काव्यशिल्प Digital Media: चंद्रपुर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label चंद्रपुर. Show all posts
Showing posts with label चंद्रपुर. Show all posts

Saturday, October 27, 2018

चंद्रपूर के नागरीकोंनो राष्ट्रीय एकता दौड़ में हिस्सा लेने की अपील

चंद्रपूर के नागरीकोंनो राष्ट्रीय एकता दौड़ में हिस्सा लेने की अपील

संबंधित इमेजचंद्रपुर/संवाददाता:
 भारत के लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल ने भारत के स्वतंत्रता आंदोलन में पश्चात अखंड भारत के निर्माण के लिए दिए महत्वपूर्ण योगदान दिया. उनके कार्य से जनता को प्रेरणा मिलने के उद्देश्य से राष्ट्रीय एकता सप्ताह के तहत 31 अक्टूबर की सुबह 6.30 बजे एकता दौड़ का आयोजन किया गया है. स्पर्धा पुरुष खुला गट व महिला खुला गट में होगी. दौड़ जिला खेल संकुल से शुरू होगी. जनता महाविद्यालय, वरोरा नाका, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह से वापस वरोरा नाका से जिला क्रीड़ा संकुल पहुंचेगी. जिले के नागरिक, विद्यार्थी, युवक व खिलाड़ियों को बड़ी संख्या में शामिल होने की अपील जिला खेल अधिकारी अनंत बोबडे ने की है

Wednesday, September 26, 2018

चंद्रपुरात ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन; पहाटे ६ पर्यंत मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले चकाचक

चंद्रपुरात ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन; पहाटे ६ पर्यंत मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले चकाचक


१०८० पीओपी मुर्त्यांचे विसर्जन
Image may contain: one or more people, people standing and outdoorचंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही रामाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महानगरपालिकेने विविध भागातून विविध पर्यावरण, सामाजिक संघटनां निर्माल्य गोळा करण्यासाठी सरसावल्या होत्या. गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. या तलावांत ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़
गणेश विसर्जन रात्री उशिरा २.३० पर्यंत सुरु असल्याने स्वच्छतेकरिता महानगरपालिका सफाई कर्मचारी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत निरंतर कार्यरत होते. यासाठी विभागातर्फे त्यांना काम ३ शिफ्ट मधे वाटून देण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान स्वच्छता कर्मचारी शक्य तितक्या तत्परतेने मिरवणुकी पाठोपाठच झालेला कचरा गोळा करत होते.. शहर स्वच्छ राखण्याकरिता मनपातर्फे मिरवणूक मार्गांवर कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी आणि नंतर अश्या दोन्ही वेळेस रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. शेवटची गणेश मूर्ती रात्री २ वाजता शिरविण्यात आली. मनपा स्वच्छता विभागाने रात्री १२ वाजता नंतर स्वच्छतेचे कार्य सुरु केले, अथक प्रयत्न करून मिरवणुकीदरम्यान वाहतुकीने अस्वच्छ झालेले रस्ते सकाळी ६ वाजेच्या आत साफ करून चकचकीत करण्यात आले. 
तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता ते कृत्रिम टँकमध्ये करावे, यासाठी महानगरपालिकेने शहरातील विविध भागांत १७ कृत्रिम तलाव व निर्माल्य कलश निर्माण करण्यात आले . प्रत्येक तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेले कलश निर्माल्याने भरले की लगेच महापालिकेतर्फे खाली केले जात होते.शहरातील मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी रामाळा तलाव येथे परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे चंद्रपुरात मागील वर्षीच्या तुलनेत प्रदूषणमुक्त विसर्जन पार पडल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 
Image may contain: night and outdoor
महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत ७७८५ मातीच्या मूर्ती व १०८० पीओपी अशा एकूण ८८६५ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. सगळ्या लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपा कर्मचारी प्रयत्नशील होते, या कामात एस.पी. महाविद्यालय चंद्रपूरच्या ग्रीन थिंकर्स सोसायटी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले. मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना कृत्रिम तलावातच गणेश मूर्ती विसर्जित करण्याचा तसेच निर्माल्य कलशातच टाकण्याचा आग्रह स्वयंसेवक करीत होते. नागरिकांनाही त्यास प्रतिसाद देऊन पर्यावरण पूरक गणेशोत्सव विसर्जनास हातभार लावला. याद्वारे बहुतांश मूर्तींचे विसर्जन रामाळा तलाव , गांधी चौक , शिवाजी चौक , दाताळा रोड इरई नदी , पं. दीनदयाळ उपाध्याय तुकूम प्रा. शाळा, झोन क्र. ३ कार्यालय, नेताजी चौक बाबुपेठ, बंगाली कॅम्प झोन ऑफिस, विठोबा खिडकी विठ्ठल मंदिर वॉर्ड , शिवाजी चौक, लोकमान्य टिळक प्रा. शाळा पठाणपुरा रोड, नटराज टॉकीज ताडोबा रोड, इत्यादी ठिकाणच्या कृत्रिम तलावात झाले. कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या भाविकांना व गणेश मंडळांना प्रमाणपत्रे देऊन महानगरपालिकेने त्यांचा गौरव केला
याप्रसंगी आयुक्त श्री. संजय काकडे तसेच पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराज राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नायक सीसीटीव्ही च्या माध्यमातून मोबाईलद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहेरे. उपायुक्त श्री. गजानन बोकडे. श्री. गोस्वामी, सहायक आयुक्त श्री. विजय देवळीकर, धनंजय सरनाईक, सचिन पाटील, शीतल वाकडे, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता श्री. नितीन कापसे विसर्जन सुरळीतपणे पार पडण्यास प्रयत्नशील होते. 
Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoor




Friday, September 21, 2018

 चंद्रपूर पोलिसांकडून १४ दारू तस्करांना हद्दपार करण्याचे आदेश

चंद्रपूर पोलिसांकडून १४ दारू तस्करांना हद्दपार करण्याचे आदेश

Image result for हद्दपार आरोपीचंद्रपूर/प्रतिनिधी:
गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १४ जणांना आरोपींना जिल्ह्यातून  हद्दपार करण्याचे आदेश   दिले आहे. 
चंद्रपूर पोलिसांकडून गणेशोत्सव उत्सवाच्या मिरवणुकीत जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करून जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी चंद्रपूर यांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. 
  कलम 56, ५७ मुंबई पोलीस कायदा अन्वये हे आदेश पारीत करण्यात आले आहे. 
गणेशोत्सव कालावधीत अवैध दारूची विक्री होऊ नये, याकरीता गणेश विसर्जनापासून पुढील सहा महिने व तीन महिने कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. 
यात दिपक उर्फ रिंकु कोमल चव्हाण वय 19 वर्ष रा. महाराणा प्रताप वार्ड बल्लारशाह यास दि. 07/12/17 अन्वये 01 वर्षकरीता हददपार,
 पोलीस स्टेषन गोंडपिंपरी येथील काशीनाथ सदाशीव पोटे वय 32 वर्ष रा.मक्ता ता गोंडपिंपरी जि. चंद्रपुर यास दि. 12/04/18 अन्वये 06 महिने करीता,
गोंडपिंपरी लगतचे 06 तालुक्यातुन हद्दपार,पोलीस स्टेशन चिमुर होमराज मारोती गोसवाडे वय 27 वर्ष रा. मालेवाडा ता. चिमुर जि. चंद्रपुर यास दि. 16/05/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
 पोलीस स्टेशन सावली येथील श्रीनिवास रामदास पुल्लुरवार वय 42 वर्ष रा. लोंढोली ता. सावली जि. चंद्रपुर यास दि. 14/08/18 अन्वये ०३ महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील गौतम तुळशीराम लोणारे वय 32 वर्ष रा. नलेस्वर मोहाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर यास दि. 23/08/18 अन्वये 04 महिने करीता हददपार, 
 पोलीस स्टेशन चिमुर प्रशांत जनार्दन शामकुळे वय 34  वर्ष रा. खडसंगी ता. चिमुर जि. चंद्रपुर यास दि. 06/09/18 अन्वये 04 महिने करीता हददपार, 
 पोलीस स्टेशन बल्लारशाह अब्दुल रशीद अब्दुल गफ्फार कुरेशी वय ४३ वर्ष रा. राजेंद्र प्रसाद वार्ड बल्लारशाह यास दि. 06/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील आवेश शब्बीर कुरेशी वय 32 वर्ष रा. भंगाराम भिवापुर वार्ड चंद्रपुर यास दि. 15/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अनिल रामचंद्र जाफराबादी वय 35 वर्ष रा. गोपालपुरी वार्ड चंद्रपूर यास दि. 15/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार, 
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर कुणाल यशवंत गर्गेलवार वय रा. विट्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर यास दि. 14/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर छोटु उर्फ नितीन शंकर गोवर्धन वय 35 वर्ष रा. महात्मा फुले चौक बाबुपेठ वार्ड चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 06 महिने करीता हददपार,
पोस्टे चंद्रपुर शहर लव नरसिंग रेड्डी रा. अश्टभुजा वार्ड वय 25 वर्ष चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 03 महिने  करीता हददपार,
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर शुभम अमर समुद रा. पंचशील चौक घुटकाला वार्ड चंद्रपुर यास दि. 17/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार, 
पोलीस स्टेशन रामनगर येथील यावर अली शेरू अली वय 26 वर्ष रा. जलनगर वार्ड चंद्रपूर दि. 17/09/18 अन्वये 03 महिने करीता हददपार करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. हेमराजसिंह राजपूत यांचे मार्ग मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्री. सुधाकर अंभोरे,पोनि श्री. गोपाल भारती यांनी केली.
 



Sunday, August 05, 2018

चंद्रपुरात उड्डाण पुलाच्या खड्ड्यात पडला १२ वर्षीय मुलगा

चंद्रपुरात उड्डाण पुलाच्या खड्ड्यात पडला १२ वर्षीय मुलगा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. कंत्राटदाराने पिल्लरसाठी खड्डे खोदले़ मात्र या खड्ड्यांभोवती सुरक्षेकरिता कठडे लावले नाही. दिशादर्शक फलक व पुरेशा प्रमाणात प्रकाश व्यवस्था देखील न केल्याने याच परिसरातील श्रुक्र्वारी एका १२ वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला असता,
शुक्रवारी रात्री ९ वाजता आपल्याच आनंदात रस्त्याने जात असलेल्या  प्रित पाटील नामक मुलगा अचानक खड्ड्यात पडल्याने त्यातील चिखलात फसला़ याच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना हे दृश्य दिप्रित सताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या बालकाला सुरक्षित बाहेर काढून माणुसकीचा प्रत्यय दिला़.हा खड्डा प्रित यांच्या उंची पेक्षा मोठा हों व त्यात मोठ्या प्रमाणत चिखल साचले होते.या चिखलात तो मानेपरीयंत फसला,त्याला खड्ड्याचा अंदाज न आल्याने पिल्लरच्या तो खड्ड्यात पडला. ही घटना नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्याने प्रसंगावधान दाखवून बालकाला सुखरूप बाहेर काढले़ कंत्राटदाराच्या चुकीमुळेच ही घटना घडली़ सात दिवसांच्या आत फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक स्नेहल रामटेके यांनी दिला आहे.



  

Saturday, August 04, 2018

चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना मिळणार भरीव निधी:अहिर

चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना मिळणार भरीव निधी:अहिर

गावाला पायाभूत सुविधांसाठी निधी : सरपंच करणार नियोजन
चंद्रपूर /प्रतिनिधी:
 जिल्ह्यातील पंधराशेच्यावर गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्ह्यातील सरपंचांच्या भरगच्च मेळाव्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी आज केले. 
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात आज झालेल्या जिल्हाभरातील सरपंचांच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत गावागावांना मिळणाऱ्या निधीबाबतची माहिती उपस्थित सरपंचांना दिली. लक्षावधीचा निधी थेट ग्रामपंचायतला मिळणार आहे. या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने सरपंच उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आ.म.यादव, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावतीच्या सभापती विद्या कांबळे, पोंभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, गोंडपिपरीचे सभापती दिपक सातपूते, जिल्हा परिषद सदस्य प्रविण सुर, राजू गायकवाड, मारोती गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सरपंचांनी आपल्या गावाच्या समस्या मांडल्या. याशिवाय काही प्रलंबित विषयावरही यावेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. 
केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठान मार्फत क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ही योजना आखली आहे. ही योजना बाधीत क्षेत्रातील (खाणीमुळे बाधीत झालेली गावे) सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लोकसंख्या व बाधित क्षेत्र, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कार्यान्वित करण्यात आली आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम राबवताना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य व सामाजिक व आर्थिक परिस्थिती वरील आघात कमी करणे, क्षेत्रातील व्यक्तींना दीर्घमुदतीचे शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, यासाठी या निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे सर्वात जास्त निधी या योजनेअंतर्गत चंद्रपूरला मिळाला आहे.
यासंदर्भात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी या योजनेत प्रत्येक गावाला लक्षावधी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट केले. या रुपयांचा विनियोग योग्य कामांसाठी झाला पाहिजे, असे आवाहन उपस्थित सरपंचांना केले. यावेळी त्यांनी खर्च करण्यासाठी सर्वाधिक प्राथमिकता त्या गावातील शुद्ध पेयजलासाठी प्रत्येक गावाने स्वतःच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था निर्माण करताना एटीएम आरो मशीन लावावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय सर्व बाधित गावाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा शुद्ध पेयजल पुरवणाऱ्या आरो मशीनचे एटीएम लावण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. गावांमध्ये शाळा, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सोलर यंत्राद्वारे शाश्वत वीजपुरवठा यालाही प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच प्रत्येक गावाच्या शेजारील नाल्याला खोलीकरण करण्यासाठीही या निधीचा खर्च करण्यात यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रत्येक सरपंचाने ग्रामस्थांना गावाच्या विकासाचा कृती आराखडा सादर करावा व यामध्ये प्राथमिकता पेयजल व शाश्वत ऊर्जा स्त्रोत निर्माण करण्याला देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत कुठले काम घेतले जाऊ शकते. याबाबतचे सादरीकरण जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.जी.डी.कांमडे यांनी केले. यावेळी सरपंचांनी केंदीय गृहराज्य मंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा केली

Thursday, August 02, 2018

मुलांच्या शाळेपर्यंतच्या सुरक्षित प्रवासासाठी  पालकांनी देखील जागरुक असावे:व्ही.एन.शिंदे

मुलांच्या शाळेपर्यंतच्या सुरक्षित प्रवासासाठी पालकांनी देखील जागरुक असावे:व्ही.एन.शिंदे

चंद्रपूर/प्रतिनिधी: 

शाळेमध्ये जाणारी आपली मुले कोणत्या वाहनातून प्रवास करतात. या वाहनाचे चालक प्रशिक्षित आहे अथवा नाही ? शाळा या वाहन चालकांबाबत कोणती काळजी घेते ? यासंदर्भातील चौकशी आपल्या पाल्याच्या अभ्यासाइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे स्कूल बस व अन्य वाहनाबाबत पालकांनी जागरूक रहावे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी आज येथे केले. 
आपला पाल्य, आपला मुलगा ज्या शाळेमध्ये शिकतो आहे. त्या शाळेतील वाहन व्यवस्थेबाबत पालकांनीदेखील जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने देखील या भागावर अतिशय लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक घरातला मुलगा शहरातील शाळांमध्ये जाताना अतिशय सुरक्षितरित्या शाळेमध्ये पोहोचला पाहिजे. याबाबत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार वाहनांच्या तपासणीची काळजी घेतली जाते. 

तथापि, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, पालक आणि अन्य सर्वच घटकांनी याबाबत जागरूक असणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. माननीय न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहनातून वाहतूक करण्यासाठी पालकवर्गामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या संदर्भात आज पालक व शाळेच्या परिवहन समिती सोबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जनजागृती मेळावा घेण्यात आला. पोलीस मुख्यालयात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना हेमराजसिंग राजपूत यांनी देखील शालेय वाहतुकीच्या नियमांचे पालन सर्व घटकांनी करणे आवश्यक असून शाळा व्यवस्थापनाने याकडे मुख्यत्वे लक्ष घालावे, असे निर्देश दिले. प्रत्येकाच्या घरातील मुले ही लाख मोलाची असतात. त्यामुळे अतिशय जाणीवपूर्वक या वाहन व्यवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माननीय न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने देखील गाड्यांची तपासणी करताना काटेकोर नियमांचे पालन करावे, अशी सूचना देखील त्यांनी केली. 
यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी देखील शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना वेळोवेळी आमच्या मार्फत सूचना दिल्या जातात. तथापि, वाहन व्यवस्था ही मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात काम करत असते. त्यामुळे यासंदर्भातील शाळेच्या परिवहन समितीने अधिक बारकाईने लक्ष घालावे. तसेच शहरातील सर्व नागरिकांनी देखील कोणत्याही शाळेची बस असेल तरी अतिशय सुरक्षितरित्या रस्त्यावर प्रवास करू शकेल व सुलभरीत्या शाळेत पोहोचू शकेल. अशा पद्धतीने शहराशहरात वातावरण निर्मिती करावी. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुख्याध्यापक पालक उपस्थित होते.

Tuesday, May 22, 2018

चंद्रपुरात अभियंता परीक्षेपासून १००० विद्यार्थी वंचित

चंद्रपुरात अभियंता परीक्षेपासून १००० विद्यार्थी वंचित

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाकडून अभियांत्रिकी पदासाठी आयोजित केलेल्या `महाराष्ट्र नगर परिषद सेवा`पूर्व परीक्षेचा चंद्रपुरात हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाने `महाराष्ट्र नगर परिषद सेवा` मधील सेवा अंतर्गत (गट-क) श्रेणी अ,ब,क व ड च्या संवर्गातील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा,विद्युत अभियंता   सेवा,संगणक अभियांत्रिकी सेवा,पाणी पुरवठा व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, लेखा परीक्षण लेखा सेवा,कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या सारख्या पदासाठी परीक्षेचे आयोजन केले होते,यात चंद्रपूर शहरातील गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालय व रेनायसंस अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचे केंद्र देण्यात आले होते,मात्र गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालय येथील केंद्रावर परीक्षेचा सर्वर फेल असल्याने या केंद्रावर परीक्षा असलेल्या १००० विध्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचीत राहवे लागले आहे.तर त्याच वेळेवर  रेनायसंस महाविद्यालय येथे हि परीक्षा सुरळीत सुरु होती.
 गेले 4 दिवसापासून ही परीक्षा सुरू असून राज्य सरकारतर्फे महाआयटी संस्था ही परीक्षा घेत आहे. यासंपूर्ण प्रकारामुळे गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. हि परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर आले होते. मात्र हा संपूर्ण गोंधळ लक्षात येताच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळाला,हि परीक्षा सकाळी ९.३० ते ११ दुपारी १२.३० ते २.०० व २.३० ते ५.०० या वेळेवर आयोजित केली होती.मात्र सकाळी ९.३० च्या पहिल्या बॅच पासून हा गोंधळ सुरु झाला. यानंतर परीक्षा केंद्रावर वातावरण चिघळत दिसताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त परीक्षा केंद्राबाहेर लावण्यात आला.त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मानसिक,आर्थिक,आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे.
या नंतर युवासेनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.ज्यात आजच्या तारखेची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी व पुन्हा परीक्षेची दिनांक व वेळ आजच्या आज परीक्षेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात यावा, बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जागी परीक्षा केंद्र देण्यात यावी, गुरु साई कॉलेजच्या गलथान कारभारासाठी कॉलेजवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी  युवा सेना जिल्हीप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात व इंजि.निलेश बेलखेडे यांच्या नैत्रुत्वात, यावेळी सुरज घोंगे,विनय धोबे ,विशाल पिंपळकर,पवण राऊत या युवा सेना शिष्ठमंडऴासाेबत परीक्षार्थी विध्यार्थी वर्ग उपस्थित होते 

-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Sunday, May 20, 2018

वाहनाच्या धडकेत अस्वल अन चितळाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत अस्वल अन चितळाचा मृत्यू


चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुर जिल्ह्यातील मुल शहरापासून चार किलोमीटर अंतरावर नागपूर रोडवर चित्तेगाव या गावाजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेत चीतळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.अध्ण्यात वाहनाने जंगल परिसरातून जात असतांना जोरदार धडक दिली त्यात चीतळाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या अस्वलाचा  मुलवरून १५ किमी अंतरावर असलेल्या केसलघाट नागाळा महामार्गावर अपघात झाला.महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वन्य प्राणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Monday, April 16, 2018

 कठुआ,उन्नाव प्रकरण;चंद्रपुरात जनतेचा आक्रोश.बघा विडीओ

कठुआ,उन्नाव प्रकरण;चंद्रपुरात जनतेचा आक्रोश.बघा विडीओ




चंद्रपूर /प्रतिनिधी:



देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ आणि उन्नाव बलात्कार घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळावा कायद्यात कठोर शिक्षा व्हावी  या मागणीसाठी चंद्रपुरात कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते, कठूआ येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात कॅन्डल मार्च निघत आहे. देशातील लाखो नागरिकांप्रमाणे आपल्याला वेदना झाल्या. ज्याप्रमाणे महिलांना वागणूक मिळत आहे. यापुढे मिळता कामा नये. हिंसाचाराच्या विरोधात आणि न्यायाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या कॅन्डल मार्चमध्ये सामील व्हा. असे आव्हाहन गेल्या २ दिवसापासून जिल्यात सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात होते. यात whatsapp चा  जास्त वापर करून जास्तीत जास्त लोकांपारीयंत हा  कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हा असे आव्हाहन करण्यात आले होते, त्यामुळे यात शहरभरतील तरुण तरुणाई,महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते,हा कॅन्डल मार्च गांधीअ चौक चंद्रपूर येथून निघून संपूर्ण शहराच्या प्रमुख मार्गावरून निघाला.यात हजारोच्या संख्येने लोक we want justice म्हणत हाक देण्यात आली.(छायाचित्र:गोलू बाराहाते,ETC)


Image may contain: one or more people, night, crowd and outdoor

Friday, March 30, 2018

चंद्रपुर पोलीस शिपाई भरती-2018

चंद्रपुर पोलीस शिपाई भरती-2018

दिनांक 04 एप्रिल 2018 रोजी
chandrapur police साठी इमेज परिणाम
चंद्रपुर पोलीस शिपाई भरती-2018 मध्ये लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवांराची यादी दिनांक 24/03/2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यावर आक्षेप दिनांक 27/03/2018 पर्यंत नोंदविण्यास कळविण्यात आलेले होते. त्याबाबत समर्पक आक्षेप या कार्यालयास प्राप्त न झाल्याने दिनांक 24/03/2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी कायम ठेवण्यात आलेली आहे.
लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा ही दिनांक 04/04/2018 रोजी घेण्यात येणार आहे. करीता पात्र उमेदवार यांनी दिनांक 04/04/2018 रोजी सकाळी 04ः00 वाजता पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे न चुकता हजर राहावे. वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश नाकारल्या जाईल याची नोंद घ्यावी.
लेखी परिक्षेकरीता महत्वाच्या सुचना
➢ लेखी परिक्षेला येतांना पोलीस भरतीचे पिवळया रंगाचे ओळखपत्र सोबत आणावे.
➢ सोबत हॉल टिकीट व पाण्याची बॉटल आणावी.
➢ परिक्षेला येतांना कोणत्याही प्रकारचे इलेक्टंानिक साहित्य ,कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, कॅमेरा,लॅपटॉप, टॅबलेट, तसेच इतर मौल्यवान वस्तु इ.सोबत आणु नये.
➢ उशिराने येणाऱ्या उमेदवारांना लेखी परिक्षेकरीता प्रवेश देण्यात येणार नाही.पोलीस विभागातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की, पोलीस भरती प्रक्रिया निपःक्षपातीआणि अत्यंत पारदर्शक पध्द्तीने होत असुन उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभणास किंवा आमिशाला बळीपळु नये. पोलीस भरतीमधील उमेदवार यांना कोणत्याही टप्प्यावर काही शंका किंवा माहिती असल्यास त्यांनी त्वरीत भरती प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकारी यांना समक्ष भेटुन संपर्क करावा.
संपर्क क्रमांक पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपुर 07172-251200/263100/2732581

                                                                                                     (ललित लांजेवार )

Monday, January 15, 2018

चंद्रपुरात कृषी मेळावा व विभागीय जलसाक्षरता केंद्राचे भव्य आयोजन

चंद्रपुरात कृषी मेळावा व विभागीय जलसाक्षरता केंद्राचे भव्य आयोजन

चंद्रपूर/प्रतिनिधी:   
चंद्रपूर जिल्हयातील कृषि आधारीत अर्थव्यवस्थेला व एकूण शेती व्यवस्थेला जलव्यवस्थापन, कृषि व्यवस्थापन व बदलत्या परिस्थितीत शेतीमधील बदल स्विकारण्याबाबतचे विचार मंथन आज पासून चंद्रपूरच्या चांदा क्लबवर सुरु झाले आहे.राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता, वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, अनियमित पर्जन्यमान यामुळे पाण्याच्या वापरावरील ताण वाढणार आहे, यासाठी जलजागृती आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याला जलसाक्षर करण्यासाठी नियोजन करण्याची आखणी केली होती. नागपूर महसूल विभागात चंद्रपूरची विभागीय जलसाक्षरता केंद्रासाठी निवड करण्यात आली. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जलसाक्षरता कार्यशाळेचे व विभागीय जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभ करण्यात आले.
                           याचवेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, महिला स्वंयस्वायत्ता समुहामार्फत कृषि प्रदर्शनी व वस्तु विक्री प्रदर्शनीलाही प्रारंभ झाला. 15 ते 19 जानेवारी या काळामध्ये ही प्रदर्शनी चालणार असून या ठिकाणी कृषि तंत्रज्ज्ञानातील नवनवीन अविष्कार बघायला मिळणार आहे. शेतीशी नाळ जुळली असणा-या प्रत्येक विद्यार्थ्याने, गृहीनीने व शेतक-यांने या चार दिवसांच्या कार्यक्रमात चांदा क्लब मैदानाला भेट दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील एकूण शंभर महिला बचत गट सहभागी होत आहे. 
                   या प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून बाजाराच्या मागणीनुसार विविध गृहोपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, धने, शेवया, चटनी, रेडीमेड कपडे, खादीचे कपडे, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांब पोळी, पुरण पोळी, झुनका भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, टेबल क्लॉथ, मेंढीच्या केसापासून बनलेल्या गादया, उशा, घोंगडी, लाकडी शिल्प, टोपल्या, सुप-परडे, खराटा, झाडू, कंदील, शोपीस, हातसळीचे तांदुळ, सुहासीक तांदुळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळ खत, गोमुत्र अर्क, आयुर्वेदिक उत्पादने, तुरदाळ, उडीद, चणा, मुग, मटकी, चवळी इत्यादी ग्रामीण भागातील कडधान्ये विक्रीला उपलब्ध होणार आहेत.

Tuesday, November 28, 2017

चंद्रपुरात ग्रंथ महोत्सवाचे थाटात उदघाटन ; शहरातून निघाली भव्य ग्रंथदिंडी

चंद्रपुरात ग्रंथ महोत्सवाचे थाटात उदघाटन ; शहरातून निघाली भव्य ग्रंथदिंडी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्य शासनातर्फे रावबिण्यात येत असलेल्या वार्षिक ग्रंथ महोत्सवाची सुरुवात आज चंद्रपुरात करण्यात आली.ग्रंथ महोत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता ज्युबली हायस्कुल ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह पर्यंत भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या ग्रंथ दिंडी चे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन समारंभ पार पडले. यावेळी मुख्य उदघाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महापौर अंजली घोटेकर,ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवर उपस्थित होते.

28 व 29 नोव्हेंबर या काळात संपन्न होणा-या या कार्यक्रमामध्ये वाचन संस्कृतीला चालना देणा-या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यक्रमाचे वैशिष्टय विद्यार्थ्यांचा सहभाग ठरले. विविध वेशभूषेत शाळांचा सहभाग, लेझीम पथक, एनसीसी, स्कॉऊड गाईड, एनएसएस पथक तसेच आकर्षकरित्या सजवलेल्या ग्रंथदिंडीने शहर वाशियांचे लक्ष वेधल्या गेले.

वाचन संस्कृतीला चालना मिळावी या साठी या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केल्या गेले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन, संस्कृती व साहित्य चळवळीशी संबंधित भरगच्चं कार्यक्रम होणार असून त्यानिमित्य नागरिकांनी पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुलांशी संवाद साधतांना पुस्तकांच्या वाचनासोबतच सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. महापौर अंजलीताई घोटेकर यांनी पुस्तक आणि खेळामुळे व्यक्तीमत्व विकासाला चालना मिळत असून त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी चंद्रपूर जिल्हयात ग्रंथालय चळवळीचे योगदान यावर प्रकाश टाकला. जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी अभ्यासिका सुरु करण्यात आल्या असून ग्रंथालय बळकटीकरणाची मोहीम सुरु आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी केले. या सत्राचे संचालन मनिषा गिदेवार यांनी केले. यानंतर दुपारी पर्यावरण सद्यास्थिती व उपाय यावर विद्यार्थ्यांचा परिसंवाद रंगला. जेष्ठ कवी प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन रंगले. तर सांयकाळी व-हाडी झटका हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद ग्रंथालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती या सर्वांचा समन्वय साधत हे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी ग्रंथप्रदर्शनी व विक्री दालनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उदया या ग्रंथोत्सवाचा दुसरा दिवस असून मोठया संख्येने सकाळी 10 ते सांयकाळी 7 पर्यंतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता व्याख्यान, दुपारी 12 कवी संमेलन, दुपारी 3 वाजता वादविवाद स्पर्धा तर सांयकाळी 5 वाजता ग्रंथालयात अभ्यास करुन शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सांयकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रम होणार आहे.

हे कार्यक्रम २ दिवस चालणार असून या कार्यक्रमात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून संस्कृती आणि ग्रंथालय याबाबत डॉ.पदमरेखा धनकर, डॉ.प्रा अशोक मथानकार यांचे व्याख्यान नागरिकांना ऐकायला मिळणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता या ग्रंथोत्सवाच्या समारोप होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. अहिर तर प्रमुख उपस्थिती ना. मुनगंटीवार, खा. अशोक नेते, आ. भांगडिया,आ. ना गो गोणार,आ.अनिल सोले,आ. नानाजी शामकुळे,आ. विजय वडेट्टीवार.आ. धानोरकर आदी उपस्थित राहणार आहेत.












Sunday, November 26, 2017

चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली

चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली

चंद्रपूर प्रतिनिधी :
चंद्रपुरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.शहरातील तुकूम परिसरात दुपारच्या सुमारास मराठी पाट्यासाठी आंदोलन करत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दुकान चाळीतील इंग्रजी पाट्यांना काळफासत इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून टाकली.

शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर दुपारी हा प्रकार घडला.तुकूमपरिसरात दुपारी मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या हातात मनसेचे झेंडे देखील होते. मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर या कार्यकर्त्यांनी अचानक इंग्रजी पाट्यांना लक्ष करत काळफ़ासले आणि काही इंग्रजी बॅनरही फाडले.अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण  निर्माण झाले होते. काही दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केली.
चंद्रपुरात मनसेने नवीन शाखेचे उदघाटन केल्या नंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केले होते.आता पुन्हा एकदा मनसेने मराठी पाट्यांसाठी आक्रमक झाली आहे.