काव्यशिल्प Digital Media: प्रकल्पग्रस्त

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label प्रकल्पग्रस्त. Show all posts
Showing posts with label प्रकल्पग्रस्त. Show all posts

Tuesday, May 29, 2018

प्रकल्पग्रस्तांचा चंद्रपूर येथे 1 जून ला भव्य मेळावा

प्रकल्पग्रस्तांचा चंद्रपूर येथे 1 जून ला भव्य मेळावा

प्रकल्पग्रस्त साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
 भारत सरकारचे केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर राज्याचे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार विद्यूत प्रकल्पग्रस्त कृती समिती, चंद्रपूर च्या वतीने चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राशी निगडीत प्रकल्पग्रस्तांचा मेळावा दि. 1 जून 2018 रोजी सकाळी 10 वाजता डब्ल्यू.आर.सी. हाॅल, उर्जानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. 
या मेळाव्यास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून या प्रसंगी जि.प.चे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा नेते पूर्व पालकमंत्राी संजय देवतळे, भद्रावती पं.स.च्या सभापती विद्या कांबळे, भाजपा वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, भाजपा जिल्हा महामंत्राी राहुल सराफ, भाजपाचे भद्रावती तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य, मारोती गायकवाड, जि.प. सदस्य यशवंत वाघ, जि.प. सदस्या वनिता आसुटकर, जि.प. सदस्य रोशनी अनवर खान, भद्रावती पं.स. सदस्य महेश टोंगे, चंद्रपूर पं.स. सदस्य संजय जाधव, चंद्रपूर पं.स. सदस्य श्रीमती खेमा रायपुरे आदींची उपस्थिती राहणार आहे. 
प्रकल्पग्रस्तांच्या या मेळाव्यात प्रलंबित असलेल्या विविधांगी प्रश्नावर तसेच बाधीत गावाच्या विकासाकरिता सीएसआर निधीचा वापर महाऔष्णिक केंद्राच्या अधिकाÚयांशी विविध मुद्यांवर चर्चा तसेच विविध प्रश्न आणि समस्यांवर या मेळाव्याच्या माध्यमातून उहापोह होणार असल्याने सीएसटीपीएस प्रकल्पग्रस्त बाधीत गावातील सर्व सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रगत कुशल कामगार व नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास बहुसंख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन सर्वश्री देवंेंद्र मालुसरे, अनिल सोमलकर, आनंद रामटेके, आशिष कोल्हे, धिरज डाहाकी, शंकर येरगुडे, ज्योती बोढाले, निशा डाहाकी, वर्षा येरगुडे, आतिश जुनघरे, प्रकाश चुधरी, मधुकर गोहणे, भाग्यश्री सोमलकर, प्रियंका रत्नपारखी, प्रमोद बोढाले, मनिषा चुधरी, आशिष राजुरकर, रोशन पिंपळकर, सुर्यभान येरगुडे, संदीप इखारे, आशिष गोहणे, अमोल येरगुडे, प्रफुल कातकर, प्रविण मोहितकर, प्रकाश झोमलकर, चेतन माहुलकर आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातुन आवाहन केले आहे.

Tuesday, December 05, 2017

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

 न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाच ईशारा 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिंदोडा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी अनेक वर्षांपासून संपादित करण्यात आल्या मात्र अजून पर्यंत शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही व अद्याप शासनाने कोणत्याच प्रकरणात अजूनही दखल घेतलेली नाही.  त्यामुळे याचा निषेध करत मंगळवारी (आज) दिंदोडा प्रकल्पग्रस्तांनी हजारोंच्या संख्येने जनता कॉलेज पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला.
दिंदोडा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी १९९९ ते २००० या कालावधीत वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी निप्पोन डेंनो प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या.हा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील दिंदोडा गावाजवळील वर्धा व वेणा नदीच्या संगमावर प्रस्तापित होता. त्या प्रकल्पातील सर्व पाणी निप्पोन डेंनो विद्युत प्रकल्पासाठी जाणार होते. त्यावेळी फक्त ३० हजार रुपये प्रति एकर जमिनीचा मोबदला देण्यात आला होता व प्रति एकर एक लाख रुपये अनुदान देण्याचे मान्य करण्यात आले होते.
त्या प्रकल्पाचे ८० टक्के पाणी वर्धा पॉवर, जीएमआर व इतर विद्युत प्रकल्पाला व उर्वरित २० टक्के पाणी शेतीसाठी देण्याचे ठरले. मात्र १७ वर्ष होऊन सुद्धा प्रकल्पाला सुरुवात झाली नाही. या दरम्यान शेतकऱ्यांच्या व पर्यावरण विभागाच्या अनेक बैठक झाल्या मात्र मोबदला देण्याबाबत कोणतेही दखल घेतली गेली नाही. 
मागील वर्षांपासून शांततामय वातावरणात नदीच्या तीरावर विविध आंदोलने प्रकल्पग्रस्तांनी केली मात्र शासनाने कोणतीच दखल घेतली नाही तसेच प्रकल्पग्रस्तांचे निवेदन स्वीकारण्यासाठी एकही संबंधित अधिकारी उपस्थित झाले नाही. म्हणून न्यायाच्या मागणीकरिता आज दिंदोडा प्रकल्पग्रस्तांनी हजारोंच्या संख्येने जनता कॉलेज पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. व आपल्या मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 
या नंतर सुद्धा दिंदोडा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे, उपाध्यक्ष अभिजित माढेकर, सचिव चंपतराव साळवे यांनी सांगितले आहे.