Tuesday, September 25, 2018
Saturday, August 04, 2018
अशोक अग्रवाल आत्महत्या प्रकरण;चारही आरोपींना जामीन मंजूर
Tuesday, July 31, 2018
गोंडखैरीत तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या
Wednesday, June 20, 2018
चंद्रपुरात माजी संघ प्रचारकाची आत्महत्या
Wednesday, June 06, 2018
नागपुरात व्यापाऱ्याची उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या
Tuesday, May 22, 2018
प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Saturday, March 31, 2018
कामावरून काढलेल्या कामगाराने केली आत्महत्या
Wednesday, February 21, 2018
कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
Saturday, February 17, 2018
काजळसर येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
Tuesday, January 16, 2018
शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या
Monday, January 15, 2018
कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Monday, December 04, 2017
विहिरीत उडीघेवून आत्महत्या
Thursday, November 23, 2017

कर्जापायी शेतक-याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या
मूल: तालुक्यातील गांगलवाडी येथिल शेतकरी परशुराम सकाराम बोलमवार वय 42 या शेतक—याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
मृतक शेतकरी परशुराम बोलमवार याला तीन मुली, पत्नी व आई असा परीवार असुन अनु्क्रमे मोठी मुलगी 5 व्या वर्गात, 2 —या वर्गात व पहिल्या वर्गात आहे. त्याला दीड एकर शेती असून शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते.या मृतक शेतक—याने 2008—9या वर्षात कर्ज घेतले होते अशी माहिती आहे. यावर्षी पाणी पाऊस नसून धानाला मावा,तुळतुळा,खोड किडी या रोगाने ग्रासले असून शेतक—याचे पिकही झाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आला असतांनाच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी केली असल्याने शेतक—याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार व मूल नगर परीषदेचे नगरसेवक विनोद कामडे यांनी लगेच घटनास्थळी भेट घेतली व घटनेचा रोष व्यक्त करत शेतक—याच्या कुटंबाला सरकारने भरीव मदत करावी असे मत व्यक्त केले. मूल तालुका अर्थमंत्री व जिल्हृयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असून त्यांचे क्षेत्रात या शेतक—याची आत्महत्या होत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.
Tuesday, November 21, 2017
Saturday, November 18, 2017

सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी
वेकोली वणी क्षेत्रातील भद्रावती तालुक्यायील ताडाळी( उर्जाग्राम) येथील मुख्यकार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून सहाय्यक अभियंता अशोक नरडे (५६) रा. दुर्गापूर कॉलनी चंद्रपूर यांनी आत्महत्या केली. नरडे यांना मानसिक त्रासाला कंटाळले असल्याचे कडले. नरडे यांनी आत्महत्या केल्याचे कळताच उर्जाग्राम परिसरात एकच खळबळ उडाली.
Sunday, November 12, 2017

कुटुंबीयांच्या धाकामुळे बारावीतील दोन मुलींची आत्महत्या
नागपूर/प्रतिनिधी : मित्राला भेटण्याकरिता शाळा बुडवून निघून गेलेल्या दोन मुलींनी घरी परतल्यास आईवडील व भाऊ रागावतील, मारहाण करतील या धास्तीने दोन मुलींनी कोराडी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मुलींनी मृत्यूपूवी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्यामागचे कारण लिहून ठेवले. आशना रवींद्र रोकडे (17) रा. मार्टिननगर आणि मनीषा पटले (17) रा. जरीपटका पोलीस ठाण्याच्या मागे अशी मृत मुलींची नावे आहेत.
दोघीही जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या महाविद्यालयात मुली बाराव्या वर्गात वाणिज्य शाखेत शिकत होत्या. गुरुवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. मात्र, शाळेत न जाता त्या शिकवणी वर्गातील मित्र निशिकांत नागपुरे याच्यासह अंबाझरी उद्यान व फुटाळा येथे गेल्या होत्या. त्या ठिकाणी आशनाला भेटण्यासाठी छिंदवाडा येथून तिच्या नात्यातील रजत नावाचा मुलगा येणार होता. मात्र, रजतची गावाकडे परीक्षा सुरू असल्याने तो नागपुरात आलाच नाही. रात्री उशीरापर्यंत आशनाने त्याची वाट बघितली. त्यामुळे त्यांना फुटाळयावर 8 वाजले. निशिकांत हा दोन्ही मुलींना घरी परतण्याची विनंती करीत होता. मात्र, तोपर्यंत मुली शाळेत न जाता फिरायला निघून गेल्याची कळले होते. त्यामुळे दोघिंनाही भीती वाटत होती. त्यामुळे दोघीही निशिकांतला परतण्यास नकार देत होत्या. त्याच्या दुचाकीने त्या रात्रभर इकडे तिकडे भटकत होत्या.
निशिकांतलाही घरी जाण्यास मज्जाव करीत होत्या. निशिकांतमुळेच आपण शाळेत न जाता फिरायला गेलो, अशी माहिती पोलिसांना देऊ, अशा शब्दात त्याला धमकावत होत्या. त्यामुळे मुलींमुळे फसल्याचे समजून तो त्यांच्यासोबत फिरत होता. त्यानंतर ते कोराडी परिसरात फिरत होते. त्याच दिवशी मुले घरी न परतल्याने मुलींच्या पालकांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मुली आता घरी परतण्यात अर्थ उरला असून जीवनयात्रा संपविण्याची भाषा करू लागल्या. त्यामुळे निशिकांत घाबरला व त्याने आपल्या आईवडिलांशी संपर्क केला. मुलींच्याही पालकांना कळविले. मात्र, मुली परतण्याच्या तयारीत नव्हत्या. शुक्रवारी ते कोराडी तलाव परिसरात पोहोचल्या. मुलींनी आत्महत्या करू नये म्ळणून रात्री 8 वाजेपर्यंत तो त्यांच्यावर नजर ठेऊन होता. त्यानंतर पोलिसांना व कुटुंबियांना माहिती देण्यासाठी तो तलाव परिसरातून निघाला. घरी पोहोचून त्याने सर्वांना माहिती दिली. त्यानंतर सर्वजन कोराडी पोलिसांसह तलाव परिसरात मुलींचा शोध घेतला. मात्र, रात्री काहीच सापडले नाही. तलावाच्या बांधावर मुलींच्या चपला दिसल्या. आज शनिवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास तलावात मुलींचे मृतदेह सापडले आणि रोकडे व पटले परिवारावर शोककळा पसरली.
आशनाचा शेवटचा संवाद बहिणीशी
घरातून बाहेर निघून गेल्यानंतर शुक्रवारी आशनाने मोठी बहिण रोशनीला भ्रमणध्वनी केला. रोशनी विवाहीत असून ती छिंदवाडा येथे राहते. यावेळी आशनाने "माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. ही चूक सुधारण्यासारखी नाही. मी आईवडीलांशी डोळे मिळवू शकत नाही. माझा शेवट जवळ आला आहे. हा माझा शेवटचा फोन आहे. यानंतर मी दिसणार नाही. मी आत्महत्या करीत आहे.' अशा शब्दात आपल्या बहिणीशी संवाद साधला. त्यानंतर रोशनीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तू घरी परत जा, तुला कुणीही काही बोलणार नाही, असे तिला सांगितले. त्यानंतर आशनाने भ्रमणध्वनी ठेवून दिला. तर रोशनीने आपल्या आईवडिलांना भ्रमणध्वनी करून सर्व माहिती दिली. दुसक्तया दिवशी मुलींच्या मृत्यूचाच निरोप घरी पोहोचला.
Monday, November 06, 2017
'विद्या मला माफ कर' - कंत्राटदाराची आत्महत्या
ठाणे/ प्रतिनिधी-
गोडबंदर रोडवरील एका कंत्रटदाराचा कारमध्ये मृतदेह आढळून आला आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव संकेत जाधव असे आहे. घटनेची माहिती पोलिसांना ंमिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन कारमधील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. गाडीमध्ये एक रिव्हाल्वर आणि एक चिट्टी मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार स्वताच्याच रिव्हाल्वरने आत्महत्या केली असवी असे प्रथमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.गाडीत संकेतच्या मृतदेहाजवळ पोलिसांना चिट्टी मिळाली आहे. या चिट्टीमध्ये “विद्या मला माफ कर, मला धंद्यात नुकसान झालं” अशा वाक्याचा उल्लेख असल्याची माहिती मिळाली.
जाधव हा ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात कुटुंबासोबत राहत होता. कासारवडवली पोलिस त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.