সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, September 28, 2014

नागपूर ग्रामीणमध्ये 142 उमेदवार

नागपूर ग्रामीणमध्ये 142 उमेदवार

नागपूर : ग्रामीण जिल्ह्यात सहा मतदार संघात एकूण 142 अर्ज दाखल झाले आहेत. यात हिंगणा 24, कामठी 23, सावनेर 18, उमरेड 24, काटोल 32, रामटेक 21 उमेदवारी अर्ज आहेत. जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारात राष्ट्रवादीचे रमेश बंग, अनिल देशमुख, भाजपचे समीर मेघे, सुधीर पारवे, चंद्रशेखर बावनकुळे, कॉंग्रेसचे राजेंद्र मूळक, सुनील केदार, सुबोध मोहिते यांचा समावेश आहे.

Saturday, September 27, 2014

प्रमुख उमेदवार

प्रमुख उमेदवार


प्रमुख उमेदवार  

बल्लारपूर
आ. सुधीर मुनगंटीवार- भाजप
घनश्याम मुलचंदानी - कॉंग्रेस
हर्शल चिपळूणकर - मनसे


राजुरा
आ. सुभाष धोटे, - कॉंग्रेस
संजय धोटे, - भाजप
सुधाकर राठोड - मनसे
सुदर्शन निमकर- राष्ट्रवादी 


ब्रम्हपुरी
आ. विजय वडेट्टीवार - कॉंग्रेस
अतुल देशकर - भाजप
संदीप गड्डमवार- राष्ट्रवादी
विश्वास देशमुख- मनसे
राष्ट्रवादी

संदीप गड्डमवार

चिमूर
कीर्तीकुमार भांगडिया - भाजप
अविनाश वर्जुरकर - कॉंग्रेस
अरविंद चांदेकर - मनसे

वरोरा
संजय देवतळें- भाजप
आसावरी देवतळे - कॉंग्रेस
बाळू धानोरकर- शिवसेना
अनिल बुजोने - मनसे

चंद्रपूर
महेश मेंढे - कॉंग्रेस
किशोर जोरगेवार- शिवसेना
नाना शामकुळे - भाजप
सुनिता गायकवाड - मनसे

जुना इतिहास

Thursday, September 25, 2014

एकनाथराव खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एकनाथराव खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव, दि. 25 :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी आज (गुरुवार दि. 25 सप्टेंबर) जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसिल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांच्याकडे 20-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी सौ.मंदाताई खडसे, भाजपाचे तालुका अध्यक्ष निवृत्ती पाटील, नगरसेवक ॲड. संजय राणे उपस्थित होते. तत्पुर्वी श्री.खडसे यांनी मुक्ताई मंदिरात जाऊन आदिशक्ती मुक्ताईमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री.खडसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा ताफा तहसिल कार्यालयाकडे निघाला. यावेळी खा.ए.टी.नाना पाटील, खा.रक्षाताई खडसे, मलकापूरचे आ.चैनसुख संचेती, आ.गुरुमुख जगवाणी, माजी खासदार गुणवंतराव सरोदे व हरिभाऊ जावळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांच्या ताफ्याचे रुपांतर मोठया जनसमुदायात झाले व नाथाभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत लाखोंच्या जनसमुदायाने नाथाभाऊंना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.
मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

चंद्रपूर
राजुरा - सुधाकर राठोड
बल्लारपूर - अॅड. हर्षल चिपळूणकर
चिमूर - अरविंद चांदेकर
वरोरा - डॉ. अनिल बुजोणे

मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

वर्धा
हिंगणघाट- अतुल वंदिले
वर्धा - अजय हेडाऊ
आशीर्वादपर १ रुपया मदत निधी घेऊन अनामत रक्कम भरणार

आशीर्वादपर १ रुपया मदत निधी घेऊन अनामत रक्कम भरणार


भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय मुल येथे दाखल करणार आहे.
२६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भाग्यरेखा सभागृह मूल येथून रॅलीने पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांसह आ. सुधीर मुनगंटीवार उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक असलेली १० हजार रुपये अनामत रक्कम नागरिकांकडून आशीर्वादपर १ रुपया मदतनिधी घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार भरणार आहेत. यासाठी गेल्या आठवडाभरापासून भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क साधून आशीर्वादपर मदतनिधी शुल्क गोळा करीत आहेत. मदतनिधी देणार्‍या मतदारांना आ. मुनगंटीवार यांच्या स्वाक्षरीचे आभारपत्रसुद्धा देण्यात येत आहे.

Wednesday, September 24, 2014

२६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

२६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष  श्री. सुधीर मुनगंटीवार २६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे भूतपूर्व अध्यक्ष, संघाच्या कार्यकर्त्यांशी एकरूप होणारे नेते श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. उच्चविद्याविभूषित सुधीरजी यांनी एम.कॉम., एल.एल.बी., एम.फिल., डी.बी.एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि सार्वजनिक जीवनाला आरंभ केला. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीस पदी निवडून आले. यानंतर लवकरच म्हणजे १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. आता चंद्रपूरच्या लोकांच्या समस्या सोडवणे हेच आपले ध्येय मानून त्यांनी तेथील अनेक सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांचे चंद्रपूरचे सहयोगी असे म्हणतात की, ‘सतत लोकांच्या संपर्कात असणारा व कामामध्ये स्वतःला झोकून देणारा हा एकमेव नेता आहे.’
चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे सतत चार वेळा राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे सुधीरजी १९९५ मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. यावेळी त्यांनी ५५ हजाराचे विक्रमी मताधिक्य मिळविले होते. लगोलग ते भाजपा-सेनेच्या युती सरकार मध्ये पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री देखील झाले. विधीमंडळाचे १९९८ सालचे उत्कृष्ट वक्त्याला दिले जाणारे पारितोषिक सुद्धा त्यांना मिळाले आहे. याखेरीज समाजातील अंध-अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी वैधानिक लढा देणाऱ्यास दिला जाणारा जी.एल.नार्देकर स्मृती पुरस्कार सुधीरजीना मिळाला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेले गोंडवन विद्यापीठ उभे करण्यात सुधीरजींचा मोठा वाटा आहे.
२००९ ते २०१३ या काळात त्यांनी भाजपाचे महाराष्ट्रप्रदेशाध्यक्ष पद भूषविले. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपाचा आलेख उंचावला.

“भाग्यश्री”, गोलबाजार वॉर्ड, कस्तुरबा रोड, गिरनार चौक, चंद्रपूर – ४४२४०२, महाराष्ट्र राज्य
स्वीय सहायक - अजय धवणे(चंद्रपूर) : ०९८२२५६५९२६
                    ऑफिस-(०७१७२)२५२५८२, २५६०६९
फॅक्स -(०७१७२)२५८८००
sudhir.mungantiwar@mahabjp.org 

स्वीय सहायक - श्री. अजय धवणे
मोबा.नं.: ९८२२५६५९२६
विधानसभा

विधानसभा

निवडणूक विशेष '
राजुरा
अनु क्र. वर्ष विजेता उमेदवार पक्ष मतसंख्या पराभूत उमेदवार पक्ष मतसंख्या
1 2009 सुभाष धोटे काँग्रेस 61476 संजय यादवराव एसटीबीपी 45389
2 2004 वामनराव चटप एसटीबीपी 66216 सुदर्शन निमकर काँग्रेस 57155
3 1999 वामन चटप अपक्ष 67690 प्रभाकर मामुलकर काँग्रेस 48645
4 1995 वामन चटप अपक्ष 67690 प्रभाकर मामुलकर काँग्रेस 48645
5 1990 वामनराव चटप जनता दल 47949 प्रभाकर मामूळकर काँग्रेस 37476
6 1962 विठ्ठलराव धोते काँग्रेस 22818 यादवराव धोते अपक्ष 22745


1 1967 एस.बी. जीवतोडे गुरुजी अपक्ष 21435 व्ही.एल. धोते काँग्रेस 17521
2 1972 विठ्ठलराव धोते काँग्रेस 27079 देवराव मुसळे अपक्ष 19735
3 1977 बाबूराव मुसळे जनता पक्ष 30786 प्रभाकरराव मामूलकर अपक्ष 24873
4 1980 प्रभाकरराव मामूलकर काँग्रेस (आय) 36235 प्रभाकर धोते भाजप 22001
5 1985 प्रभाकरराव मामूलदार काँग्रेस 39356 बाबासाहेब वसदे काँग्रेस (सोशालिस्ट) 21446

----------------------------------------------------------------------------------------------------------
सावली -
अनु क्र. वर्ष विजेता उमेदवार पक्ष मतसंख्या पराभूत उमेदवार पक्ष मतसंख्या
1 1962 मारोतराव कन्नमवार काँग्रेस 23696 दामोदर काळे अपक्ष 22968
2 1962 एम. जी. गंदमवार काँग्रेस 31081 व्ही. ए. पाटील प्रजासमाजवादी 12378
3 1977 देवराव भय्याची भांडेकर काँग्रेस (आय) 28466 दादा देशकर वकील जनता पक्ष 23862
4 1980 महादेव ताजणे काँग्रेस (आय) 21729 बाबूराव माशाखेत्री काँग्रेस (यू) 13664
5 1985 वामन गद्दमवार काँग्रेस 36611 शोभाताई फडणवीस भाजप 26933
6 1990 शोभाताई फडणवीस भाजप 49924 गद्दमवार विस्तारी काँग्रेस 36630
7 1995 शोभाताई फडणवीस भाजप 71343 वामनराव गड्डमवार काँग्रेस 45677
8 1999 शोभाताई फडणवीस भाजपा 71343 वामनराव गड्डमवार काँग्रेस 45677
9 2004 शोभा फडणवीस भाजपा 48004 भैय्याजी देवराय काँग्रेस 43094

-----------------------------------------------------------------------------------------------------------
ब्रम्हपुरी
अनु क्र. वर्ष विजेता उमेदवार पक्ष मतसंख्या पराभूत उमेदवार पक्ष मतसंख्या
1 1962 गोविंद मेश्राम काँग्रेस 23114 नामदेवराव नागदोवते रिपब्लिकन पार्टी 12419
2 1995 सुरेश खानोरकर जनता दल 42525 वासुदेवराव पाझोडे भाजप 39737
3 1999 सुरेश खानोरकर जनता दल 42525 वासुदेवराव पाझोडे भाजपा 39737
4 2004 अतुल देशकर भाजपा 52953 दामोधर मिसार राष्ट्रवादी 38777
5 2009 अतुल देशकर भाजपा 50340 संदीप गड्डमवार अपक्ष 44845
---------------------------------------------------------------------------------------------------------
चिमूर
नु क्र. वर्ष विजेता उमेदवार पक्ष मतसंख्या पराभूत उमेदवार पक्ष मतसंख्या
1 2009 विजय वडेट्टीवार काँग्रेस 89341 वसंतभाऊ वारजूरकर भाजपा 58725
2 2004 विजय वडेट्टीवार शिवसेना 45332 अविनाश वारजूकर काँग्रेस 44529
3 1999 रमेशकुमार गजाभे अपक्ष 36433 रामदासजी गाभणे भाजपा 29090
4 1995 रमेशकुमार गजाभे अपक्ष 36433 रामदासजी गाभणे भाजप 29090
5 1990 बाबूराव वाघमारे काँग्रेस 26442 बाबा जयस्वाल शिवसेना 24432
6 1985 भूजंगराव बागडे काँग्रेस 45235 एम. रहिमतुल्ला अपक्ष 13008
7 1980 यशोधरा बजाज काँग्रेस (आय) 44264 वसंतराव पोशंट्टीवार भाजप 13168
8 1977 अडकूजी सोनावणे काँग्रेस (आय) 55117 गोपाळराव कोरेकर जनता पक्ष 24431
9 1972 मोटीराम बिरजू काँग्रेस 20934 अडकू सोनावणे अपक्ष 20689
10 1967 एम.डी. तुपलव्हार काँग्रेस 18256 जी.के. कोरेकर संघता सोशालिस्ट 9545
11 1962 मारोतराव टुमपल्लीवार काँग्रेस 23479 बालाजी बोरकर जनसंघ 9024
---------------------------------------------------------------------------------------------------------
बल्लारपूर 
1 2009 सुधीर मुनगंटीवार भाजपा 86196 राहूल पुगलिया काँग्रेस 6146
  ----------------------------------------------------------------------------------------------------------
वरोरा 
अनु क्र. वर्ष विजेता उमेदवार पक्ष मतसंख्या पराभूत उमेदवार पक्ष मतसंख्या
1 1962 रामचंद्र देवतळे काँग्रेस 24414 विठ्लराव देवतळे प्रजासमाजवादी 22604
2 1967 आर.जे. देवतळे काँग्रेस 25232 व्ही.एल. देवतळे संघता सोशालिस्ट 23570
3 1972 दादासाहेब देवतळे काँग्रेस 39801 बळीराम श्रीमारी अपक्ष 17388
4 1980 दादासाहेब देवतळे काँग्रेस (आय) 32004 अडकू पाटील ननावरे अपक्ष 29129
5 1985 मोरेश्वर टेमूर्डे अपक्ष 36088 दादासाहेब देवतळे काँग्रेस 26197
6 1990 मोरेश्वर टेमुर्डे जनता दल 34666 बाबा वसाडे काँग्रेस 30495
7 1995 संजय देवतळे काँग्रेस 37689 बाबासाहेब वासडे अपक्ष 26164
8 1999 संजय देवतळे काँग्रेस 37689 बाबासाहेब वसाडे अपक्ष 26164
9 2004 संजय देवताले काँग्रेस 48422 अनिल बुजोने अपक्ष 29979
 

Sunday, September 21, 2014

कामठीला प्रगतीची अपेक्षा

कामठीला प्रगतीची अपेक्षा

कामठी विशेष पान

नागपूरचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठी शहराची स्थापना अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली. कन्हान नदीतीरावर असलेल्या विस्तीर्ण पठारावर इंग्रज सैनिक सरावासाठी येत असत. यादरम्यान, "चहा शिबिर' व्हायचे. त्याला "कॅम्प टी' असे म्हणत. पुढे त्याच शब्दाचा अपभ्रंश होऊन गावाचे नाव "कामठी' असे पडले. इंग्रजांनी त्यांच्या सुविधेसासाठी कन्हान नदीच्या तीरावर वसाहत बनविली. आता नदीच्या दोन्ही बाजूंनी वस्ती असून, जुनी आणि नवीन कामठी असे नामकरण झाले. कामठी शहराला सैनिकी इतिहास असल्याने येथे केंद्र सरकारच्या अधीन असलेले कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि नगर परिषद या दोन स्थानिक स्वायत्त संस्था आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात नियोजनानुसार विकास झाला. मात्र, कामठी वस्ती आजही विकासापासून दूरच आहे. विस्तारीकरणासाठी पुरेशी जागा नसल्याने शहर दाटीवाटीने वसले आहे.


गावाची ओळख
इंग्रजांनी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या नागरिकांना देशाच्या विविध भागांतून इथे आणले. त्यामुळे कुरैशी, मुस्लिम, जैन, धोबी, सोनार, शीख यांच्यासह अठरापगड जातीधर्माचे लोक येथे आहेत. येथे गुजरी बाजार, चावडी, भाजीमंडी, सोनारओली, फुटाणा ओली, दालओली, दर्जी मोहल्ला, परवारपुरा, कसार ओली, गुळओली, किराणाओली अशा नावांनी स्थळे आहेत. 1917 नंतर नागपूर शहरातील सीताबर्डी किल्ल्यावरील छावणी कामठी कॅन्टोन्मेंट येथे हलविण्यात आली. 1927 मध्ये बागडोर नाल्याचा भाग मिल्ट्री कॅन्टोंन्मेंटपासून वेगळा करण्यात आला. त्यानंतर कामठी हे "ब' वर्ग शहर मानण्यात आले. येथे असलेले ड्रॅगन पॅलेस टेम्पल जपान येथील ओगावा संस्थेने बांधले असून, येथे जगभरातील पर्यटक वर्षभर भेट देतात.


वैशिष्ट्ये
कामठी येथे भोसलेकालीन वास्तू, सैन्य प्रशिक्षण केंद्र, जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल, रेल्वेलाइन, कन्हान नदी, कन्हान गोंडेगाव कोळसा खाण, बुद्धविहार, मंदिर, मशीद, चर्च येथे आहे. क्रिकेटपटू सी. के. नायडू, फूटबॉलपटू मुस्ताक कप्तान, सलाहुद्दीन अंसारी यांच्या क्रीडागुणांना येथून सुरवात झाली.

  • एक डिसेंबर 1863 : नगर परिषद स्थापना
  • 97 हजार : लोकसंख्या
  • 427.6 चौ. किमी क्षेत्रफळ
  • 1927 : नगर परिषदेची स्वतंत्र स्थापना (सीपी ऍण्ड बेरार)
  • 8 : एकूण प्रभाग
  • 31 : वॉर्ड

कागदावर विकास, शहर भकास
कामठी नगरपालिकेची विकास योजना 1989 मध्ये मंजूर करण्यात आली. त्यात 88 आरक्षणे आहेत. आजवर 15 आरक्षणस्थळी विकास करण्यात आला. पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने शहर विकासापासून वंचित आहे. शहरात एकूण 72 किलोमीटर लांबीचे रस्ते असून, 80 किमी लांबीच्या नाल्या आहेत.
शहराच्या विकासासाठी स्थानिक आमदारांच्या निधीतून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. त्यामुळे कागदावर विकास दिसतो. प्रत्यक्ष संपूर्ण शहर "भकास' झाले आहे. मग, हा निधी गेला कुठे, असा प्रश्‍न उपस्थित करीत गैरव्यवहाराची शंका उपस्थित केली जात आहे. स्थानिक आमदार निधीतून जानेवारी 2005 ते 31 मे 2014 पर्यंत रस्ते बांधकाम व दुरुस्ती 9 कोटी 62 लाख 65 हजार 485 रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजना तीन कोटी 55 लाख, झोपडपट्टी विकास 1 लाख 53 हजार 491 रुपये, दलित वस्ती योजना 13 कोटी 83 लाख 38 हजार 471 रुपये, वित्त योजना दोन कोटी तीन लाख 11 हजार 482, शाळा बांधकाम अनुदान 17 लाख 47 हजार 420, आमदार निधी 58 लाख 14 हजार 658, नगरोत्थान महाअभियान 1 कोटी 98 लाख 5 हजार 260, तेरावा वित्त आयोग 4 कोटी 79 लाख 22 हजार 316, यूआयडी योजना 19कोटी 98 लाख 54 हजार इतका निधी खर्च करण्यात आला. त्याउपरही नगराचा विकास झाला नाही, अशी ओरड नागरिक करीत आहेत.
------------
स्वच्छतागृहांची गरज
जवळपास एक लाखाच्या आसपास लोकसंख्या असतानाही शहरात एकही स्वच्छतागृह नाही. शुक्रवारी बाजार परिसरात असलेले एकमेव स्वच्छतागृह देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्थेत पडले आहे. स्वच्छतागृहाअभावी बाजार, व्यापारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. शहरात किमान सहा ठिकाणी सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहांची आवश्‍यकता आहे.

उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री
आजच्या पिढीला फास्टफूड संस्कृतीचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र या थोड्याशा आकर्षणामुळे रस्त्यावरील 5 ते 10 रुपयाला मिळणारे उघडे पदार्थ खाऊन आजाराला आमंत्रण देत आहोत. ही बाब नागरिक विसरत असतात आणि यामुळे आजाराला बळी पडतो. कामठी शहरात या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. कामठी येथे हॉटेल व उपाहारगृहांना परवाने देताना काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.

घाणीचा विळखा
कामठी न.प. अंतर्गत विविध विकासकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गत अडीच वर्षात मंजूर झाला. त्या निधीतून विविध विकास केल्याचा आणि विकासकार्य प्रगतीवर असल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात विकासकार्य झाल्याचे जाणवत नाही. 10 वर्षापासून न.प. त कॉंग्रेस आघाडीची एकहाती सत्ता होती. कामठी शहराची ओळख घाण, अस्वच्छता आणि उकीरड्यांचे शहर अशीच आहे.

रस्ते डागडुजीच्या प्रतीक्षेत
बाबू हरदास एल.एन. चौक ते भाजी मंडी चौक या शहराच्या मुख्य मार्गाचे नशिब अद्यापही पालटले नसून, गत पंधरावर्षापासून या मार्गाची साधी डागडुजी सद्या सुध्दा करण्यात आली नाही. शहरातील अंतर्गत रस्त्यांची हालत अत्यंत दयनीय आहे.

बाजार रस्त्यावर
शहरातील आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. जयस्तंभ चौक ते गांधी चौक, पोलिस ठाणे ते छत्रपती शिवाजी चौक या मार्गावर दुकानदारांनी बेसुमार अतिक्रमण केले आहे. मार्गावरील दुभाजकांवरही दुकाने थाटण्यात येत आहेत. गोलबाजार परिसरात वाहनांची गर्दी असते. येथे वाहनतळाची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे.

भवनाचे बांधकाम संथगतीने
मुस्लिम समाज भवनासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. गत दोन वर्षापासून भवनाचे बांधकाम संथगतीने सुरु आहे. त्यामुळे मुस्लिम समाजबांधवाना त्यांचे वैवाहीक समारंभ रस्त्यावर मांडव टाकून राहावे लागतात. त्याचप्रमाणे पोरवाल मैदानातील राजीव गांधी सांस्कृतिक भवनाचे बांधकाम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. हा प्रश्‍न रेंगाळत ठेवण्यात सत्ता धारकांची महत्वाची भूमिका आहे.

------------------
आययुडीपी भागात विकास कार्याचा दर्जा खालावलेला आहे. या भागात कोट्यवधींची विकासकामे करण्यात आली. रस्ते बांधकाम, डांबरीकरण, नाली बांधकाम, सिमेंट रोड आदी कामात गैरव्यवहार झाला आहे. छत्रपतीनगर, लुंबिनीनगर, भुराजीनगर, कुंभारे कॉलनी या भागात सुविधांची गरज आहे.

  • काही वर्षांपूर्वी नवे पोलिस ठाणे थाटात सुरू करण्यात आले. सध्या जुन्या पोलिस ठाणे दोन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. शहरात सहा पोलिस चौकी असून, कर्मचाऱ्यांअभावी त्या बंद आहेत. पोलिस वसाहतीची दूरवस्था झाली असून, कर्मचाऱ्यांचे कुटुंब धोक्‍यात जीवन जगत आहेत. येथे 75 सदनिका आहेत.

  • शहराच्या मध्यवर्तीभागात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुले नाट्यगृह आहे. बोटावर मोजण्याइतके कार्यक्रम इथे झाले.

-------------
रेल्वे उड्डाणपूल प्रतीक्षेत
कामठी व नवीन कामठीला जोडणाऱ्या रामगढ रेल्वे क्रॉसिंग येथे रेल्वे उड्डाणपुलाची आवश्‍यकता आहे. दर 10 मिनिटांनी रेल्वे फाटक बंद होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. रेल्वे उड्डाणपूल झाल्यास जडवाहतुकीसह विद्यार्थ्यांना वेळेत आणि सुरक्षित प्रवास करता येईल.
------------
प्रतिक्रिया
विहिरींचा गाळ काढा
भौगोलिक रचनेमुळे शहरात कमी दाबाचा अल्प पाणीपुरवठा होतो. शहरात पुरेशा प्रमाणात विहिरी असून, मोटारपंपाच्या माध्यमातून तिथून पाणी घेतले जात आहे. अनेक विहिरींमध्ये गाळ साचल्याने त्यांच्या सफाईची गरज आहे. गाळ उपसा योजना राबविल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागू शकते.
- योगेश गायधने

नेत्यांच्या वादात खुंटला विकास
केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध कार्यांसाठी निधी मंजूर केला जातो. कामठी नगर परिषदेचे पदाधिकारी आणि स्थानिक आमदार नेहमीच विरोधी भूमिका घेत असतात. त्यामुळे विकासकामे करताना श्रेय घेण्यावरून वाद होतो. परिणामी विकासकामे केली जात नाहीत. एखाद्या कामासाठी आवश्‍यक नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे नाही, असे धोरण राबविण्यात येत असल्याने विकास खुंटला आहे.
- डॉ. संदीप कश्‍यप

अवैध कत्तलखाना
शहरातील भाजीमंडी या मुस्लिमबहुल भागातील अवैध कत्तलखान्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. आमदारांनी हा प्रश्‍न लावून धरल्यानंतर शासनाने पर्यायी जागा शोधून कत्तलखाना हटविण्याचे निर्देश दिले. तालुका प्रशासनाने आजनी, वारेगाव, खैरी आणि गादा या गावांतील जमिनी संपादन करण्याचा प्रयत्न केला; परंतु गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विरोध केला. त्यामुळे अवैध कत्तलखाना हटलेला नाही.
- विवेक मंगतानी

उद्यानाची वाताहत
नियोजनाअभावी शहर दाटीवाटीने वसले आहे. पाहिजे तशी मोकळी जागा नसल्याने बगीचे नाहीत. सेठ केसरीमल पोरवाल यांनी त्यांचे उद्यान नगर परिषदेला भेट दिले. परंतु, योग्य देखभाल होत नसल्याने वाताहत झाली आहे.
- सुरेश अढाऊ

भुयारी गटार योजनेचे भिजत घोंगडे
केंद्र शासनाच्या योजनेतून कोट्यवधी रुपयांची भुयार योजना राबविण्यात आली; मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. या योजनेसाठी शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते ठिकठिकाणी खोदण्यात आले. त्यामुळे रस्त्यांची पूर्णत: वाट लागली. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही भुयारी गटार योजनेचे भिजत घोंगडे कायम आहे.
- शोयेब हैदरी

अस्वच्छतेचे साम्राज्य
नगरातील घाण साफ करण्यासाठी पुरेशी यंत्रणा असूनही ती प्रभावीपणे काम करीत नाही. शहरात ठिकठिकाणी घाण आणि कचऱ्याचे ढिगारे आढळतात. उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांनी "कामठी डुकरांचे शहर' म्हणून उल्लेख केला होता. यावरून गाव किती गलिच्छ आहे, हे दिसून येते.
- श्रीकांत शेंद्रे

मोक्षधामचा उद्धार केव्हा?
येथील नागरिकांना मृत्यूनंतरही यातना भोगाव्या लागतात. येथे अंत्यविधीसाठी जागा नसल्याने मोठी गैरसोय होते. पावसाळ्यात रॉकेल, टायर, पेट्रोल टाकून मृतदेहांना अग्नी दिला जातो.
- उदयसिंग यादव

---------------------
खासदार कृपाल तुमाने :
नगराध्यक्ष रिजवाना कुरैशी : 9595761861
उपाध्यक्ष रणजित सफेलकर : 9371291888
मुख्याधिकारी प्रशांत घोरुडे : 9822737118
उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर : 8600046520
उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश कंतेवार : 9422188348
तहलसीलदार डी. एस. भोयर : 9423608327
पोलिस निरीक्षक सतीश गोवेकर : 9892248769

Friday, September 19, 2014

बेपत्ता संदीपचा मृतदेह गोसेखुर्दच्या कालव्यात

बेपत्ता संदीपचा मृतदेह गोसेखुर्दच्या कालव्यात

ब्रह्मपुरी-  दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आवळगावातील संदीप नरुले या एकवीस वर्षीय युवकाचा मृतदेह गोसेखुर्दच्या कालव्यात आढळून आला. पोलिसांनी गावातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची नावे सांगण्यास पोलिस मागेपुढे पाहत आहेत.  आवळगाव येथील संदीप घनश्‍याम नरुले हा प्रातर्विधीला जातो म्हणून सायकलीने निघाला. त्यापूर्वी आवळगावच्या बसस्थानकावर त्याला अनेकांनी पाहिले. जेवणाची वेळ झाली तरी तो आला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र, त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. बुधवारी (ता.17) त्याचा मृतदेह आगर तलावाला लागून असलेल्या गोसेखुर्दचा उजव्या कालव्यात आढळून आला. त्याचे हातपाय बांधून होते. त्यामुळे त्याचा खून करून त्याला फेकण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
रिमोटच्या माध्यमातून डॉक्टर ने केली वीजचोरी

रिमोटच्या माध्यमातून डॉक्टर ने केली वीजचोरी

डास मारण्याच्या रॅकेटमध्ये रिमोट

चंद्रपूर- महावितरणच्या नागपूर परिमंडळातील एका पथकाने  छापा घातला आणि बालरोगतज्ज्ञ   डॉ. एम. जे. खान यांची रिमोट वीज चोरी उघड झाली.
डॉ. खान हे चक्क रिमोटचा वापर करून वीजचोरी करायचे. हा रिमोट त्यांनी डास मारण्याच्या रॅकेटमध्ये लपविला होता. त्यामुळे आजवर कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र, अखेर त्यांची चोरी पकडली गेली.
येथील जिल्हा परिषदेसमोर डॉ. खान यांचे रुग्णालय आहे.
इच्छूकांच्या राजकीय भेटीना वेग

इच्छूकांच्या राजकीय भेटीना वेग


चंद्रपूर - विधानसभा क्षेत्रातील सर्वच पक्षाच्या इच्छूक उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्याना भेटी देवून त्यांच्या मनाचा कानोसा घेणे चालवीले आहे. सारेच राजकीय कार्यकर्ते पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाची वाट पाहात प्रचारासाठी सज्ज असल्याचे परीसरातील चित्र आहे.

Sunday, September 14, 2014

चार तरुण बुडाले

चार तरुण बुडाले

नागपूर  - वाकी येथील ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्याचे दर्शन घेतल्यानंतर फिरण्यासाठी कन्हान नदीत गेलेल्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. हे सर्व तरुण नागपुरातील रहिवासी आहेत. मृतात गीतकुमार ठेंबरे, विनय खोब्रागडे, धीरज पिल्लेवान, ईश्‍वर वांढरे यांचा समावेश आहे. रात्रीउशिरापर्यंत त्यांचे मृतदेह हाती लागले नव्हते.

Friday, September 12, 2014

मुलीचा मृत्यू

मुलीचा मृत्यू

चंद्रपूर  तीनवर्षीय सुरक्षा सुरेश पाटील मुलीचा शुक्रवारी मृत्यू झाला.  ल वडधा या गावातील सुरक्षा पोळ्यापासून आजारी होती. तिने खासगी रुग्णालयात उपचार घेतले.

Tuesday, September 09, 2014

सावनेरमधील दोघे बुडाले

सावनेरमधील दोघे बुडाले

नागपूर : येथून जवळच असलेल्या मुरली मंदीरावजळील कोलार नदीवर सोमवारी गणेश विसर्जनाच्या घटनेच्या वेळी हरीष धर्मराज तिरपे (वय 28), चंद्रकांत केशव बारई (वय 25, रा. सावनेर) हे कोलार नदीच्या पाण्यात पडून ठार झाले. ही घटना आठ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
विकासाच्या प्रतीक्षेत मौदा

विकासाच्या प्रतीक्षेत मौदा

विकासाच्या प्रतीक्षेत मौदा

अखंड वाहणाऱ्या कन्हान नदीच्या किनाऱ्यावर वसलेले मौदा गाव. चक्रधरस्वामींचे मंदिर आणि महान त्यागी जुमदेवजी यांच्या आश्रमामुळे गावाला आध्यात्मिक वारसा लाभला आहे. चक्रधरस्वामींचे मंदिर 700 ते 750 वर्षांपूर्वीचे असून, स्वामींनी यास्थळी रात्रभर मुक्काम केल्याची आख्यायिका आहे. येथे दरवर्षी वसंत पंचमीला यात्रा भरते. बाबा जुमदेवजी यांचे परमात्मा एक सेवक आश्रम येथे असून, ते 15 वर्षांपूर्वी स्थापन झाले. भव्यदिव्य आश्रमात विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातून हजारो भाविक येतात. आता महाऔष्णिक वीजकेंद्रामुळे मौद्याला नवी ओळख प्राप्त झाली असून, ग्रामपंचायतीच्या या गावाला यंदापासून नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. त्यामुळे विकासाचा प्रश्‍न सुटेल, अशी आशा नगरवासींना आहे.

Saturday, September 06, 2014

राष्ट्रीय सणांना मुख्याध्यापकाची दांडी

राष्ट्रीय सणांना मुख्याध्यापकाची दांडी

शिक्षकदिनाच्या कार्यक्रमातही अनुपस्थिती

चंद्रपूर : 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीण सणांच्या कार्यक्रमांना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थिती राहणे अनिर्वाय असतानाही सावली तालुक्‍यातील मेहा बुज येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क दांडी मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. एक-दोन नव्हे तर गेल्या तीन वर्षात एकही उपक्रमात सहभागी होण्याची औचित्य या मुख्याध्यापकाने दाखविले नाही. त्यामुळे गावकऱ्यांत रोष व्यक्त होत आहे.
पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या मेहा बुज. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रामचंद्र निरगुडे गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहेत. ते येथे रुजू झाल्यापासून त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. शाळा आणि शिक्षकांवर त्यांचे वचक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीण सणांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, चक्क मुख्याध्यापकाचीच अनुपस्थिती राहते. प्रारंभी वैयक्तिक कारण, आजारपणामुळे ते अनुपस्थित असतील, असा समज शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांत होता. वारंवार घडणाऱ्या या प्रकारात आता नित्याचीच बाब झाली आहे. यंदा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन या दोन्ही राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमात त्यांच्या अनुपस्थितीवरून वाद निर्माण झाला होता. मुख्यालयी राहूनदेखील शाळेच्या कार्यक्रमातील त्यांची अनुपस्थिती नेहमी कशासाठी असते, याचे कारण अनेकदा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामसभेने मागितले. मात्र, उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ग्रामसभेने त्यांच्या निलंबनाच्या मागणीचा ठराव पारित केला आहे. पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, नेहमीप्रमाणेच गैरहजर राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या सूचना असतानाही मुख्याध्यापकाने व्यवस्था केली नाही. अखेर विद्यार्थी हितासाठी गावातील तरुणमंडळींनी पुढाकार घेऊन दूरचित्रवाणीची व्यवस्था करून मोंदीचे भाषण ऐकविले.

आठ महिन्यापासून शिक्षक गायब
जानेवारीमध्ये नव्याने रुजू झालेले मेश्राम नामक शिक्षक केवळ आठवडाभर आले आणि त्यानंतर ते शाळेत कधीच दिसले नाही. एकदिवस अतिमद्यप्राशन करून आलेल्या या शिक्षकाने शाळेत चांगलाच धूमाकूळ घातला होता. चक्क मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसून, माझे कुणी वाकडे करू शकत नाही, असा आव आणून इतर शिक्षकांना तंबी देत होता. या शिक्षकाची बदली झाली की, त्याच्या अनुपस्थितीला अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मेहा येथील शाळेत सातवीपर्यंत वर्ग असून, एकूण जवळपास 125 विद्यार्थी पटसंख्येवर आहेत. त्यांना शिकविण्यासाठी एकुण सहा शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, मुख्याध्यापक निरगुडे आणि मेश्राम या शिक्षकाच्या नियमित गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Friday, September 05, 2014

१५ शिक्षकांना मिळणार आदर्श शिक्षक पुरस्कार

१५ शिक्षकांना मिळणार आदर्श शिक्षक पुरस्कार

शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यंदा १५ शिक्षकांना जाहीर झाला . यावेळी बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या जि. प. शाळा विद्युतकेंद्राच्या प्रा. शिक्षिका सरोज चांदेकर, ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत गणेशपूर शाळेचे भाऊराव कावळे, गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत वक विठ्ठलवाड्याचे र्शावण गुंडेट्टीवार, जिवती उच्च प्रा. शाळेचे कनिराम पवार, पोंभूर्णा तालुक्यातील थेरगाव जिल्हा परिषद शाळेचे हरीश ससनकर, मूल तालुक्यातील मरेगाव शाळेचे कविता बोबडे, चंद्रपूर तालुक्यातील वढोली शाळेचे शुद्धोधन मेर्शाम, वरोरा तालुक्यातील पांझुर्णी शाळेतील पंडित रामाजी लोंढे, चिमूर तालुक्यातील अडेगाव देशचे दादाजी पिसे, सावली तालुक्यातील सावंगी दिक्षितचे टिकाराम आत्माराम शेंडे, राजुरा तालुक्यातील धानोरा प्रा. शाळेचे वामन साळवे, सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव तुकूमचे जिमनादास दादाजी मसरा, नागभीड तालुक्यातील डोंगरगावचे निता ओंकार निनावे, जिल्हा परिषद कन्या विद्यालय चिमूरचे बंडू लिलाधार चरपे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

बल्लारपूर (जि.चंद्रपूर) : तालुक्‍यातील विसापूर येथील तीन विद्यार्थ्यांचा शेतातील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (ता. चार) सायंकाळी पाचच्या सुमाराला उघडकीस आली. मृत विद्यार्थी बल्लारपूर येथील आयडियल कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आहेत. नीरज विजय वैद्य, क्षितिज अशोक डोंगरे आणि क्रिष्णा अशोक धामणे, अशी मृतांची नावे आहेत. विसापूर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयासमोरील शेतातील खड्ड्यात पाणी साचले आहे. या खड्ड्यात हे तिघेही पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाणी जास्त असल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Wednesday, September 03, 2014

लाच घेताना अभियंत्याला अटक

लाच घेताना अभियंत्याला अटक

वरोरा - कृषिपंपाला वीज मीटर देण्यासाठी शेतकऱ्याकडून बाराशे रुपयांची लाच मागणारा खांबाडा वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता रामेश्‍वर चव्हाण आणि वीजसेवक मकसूद शेख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.
वानराच्या शिकारीसाठी पाठलाग ,  बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू

वानराच्या शिकारीसाठी पाठलाग , बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू

नागपूर - पारशिवणी तालुक्‍यातील शिंगोरी येथे वानराच्या शिकारीसाठी पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला. वनाधिकाऱ्यांनी मजुरांच्या मदतीने बिबट आणि वानरास बाहेर काढले.
शिंगोरा येथे प्रकाश सिताराम आसोले यांचे शेत आहे. ते आज शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतातील विहिरीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा आत बिबट आणि वानर पडलेले आढळून आले. पोलिस पाटील मधुकर रांगणकर यांनी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. पारशिवणीच्या वनपरिक्षेत्राधिकारी एस.आर. जयस्वाल, वनरक्षक के. ए. कोठेकर हे पथकासह दाखल झाले. त्यांनी मजुरांच्या मदतीने दोन्ही प्राण्यांना बाहेर काढण्यात आले. गेल्या दोन दिवसांपूर्वी खापा परिसरातदेखील एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.
अग्निशमन यंत्र स्फोट, जवान  ठार

अग्निशमन यंत्र स्फोट, जवान ठार

नागपूर - कामठी येथील सैन्य छावणी परिसरातील अग्निशमन यंत्र दुसरीकडे हलवीत असताना खाली पडल्याने स्फोट झाला. यात पोलिस जवान यादराम श्रीराम (वय 35) जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी (ता. तीन) घडली. राजस्थानमधील दुधवा येथील रहिवासी श्रीराम छावणीत हवालदार पदावर होते. मिल्ट्री हॉस्पिटल परिसरातील अग्निशमन यंत्र ते हलवीत असताना ही घटना घडली.

Tuesday, September 02, 2014

जिल्हा परिषदेत 21 सप्टेंबरला निवडणूक

जिल्हा परिषदेत 21 सप्टेंबरला निवडणूक

चंद्रपूर,    जिल्हा परिषदेत येत्या 21 सप्टेंबरला अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. ओबीसी महिलेसाठी अध्यक्षपद राखीव असल्याने आतापासून हालचालींना वेग आला आहे.  57 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी, मनसे, युवाशक्ती, शेतकरी संघटना, अशी युती आहे. कॉंग्रेस 21, भाजप 18, राष्ट्रवादी 7, युवाशक्ती संघटना 5, शिवसेना 2, शेतकरी संघटना 2, बसप 1, असे पक्षीय बलाबल जिल्हा परिषदेत आहे.