काव्यशिल्प Digital Media: प्रदूषण

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label प्रदूषण. Show all posts
Showing posts with label प्रदूषण. Show all posts

Monday, November 13, 2017

प्रदूषणात चंद्रपूर राज्यात टॉप

प्रदूषणात चंद्रपूर राज्यात टॉप

चंद्रपूर प्रतिनिधी:
दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली असताना रविवारी चंद्रपूरचा मागील २४ तासांतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स) ३२७ सरासरी होता. त्यामुळे राज्यात चंद्रपूर पुन्हा एकदा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्यातील नागपूर व नाशिक येथेही वायू गुणवत्ता निर्देशांक सर्वात घातक दिसून आला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटनुसार दिल्लीचा मागील २४ तासांतील वायू गुणवत्ता निर्देशांक सरासरी ४६० होता. तर चंद्रपूरचा ३२७ इतका होता. रविवारी रात्री ९ वाजता चंद्रपूर शहरातील केंद्राचा वायू गुणवत्ता निर्देशांक १८२ होता. पण, एमआयडीसी खुटाळा परिसरातील दुसऱ्या केंद्राचा एक्यूआय ५००वर गेल्याचे दिसून आले. गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वाधिक प्रदू्षित शहरांच्या यादीत असणाऱ्या चंद्रपूरचे प्रदूषण कमी झाल्याने चंद्रपूर, बल्लारपूर, ताडाली व घुग्घुस या भागातील मॉनिटोरियम रद्द करण्यात आले आहे.