Showing posts with label सावली. Show all posts
Showing posts with label सावली. Show all posts
Sunday, July 15, 2018
अविनाश पाल यांचे हस्ते प्रमाणपञाचे वितरण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासन कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इत्तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे सहकार्याने व कृषी ऊत्पन्न बाजार समिती सावली च्या वतिने भाजपा तालुका अध्यक्ष तथा मुख्य प्रशासक अविनाश पाल यांचे वाढदिवसानिमीत्य उपबाजार व्याहाड खुर्द व सावली येथे कामगार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीराला सावली तालुक्यातील बहुसंख्य कामगारानी नोंदणी करीता उत्स्फुर्त सहभाग दर्शवुन नोंदणी केली व शिबीराची सुरवात यशस्वी केली, या शिबीरात तब्बल एकाच दिवशी 123 कामगारांनी नोदंनी करून चंद्रपुर जिल्हात विक्रम केलेला आहे, आजपर्यंत एकाही तालुक्यानी इतकी नोंदनी केली नाही, नोंदणी केलेल्या कामगांराना प्रमाणपञाचे वाटप बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी मिळणा-या लाभाचा पुरेपुर फायदा घ्यावा असे आवाहनही केले.
या शिबीराच्या वेळी भाजपा सावली तालूका अध्यक्ष तथा मुख्य प्रशासक अविनाशभाऊ पाल, पंचायत समितीचे उपसभापती तुकारामजी ठिकरे, अर्जुनजी भोयर प्रशासक तथा कोषाध्यक्ष भाजपा, अरूनजी पाल प्रशासक, दिलीपजी ठिकरे तालुका महामंञी भाजपा तथा प्रशासक, भुवनजी सहारे प्रशासक, पुनम झाडे जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो तथा प्रशासक, शरद सोनवाने प्रशासक, दिनकर घेर सचिव, दौलतजी भोपये, दिवाकर गेडाम जिल्हा सचिव भाजयुमो, तुळशिदास भुरसे प्र. लेखापाल कुमरे तसेच कर्मचारी उईके सरकारी कामगार अधिकारी चंद्रपुर, दुबे मँडम निरीक्षक दुकाने नागपुर,रीना शेख, स्वाती शेगोकर, अश्विनी वांढरे, स्वागत निमगडे, संदीप बुरडकर यांनी कामगार नोंदनीसाठी अथक परिश्रम केले.
Wednesday, May 16, 2018
वेल्डर कामगाराचा करंट लागून मृत्यू
by खबरबात
सावली येथील एका वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराला विद्युत करंट लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली
सुभाष दादाची भोयर ३५ वर्षे राहणार पारडी तालुका सावली असे याचे नाव असून हा
वेल्डिंग वर्कशॉप येथे कारागीर म्हणून काम करायचा. गेल्या आठ वर्षांपासून तो
या वर्कशॉप मध्ये नियमित वेल्डिंगचे काम करीत होता मात्र बुधवारी अचानकपणे
काम सुरू असताना त्याला करंट लागल्याने त्याचा जागीच
मृत्यू झाला त्यांच्यामागे पत्नी मुलगी मुलगा असा आप्त परिवार आहे या
घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक करावा व त्यांचे सहकारी करीत आहे.
Saturday, January 13, 2018
भीमा कोरेगाव प्रकरणाचा सावलीत पडसाद
by खबरबात
Friday, November 10, 2017
अविनाश पाल बाजार समिती अशासकीय प्रशासकीय मंडळात
by खबरबात
सावली/प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अशासकीय प्रशासकीय मंडळात मुख्य प्रशासक म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी पदभार स्विकारला.
या अशासकीय प्रशासक मंडळात उपमुख्य प्रशासक म्हणून विनोद गड्डमवार यांची तर प्रशासक म्हनुन दिलीपजी ठिकरे, पुनम झाडे, सुधाकरजी गोबाडे, अर्जुनजी भोयर, अरुनजी पाल, गुरुदेव भुरसे, अशोक नागापुरे, रविंद्र साखरे, सचिन तंगडपल्लीवार, ढिवरूजी कोहळे, भुवनजी सहारे, सौ. पुष्पाताई शेरकी व शरद सोनवाने यांची नियुक्ति करण्यात आली.
पदभार स्विकारतांना संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती बांधकाम समिती जि. प. चंद्रपूर, देवराव सा. मुद्दमवार जिल्हा सचिव भाजपा, सतिष बोम्मावार महामंञी, तुकाराम ठिकरे उपसभापती पं. स. सावली, मनिषा चिमुरकर सदस्य जि. प. चंद्रपूर, योगिता डबले सदस्य जि. प. मनोहरजी कुकडे होते.
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील मुख्याध्यापक निलंबित
by खबरबात
सरपंचांच्या तक्रारीवर जिल्हा परिषदेची कारवाई
चंद्रपूर - मेहा बुज येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र निरगुडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्यात.
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील शाळेत आठ वर्षापासून रामचंद्र निरगुडे कार्यरत होते. तेव्हापासून त्यांनी शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करणे, शालेय कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारींना न बोलावणे, वारंवार रजेवर जाणे, महिला सरपंचांशी असभ्य वर्तन करणे, विद्यार्थी कडून शाळेत कामे करवून घेणे आदी तक्रारी होत्या.
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील शाळेत आठ वर्षापासून रामचंद्र निरगुडे कार्यरत होते. तेव्हापासून त्यांनी शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करणे, शालेय कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारींना न बोलावणे, वारंवार रजेवर जाणे, महिला सरपंचांशी असभ्य वर्तन करणे, विद्यार्थी कडून शाळेत कामे करवून घेणे आदी तक्रारी होत्या.
सरपंच उषा भोयर आणि गावक-यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मार्फत चौकशी करण्यात आली. यात ते दोषी असल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला. त्यानुसार मुख्याध्यापक रामचंद्र निरगुडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्यात. यापुढे सूचनांचे पालन केल्यास बडतर्फ करू, अशी ताकिद देण्यात आली आहे.