचा बुडून मृत्यू

सहा तरुणांचा बुडून मृत्यू

मंगरुळ-वडद येथील तलावातील घटना

बुटीबोरी, : मंगरुळ-वडद तलावावर पार्टीसाठी गेलेल्या आशीर्वादनगरातील सहा तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 22) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. सर्व मृत तरुण 20 ते 22 वयोगटातील असून, नागपुरातील आशीर्वादनगरातील रहिवासी आहेत. त्यामुळे या परिसरावर वृत्त धडकताच शोककळा पसरली.
नागपूर-वर्धा मार्गावरील डोंगरगावपासून आठ किलोमीटर अंतरावर मंगरुळ गाव आहे. तिथे डोंगरपायथ्याशी निसर्गरम्य तलाव असल्याने वन्यजीवांची भ्रमंती होत असते. येथे नेहमी पर्यटक येत असतात. रविवारी सुटीचा दिवस असल्याने नागपुरातील आशीर्वादनगरातील अकरा तरुण फिरण्यासाठी या परिसरात गेले होते. भोजनानंतर त्यांना मासेमारीचा मोह झाला. त्यापैकी सात जण नावेत बसले. काही दूर गेल्यानंतर नावेत पाणी शिरल्याने नाव एका बाजूला झुकल्याने ते सर्व जण पाण्यात पडले. सातपैकी केवळ एक जण सुदैवाने बचावला. मृतांमध्ये चेतन आदमने, हर्षल आदमने, मकसूद शेख, गोवर्धन खेटे, राहुल बानोदे, रामा शिवरकर यांचा समावेश आहे. यातील चेतन व हर्षल आदमने हे सख्खे भाऊ आहेत.
सायंकाळ झाल्यानंतरही मुले घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, घटनास्थळ नेमके कोणत्या पोलिस ठाण्यात येते यावरून बुटीबोरी, कुही, उमरेड पोलिसांत संभ्रम होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तिन्ही पोलिस ठाण्यांचे ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह हाती लागले नव्हते. सोमवारी सकाळपासून मृतदेहांची शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. मृतांतील दोघे जण ऑटोचालक, तर उर्वरित शिक्षण घेत होते. 

Sunday, March 22, 2015

 पूर पीडीतांच्या आंदोलनाला सुरूवात

पूर पीडीतांच्या आंदोलनाला सुरूवात

चंद्रपूर - दाताळा रोड वरील इरई नदीचा पुल, या पुलावरून सतत पुजेअर्चचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रातसाचलेली घान. या घाणीला अडून अडकलेले प्लास्टीक , वनस्पती व या सर्वप्रकारमुळे तयार झालेला 2-3 फुटांचा घाणीचा थर.

Wednesday, March 18, 2015

अर्थसंकल्प नावीन्यपूर्ण

अर्थसंकल्प नावीन्यपूर्ण

कोरडवाहु शेतीच्या स्थैर्यास प्राध्यान्य 
आणि राज्याच्या एकूणच विकासाला चालना

- एकनाथराव खडसे

मुंबई दि.१८ मार्च : राज्यातील कोरडवाहू शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कोरडवाहु शेतीच्या स्थैर्यास प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येकी घटकासाठी, विशेषत: गरीब उपेक्षीत आणि कष्टकरी जनतेला या अर्थसंकल्पात आपल्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब दिसणार आहे. या बरोबरच अर्थसंकल्पात वीज निर्मिती दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी घरकुल योजना, स्वच्छ भारत अभियान, मुंबई मेट्रो लाईन-३, स्मार्ट सिटी, एस.टी.बसस्थानकांची दुरुस्ती, रेल्वे व विमानतळांचा विकास, उद्योग व पर्यटन तसेच शिक्षण, आरोग्य आणि महिला विकास त्याच बरोबर अल्पसंख्यांक विशेष सहाय्य व आदिवासी विकास या घटकांसाठी देखील अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, अशा शब्दात राज्याच्या आज सादर झालेल्या सन २०१५-१६ या वर्षीच्या अर्थसंकल्पावर कृषि व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे.

एकनाथराव खडसे यांनी पुढे म्हणले आहे की, या अर्थसंकल्पात जलयुक्त शिवार (रु.१ हजार कोटी), सिमेंट नाला बांधणे (रु.५०० कोटी), मालगुजारी तलावांची दुरुस्ती (रु.१०० कोटी), सूक्ष्म सिंचन(रु.३३० कोटी), पथदर्शी मोतीराम लहाने कृषि समृध्दी योजना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी यांत्रिकीकरणाचा आधार घेण्याकरीता तरतूद, कृषि पंपांचे उर्जीकरण, अपारंपारीक ऊर्जा स्त्रोतांचा कार्यक्रम, रोजगार हमी योजना (रु.७०० कोटी), ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटी रुपयांचा नियतव्यय असलेली मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना, आमदार आदर्श गाव योजना, वृक्ष संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना, द्राक्ष बागेचे गारपीटीपासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट करीता सहाय्य देणारी योजना, राष्ट्रीय कृषि योजना (रु.३३६ कोटी), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान आणि फलोत्पादन अभियान (रु.२५७ कोटी), सिंचन प्रकल्पाचे अचूक, तांत्रिक व वित्तीय नियोजन आणि प्रकल्प बजावणीचा कालबध्द कार्यक्रम (रु.७२७२ कोटी) याप्रमाणे अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे.

अर्थसंकल्पात प्रशासनाचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत व खर्चामध्ये बचत करण्याच्या उपाययोजना सुचविण्याऱ्या कल्पक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्याचे सुचविले आहे.

या अर्थसंकल्पामुळे कृषि विकासाला तसेच राज्यातील अनेक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल आणि कृषि विकासाचा दर निश्चितपणे वाढेल. त्याचबरोबर एकूण विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र यापुढेही अग्रेसर राहील, असा विश्वास खडसे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Wednesday, March 11, 2015

पायात पेन धरून सोडविले पेपर

पायात पेन धरून सोडविले पेपर

सावनेर,   : दहावी, बारावीची परीक्षा म्हटली की शहरातील मुलांचे काय कोडकौतुक होते. अंगारे, धुपारे, संतुलित आहार, तज्ज्ञांचे मागदर्शन, मनमर्जी सांभाळणे, पालकांची सुटी... ही यादी कितीही मोठी होऊ शकते. अशा लाडावलेल्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम पारशिवनी मार्गावरील कोथुर्णा येथील जयनारायण सेवते याच्या शिकण्याच्या जिद्दीने केले आहे. आत्यंतिक गरिबी, आईचा मृत्यू, वडिलांचा अपघात यामुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे उगवणारा प्रत्येकच दिवस त्याची परीक्षा घेत असतो. नुकतीच त्याची इयत्ता बारावीची वाणिज्य शाखेची परीक्षा संपली. त्यात या पठ्ठ्याने पायाच्या बोटांत पेन धरून पेपर सोडविले....अगदी सामान्य मुलांच्या वेगाने.
परदेशी पक्ष्यांचा परतीचा प्रवासाला सुरवात

परदेशी पक्ष्यांचा परतीचा प्रवासाला सुरवात

चंद्रपुर- गुलाबी थंडीचीचाहूललागताच चंद्रपुरातील पाणवठे आणि जलाशय परदेशी पक्ष्यांनी नटू लागतात दरवर्षी मंगोलिया, पोलंड, सायबेरिया आणि युरोप खंडातून पक्षी आपल्याकडे हिवाळी स्थलांतर करतात  आणि फेब्रुवारी- मार्च दरम्यान मायदेशी प्रस्थान करतात. त्यांच्या दुर्मिळ नोंदी आणि छायाचित्रणा करिता पक्षीमित्रांची एकच धडपड सुरु असते आणि  स्वखर्चाने जिल्ह्यातील विविध संस्थांशी संलग्नीत  कित्येक पक्षिमित्र  हे काम चोखंदळपणे बजावत असतात. सध्या थंडी नुकतीच सरली असून परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्याचे थवे मायदेशी परतण्यासाठी आकाशात सरसावत आहे. सध्या 'परतीचा प्रवास'  झाला असून आपणांस  जलाशायांवर पक्ष्यांची कमी होत असलेली विविधता निदर्शणास येऊ शकते. 
         दिवसें दिवस घसरत असलेली पक्ष्यांची संख्या आणि  नामशेष होत चाल लेल्या त्यांच्या प्रजाती हा जगभरातील पक्षी अभ्यास कां साठी गंभीर विषय आहे. पण २०१४-२०१५ ही वर्ष चंद्रपुर जिल्ह्यातील दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी करिता सुगीची ठरली आहे. यंदा चंद्रपुर जिल्ह्यातील पक्षिमित्र दिनेश खाटे,स्वप्नील कारेकर,पप्पी यादव,प्रसाद चट्टे,निखिल झाडे,वनदीप रोडे,चेतन साव, सुमेध साखरे, विक्की पेटकर इत्यादी वन्यजीव अभ्यासकांनी जिल्ह्यातील पाणपक्षी विविधतेचा आढावा घेतला. त्या करिता अभ्यासकांच्या चमूने सलग चार महिने जिल्ह्यातील विवध पाणवठ्यांवर स्थलांतरित पक्ष्याचे नोंदी घेतल्या. 
          सदर अभ्यासादरम्यान त्यांना युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्ड, पिनटेल, शोवेलर, गडवाल, युरेशिअन टील इत्यादी रानबदके मुबलक संख्येत आढळली तसेच दुर्मिळ असलेली कॉमन पोचार्ड ही या वेळी टिपल्या गेली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात या आधी न पाहिले गेलेले अनेक पक्ष्यांच्या प्रजातींचीही प्रथम नोंद सदर अभ्यासातून झाली. प्रथम नोंद झालेल्या पक्षीसुचीत हिमालय ओलांडून मंगोलियाहून येणाऱ्या पट्टकादंब अर्थात बार-हेडेड गूजचा ४०० हून अधिक थवा आढळून आला. तसेच विदर्भात फक्त अमरावती, भंडारा, गोंदिया जिह्ल्यात दिसणारे कलहंस (Grey-lag Geese) या वर्षी चंद्रपूर मध्ये पाहिल्या गेले. मात्र थेट सायबेरिया, रशियन प्रांतातून येणाऱ्या 'क्रौंच' (Eurasian Common crane) पक्ष्याची नोंद ही जिह्ल्यासाठी सर्वोत्तम ठरली. तब्बल दशकानंतर एवढ्या मोठ्या संख्येत क्रौंच पक्षी विदर्भात पहावयास मिळाला. सुमारे ३५ क्रौंच पक्ष्यांनी हल्लीच चंद्रपूर मध्ये हजेरी लावल्याने अभ्यासकांच्या चमूस सुखद धक्का बसला. कारण यापूर्वी सन २००० मध्ये अमरावती येथील कुणा एका पक्षीमित्रास केकतपुर जलाशयावर ३६ क्रौंच आढळल्याचा उल्लेख एका संशोधनपत्रात नमूद आहे. मात्र त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येत क्रौंच विदाभात कुठेच पहिल्या गेले नव्हते. वाढते औद्योगीकरण, अधिवासातील र्हास, अवाजवी कीटनाशकांचा वापर, अवैध मासेमारी यांच्या दुषप्रभावामुळे सर्वत्र क्रौंच पक्ष्यांच्या संख्येत घट दिसू लागली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत क्रौंच जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, पक्षीमित्रांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
       सद्यास्थित स्थलांतर संपले असून पक्षी मायदेशी प्रस्थान करण्यास सुरवात झाली आहे. परंतु अकाली पाउस, वादळ उद्भवल्यामुळे हवामानातील बदलाचा फटका ही यावेळी पक्ष्यांना परतीच्या प्रवासा दरम्यान सोसावा लागणार आहे अशी माहिती पक्षीमित्र दिनेश खाटे यांनी दिली. तसेच   घेतलेल्या सर्व नोंदीचा अहवाल आपण पक्षी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थेत सादर केला असून लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील पक्षीसुची प्रकाशित होत असल्याची  माहिती त्यांनी दिली. तसेच घेतलेल्या सर्व नोंदिकारिता त्यांनी चंद्रपूर वनविभाग, मार्गदर्शक आणि आपल्या चमूतील सर्व निरीक्षकांचे आभार मानले.