काव्यशिल्प Digital Media: महाकाली

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label महाकाली. Show all posts
Showing posts with label महाकाली. Show all posts

Thursday, July 26, 2018

महाकाली मंदिराला मिळाला ५० लाखांचा निधी

महाकाली मंदिराला मिळाला ५० लाखांचा निधी

हंसराज अहिर यांनी मानले केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्र्यांचे आभार 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर महानगरातील आराध्य देवता माता महाकाली देवस्थान प्रांगण परिसरात भाविकांच्या सुविधेकरिता फ्लोरिंगसाठी (फरशीकरण) निधीची उपलब्धता करावी तसेच या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महानगरातील पुरातन वास्तू, परकोटाच्या जतन व संरक्षणासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केंद्रीय सांस्कृतीक राज्यमंत्राी डाॅ. महेश शर्मा यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना दि. 12 जून 2018 रोजी पत्र दिले होते. या पत्रास अनुसरून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने महाकाली मंदिराच्या प्रांगणात 50 लक्ष रूपयांच्या फरशीकरणाच्या प्रस्तावास मान्यता प्रदान केली असुन सदर कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती सांस्कृतिक राज्यमंत्र्यांनी  ना. अहीर यांना पत्राद्वारे कळविले आहे. 
केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी महाकाली मंदिराच्या फरशीकरणाकरिता 50 लक्ष रूपयांचा निधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे उपलब्ध केल्याबद्दल या जिल्ह्यातील  नागरिक, भक्तगण यांच्या वतीने सांस्कृतिक मंत्राी डाॅ. महेश शर्मा यांचे आभार मानले आहे. तसेच या गोंडकालीन वारस्याच्या जतन व संवर्धनासाठी आणखी भरीव निधी उपलब्ध करण्याची अपेक्षासुध्दा त्यांनी व्यक्त केली आहे.