Sunday, July 15, 2018
Monday, July 02, 2018
अखेर त्या दहशदखोर वाघाला पकडण्यात वनविभागाला यश
संग्रहित |
Tuesday, June 19, 2018
सिंदेवाही तालुक्यातील वाघाचा बंदोबस्त करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश
Saturday, April 07, 2018
पोलिसांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला
Tuesday, January 16, 2018
ट्रक आणि कारच्या धडकेत एक ठार ; एक जखमी
Sunday, December 10, 2017

वाघाने घेतला निर्मलाचा बळी
सिन्देवाही -येथील निर्मला मुखरुजी निकोडे (वय ५२ ) ही महीला शेतावर एकटीच गेली. सांयकाळ झाली परंतु घरी वापस आली नाही. तिचा सांयकाळी शोध घेतला असता मिळाली नाही. मग सकाळी पुन्हा शोध घेतला असता नाल्यामध्ये छिन्नविचीन्न अवस्थेत वाघाने खाल्लेले आढळले.
Monday, November 27, 2017
वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी

सिंदेवाही तालुक्यातील शिवनी रेंज मधील पांढरवाणी क्षेत्र क्रमांक २६१ पिपरहेटी बिट १ मध्ये सोमवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान जळाऊ लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढविला.सुमित्रा सुखदेव आले (55) वर्ष असे या वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

काजलच्या मृत्यूचा तपास वरिष्ठाकडे
या घटनेची बातमी
https://kavyashilpnews.blogspot.in/2017/11/blog-post_668.html
Saturday, November 25, 2017
प्राचार्यांनी दिले मुख्याध्यापकांना धडे
सिंदेवाही- तालुकास्तरीय KRA मुख्याध्यापक कार्यशाळा पंचायत समिती, सिंदेवाही -( बीट :- सिंदेवाही, गुंजेवाही अंतर्गत भारत विद्यालय , पळसगाव (जाट) येथे घेण्यात आली.
यावेळी बाबूपेठ येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणचे प्राचार्य धनंजय चापले यांनी मार्गदर्शन केले.
KRA बाबत मुख्याध्यापकामध्ये मार्गदर्शन व चर्चा, NAS सर्वेक्षण बाबत विशेष मार्गदर्शन व महत्व विषद केले, ASER सर्वेक्षण बाबत आपल्या जिल्ह्याचे स्थान व आपली प्रगती कुठे आहे, यावरही मार्गदर्शन केले. गणितपेटीतील साहित्याची ओळख व घटकनिहाय वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले.दि. 14 जुलै 2017 च्या जीआर चे वाचन सर्व मुख्याध्यापकांनी करून त्यानुसारच पायाभूत चाचणी व संकलित चाचणी-1 घेऊन गुणदान करावे, असे सूचित करण्यात आले.
कार्यशाळेत शिविअ केंद्रप्रमुख व सर्व विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.
कार्यशाळेत मान. श्री. मेश्राम ( B.E.O. ), श्री. चहांदे, श्री. परचाके, बरगडे ( के. प्र. ) श्री. बोरकर मु.अ. भारत विद्यालय , पळसगाव श्री. भारत मेश्राम, श्री. बगडे, श्री. निकुरे, विषयतज्ञ उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन श्री. शेंडे ( के.प्र.) यांनी केले, तर आभार श्री. जनबंधू यांनी मानले.
Wednesday, November 22, 2017
काजलचा मृतदेह विहिरीत
- सिंदेवाही तालुक्यातील घटना
सिंदेवाही/प्रतिनिधी:
सिंदेवाही येथील सिद्धार्थ चौक जवळील विहिरीत एका युवतीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आल्याची घटना घडली . काजल रावजी हनुमंते वय १७ वर्ष असे या युवतीचे नाव असून ती सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही येथे बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती.
प्राप्त माहिती अनुसार काजल हि य आपल्या मोठ्या वडीलाकडे सिंदेवाही येथे राहून शिक्षण घेते. ती सिंदेवाही तालुक्यातील लोनखैरी या गावची रहिवासी होती. तिन दिवसापासून म्हणजे रविवार पासून ती अचानक घरून निघून गेली होती. घरचांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेच आढळून न आल्याने आज बुधवार ला सकाळी ७.३० वाजता च्या दरम्यान सिंदेवाही येथील सिद्धार्थ चौक येथील विहरीत तरंगत असलेल्या आढळून आले.
हि माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली.पोलीस घटना स्थळ गाठून तिला विहीरीतून बाहेर काढले. पुढील तपास इंगळे साहेब ठाणेदार सिंदेवाही याांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Tuesday, November 07, 2017
कलावंत राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत नवरगावचे कलावंत अव्वल
कलावंत न्यास उज्जैन(मध्यप्रदेश) आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथील श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाच्या बावीस विद्ध्यार्थ्यानी वेगवेगळी बक्षिसे पटकावून अव्वल येण्याचा मान पटकावला आहे . भारताच्या विविध प्रदेशातील हजारो विद्यार्थ्यानी या स्पर्धेत भाग घेतला होता.
रेखा व रंगकला विभागाचा कृनाल धनझोडे यांस पाच हजार रुपये रोख आणि
अक्षय मेश्राम याला दोन हजार रुपये रोख पारितोषिक प्राप्त झाले. हे दोन्ही पुरस्कार त्यांच्या ग्राफीक्स या कलाप्रकाराला देण्यात आलेत.
अबोली लांबे आणि अक्षय पिंपळक यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले असून अन्य विध्यार्थ्यांना मेरिट सर्टिफिकेट जाहीर झालीत.
त्यात श्वेता गुरू, निखिल आत्राम, सुरभी कागदेलवर,अश्विनी गावळे, चेतन वाढई, भाग्यश्री फुकटकर, प्रियंका रॉय, प्रवीण कुंभारे, निखिल जनबंधु, अक्षय बोबडे, धयनदेवी नंदनवार, भावना काशट्टीवार, पूजा गावंडे, मारोती चौधरी, नेहा भोगे, प्रिया निकुरे आणि स्वाती लोणकर यांचा समावेश आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर आणि मार्गदर्शक अद्यापक चित्रकार प्रा अतुल कामडी, प्रा कैलाश घुले, प्रा निवृत्ती बावणे आणि लक्ष्मीकांत लेंझे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे.