সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 30, 2013

आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

राजुऱ्याजवळील जोगापूरच्या जंगलात  ज्येष्ठ विधीज्ञ प्रदीप नालमवार यांच्यावर येथे तर बल्लारपूर पालिकेचे अभियंता विजय बिसने यांचा ७ सप्टेंबर रोजी खून  करण्यात आला होता. यातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनवलि आहे.  राजुरा ते आसिफाबाद मार्गावरील जोगापूरच्या जंगलात अ‍ॅड. प्रदीप नालमवार व अभियंता विजय बिसने यांचे मृतदेह आढळून आले. या दोघांचा देशीकट्टय़ातून गोळय़ा झाडून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने तपास हाती घेण्यात आला. नालमवार व बिसने यांच्यासोबत अब्दुल राजीक हा शेवटपर्यंत असल्याने त्याला सर्वप्रथम ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना उलटसुलट माहिती देणाऱ्या अब्दुलने सखोल चौकशी केल्यानंतर या खुनाचे गूढ  उलगडले. या प्रकरणात पोलिसांनी अब्दुल राजीक अब्दुल नबी शेख याच्यासह एकूण चार आरोपींना अटक केली होती . दोघांचा खून मालमत्तेच्या वादातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असले तरी अभियंता विजय बिसने यांना केवळ मैत्रीखातर जीव गमवावा लागल्याची बाब समोर आली होती. येथील सरकारनगरामध्ये राहणारे व जिल्हय़ातील बहुतांश पालिकांचे वकील असलेले अ‍ॅड. प्रदीप नालमवार पूर्वी येथील टपाल कार्यालयाजवळ असलेल्या स्वामी यांच्या घरी राहात होते. ही जागा व इमारत दिवंगत खासदार अ‍ॅड. व्ही. एन. स्वामी यांची होती. सध्या या जागेची मालकी त्यांचे दत्तक पुत्र कृष्णा स्वामी यांच्याकडे आहे. नामलवार यांनी स्वत:चे घर घेतल्यानंतरही जागेचा ताबा सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. कृष्णा स्वामीला ही मालमत्ता विकायची होती. येथील दोन व्यवसायिकांशी त्यांचा सौदाही झाला होता. नालमवार ताबा सोडत नसल्याने सौदा पूर्ण होत नव्हता. नालमवार यांनी ताबा सोडण्याचा मोबदला म्हणून २५ लाख रुपयांची मागणी केली होती. एवढी रक्कम देण्यास कृष्णा स्वामी तयार नव्हते. नालमवार वकील असल्याने हा वाद संपुष्टात येणार नाही याची कल्पना आल्यानंतर कृष्णा स्वामीने त्यांची सुपारी देऊन हत्या करण्याची योजना आखली. यासाठी त्यांनी येथील मुख्य मार्गावर असलेल्या शिवकृपा हॉटेलच्या मालकाचा मुलगा ललित रमेश प्रभावत याची मदत घेतली. अहेरी येथे शिक्षण घेतलेल्या ललितने एक लाख ६० हजार रुपयात ही सुपारी घेतली. ललितच्या हॉटेलात जलनगर वॉर्डातील अनेक गुंडांची उठबस असते. त्याने जिवती येथील अब्दुल राजीकला ८० हजार रुपयात हे खुनाचे कंत्राट दिले. जलनगर वॉर्डात राहणारा अब्दुल गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सध्या तो जिवती येथे प्रवासी जीप चालवत होता. त्याचे लखमापूर-बाखर्डी शिवारातील एका शेतीच्या वादाचे प्रकरण नालमवार यांच्याकडे होते. नेमकी हीच बाब हेरून ललितने त्याची निवड केली. अब्दुलने रय्यतवारी कॉलरी परिसरात राहणाऱ्या मोंटू वर्माला देशी कट्टा देण्याच्या तयारीवर या कटात सामील करून घेतले. नंतर जिवती येथे टाटा सुमो चालवणारा साहेबरराव मून व त्याचा एक साथीदार पैशाच्या आमिषावर या कटात सामील झाले. सर्व तयारी झाल्यानंतर अब्दुल राजीकने शनिवारी सायंकाळी नालमवार यांचे घर गाठले. अब्दुल पक्षकार असल्याने नालमवारांना त्याचे येणे खटकले नाही. अब्दुलने स्वत:च्या शेतीचा वाद सोडवण्यासाठी राजुरा येथे राहणाऱ्या पटवाऱ्याची भेट घेणे आवश्यक आहे. तेव्हा तातडीने चला, अशी विनंती नालमवारांना केली. ते प्रश्नरंभी यायला तयार नव्हते तेव्हा अब्दुलने पैशाची लालूच दाखवली. यानंतर अब्दुल नालमवारांना घेऊन एम.एच.३४-८७२३ या क्रमांकाच्या टाटा सुमोतून राजुऱ्याकडे निघाला. वाटेत बंगाली कॅम्पवर त्याने इतर साथीदारांना सोबत घेतले. बल्लारपूरजवळ आल्यानंतर एकटेच कशाला जायचे म्हणून नालमवारांनी विजय बिसने यांना दूरध्वनी केला व त्यांनाही सोबत घेतले. अब्दुलने राजुरा आल्यानंतर वाहन न थांबवता ते थेट पाच किलोमीटरवरील जोगापूरच्या जंगलात नेले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच नालमवार व बिसने भडकले. तेव्हाच अब्दुलने देशीकट्टा काढून त्यातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन गोळय़ा नालमवारांना लागल्या नाही. नंतर गाडी थांबवून नालमवारांना खाली उतरवण्यात आले व अगदी जवळून त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. यानंतर इतर साथीदारांनी पकडून ठेवलेल्या विजय बिसने यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. या दोघांना तिथेच टाकून हे आरोपी समोर जंगलाच्या दिशेने रवाना झाले. आरोपींनी लेंडीगुडा गावाजवळच्या एका नाल्यावर टाटा सुमो गाडी स्वच्छ केली. काम फत्ते झाल्याचा निरोप कृष्णा स्वामी यांना दिला व सर्वजण फरार झाले. संशय येऊ नये म्हणून अब्दुल राजीकने दुसऱ्या दिवशी राजुऱ्यात उतरलो होतो, अशी बनावट कथा तयार केली. मात्र पोलिसांचा हिसका बसताच त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी टाटा सुमो व देशीकट्टा जप्त केला. 

Sunday, July 28, 2013

 चंद्रपूर जिल्ह्यात सव्वा लाख हेक्‍टर शेतीचे नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यात सव्वा लाख हेक्‍टर शेतीचे नुकसान

अतिवृष्टीचा फटका; 93 हजार हेक्‍टरचे मोठे नुकसान; 546 गावे बाधित
 

चंद्रपूर - अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील एक लाख 35 हजार 902 हेक्‍टर शेतीला फटका बसल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून दिसून आले आहे. यापैकी तब्बल 93 हजार हेक्‍टरवरील पिकांचे पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. 
संततधार आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यात मालमत्तेसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जूनमध्ये झालेल्या पावसानंतर काहींनी दुबार पेरण्या केल्या होत्या. मात्र लागलीच जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस संततधार कोसळत असल्याने शेतीची मोठी हानी झाली आहे. 
प्राथमिक अंदाजानुसार ही हानी 40 ते 45 हजार हेक्‍टर इतकी असल्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीत शेतीची जबर आणि न भरून निघणारी हानी झाल्याची माहिती पुढे आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार 92 हजार 902 हेक्‍टरमधील पिकांची पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक हानी झाली आहे. सध्याचा पाऊस बघता केवळ धानाची पुनर्लागवड शक्‍य आहे. 
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागानेही प्राथमिक पाहणीनंतर 215 किलोमीटरच्या रस्त्यांना हानी झाल्याचा अंदाज काढला आहे. यात 21 छोट्या आणि मोठ्या पुलांचा समावेश आहे. या रस्त्यांची तातडीची दुरुस्ती आवश्‍यक असल्याने विभागाने 50 कोटी रुपयांचा मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. 
जिल्ह्यात बाधित गावांची संख्या 546 असून, एकूण 12 जणांचे बळी केले आहे. पावसामुळे अंशत: 3849 व पूर्णत: 190 घरांचे नुकसान झाले आहे. घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अंमलनाला, लभानसराड, पकड्डीगुडम, डोंगरगाव व दिना प्रकल्प 100 टक्‍के भरले असून, आसोलामेंढा धरण 59 टक्‍के भरले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसान क्षेत्र (हेक्‍टर) पीक - 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक - 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी
धान (भात) - 18,600 - 7,850
कापूस - 25,454 - 10,201
तूर - 7,378 - 1,907
सोयाबीन - 37,726 - 19,482
इतर पिके - 3,744 - 351
एकूण - 92902 - 39,791
132639 

तालुका : बाधित गावे : नुकसान क्षेत्र (हेक्‍टर) चंद्रपूर : 42 : 2,200 
वरोरा : 28 : 1,883 
भद्रावती : 37 : 7,002 
चिमूर : 142 : 6,094 
ब्रह्मपुरी : 140 : 7,011 
नागभिड : 3 : 18 
राजुरा : 65 : 6,000 
कोरपना : 22 : 8,500 
मूल :8 : 272 
गोंडपिंपरी : 39 : 3,948 
बल्लारपूर :15 :2,645 
पोंभुर्णा : 71 : 700 
सावली : 3 : 150 

 

 घरांची हानी   तालुका......अंशतः.....पूर्णतः 
चंद्रपूर......442.....02 
बल्लारपूर......34....26 
गोंडपिंपरी.....175...14 
पोंभुर्णा.......65....02 
मूल......61.....02 
सावली.....03...00 
वरोरा....928....62 
भद्रावती....754....71 
चिमूर.....868.....00 
ब्रह्मपुरी.....133....02 
सिंदेवाही....59....00 
नागभिड.....151...00 
राजुरा.....242....07 
कोरपना....60....02 
जिवती.....56....00 

तालुकानिहाय पावसाचा फटका बसलेल्या गावांची संख्या चंद्रपूर 39, बल्लारपूर 22, गोंडपिंपरी 52, पोंभुर्णा 25, मूल 27, सावली 1, वरोरा 54, भद्रावती 91, चिमूर 82, ब्रह्मपुरी 38, सिंदेवाही 18, नागभिड 32, राजुरा 45, कोरपना 18, जिवती 2, एकूण 556. 

तालुकानिहाय कुटुंबांचे स्थानांतरण चंद्रपूर 444, बल्लारपूर 92, पोंभुर्णा 60, वरोरा 365, मूल 2, एकूण 963 

तालुकानिहाय मृत्यू (अतिवृष्टी, वीज) चंद्रपूर 3, बल्लारपूर 2, भद्रावती 2, चिमूर 2, ब्रह्मपुरी 3, एकूण 12. 

एक जून ते 25 जुलै दरम्यानचा तालुकानिहाय पाऊस (मि.मी.) चंद्रपूर 1395, बल्लारपूर 1058, गोंडपिंपरी 1122, पोंभुर्णा 1031, मूल 1006, सावली 827, वरोरा 1306, भद्रावती 1098, चिमूर 1093, ब्रह्मपुरी 1252, सिंदेवाही 868, नागभिड 930, राजुरा 1063, कोरपना 1156, जिवती 1115, सरासरी 1088.
बळिराजाचे अश्रू न पुसताच मुख्यमंत्री परतले

बळिराजाचे अश्रू न पुसताच मुख्यमंत्री परतले

नुकसानग्रस्त शेतीची पाहणीही केली नाही 

देवनाथ गंडाटे
Sunday, July 28, 2013
चंद्रपूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असतानाही त्यांच्या अश्रूंकडे दुर्लक्ष करून शनिवारी (ता. 27) चंद्रपूर शहराच्या भेटीची केवळ औपचारिकता पूर्ण करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माघारी फिरले. यामुळे तब्बल 40 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातील की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे. 
एक लाख 26 हजार हेक्‍टर शेतीला फटका बसल्यामुळे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण शनिवारी दुपारी जिल्ह्यात आले; मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर भेट टाळत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा न देताच ते परत गेले, त्यामुळे दौरा केवळ अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या भेटीपुरताच ठरला. 
अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी स्थानिक आमदारांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम विमानाने येथे आले होते. 
दौरा कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री नुकसानग्रस्त शेतीला भेट देणार होते; मात्र विमान मोरवा विमानतळावर उतरल्यानंतर ते सरळ शहरात गेले. इंदिरानगर आणि रहेमतनगर या दोन पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर त्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. तिथे अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मंत्र्यांना दिली. त्यानंतर मंत्रिमहोदयांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, शहरातील पूरग्रस्त भागाव्यतिरिक्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याविषयी कोणतीही घोषणा केली नाही. जिल्ह्यातील 546 गावे पुरामुळे बाधित झाली असून, सुमारे एक लाख 26 हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पुरात बुडालेल्या शेतीची पाहणी करण्याचे टाळले.

कृषी सभापती, आमदार ताटकळत 
शेतीच्या हानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या कृषी सभापती अरुण निमजे आणि आमदार नाना श्‍यामकुळे यांना ताटकळत राहावे लागले. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपला परिचय दिल्यानंतरही पोलिसांनी जाऊ दिले नाही. कृषी सभापती अरुण निमजे हे जिल्हाधिकारी कार्यालयात, तर आमदार श्‍यामकुळे हे विमानतळावर पुष्पगुच्छ घेऊन ताटकळत होते.

Saturday, July 27, 2013

मुख्यमंत्री चंद्रपुरात

मुख्यमंत्री चंद्रपुरात

चंद्रपूर -  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे 27 जुलै रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या  दौ-यावर आले आहेत. दुपारी 1.00 वाजता अमरावती येथून चंद्रपूरकडे प्रयाण हेलीक्याप्तर ने झाले. दुपारी 1.30 वाजता चंद्रपूर येथील विमानतळ येथे आगमन झाले. त्यानंतर  दुपारी 2.15 वा.चंद्रपूर विमानतळ येथून चंद्रपूरकडे प्रयाण केले. यावेळी शहरातील कॉन्ग्रेस कार्याकार्यानी फटाके फोडून आतिषबाजी करीत स्वागत केले.  दुपारी 2.30 ते 4.00 वाजेपर्यंत पुरग्रस्त भागाची पाहणी व चर्चा करतील.
दरम्यान जिल्हात ओला दुष्काळ असतानाही राजकीय पक्ष्याच्या कार्यकर्त्यानी फटाके फोडून, फलक लाऊन पैशाची उथळपट्टी केली. या प्रकाराचा सामान्य नागरिकांनी निषेध केला. 

Wednesday, July 24, 2013

शिवराज्य पक्ष्याच्या कार्यकर्त्यांची खंडणी साठी धुडगूस !!

शिवराज्य पक्ष्याच्या कार्यकर्त्यांची खंडणी साठी धुडगूस !!

शिवराज्य पक्ष्याच्या १३ गुंडांनी काल २३ जुलै रोजी सुमारे ४.५० वाजता मुल रोड येथील जेट किंगडम फायनान्स या खाजगी कंपनीच्या कार्यालयात जाउन खंडणीसाठी धुडगूस घातला. उपाध्यक्ष व इतर १२ जन मिळून अचानक या कार्यालयात प्रवेश करून त्यांनी संचालक व कार्माच्यार्यांना पैश्यासाठी मारहाण केली. याआधी एक दोनदा हे कार्यकर्ते खंडणी साठी या व जवळच्या इतरही काही कार्यालयात धमकी देऊन गेले होते.
या मारहाणी चा सर्व प्रकार कार्यालयातील क्यामेरा ने टिपला. या सर्व प्रकाराचे नेतृत्व पक्षाचे उपाध्यक्ष प्रवीण देठेकर करीत होते असे यावरून दिसते.
या गुंडांनी दिलेल्या विझिटिंग कार्ड वर जिजामाता, आंबेडकर, फुले यांचे चित्र आहे. शिवाजीचे नाव घेऊन अफझल खानासारखे भ्याड कृत्य करणाऱ्या या गावगुंडांचा शोध पोलिस घेत आहेत.
विशेष म्हणजे या गुंडांनी आधी पावणे चार च्या सुमारास येउन धमकी देऊन पैश्याची  मागणी केली. या घटनेची पोलिस तक्रार करण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक व एक कर्मचारी रामनगर पोलिस स्टेशन येथे गेले. पोलिसात आपली तक्रार केली हे कळल्यावर थोड्याच वेळात पोलिस येण्याआधी हे गुंड परत याच कार्यालयात आले व काही कळण्याच्या आत उपस्थित संचालक व कर्मचार्यांना मारहाण केली व निघून गेले.
इमारतीत लावलेल्या क्यामेरा मध्ये आलेले १३ गुंड व मारहाण करताना पक्ष्याचे उप प्रमुख दिसत आहेत.
पोलिसांनी या प्रकरणात भा. दं. वि. च्या कलम ५०६, ३४, ३२३, ४५२, ३८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात या पैकी कुणीही पक्ष्याच्या कार्यालयात अथवा घरी सापडले नव्हते. पोलिस छायचित्रनाचा अभ्यास करून गुन्हेगारांना ओळखण्याचे काम करत आहे.
या घटनेने चंद्रपूर मध्ये खंडणीखोर राजकीय पक्षांची नवीन संस्कृती उदयास येत आहे असे दिसते.
--------------------------------------------------------------------------------------------------
या पक्ष्याच्या काही पदाधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आम्हाला मिळाले आहेत. आपण या विषयी त्यांचे मत जाणून घ्यावे.
प्रवीण देठेकर ९८२३५३७८३०
गौतम पाटील ९४२२८८०६०४
प्रमोद मत्ते अध्यक्ष
पक्ष प्रमुख ब्रि. सुधीर सावंत ९८६९८१२४०८, ९९८७७१४९२९
  वरोरा भद्रावती तालुक्यातील पुरग्रस्त

वरोरा भद्रावती तालुक्यातील पुरग्रस्त

भागाची जिल्हाधिका-याकडून पाहणी
चंद्रपूर दि.24- वरोरा व भद्रावती तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असून टाकळी, नंदोरी, कोसरसार, हिरापूर व खापरी या गावाची पाहणी आज जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.  पिकाच्या नुकसानीचा सर्व्हे करुन तातडीने पाठवा असे निर्देश त्यांनी दिले.  अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, उपविभागीय अधिकारी जि.एच.भुगवाकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  डॉ.डी.एल. जाधव, वरोरा तहसीलदार प्रमोद कदम व भद्रावती तहसीलदार प्रसाद मते यावेळी सोबत होते.

      यावेळी जिल्हाधिका-यांनी भद्रावती, नंदोरी दरम्यान असलेल्या पुलाची पाहणी केली.  त्यानंतर टाकळी येथील पुराने वाहून गेलेल्या शेतीची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली.  नुकसान झालेल्या पिकाचा 50 टक्के पेक्षा कमी किती हेक्टर व 50 टक्या पेक्षा जास्त किती हेक्टर  असा अहवाल तात्काळ पाठविण्याचे निर्देश म्हैसेकर यांनी दिले. खांबाडा येथील नाल्याचे बॅकवॉटर कोसरसार या गावात शिरल्यामुळे येथील घराचे व शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.  नुकसानग्रस्त नागरीकांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी मदतीचे आश्वासन दिले.

      वरोरा तालुक्यातील खापरी या गावाच्या बाजूने नाला जात असून या नाल्याला आलेल्या पुरामुळे गावातील घरांचे नुकसान झाले.  या नुकसानीची पाहणी करतांना       गावक-यांनी पुर्नवसनाची मागणी जिल्हाधिका-याकडे केली.  ग्राम पंचायतने पुर्नवसनाचा ठराव घेवून पाठविल्यास यावर विचार करण्यात येईल असे डॉ.म्हैसेकर यांनी गावक-यांना सांगितले.

      चंद्रपूर तालुक्यातील मसाळा येथील माजी मालगुजारी तलाव फुटल्यामुळे धान पिकाचे नुकसान झाले.  या भागास जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी भेट दिली.  मामा तलाव तात्काळ दुरुस्त करण्याच्या सुचना जिल्हा परिषद सिंचन विभागाला दिल्या.  तसेच पावसामुळे  मसाळा गावातील पडलेल्या घराची पाहणी त्यांनी केली.  यावेळी तहसीलदार गणेश शिंदे सोबत होते.
     अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्हयातील 546 गावे बाधित झाली असून अंशत: 3849 तर पूर्णत: 190 घरे अतिवृष्टीमुळे पडली आहेत.  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त व्यक्तींना जिल्हा प्रशासनातर्फे 2 लाख 41 हजार 125 रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.  अतिवृष्टीमुळे जिल्हयात एकूण 12 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसदारांना 15 लाख 5 हजाराचे अनुदान देण्यात आले. उर्वरीत अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरु आहे.                                               0000 
धर्माधिकारी, पोफळी यांना कर्मवीर पुरस्कार

धर्माधिकारी, पोफळी यांना कर्मवीर पुरस्कार




चंद्रपूर चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणा-या कर्मवीर पुरस्काराची घोषणा झाली असूनयंदा ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी आणि शशिकांत धर्माधिकारी हे या पुरस्काराचे मानकरी ठरले.
पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणा-या जिल्ह्यातील दोन पत्रकारांना पत्रकार संघातङ्र्के दरवर्षी मकर्मवीरङ्क पुरस्काराने गौरविण्यात येतेएक ऑगस्ट रोजी पत्रकार भवनात होणाèया समारंभात या पुरस्काराचे वितरण होणार आहेशालश्रीस्मृतिचिन्ह आणि रोख राशी असे या पुरस्काराचे स्वरूप आहेपुरस्काराचे मानकरी शशिकांत धर्माधिकारी हे मूल येथील महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य असूनत्यांनी मतरुण भारतमध्ये वार्ताहर म्हणून काम केले आहेपत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेतराजाभाऊ पोळी यांनी विविध वृत्तपत्रात वार्ताहरउपसंपादक आणि सहायक संपादक म्हणून काम केले.पत्रकारकामगार आणि ग्राहक चळवळीत त्यांनी योगदान दिले आहेश्रमिक पत्रकार भवनाच्या स्वतंत्र भवनासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होतात्यांचा बालकथा संग्रह प्रकाशित असूनत्याला पुरस्कार मिळालेला आहे.




Tuesday, July 23, 2013

लाच घेताना अटक..... तिघे वाहून गेले

लाच घेताना अटक..... तिघे वाहून गेले

पोंभूर्णा : येथील विजवीतरण कंपनीचे  सहाय्यक अभियंता अभिजीत फरकाडे यांना सात हजार रूपयांची लाच घेताना अटक……. 

चंद्रपूर -  चिमुर तालुक्यातील नवेगावपेठ येथील जयराम चबोर, जांभुळहिरा येथील जर्नादन शंभरकर आणि पोंभूर्णा तालुक्यातील वसंत कस्तुरे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले ।
सर्व पक्षांना देशाची चिंता असली पाहिजे

सर्व पक्षांना देशाची चिंता असली पाहिजे

डॉ. मुरली मनोहर जोशी -  शत्रुघ्न सिन्हावर बोलण्याचे टाळले 
चंद्रपुर- देशाला चोहोबाजूंनी चीननं घेरलं आहे. रोज सीमेवर आक्रमण करीत आहे. त्यामुळं चीन हे सध्या देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे. देशाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर राजकारण. देश वाचला तर सर्व वाचतील. त्यामुळं सर्व पक्षांना देशाची चिंता असली पाहिजे, असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं. एका कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
सध्या भाजपमधील राजकारण नरेंद्र मोदी यांच्याभोवती एकवटलं असताना भाजपमधील अनेक नेते त्यांच्या नावाला विरोध करीत आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनीही उघडपणे त्यांच्यावर टीका केली. यासंदर्भात जोशी यांना छेडलं असता त्यांनी उपरोक्त उत्तर देऊन वादात उडी घेण्याचं टाळलं.
पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाचेच नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी घरचा आहेर दिला आहे. मोदींसाठी दिल्ली अजून दूरच आहे, असे सिन्हा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. त्यावर डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी अधिक बोलण्याचे टाळले. 
२०१४ च्या निवडणुका येतील तेव्हा येतील. पण सध्याचं देशाचं चित्र खराब आहे, असं सांगून राम मंदिराचा मुद्दा आता संपला आहे. पण निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काय-काय मुद्दे समाविष्ट होतील, हे येत्या काळात दिसेलच, असंही ते म्हणाले.

Monday, July 22, 2013

 धुवाधार पावसाला सुरुवात

धुवाधार पावसाला सुरुवात

चंद्रपूर: दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज (सोमवार) चंद्रपुरात पुन्हा एकदा धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी झालेल्या ढगफुटीनंतर संपूर्ण जिल्ह्यात शेकडो घरांची पडझड झाली होती तर ४ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने आपला कहर थांबवल्यामुळे सामान्य लोक आणि प्रशासनाची या धक्क्यातून सावरायला सुरुवात झाली होती, पण आज अचानक पुन्हा एकदा काळे ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने सर्व नागरीकांची एकच धांदल उडाली. या पावसामुळे रस्त्यांवरे दोन ते तीन फूट पाणी जमा झाले तर वाहतुक पुर्णपणे कोलमडली आहे. पाऊस सुरु होताच अनेक शाळांच्या आणि महाविद्यालयांच्या विद्याथ्र्यांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुट्टी देण्यात आली आहे, तर पावसाचा फटका बसू नये म्हणून अनेक लोकांनी सुरक्षित स्थळांचा आश्रय घेतला आहे. चिंतेची बाब म्हणजे येत्या २४ तासात हवामान खात्यानेने पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

चंद्रपूर (प्रतिनिधी) : सोमवारी झालेल्या पावसामुळे इरई धरणाचे सातही दरवाजे शून्य पूर्णाक पाच मीटरने उघडण्यात आल्याने इरई नदी भरून वाहत अहे. चंद्रपूर शहरालगतची शेती आणि काठावरील वस्ती पाण्याखाली आली आहे.
चोवीस तासांत विश्रांती घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं पूर्वपदावर येत असलेलं जनजीवन पुन्हा विस्कळित होण्याची शक्यता बळावली आहे. आज दिवसभर संततधार पाऊस असल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं कठिण झालं.
मागील आठवडा गाजवल्यानंतर नव्या आठवड्याची सुरुवात पुन्हा दमदार पावसानं झाली. मागील चोवीस तासांची विश्रांती घेतल्यानंतर पावसानं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळी नऊ वाजल्यापासून बरसायला सुरुवात केली. कधी मुसळधार तर कधी रिमझिम स्वरुपाचा हा पाऊस चंद्रपूर जिल्ह्यासाठी आता डोकेदुखी ठरलाय. मागच्या आठवड्यात पावसाचं पाणी घरात घुसल्यानं सुमारे एक हजार कुटुंबांना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. या लोकांच्या चेहèयावर पावसाच्या कालच्या विश्रांतीमुळं हसू ङ्कुलत असतानाच आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं हे चेहरे पुन्हा कोमेजले. जिल्ह्यात सुमारे ५०० घरांची पडझड झाली आहे. या लोकांना घर उभं करण्यासाठी qकवा सामानांची पाहणी करण्याची संधीसुद्धा पावसानं दिलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्य नागरिक या अस्मानी संकटानं त्रस्त झाले आहेत.
मागील नऊ दिवसांपासून सातत्यानं कोसळत असलेल्या या पावसामुळं चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. घरांसोबतच हजारो हेक्टर शेती पाण्यात बुडाली. रस्ते वाहून गेले. चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर चालणंसुद्धा कठिण झालं आहे. सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. इरई आणि वर्धा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहात आहेत. त्या धोक्याच्या पातळीखाली असल्या तरी परिस्थिती केव्हाही बदलू शकते, असं चित्र इथं आहे. दरम्यान, आज शहरात चार वाजेपर्यंत ८० मिमी पाऊस झाला, तर जिल्ह्यात सरासरी ९० मिमी पाऊस पडला. यावर्षी पावसानं या जिल्ह्यावर चांगलीच मेहरबानी दाखवली आहे. जून महिन्याची चंद्रपूर जिल्ह्याची सरासरी १८५ मिमी असताना प्रत्यक्षात ४३० मिमी एवढा प्रचंड पाऊस झाला. तर जुलैची सरासरी ३९७ मिमी एवढी आहे. ही सरासरी जवळपास गाठली गेली. ३७० मिमी एवढा पाऊस या महिन्यात पडला असून, महिना संपायला आणखी एक आठवडा आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस इथं पडत आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडत असल्यानंच चंद्रपूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळित झालं आहे. यात शहरी आणि ग्रामीण भागालाही मोठा ङ्कटका बसला आहे. शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं शेतक-यांची स्थिती वाईट झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आता हा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी पुढे येत आहे.

गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सुरळीत

गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे सुरळीत

चंद्रपूर- गोंदियाहून वडशाला जात असलेल्याचांदा फोर्ट पॅसेंजरचे इंजिनसह नऊ डबे रविवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान वडशाच्या अलीकडे १५ कि.मी. अंतरावर घसरले. ही पॅसेंजर गोंदियाहून दोन तास उशिरा सुटली होती. वडशाजवळ पोहोचत असताना ती रुळावरून घसरली. रूळ तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वे रूळ सुरळीत झाला असून, गाडी सुरु झाली आहे. 
इंजिन रुळावरून घसरल्यानंतर ते फरफटत ४०० मीटर अंतरावरील शेतात झाडाला जाऊन अडकले. हा भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे नक्षल्यांनी रुळांची तोडफोड केल्याची शंका व्यक्त होत आहे. इंजिनसह नऊ डबे रुळावरून घसरल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अंधारामुळे रात्री उशिरापर्यंत रेल्वेचे मदतकार्य सुरू झाले नव्हते. मध्यरात्रीनंतर रेल्वेचे एक पथक घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत वडशातील ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढून मदत केली. या पॅसेंजरमधून उतरलेल्या प्रवाशांची व्यवस्था वडसा येथील एका भवनात करण्यात आली आहे. ही रेल्वे गोंदियाहून निघाली असता वडशाजवळ दुर्घटना घडली, असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे व्यवस्थापक एस.एल. वर्मा यांनी सांगितले. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम.एस. हक म्हणाले की, अपघात झालेले स्थळ नक्षलग्रस्त भागात असल्याने तेथे गोंदिया आणि गडचिरोलीतून पोलीस दल पाठविण्यात आले.


Sunday, July 21, 2013

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान - संजय देवतळे

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान - संजय देवतळे

रक्तदात्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
चंद्रपूर दि.21- रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदान करुन ही चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. राज्य रक्तसंक्रमन परिषद मुंबई व जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वैच्छिक रक्तदात्यांचा सत्कार समारंभ स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
      जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.प्रमोद सोनुने, डॉ.टि.जी.धोटे, डॉ.अनंत हजारे, नंदू नागरकर, श्रीमती सुनिता लोढीया, विनोद दत्तात्रय, सुभाष गौर, सत्यनारायण तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरवातीला पालकमंत्री संजय देवतळे यांनी दीप प्रज्वलन करुन उदघाटन केले.  यावेळी बोलतांना देवतळे पुढे म्हणाले की अनेक सामाजिक संस्था व नागरीक स्वेच्छेने  रक्तदान करतात.  या रक्तदानामुळे असंख्य नागरीकांचा जीव वाचविण्यास मदत होते.  रक्तदान ही चळवळ असून यात अनेकांनी स्वेच्छेने सहभागी होण्याची गरज आहे.  आजचा सत्कार हा रक्तदान करणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी असून  या कार्यकर्त्यांनी रक्तदान  चळवळ अनेक लोकापर्यंत पोहचवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    या कार्यक्रमात पालकमंत्री संजय देवतळे यांचे हस्ते जिल्हयातील  संस्था व रक्तदाते यांचा स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रमोद सोनुने यांनी केले.  या कार्यक्रमास जिल्हयातील असंख्य संस्था व रक्तदाते मोठया संख्येने उपस्थित होते.

Saturday, July 20, 2013

डॉ.दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी पदी रुजू

डॉ.दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी पदी रुजू

  चंद्रपूर दि.20- चंद्रपूर जिल्हयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आज डॉ.दीपक म्हैसेकर यांनी प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांचेकडून पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त प्रकाश बोखड, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, जिल्हा पुरवठा अधिकारी आर.एस.आडे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यावेळी उपस्थित होते.
    विजय वाघमारे यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अपर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांचेकडे सोपविण्यात आला होता.  6 जुलै 2013 रोजी शासनाने चंद्रपूर जिल्हाधिकारी पदी डॉ.दीपक म्हैसेकर यांची कोल्हापूर येथून बदली केली.  त्यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारली.
    डॉ.म्हैसेकर मागील तीन वर्षापासून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.  डॉ.म्हैसेकर 1989 मध्ये परभणी येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांची तेथेच उपमुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
    जळगांव येथे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी, नागपूर येथे पशुवैद्यकीय विद्यापीठाचे निबंधक, नांदेड मनपाचे आयुक्त, नगर विकास खात्याचे उपसचिव म्हणून काम बघितल्यानंतर त्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे व्हीडीओ फोन यंत्रणा कार्यान्वित केली.  हायटेक यंत्रणा वापरणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली.  आज त्यांनी चंद्रपूर जिल्हयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Friday, July 19, 2013

मतिमंद जनाबाईची जिल्हा न्यायालयाने घेतली दखल

मतिमंद जनाबाईची जिल्हा न्यायालयाने घेतली दखल

वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश 

भंडारा ;  तालुक्‍यातील कऱ्हांडला येथील शेवंता हरी तोंडरे व गुणा तोंडरे या मायलेकीचा भूकबळी गेल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून राजकारण सुरू असतानाच गावात भटकत असलेली मृत शेवंताची मतिमंद मुलगी जनाबाई हिच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही सवड नाही. गुरुवारी (ता. 18) "सकाळ'मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन मतिमंद जनाबाईला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी जनाबाईची वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयात दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.

शेवंताच्या दोन मुली मतिमंद असल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शेवंतावरच होती. एक मुलगी शेवंताजवळच राहत होती, तर दुसरी जनाबाई (वय 25) परिसरात फिरत असे. दोन मुली अपंग असतानाही शेवंताला निराधार योजनेचा लाभ मिळत नव्हता. वृद्धत्वामुळे काम करणे जमत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. यातूनच शेवंता आणि गुणाचा भूकबळी गेला. यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे झाले. आजवर निराधार योजनेचा लाभ मिळवून न देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप करून राजकारण केले. मात्र, दुसरी मुलगी जनाबाई हिच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. दरम्यान, "सकाळ'मध्ये "भूकबळी प्रकरणात शरमेने झुकली भंडाऱ्याची मान' या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित होताच जिल्हा व सत्र न्यायालयाने मतिमंद जनाबाईला वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.

निराधारांना द्या मदतीचा हात 
जनाबाईसारख्या अनेक अपंग व अनाथ महिला-पुरुष खेड्यापाड्यात व शहरी भागात फिरत असतात. मात्र, त्यांना मदतीचा हात कोणीही देत नाही. लोकप्रतिनिधी केवळ राजकारण करतात. यामुळेच अशा अनुचित घटना घडतात. त्या घडू नये यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. 

Thursday, July 18, 2013

गीतेश उराडेची आत्महत्या

गीतेश उराडेची आत्महत्या

चंद्रपूर : येथील रामाळा तलावात गीतेश मधुकर उराडे (२३, रा. बेबांळ) याने आत्महत्या केली. गुरुवारी (१८) दुपारी १२ वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.
गीतेशला कविता करण्याचा छंद होता. तो हळव्या मनाचा होता. त्यांचा अनेक कविता वृत्तपत्रांत प्रकाशित झाल्या आहेत. गीतेश मूल तालुक्यातील बेबांळ येथील असून, येथे त्याने डिटीएड अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर त्याने उपजीविकेसाठी येथील स्थानिक वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून काम करणे सुरू केले. तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता, अशी तक्रार दुर्गापूर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. तुकूम परिसरामध्ये भाड्याचा खोलीत तो राहत होता. ममी माझे जीवन पाण्याला समर्पित करीत आहेङ्क, अशा आशयाची एक चिट्टी पोलिसांचा हाती लागली आहे. गीतेश कविता करीत असल्याने त्या चिट्टीमधील मजकूर कवितेचा ओळीप्रमाणे आहे. हा मजकुर गितेशनेच लिहिलेला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अद्यापही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहे.

युवकाची आत्महत्या

म्हाडा परिसरामध्ये कुणाल ढवळे (वय २७) याने गळङ्कास लावून आत्महत्या केली. मंगळवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजता घटना घडली. घटनेची तक्रार पडोली चौकीमध्ये दाखल करण्यात आली आहे. कुणाल हा बाबूपेठ येथील आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही.  

Wednesday, July 17, 2013

बाधित कुटूंबाना सुरक्षित स्थळी हलविले

बाधित कुटूंबाना सुरक्षित स्थळी हलविले

जिल्हाधिकारी यांनी केली चंद्रपूर शहरातील  पुरग्रस्त भागाची पाहणी

चंद्रपूर दि.17 - इरई धरणात पाणी साठा वाढल्यामुळे चंद्रपूर शहरातील काही भागात पाणी सिरले असून यामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले असून आज जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरीकांशी चर्चा केली. जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त प्रकाश बोखड व निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार यावेळी सोबत होते.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेवून जिल्हाधिकारी डहाळकर यांनी धरणातील साठयाचा आढावा घेतला. काल इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले होते. आज 1 वाजता सातही दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली. धरणातील साठयाचा आढावा दिवसातून दोनवेळा घेण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी दाताळा, रहेमत नगर, पठाणपूरा गेट व विठ्ठल मंदिर वार्ड भागास भेट दिली. प्रशासनाने रहेमत नगर मधील 37 कुटूंबांना सुरक्षित स्थळी हलविले. त्याचप्रमाणे राजनगर येथील 150 नागरीकांना आरवड येथील शाळेत हलविण्यात आले. पुरग्रस्त भागाची पाहणी करतांना जिल्हाधिका-यांनी नागरीकांशी चर्चा करुन प्रशासन सर्व त्या उपाय योजना करत असल्याचे सांगितले. नागरीकांनी या कामी प्रशासनास सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.
पावसाचा जोर कायम

पावसाचा जोर कायम


चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात 36.08 सरासरीसह 541.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात वरोरा, कोरपना, जिवती या तालुक्यात 100 मि.मी. हून अधिक पाउस पडला आहे.
अतिवृष्टीमुळे चंद्रपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून हैद्राबाद हायवे ठप्प झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 742 मिमी सरासरीसह 11,134 मिमी पाऊस पडला आहे. या पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व (७) दारे अर्ध्या मीटरने उघडली आहेत. यामुळे शहराला वळसा घालणा-या इरई नदीचे पाणी हवेली गार्डन, दाताळा मार्ग, रहमतनगर, पठाणपुरा या भागात पोहचले आहे. सखल भागात गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे इरई नदीने पात्र  सोडल्याने नदीकाठच्या आरवट, माना, नांदगाव क़ोलगाव, भोयेगाव आदी गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. वर्धा नदीचे पाणी पुलावर चढल्याने बल्लारपूर शहरालगतचा हैद्राबाद मार्गावरील मोठा पूल पाण्याखाली आला आहे. यामुळे हैद्राबाद मार्ग बंद झाला असून ५ किमी पर्यंत शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे या भागात असलेल्या डझनभर कोळसा खाणीतील उत्पादन कार्य ठप्प होण्याची शक्य निर्माण झाली आहे. राजुरा शहरातील काही भाग पुराच्या पाण्याने वेढण्यास सुरुवात झाली आहे. सध्याही जिल्ह्यात रिमझिम पाउस सुरु असून इरई धरणाची दारे अधिक उघडली जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास शहरात पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
विदर्भाच्या सीमेवरून

विदर्भाच्या सीमेवरून

हिमायतनगर शहरानजीक विदर्भाकडे जाणार्या नाल्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ता जाम झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नदीचे पाणी हिमायतनगर शहरात येण्याची शक्यता आहे. मराठवाडा - विदर्भाच्या सीमेवरून पैनगंगा तीन दिवसापासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्या पावसाने सहस्रकुंड धबधबा संपूर्ण पत्र भरून वाहत असून, भव्य दिव्य धबधब्याच्या धारीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

छाया - अनिल मादसवार
इरईचे सातही दरवाजे उघडले

इरईचे सातही दरवाजे उघडले

वर्धा, इरई, वैनगंगेला पूर : अनेक मार्ग बंद

चंद्रपूर (प्रतिनिधी) : दोन दिवस झालेल्या पावसामुळे जलप्रकल्प, गावतलाव तुडुंब भरले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्याने इरई नदीला पूर आला असून, चंद्रपूर शहरालगतची शेती आणि काठावरील वस्ती पाण्याखाली आली आहे.
यंदाच्या पावसाने जुलै महिन्याची सर्वसाधारण सरासरी ओलांडली असल्याने पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. इरई नदीच्या काठावरील दहा ते बारा गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे वर्धा, पैनगंगा, वैनगंगा, इरई, मूल, अंधारी या नद्यांसह मोठ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे काठावरील अनेक गावातील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली. वर्धा नदीला आलेल्या पूराचे पाणी राजुरा-बल्लारपूर मार्गावरील पूलावरून वाहत असल्याने चंद्रपूर-आसिङ्कबाद मार्ग बंद पडला. शिवाय कोठारीजवळील छोट्या पूलावरून पाणी वाहत असल्याने चंद्रपूर-अहेरी मार्ग बंद होता.

जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पाऊस कोसळल्याने मोठ्या प्रमाणात पेरण्या आटोपल्या असल्या, तरी अधिक पावसाने सुमारे सात हजार हेक्टरवर दुबार पेरण्या कराव्या लागणार आहे. मागील दोन महिन्यांत पावसाच्या खंडाचे दिवस खूपच कमी असल्याने पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Tuesday, July 16, 2013

bhukbali

bhukbali

भंडारा -खायला अन्न न मिळाल्यामुळे भुकेने तडफडून मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील वऱ्हांडला येथे रविवारी दुपारी २वाजताच्या सुमारास उघडकीला आली. झोपडीतून दुर्गंधी येत असल्याने गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली.

Monday, July 15, 2013

पकडीगुड्डम धरणातील अंबुजाचा पाणी करार संपणार

पकडीगुड्डम धरणातील अंबुजाचा पाणी करार संपणार

चंद्रपूर : अंबुजा सिमेंट उद्योगाला पकडीगुड्डम धरणाचे पाणी देण्याकरिता अठरा वर्षांचा करार यावर्षी संपणार आहे. तो पाणी करार शासनाने संपुष्टात आणून, शेतकèयांना qसचनाकरिता व चौदा गावातील जनतेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सय्यद आबिद अली यांनी एका निवेदनातून केली आहे.
पकडीगुड्डम धरणात कारगाव (खु.) कारगाव (बु.) धनकदेवी, मरकागोंदी, ताडा, धानोली पिपर्डा, कुसळ, वनसडी, बेलगाव, qचचोली, सोनुर्ली, इजापूरी, खिरडी, वडगाव, रामपुर, आसन या गावांचा समावेश आहे. पकडीगुडम धरण qसचन व गावातील पिण्याचे पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने धरणाची निर्मिती करण्यात आली. मात्र तत्कालीन पालकमंत्री एकनाथ गायकवाड, तात्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलास देशमुख यांनी पकडीगुड्डम भागातील शेतकèयांच्या भावना व आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन बैठक घेतली. नंतर युतीच्या शासन काळात तात्काळीन पालकमंत्री शोभाताई ङ्कडणवीस, खासदार अहीर, आमदार वामनराव चटप यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत अंबुजा सिमेंट उद्योगाला पकडीगुडम धरणातून पाणी देण्याचा व १४ गावांना पिण्याचे पाणी देण्याचा करार करण्यात आला. करार करताना अबुंजाचे वरीष्ठ अधिकाèयांनी पकडीगुड्डम धरणाच्या परिसरातील १८ गावांना आरोग्य, शिक्षण, मुलभूत विकास व स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु १९९४ पासून आजपर्यंत येथील बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात आलेला नाही. उलट प्रकल्पग्रस्त बारा गावांचा विकास खुंटला आहे.
पकडीगुड्डम धरणाचा पाणी करार झाल्यापासून qसचनाखाली ३२०० ऐकर क्षेत्र येत असलेल्या क्षेत्रात ५० टक्के qसचनसुद्धा झाले नाही. त्यामुळे शेतकèयांना याचे चटके सहन करावा लागले. मागील २० वर्षात कोरपना व राजुरा तालुक्यात पकडीगुडम. अमलनाला, डोंगरगाव वगळता एकही नवीन प्रकल्प नव्याने आलेले नाही. ३२०० हेक्टर क्षेत्र qसचनाखाली आलेला नाही. अंबुजाचे वरिष्ठ अधिकारी, शासन प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत qसचन व विविध विकास कामांचे उपक्रम राबविण्याची हमी दिली होती. मात्र, अंबुजा सिमेंट ङ्काऊन्डेशनने कोणतेही काम केलेले नाही.
जलस्वराज्य, प्रकल्प राष्ट्रीय सम विकास कार्यक्रम, डी. पी. ए. पी., तंबाखू विरोधी कार्यक्रमात शासनाचा निधी वापरण्यात आला. शासनाच्या धोरणानुसार सि. एस. आर. निधीमधून गावातील मुलभूत सुविधा, नवीन तांत्रिक शेती, विषयक उपक्रम राबविणे अपेक्षित होते. मात्र, असे कोणतेही उपक्रम येथे राबविण्यात आले नाही.
पैनगंगा नदीवरून मागील १० वर्षांपासून उच्च पातळीचे बांध बांधून सिमेंट उद्योगांना पाणी देण्याची मागणी केली होती. परंतु, याकडे शासनाने व सिमेंट उद्योजकांनी दुर्लक्ष केल्याने भविष्यात या परिसरात पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. पाणी करार संपुष्टात येत असल्याने अंबुजा सिमेंट उद्योगाला पकडीगुडम धरणाचे पाणी यापुढे देऊ नये, अशी मागणी आबिद अली यांनी केली आहे.
चंद्रपूर शहरातील व्यापार बंद

चंद्रपूर शहरातील व्यापार बंद

चंद्रपूर- व्यापारी संघटनांनी सुचविलेल्या मुद्यांना वगळून राज्य सरकारने एलबीटी कायद्याचा अध्यादेश जारी केल्याच्या निषेधार्थ; तसेच एलबीटीच्या नियमातील दुरुस्तीच्या मागणीसाठी चंद्रपूर  शहरातील व्यापा-यांनी  सोमवारपासून (दि. 15) दोन दिवस व्यापार बंद आंदोलन सुरु  केले.  सोमवारी पहिल्या दिवशी शहरातील सर्व व्यापार शंभर टक्के बंद होते. या बंद मध्ये किरणा, कपडे, मोबाईल सह पेट्रोल पंप सहभागी झाल्याने मोठी गैरसोय होत आहे. 
 मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार

वाढत्या भाववाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांचा बहिष्कार

मुंबई दि.15 :- उद्यापासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या
चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय विधानसभेतील विरोधी पक्षनेते
एकनाथराव खडसे यांनी आज जाहिर केला. आज दुपारी मुंबईत श्री.खडसे यांच्या
निवासस्थानी सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या गट नेत्यांची बैठक संपन्न
झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधानपरिषदेतील
विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेना गटनेते आ.सुभाष देसाई, मनसे गटनेते
आ.बाळा नांदगावकर, शेकापच्या आ.मिनाक्षी पाटील, रिपाईचे आ.सुमंत गायकवाड,
आमदार सर्वश्री दिवाकर रावते, पांडूरंग फुंडकर, एकनाथ शिंदे, रविंद्र
वायकर, नितीन सरदेसाई, नाना पटोले, गिरीष महाजन, श्रीमती डॉ.निलम गोऱ्हे,
मंगेश सांगळे, प्रविण दरेकर, विनोद घोसाळकर व प्रकाश भोईर आदी मान्यवर
उपस्थित होते.

वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तु व भाजीपाल्याच्या किंमतीमध्ये
झालेली प्रचंड वाढ, अतिवृष्टी व दुष्काळामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना
नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारकडून होत असलेली दिरंगाई, मंत्र्यांचा
भ्रष्टाचार, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, उद्योग वाढीबाबत शासनाची
उदासीन भूमिका, शासनातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे
आपापसातील भांडणे, राज्य शासनाचा निष्क्रीय कारभार तसेच न्यायालयाकडून
दाखल होणाऱ्या याचिकांवर शासनाच्या कारभारावर न्यायालयाकडून ओढण्यात येत
असलेल्या ताशेऱ्यांमुळे व देण्यात येणाऱ्या आदेशामुळे हे सरकार
न्यायालयामार्फतच चालविण्यात येत आहे की काय? अशी जनमानसात निर्माण
झालेली शासनाची प्रतिमा अशा अनेक समस्या व निर्माण झालेले प्रश्न या
पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या चहापानावर बहिष्कार घालत
असल्याचे श्री.खडसे यांनी जहिर केले.

उद्या पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी
पक्षांकडून खालील मुद्यांवर सरकारला धारेवर धरण्यात येईल व जनतेच्या
प्रश्नांना न्याय देण्यासाठी खालील मुद्यांवर चर्चा केली जाईल, अशी
माहिती श्री.खडसे यांनी दिली.



दिनांक 15 जुलै, 2013 पासून मुंबई येथे सुरु होणाऱ्या

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चेस घ्यावयाचे
सार्वजनिक महत्वाचे विषय.


1. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती कुत्रिमरित्या
वाढविल्यामुळे निर्माण झालेली महागाई.

2. ठाणे, मुंबई परिसरात अनधिकृत व धोकादायक इमारती कोसळून
झालेली वित्त व जिवीत हानी.

3. राज्यातील दुष्काळी परिस्थिती - काही ठराविक भागास
शासनातर्फे मदत कार्यात देण्यात आलेले झुकते माप.

4. मागील वर्षी दुष्काळ व अवकाळी पावसामुळे जळगाव, नाशिक,
धुळे, नंदुरबारसह इतर ठिकाणी शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई न मिळणे.

5. राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा उपलब्ध करुन
देण्यास शासनास आलेले अपयश - शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या.

6. मुंबईत 6 जून ते 11 जून या कालावधीत झालेल्या
अतिवृष्टीमुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत होणे - मुंबई मनपा, एम.एम.आर.डी.ए.
मधील समन्वयाचा अभाव.

7. मुंबई व नवी मुंबई परिसरात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन
करुन झालेली अनधिकृत बांधकामे नियमीत करण्यासाठी शासनाच्या प्रस्तावास
केंद्रिय पर्यावरण विभागाने परवानगी नाकारल्याने एकुण 500 इमारती अवैध.

8. राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था.

9. वाढते नक्षलवादी हल्ले - नक्षलवाद्यांनी खुद्द
गृहमंत्र्यांनी दिलेली धमकी.

10. राज्याची ढासळलेली आर्थिक परिस्थिती

11. मंत्री/अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या विविध नस्त्यामुळे
निर्णय घेण्यास होत असलेला विलंब.

12. गेल्या 7 वर्षात शासन राज्याच्या वार्षिक योजनांच्या
आकारमाना एवढाही खर्च करु शकले नाही - आर्थिक नियोजनाचा अभाव.

13. ऊर्जा विभागाचा सावळागोंधळ - राज्यात वाढते भारनियमन सुरुच

14. राज्यातील वाढते कुपोषण.

15. औषधविक्रेत्यांचा (केमिस्ट) संपाबाबत शासनातर्फे कुठलाही
ठोस निर्णय अद्यापी नाही.

16. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबईतील मोक्याच्या शासकीय
जमीनींवर शासकीय कार्यालये न बांधता विकासकांशी संगनमत करुन इतर प्रकल्प
राबविल्यामुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान.

17. मुंबईतील रेसकोर्सच्या वापराबाबतचा करार (लीज) संपुष्टात -
थीम पार्क बांधण्याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट नाही.

18. एलबीटीबाबत शासनाची भूमिका - वेळकाढूपणाचे धोरण

19. भूविकास बँकेचे सहकारी बँकेत विलीनीकरण

20. उत्तराखंड येथील आपातकालीन परिस्थितीत अडकलेल्या राज्यातील
यात्रेकरुंना वेळीच मदत पोहचविण्यास शासनाचे अपयश.

21. जलसंपदा विभागातील गैरव्यवहाराबाबत नेमलेल्या चितळे
समितीला पुनश्च मुदतवाढ.

22. शासकीय अधिकाऱ्यांची उघडकीस आलेली अनेक भ्रष्टाचाराची
प्रकरणे - धुळे येथे तहसिलदारांकडून कामाच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची
मागणी, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
श्री.चिखलीकर, शाखा अभियंता श्री. वाघ तसेच वक्फ बोर्डाचे मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. पठाण यांच्याकडे सापडलेली कोट्यावधी रुपयांची
अवैध मालमत्ता.

23. आघाडी सरकारच्या मंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर -
सत्तेच्या लालसेपोटी अजुनही एकत्र (सांगली मनपा - गृहमंत्री, उप
मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे, नारायण राणे यांनी एकमेकांवर केलेले
आरोप-प्रत्यारोप.)

24. मुलभूत व पायाभूत सुविधा विकास निधी वितरणामध्ये विरोधी
पक्षाच्या आमदारांना निधीचे वाटप करण्यात शासनाने केलेला दुजाभाव.

25. राज्याचे औद्योगिक धोरण उद्योगास पुरक नसुन मारक - 15 हजार
कोटी गुंतवणुकीचे औद्योगिक प्रकल्प गुजरात राज्यात स्थलांतरित.

26. सहकार विभागाची 97 वी घटनादुरुस्ती - दि.14 फेब्रुवारी
2013 ला अद्यादेश काढूनही अद्यापपर्यंत कायद्यात रुपांतर झाले नाही.

27. मंत्रालय पुनर्विकासास होत असलेला विलंब - शासकीय
कार्यालये इतरत्र स्थलांतरित केल्यामुळे भरमसाठ भाड्यामुळे शासनाच्या
तिजोरीवर पडलेला आर्थिक बोजा.

28. Cash for Subsidy योजना अद्यापि कागदावरच.

29. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांच्या प्रमाणात
दिवसेदिवस होत असलेली वाढ - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे
काम धीम्या गतीने.

30. मुंबई महानगर प्रदेश परिसरात तिवरांची होत असलेली बेसुमार
कत्तल - पर्यावरणाला निर्माण झालेला धोका.

31. आदर्श घोटाळा अद्यापी अहवाल विधीमंडळास सादर केलेला नाही.

32. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप
देण्यास शासनास आलेले अपयश.

33. शिक्षण हक्क कायद्यानुसार 25 टक्के जागा गरीब
विद्यार्थ्यांना देण्याबाबत अंमलबजावणी करण्यात शासनास आलेले अपयश.

34. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणारी शिक्षण मंडळे
बरखास्त करण्याच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयात दिले गेलेले आव्हान.

35. मुंबई शहरातील रेंगाळलेले विकास प्रकल्प - वेळेत पूर्ण न
झाल्यामुळे प्रकल्पांच्या किंमतीत झालेली वाढ.

36. शालेय पुस्तकातील सदोष छपाई - अद्यापही संबंधितांवर कारवाई
नाही तसेच शालेय शिक्षण विभागाने पुस्तकांच्या वाहतुकीसाठी दिलेल्या
कंत्राटामध्ये झालेला गैरव्यवहार.

37. महानगरपालिकेत इमारत प्रस्ताव विभागातील 9200 पेक्षा अधिक
नस्त्या गहाळ - एफ.आय.आर. दाखल न होणे.

38. मिठी नदी विकास - 10 हजार कोटीपेक्षा जास्त खर्च होऊनही
प्रश्न तसाच राहणे.

39. एमएसआरडीसीचे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प मुख्यमंत्री व
पायाभूत सुविधा समितीच्या मंजुरीविना रेंगाळल्यामुळे प्रकल्पांच्या
किंमतीत प्रचंड वाढ - मंत्री व मुख्यमंत्री यांच्यातील वाद विकोपाला.

40. बेस्टचा परिवहन विभागाचा 1800 कोटीचा तोटा मुंबईतील दादर
ते कुलाबा भागातील 7 लाख विद्युत ग्राहकाकडून अन्यायकारकरित्या भरुन
काढण्याच्या प्रस्तावास विद्युत नियामक आयोगाची मंजुरी.

41. शासनामध्ये निरनिराळ्या विभागांमध्ये तसेच क्षेत्रीय
कार्यालयांमध्ये रिक्त असलेली विविध संवर्गातील पदे.

42. राज्यात एकत्रीत राज्य सेवेचा स्वतंत्र प्रशासकीय सेवा
निर्णय करण्याच्या प्रस्तावाबाबत.

43. गिरणी कामगारांना म्हाडाकडून घरे देण्यास होत असलेली टाळाटाळ.

44. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत शासनाची भूमिका,
रखडलेले एसआरए व पुनर्विकास प्रकल्प, दोन वर्षामध्ये सर्व प्रकल्प पूर्ण
न केल्यास नव्याने विकासक नेमावेत.

45. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प - विस्थापीतांचे प्रश्न सोडविण्यास अपयश.

46. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय
स्मारक उभारणे.

47. मुंबईत खाजगी कुरिअर (आंगडिया) सर्व्हिसमार्फत गुजरातकडे
जाणाऱ्या चार ट्रकमध्ये आढळून आलेली कोट्यावधी रुपयांची बेहिशेबी
मालमत्ता.

48. मुंबई महापालिकेतर्फे जास्त दराने वसुल करण्यात आलेला
प्रॉपर्टी टॅक्स परत करणे.

49. ऑनलाईन प्रवेश पध्दतीत एम.के.सी.एल.ने घातलेला सावळागोंधळ.

50. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न.

51. वक्फ बोर्डाची मालमत्ता - गैरव्यवहार व भ्रष्टाचार प्रकरणी
नेमलेल्या समितींच्या अहवालानुसार अद्यापी कारवाई प्रलंबित.

52. जिल्हावार जात पडताळणी समितीमध्ये अनेक पदे रिक्त
असल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र
वेळेवर प्राप्त न झाल्याने त्यांना प्रवेशापासुन वंचित रहावे लागले.

53. न्यायालयाचे ताशेरे –

a. राज्यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी व राष्ट्रीय
वृध्दापकाळ योजनेतील गैरव्यवहाराबाबत नेमलेल्या चौकशी समितीने राज्यातील
मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना दोषी ठरविल्याबाबतचा सादर केलेला अहवाल.

b. विद्यमान मंत्र्यांची बेहिशेबी मालमत्ता व गैरव्यवहार प्रकरणे -
जलसंपदा मंत्री श्री.सुनिल तटकरे यांच्या अवैध व बेहिशेबी मालमत्ता
प्रकरणी न्यायालयाने शासनास दिलेले आदेश.

c. आदिवासी भागातील वाढते कुपोषण रोखण्यासाठी तात्काळ डॉक्टरांची
नियुक्ती करुन ग्रामीण भागात डॉक्टरांना सक्ती करण्याबाबत.

d. आदिवासी विकास मंत्र्यांनी केलेल्या 6 हजार कोटीच्या घोटाळ्या
प्रकरणी चौकशी करण्यासाठी एस.आय.टी स्थापन करण्याबाबत.

e. मुदतीनंतरही टोल नाके सुरु असणे व रस्त्यांच्या बांधकामापुर्वीच
टोल वसुली सुरु असल्याबाबत.

f. इयत्ता 10 वी व 12 वी अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये
राष्ट्रगीता संदर्भात झालेल्या चुकीच्या संदर्भात.

g. सिंचनाच्या गैरव्यवहार प्रकरणी नेमलेल्या चितळे समितीची
कार्यकक्षा व नव्याने दोन सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत
मा.राज्यपालांकडे शिफारस करण्याबाबत.

h. राज्यातील विना अनुदानित शाळांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक
शुल्कासंबंधी शासनाने काढलेले परिपत्रक चुकीचे असून त्याकरिता कायद्याची
आवश्यकता.

i. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या एमईटी या
संस्थेच्या कारभाराबाबत उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या
संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने मा.श्री.छगन भुजबळ यांच्याविरुध्द
एफ.आय.आर. का दाखल करण्यात येऊ नये, याबाबत केलेली विचारणा.

Sunday, July 14, 2013

किशोर डांगेवर अंत्यसंस्कार

किशोर डांगेवर अंत्यसंस्कार

चंद्रपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किशोर डांगे यांचे शुक्रवारी (ता. १२) हृदयविकाराच्या धक्क्याने राजस्थानातील जयपूर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी ऊर्जानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  
आपल्या मित्र परिवार आणि कुटुंबीयांसह ते राजस्थान दौ-यावर गेले होते. शुक्रवारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना जयपूर येथील एका रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घेतली. यावेळी त्यांच्याजवळ पत्नी जिल्हा परिषद सदस्य चित्रा डांगे व दोन्ही मुल उपस्थित होते. शनिवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव येथे आले. वीजनिर्मिती कंपनीत नोकरीवर असलेले डांगे यांनी शिवसेनेच्या सामान्य कार्यकत्र्यांपासून आपल्या राजकीय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला सेनेच्या बांधणीत मोलाची भूमिका बजावणाèया श्री. डांगे यांनी नंतर शिवसेनेकडून वरोरा-भद्रावती मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढली होती. या निवडणुकीतील पराभवानंतर ते काही वर्षे राजकारणापासून दूर होते.  त्यानंतर ते काँग्रेसवासी झाले. सध्या ते वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच अनेकांना धक्का बसला. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पिंज-यातून बिबट पळाला…

पिंज-यातून बिबट पळाला…

चंद्रपूर- मोहुर्ली येथील वन विभागाच्या पिंज-यातील जेरबंद बिबट रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वनाधिका-यच्या हातावर तुरी देऊन पळाला. या घटनेमुळे वनाधिका-यात चांगलीच खळबळ माजली. या बिबट्याला शोधण्यासाठी जंगल पिंजून काढावा लागला. वन परीषेत्र अधिकारी राऊतकर, इको-
प्रो चे अध्यक्ष, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी शोध मोहीम राबउन या बिबट्याला पकडले. दीड वर्षापूर्वी सोमनाथ येथून जेरबंद करण्यात आलेला हा बिबट असून तो वन विभागाचा पाहुणा म्हणून पाहुणचार घेत आहे.
वनविभागाकडे सध्या यंदाचे चार आणि वर्षभरापूर्वीचा एक, असे एकूण पाच बिबटे असून, दिवसाला 15 किलो मटणाचा खर्च वनविभाग सोसत आहे. 
ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यात दीड महिन्यात 12 जण ठार झाले. वनखात्याने अनुक्रमे 14 एप्रिल, 27 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मोहुर्ली, आगरझरी व मामला, पालेबारसा, माना टेकडी परिसरात पिंजरे लावून चार बिबटे जेरबंद केले. यातील तीन बिबट्यांना मोहुर्ली येथे तर, एक बिबट रामबाग नर्सरीत जेरबंद करून ठेवण्यात आला आहे. दीड महिन्यापासून चार बिबटे जेरबंद असून, पाहुणे बनून वनखात्याचा पाहुणचार घेत आहेत. याशिवाय वर्षभरापूर्वी सोमनाथ येथून आणलेला एक बिबट वनविभागाच्या दावणीला बांधून आहे. यंदा जेरबंद झालेल्या चारपैकी नेमका कोणता बिबट माणसांवर हल्ले करणारा आहे, याची शहानिशा न झाल्याने त्यांना जंगलात सोडण्यात आलेले नाही. त्यासाठी उपमुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती चारही जेरबंद बिबट्यांचा अभ्यास करून या संदर्भातील अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस. डब्ल्यू. एच. नकवी यांच्याकडे सादर करणार होती. आतापर्यंत याबाबत समिती सदस्यांच्या तीनदा चंद्रपूर येथे बैठका झाल्या. मात्र, नेमका माणसांवर हल्ले करणारा बिबट कोण, या निर्णयापर्यंत समिती पोहोचली नाही. त्यामुळे चार बिबटे दीड महिन्यापासून पिंजऱ्यात अडकून आहेत. या चारही बिबट्यांना जंगलात सोडण्यापूर्वी मायक्रोचिप व रेडिओ कॉलर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा प्रत्येकी खर्च तीन ते साडेतीन लाख रुपये असल्याने व कॉलर वनखात्याला मिळत नसल्याने बिबटे पिंजऱ्यात अडकून आहेत. एका बिबट्याला दिवसाला तीन किलो मटण लागते. त्यासाठी प्रतिकिलो 338 रुपये दराने मटण खरेदी केले जात असून, पाच बिबट्यांसाठी दररोज पाच हजार 70 रुपयांचा, तर महिन्याला 1 लाख 52 हजार 100 रुपयांचा खर्च मटणावर होत आहे.

Saturday, July 13, 2013

 सदानंद बोरकर यांना  रंगकर्मी पुरस्कार

सदानंद बोरकर यांना रंगकर्मी पुरस्कार

चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Friday, July 12, 2013

किशोर डांगे यांचे हृदयविकाराने निधन

किशोर डांगे यांचे हृदयविकाराने निधन

चंद्रपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख किशोर डांगे यांचे शुक्रवारी (ता. १२) हृदयविकाराच्या धक्क्याने राजस्थानातील जयपूर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.
आपल्या मित्र परिवार आणि कुटुंबीयांसह ते राजस्थान दौ-यावर गेले होते. शुक्रवारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना जयपूर येथील एका रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घेतली. यावेळी त्यांच्याजवळ पत्नी जिल्हा परिषद सदस्य चित्रा डांगे व दोन्ही मुल उपस्थित होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचे पार्थिव येथे येण्याची शक्यता आहे.

वीजनिर्मिती कंपनीत नोकरीवर असलेले डांगे यांनी शिवसेनेच्या सामान्य कार्यकत्र्यांपासून आपल्या राजकीय प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला सेनेच्या बांधणीत मोलाची भूमिका बजावणाèया श्री. डांगे यांनी नंतर शिवसेनेकडून वरोरा-भद्रावती मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढली होती. या निवडणुकीतील पराभवानंतर ते काही वर्षे राजकारणापासून दूर होते.  त्यानंतर ते काँग्रेसवासी झाले. सध्या ते वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच अनेकांना धक्का बसला. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
हातात बंदूक म्हणजे व्यवस्थेविरुद्धच रोष

हातात बंदूक म्हणजे व्यवस्थेविरुद्धच रोष

विश्लेषण                         

मनिलंबित ग्रामसेवकाने प्रलंबित बिलासाठी अधिकाèयावर बंदूक रोखलीङ्क हे शीर्षक वाचून अनेकांना धक्का बसला. असे का घडले, याविषयी चर्चाही सुरू झाली. मात्र, ज्या अधिकाèयावर ही बंदूक रोखली, त्यांनी हा प्रकार हसण्यावारी नेला. त्याला कारणही तसेच होते. ही बंदूक जत्रेत ङ्कुगे ङ्कोडण्याच्या स्पर्धेतील असल्याचे अधिकाèयास ठाऊक होते. त्यामुळे ग्रामसेवकांचे हे कृत्य त्यांनी मनावर घेतले नाही. मात्र, ज्या कुणी व्यक्तींनी हा प्रकार डोळ्यादेखत बघितला, त्यांच्या हृदयाचे ठोके वाजायला लागले होते.
चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत येणाèया म्हातारदेवी ग्रामपंचायतीत हा ग्रामसेवक कार्यरत होता. सरपंचांविरुद्ध वाद झाल्याने त्याच्यावर बंदूक रोखली होती. तेव्हा सरपंचाच्या तक्रारीवरून अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याला काही कारणास्तव निलंबित करण्यात आले. तेव्हापासून तो थकीत बिलासाठी पंचायत समितीत चकरा मारत आहे. मात्र, अधिकाèयांनी त्याला न्याय दिलेला नाही. एरवी सामान्य माणसांना अधिकारी वारंवार चकरा मारायला लावता. काही तरी तांत्रिक चुका काढून काम अडवून ठेवतात. मात्र सामान्य माणसं काही करू शकत नाही. जमेल तेवढी प्रतीक्षा करतात qकवा अधिकाèयांच्या हातावर चार पैसे देऊन आपले काम मार्गी लावतात. मात्र यावेळी हा सामान्य माणूस नव्हता. तोही या व्यवस्थेचाच एक भाग आहे. त्याला अधिकाèयांकडून अडवणूक होत असल्याची कारणे चांगलीच माहित होती. त्यामुळेच त्याचा तोल सुटला. त्यामुळे व्यथित झालेल्या या ग्रामसेवकाने हाती बंदूक घेऊन अधिकाèयांना धकमावून न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला. ग्रामसेवकाला हातात बंदूक घेण्याची वेळ का आली? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मनस्ताप सहन न झाल्याने बंदूक हातात घेऊन (ङ्कूगे ङ्कोडण्याची का असेना) आपल्या वरिष्ठ अधिकाèयांपर्यंत एखादा कर्मचारी पोहचतो, त्या कार्यालयात सामान्य माणसांना किती त्रास सहन करावा लागत असेल. उद्या याच ग्रामसेवकाला खरीखुरी बंदूक मिळाली तर? तो व्यवस्थेविरोधातील आपला राग कशा पद्धतीने व्यक्त करेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे वरकरणी हा प्रकार अगदी क्षुल्लक वाटत असला तरी यामागचे भविष्यातील धोके लक्षात घेणे आवश्यक आहे. यानिमित्ताने शासकीय कार्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाèयांमधील ताणतणावाचेही चित्र समोर आले.

Thursday, July 11, 2013

भरसभागृहात बंदूक रोखली

भरसभागृहात बंदूक रोखली

चंद्रपूर : गेल्या काही वर्षांपासून निलंबित असलेल्या एका ग्रामसेवकाने प्रलंबित बिलांची रक्कम मंजूर करवून घेण्यासाठी चक्क संवर्ग विकास अधिकाèयावर भरसभागृहात बंदूक रोखल्याचा प्रकार घडला. गुरुवारी दुपारी पाचच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने सभागृहात बैठकीसाठी उपस्थितांत एकच खळबळ माजली.

चंद्रपूर पंचायत समितीअंतर्गत येणा-या म्हातारदेवी ग्रामपंचायतीतून निलंबित झालेला काळेवार नामक ग्रामसेवक प्रलंबित बिलांच्या रक्कमेला मंजूरी मिळविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चकरा मारत आहे. गतवर्षीच या मागण्यांना घेऊन त्याने उपोषणही केले होते. मात्र, ही रक्कम मंजूर न झाल्याने तो चांगलाच वैतागला आहे.प्रलंबित बिलांची रक्कम मंजूर करवून घेण्यासाठी आज त्याने कहरच केला. चक्क खांद्यावर बंदूक घेऊन तो पंचायत समितीत आला. प्रारंभी त्याने संवर्गविकास अधिकाèयांचे कक्ष गाठले. मात्र, तिथे कुणीही नव्हते. साहेब, शेजारच्या कृषक सभागृहात बैठकीत असल्याचे शिपायाने सांगितले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा सभागृहाकडे वळविला.तिथे पंचायत राज संदर्भात बैठक सुरू होती. अचानक कुणीतरी खांद्यावर बंदूक घेऊन आल्याचे बघून सभागृह उभा झाला. ग्रामसेवकाने सरळ मंचाकडे चाल करून संवर्गविकास अधिकारी हरीश माटे यांच्या डोक्यावर बंदूक लावली.मबिल मंजूर करता है की नही, नही तो बंदूकसे मार दुंगाङ्क अशी ङ्किल्मी डायलॉग त्याने मारली. शिवाय बंदूकीच्या घोड्यावर बोटही ठेवला. खटकन आवाज होताच संवर्गविकास अधिकाèयांच्या चेहèयावर चांगलाच घाम ङ्कुटला, तर सभागृहात उपस्थितांच्या हृदयाचे ठोके वाजू लागले. मग, काहींनी त्याची समजूत काढत बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या घटनेची तक्रार करण्यात आलेली नाही.

खांद्यावर बंदूक घेऊन आलेला हा ग्रामसेवक प्रशासकीय भवन, न्यायालयाच्या मार्गाने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने आला. त्यानंतर तो उपविभागीय अधिकाèयांच्या कार्यालयाकडून पंचायत समितीत आला. हा संपूर्ण परिसर पोलिसांच्या देखरेखीत असतानाही तो कुणालाच कसा दिसला नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय एखादा व्यक्ती थेट बंदूक घेऊन आल्यानंतरही पोलिस प्रशासन गाठ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ही बंदूक मेल्यात ङ्कुगे ङ्कोडण्याची असून, यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून सोडले होते.

सरपंचावरही रोखली होती बंदूक
म्हातारदेवी येथील ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असताना या महाशयाने येथील सरपंचावर बंदूक रोखली होती. तेव्हा सरपंचाच्या तक्रारीवरून अटकही करण्यात आली होती.
school

school

चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील टोमटा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था दाखविण्यासाठी पुरेशी बोलकी आहे. ही परिस्थिती सर्वत्र आहे.

Tuesday, July 09, 2013

shetakri atmahatya

shetakri atmahatya

अमरावती - अंजनगावसुर्जी तालुक्यातील तुरखेड येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी (ता. नऊ) विष पिऊन आत्महत्या केली. विजय आनंद वाघ (वय 50, रा. तुरखेड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. वाघ यांच्याकडे सव्वा एकर शेती आहे. त्यांनी या वर्षी सोयाबीनची पेरणी केली; परंतु पंधरा दिवसांपर्यंत पेरलेले उगवलेच नाही. म्हणून ते चिंतित होते. मंगळवारी (ता. नऊ) दुपारी एक वाजताकुणालाही न सांगता ते घराबाहेर पडले. शेताच्या मार्गावर त्यांनीविष घेतले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे कर्ज त्यांच्यावर थकित होते, असे निकटवर्तींनी सांगितले. कर्ज आणिमुलीचे लग्न या दोन गोष्टींमुळे ते चिंतित राहत होते, असेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले. अंजनगावसुर्जी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.
aniket amate

aniket amate

लोक बिरादरी प्रकल्पात आदिवासी बांधवान करिता नवीन संगणक कक्ष सुरु होतोय. अतिशय दुर्गम भागात हा प्रकल्प असल्याने लाईट-विजेचाप्रचंड प्रॉब्लेम येत असतो. ४० नवीन आणि १० जुने असे एकूण ५० संगणक असणार आहेत. हा संपूर्ण कक्ष सोलरवर (सौर उर्जेवर) चालावाअसे आम्ही ठरवतोय. मित्रांचा सल्ला व मदत हवी आहे.
प्रा. राजेश कात्रटवार याचा अटकपूर्व जामीन मंजूर

प्रा. राजेश कात्रटवार याचा अटकपूर्व जामीन मंजूर

जवान विनोद किरंगे खून प्रकरण 

चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी अभियानातील जवान विनोद किरंगेच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार याचा अटकपूर्व जामीन ऊच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला.
सावली तालुक्याच्या टोकावरील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या एका बिअरबारमध्ये सी-६0 जवान विनोद किरंगे याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना ४ जूनला उजेडात आली. या खूनप्रकरणात बारमध्ये काम करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी असलेला बारमालक तथा गडचिरोली नगरपालिकेचा नगरसेवक प्रा.राजेश कातट्रवार, अँड.संजय भट, जिल्हा परिषदेचा अभियंता प्रकाश शंखदरबार यांचा समावेश आहे. यातील प्रा.राजेश कातट्रवार याच्याविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दंगल, सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, हे विशेष.
मृत सी-६0 पथकातील जवान विनोद किरंगे हा त्याच्या काही सहकार्‍यांसोबत ४ जून रोजी चंद्रपूर-गडचिरोली मार्गालगत वैनगंगेच्या काठावरील प्रा.राजेश कातट्रवार याच्या मालकीच्या सारंग बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. यावेळी अतिमद्यप्राशनामुळे विनोदने उलटी केली. या कारणावरून वेटरसह अन्य कर्मचार्‍यांनी विनोदशी वाद घातला. हा प्रकार एवढय़ावरच थांबला नाही, तर बारमालक प्रा.राजेश कातट्रवार याच्यासह अँड.संजय भट, अभियंता प्रकाश शंखदरबार व अन्य काही साथिदारांनी विनोदला बेदम मारहाण केली. यात विनोदचा मृत्यू झाला. प्रकरण अंगलट येईल म्हणून विनोदचा मृतदेह चंद्रपूर-गडचिरोली मार्गालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाखाली फेकण्यात आला.
वैद्यकीय अहवालात विनोदचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सावली पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून प्रफुल्ल गोहोणे व नीळकंठ सिडाम या दोघांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी प्रा.राजेश कातट्रवार याच्यासह आणखी दोघांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान प्रा.कातट्रवार याच्यासह अन्य दोन आरोपी फरार झाले. त्यांनी  अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ऊच्च न्यायालयात अर्ज केला होता.  नागपूर खंडपीठाने तो  मंजूर केला. 

Monday, July 08, 2013

जवानाची गोळी झाडून आत्महत्या

जवानाची गोळी झाडून आत्महत्या

चंद्रपूर-पाटण या माओवादग्रस्त भागात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
विशाल बबन शेट्टे (वय ३०) हे मरण पावलेल्या जवानाचे नाव आहे. ते एसआरपीएफच्या दौंड येथील कॅम्पमध्ये कार्यरत होते. सुमारे सहा महिन्यांपासून शेट्टे माओवादग्रस्त भागात ड्यूटीवर होते. काही दिवसांपूर्वी ते रजेवर गेले होते. रजेवरून परतल्यानंतर रविवारी कंपनी कमांडर जवानांना सूचना देत होते. त्यावेळी गोळी झाडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्यानंतर शेट्टे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडून असल्याचे जवानांना दिसले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह सातारा येथे त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला आहे.  

Sunday, July 07, 2013

गडचिरोलीत चकमकीत सहा माओवादी ठार

गडचिरोलीत चकमकीत सहा माओवादी ठार


एटापल्ली तालुक्यातील शिवरी गावाजवळ रविवारी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले.
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शिवरी गावाजवळ रविवारी पोलिस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले. पोलिसांना घटनास्थळावर मोठया प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरुन कार्बाइन रायफल, बारा बोरच्या तीन बंदुका, हॅण्डग्रेनेड आणि इतर शस्त्रसाठा जप्त केला आहे. गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखवी सुरक्षा दलाच्या जवानांची गेल्या तीन दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात शोधमोहिम सुरु होती. पोलिस शिवरी गावाजवळच्या जंगलात पोहोचताच माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिस आणि जवानांनीही लगेचच त्याला प्रत्युत्तर दिले. पोलिस आक्रमक होताच माओवाद्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी नंतर गोळीबार सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, तेथे सहा माओवादी मृत्तावस्थेत आढळले. त्यांच्याजवळ मोठया प्रमाणात शस्त्रसाठा सापडला.

Saturday, July 06, 2013

पसार लुकडी अखेर गवसला

पसार लुकडी अखेर गवसला

चंद्रपूरः पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी फरार झालेला कोळसा माफियांच्या माध्यमातून झालेल्या एका खून प्रकरणातील न्यायाधीन कैदी लुकडी उर्फ धीरेंद्र जयकिसन यादव याला एकोरि मातेच्या मंदिराजवळून अटक करण्यात आली. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . शुक्रवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना हुलकावणी देत धीरेंद्र पळून गेला . २ ८ जुलै २० १ १ रोजी परप्रांतीयांचा मुद्दा, अवैध उत्खननाविरुद्धची मोहीम आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुचना येथील वरोरा-भद्रावती क्षेत्राचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांचा खून करण्यात आला. लुकडी (पप्पू) यादव व सैन्यदलात काम करणारा सचिन यादव यांच्यासह सात ते आठ आरोपींनी सुनियोजितपणे कुचना येथील एका बारसमोर सकाळी दहा वाजताच्या सुमाराला बोलावून श्री. सूर यांच्यावर गोळी झाडून तसेच तलवारीने गंभीर वार करून खून करण्यात आला होता. लुकडी (पप्पू) यादव याला कारागृहात पाठविण्यात आले आहे. 
 कैदी पोलिसांना गुंगारा देत फरार

कैदी पोलिसांना गुंगारा देत फरार

चंद्रपूरः कोळसा माफियांच्या माध्यमातून झालेल्या एका खून प्रकरणातील न्यायाधीन कैदी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी फरार झाला . धीरेंद्र जयकिसन यादव हे या कैद्याचे नाव आहे . त्याच्या विरुद्ध कोर्टात खटला सुरू आहे . प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . शुक्रवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना हुलकावणी देत धीरेंद्र पळून गेला . वरोराजवळील माझरी गावातील नंदू सूर नामक युवकाचा गेल्या वर्षी जूनमध्ये कोळसा माफियांनी सुपारी देऊन खून केला होता . याप्रकरणातील धीरेंद्र हा आरोपी आहे .

२ ८ जुलै २० १ १ रोजी  परप्रांतीयांचा मुद्दा, अवैध उत्खननाविरुद्धची मोहीम आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुचना येथील वरोरा-भद्रावती क्षेत्राचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांचा आज खून करण्यात आला. लुकडी (पप्पू) यादव व सैन्यदलात काम करणारा सचिन यादव यांच्यासह सात ते आठ आरोपींनी सुनियोजितपणे कुचना येथील एका बारसमोर सकाळी दहा वाजताच्या सुमाराला बोलावून श्री. सूर यांच्यावर गोळी झाडून तसेच तलवारीने गंभीर वार करून खून करण्यात आला. यानंतर संतप्त जमावाने सुमारे बारा ट्रक जाळले, तर चाळीसहून अधिक दुकानांची नासधूस केली.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर हे मूळचे वणी तालुक्‍यातील झोला येथील रहिवासी आहेत. सध्या ते माजरी येथे राहत होते. दीड ते दोन वर्षांपासून त्यांनी अवैध व्यावसायिकांविरुद्ध मोहीम उघडली होती. परप्रांतीयांच्या मुद्द्यासोबतच त्यांनी अवैध उत्खननाचे मुद्देही लावून धरले होते. माहितीच्या अधिकाराचा वापर करून काही व्यावसायिकांचे त्यांनी पितळही उघडे पाडले होते. अशाच एका प्रकरणावरून लुकडी यादव आणि नंदू सूर यांच्यात वैमनस्य झाले. लुकडी यादव हा वाहतुकीचा व्यवसाय करायचा. त्याने आपल्याला धमक्‍या दिल्याचे सूर यांनी यापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती; मात्र पोलिसांनी यादववर कुठलीही कारवाई केली नाही.
गुरुवारी (ता. 28) सकाळी सव्वादहाच्या सुमारास लुकडी यादव याने कुचना येथील पाम वाइनबारसमोर बोलायचे असल्याचे निमित्त करून सूर यांना बोलावून घेतले. सूर यांनीही काळजी घेत भाऊ हरी सूर, साळा उमेश बोढेकर आणि रितेश मेश्राम यांना सोबत घेतले. बारजवळ पोचताच लुकडी यादव याने नंदू सूर यांच्यासोबत वाद घातला. यादवसोबत त्यावेळी सचिन यादव, फिरोज कय्यामुद्दीन आणि अन्य पाचजण होते. वाद सुरू असतानाच डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच सचिन यादव याने नंदू सूर यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर लुकडी यादव याने तलवारीने डोक्‍यावर, हातावर आणि पोटावर वार केले. नंदू सूर लागलीच जमिनीवर कोसळले. बचाव करणाऱ्या उमेश बोढेकर यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. श्री. सूर ठार झाल्याची खात्री पटल्यावर लुकडी यादव, सचिन यादव आणि अन्य पाच ते सहा आरोपी चारचाकी वाहनाने पसार झाले. आरोपींपैकी सचिन यादव हा सैन्यात कार्यरत असल्याचे वृत्त आहे.
घटनेचे वृत्त कळताच नागरिक रस्त्यावर आले. वरोरा, भद्रावती, चंद्रपूर आणि वणी तालुक्‍यातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्तेही घटनास्थळाकडे निघाले. घटनेनंतर पंधरा ते वीस मिनिटांनी कुचना गावाची स्थिती हाताबाहेर गेली. वर्दळीचा वणी-वरोरा मार्ग रोखून धरण्यात आला. थांबलेल्या सुमारे बारा ट्रकला आग लावण्यात आली. छोट्या-मोठ्या सुमारे 40 हून अधिक दुकानांतील सामान बाहेर काढून जाळण्यात आले, तसेच नासधूस करण्यात आली. माजरी कॉलरीची एक स्कूलबसही जाळण्यात आली. जवळच असलेल्या शुभम बारमधील सर्व वस्तूंची तोडफोडही करण्यात आली. माहिती मिळाल्यांनतर वरोरा, भद्रावती पोलिसांसह पोलिस अधीक्षक सुवेज हक अतिरिक्‍त कुमक घेऊन घटनास्थळी पोचले. हा सर्व ताफा पोचेपर्यंत माजरी ठाण्याचे रणधीर मेश्राम हेसुद्धा जखमी झाले होते.
घटना घडल्यानंतर पोलिसांची कुमक पोचण्यास दीड ते दोन तास लागले. पोलिस पोचल्यानंतर संतप्त नागरिक आणि मनसेनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात दगडफेकही झाली. गर्दी आवरत नाही, हे लक्षात येताच पोलिसांनी बंदुकीची एक फैरीही झाडल्याचेही वृत्त आहे. पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. गर्दी पांगविल्यानंतर नंदू सूर यांचा मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनीही तेथे गर्दी केली. येथे झालेल्या धक्काबुकीत वरोरा येथील पोलिस उपनिरीक्षक येरमे यांचे पिस्तूल हिसकण्याचा प्रयत्न झाला. आजच्या घटनेत दोन पोलिसांसह उमेश बोढेकरही जखमी झाले. नंदू सूर यांच्या खुनानंतर काही वेळात नंदोरी येथून आरोपींनी वापरलेले वाहन जप्त केल्याचे वृत्त आहे. एमएच-34-9052 या क्रमाकांची सुमो ही लुकडी यादव याचीच असून, सुमोत रक्‍तही आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिलेला नव्हता.


चंद्रपूर जिल्हयात खाण माफियांचं वाढतं वर्चस्व कोळसा व्यवसायाला धोका निर्माण करणारं आहे. गेल्या काही दिवसात कोल माफीयांनी चार लोकांचा खून केला आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या घुग्गुसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षाची भर दिवसा तलवारीने हत्या करण्यात आली. कारण होतं. कोळशाच्या व्यवसायातलं शत्रुत्वाचं. हे कोळसा माफिया बेकायदेशीर तस्करी तर करतातच पण त्यांच्या कारनाम्यांमुळे गुन्हेगारीही वाढलीय.
चंद्रपूर जिल्ह्यात 40 हजारांच्या वर अंडरग्राउंड आणि ओपनकास्ट खाणी आहेत. खाणीतला कोळसा नेताना यावर कोळसामाफियांची करडी नजर असते. या व्यवसायात अनेक गँग सक्रिय आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढलीय. लाखांची दलाली आणि प्रशासनाचं पाठबळ यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा माफियांनी उच्छाद मांडला आहे. या कोळसा माफियांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने सीआयएसएफसारखी यंत्रणा लावावी, अशी मागणीही झाली. पण सरकारनं त्याकडे फारसं गांभिर्याने बघितलं नाही. जो अधिकारी अशा माफियांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवतो त्या अधिकार्‍याची बदली करण्यात येते. त्यामुळे माफिया आणि प्रशासन यांचे साटेलोटे तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झालीय. चंद्रपूरमध्ये कोळसा खाणींवरुन होणार्‍या हिंसेचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलंय. एक नजर टाकूया या गँगवॉरवर…
- हाजी सरवर आणि तिरुपती पॉल यांच्यातलं गँगवॉर नेहमीचंच- 2011 : कोल माफिया सत्याचा खून- 2011 : मनसे शहर अध्यक्ष नंदू सूर याचा खून – 6 महिन्यांपूर्वी घुग्गुस शहरात हाजी सरवरवर गोळीबार – 6 गोळ्या लागूनही हाजी सरवर बचावला- 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष तिरुपती पॉल याचा खून
सिंधुदुर्गात कळणेमध्ये 600 कोटींपेक्षाही जास्त बेकायदा मायनिंगतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे मायनिंगने लाखो टन बेकायदा लोहखनिज काढल्याचं निष्पन्न होऊन तब्बल सहा महिने झाले तरी अद्याप या मायनिंग कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही . नागपूर आणि कोल्हापूर खनिकर्म विभागाने नव्याने केलेल्या संयुक्त तपासणीत या मायनिंगमधून तब्बल 9 लाख टन बेकायदा लोहखनिजाचं बेकायदा उत्खनन झाल्याची माहिती आयबीन्एन लोकमतच्या हाती लागलीय. सुमारे 600 कोटीपेंक्षाही अधिकचा हा घोटाळा आहे. शिवाय सरकारचा कोट्यवधींचा महसूलही बुडाला आहे. मात्र राजकीय वरदहस्तामुळेच हे सगळं प्रकरण झाकलं जात असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे.
वैद्यकीय महाविद्यालय लांबणीवरच

वैद्यकीय महाविद्यालय लांबणीवरच

चंद्रपूर - येत्या शैक्षणिक सत्रापासून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल,या काही नेत्यांच्या घोषणा निराधार असल्याची बाब आता समोर आली आहे

शनिवार, 6 जुलै 2013 - वाचा sakal today

Thursday, July 04, 2013

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संपकरी ६४२ एनआरएचए‘ कर्मचा-यांचे सरसकट निलंबन

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संपकरी ६४२ एनआरएचए‘ कर्मचा-यांचे सरसकट निलंबन

जिल्हा परिषद प्रशासनाचा धक्कादायक निर्णय , आंदोलक संतापले
चंद्रपूरदि.०४ (प्रतिनिधी):
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संपकरी ६४२ एनआरएचए‘ कर्मचा-यांचे सरसकट निलंबन, जिल्हा परिषद प्रशासनाचा धक्कादायक निर्णय , आंदोलक संतापले आहे.
२००५ पासून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर काम करणा-या २२ हजार कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १ जुलै पासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांवर कार्यरत कंत्राटी कर्मचारी संपूर्ण राज्यात गेल्या अनेक वर्षापासून अस्थाई स्वरूपात काम करीत आहेत. राज्यातील आरोग्यसेवेचा दर्जा उंचावल्यास या कर्मचाèयांचे मोठे योगदान आहे. असे असतानाही या कर्मचाèयांवर शासनाकडून अन्याय केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ एनआरएचएमच्या शेकडो कर्मचèयांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले
२००५ पासून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर काम करणा-या २२ हजार कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १ जुलै पासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातील संपात सहभागी होणा-या चंद्रपूर जि. प. शी संलग्न एनआरएचए‘ कर्मचा-यांवर नोकरी गमाविण्याची वेळ आली आहे.  बेमुदत संप पुकारल्यामुळे काल संध्याकाळी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी खोडे यांनी ६६२ पैकी ६४२ कर्मचा-यांना निलंबित केले आहे. या आदेशा विरोधात संतप्त कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली आणि सरकारचा निषेध केला. सरकारी सेवेत कायम करण्यात यावे, सर्व कंत्राटी कर्मचाèयांचे सेवापुस्तक तयार करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण लागू करण्यात यावे, वाढत्या महागाईमुळे मानधनात ४० टक्के वाढ करण्यात यावी, २० वैद्यकीय रजा, ३० अजिर्त रजा व वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्यात यावा, महिला कर्मचाèयांना ६ महिन्यांपर्यत पूर्ण पगारी प्रसृती रजा देण्यात यावी, शासकीय भरती प्रक्रियेत कंत्राटी कर्मचारी वयोर्मयादा ४८ करुन भरतीत ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, आयपीएचएस व नगरपालिका क्षेत्रात काम करणाèया कंत्राटी कर्मचाèयांचे समायोजन करण्यात यावे, डाटा एन्टड्ढी आपरेटर व चालक यांचे खासगीकरण रद्द करण्यात यावे, अशा गटप्रवर्तकांना भत्ता न देता ७ हजार मासिक मानधन देण्यात यावे  आणि इतर मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राकेश नाकाडे, सचिन पोडे, राकेश बनकर, प्रकाश मोहुर्ले, चंद्रशेखर लोणारे, मेर्शाम, संगीता माहूरकर यांच्यासह शेकडोच्या संख्येने कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते. परंतु आज  या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील ६४२ कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज जिल्हा परिषद प्रशासनाने या सर्वच संपकरी कर्मचा-यांना तडकाफडकी निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी खोडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आनंद आठल्ये यांनी कर्मचा-यांचा रोष बघता जिल्हा परिषदेतून रवाना होणे पसंत केले.  राज्य सरकार व छठकच चे संपकरी कर्मचारी यांच्यात मंत्रालय स्तरावर चर्चा सुरु असताना चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाने संपकरी कर्मचारी संतप्त झाले आहेत. हा तिढा कसा सुटेल याकडे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.