काव्यशिल्प Digital Media: गाडी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label गाडी. Show all posts
Showing posts with label गाडी. Show all posts

Tuesday, April 03, 2018

गाडी चोरून लावली आग;माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप

गाडी चोरून लावली आग;माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप


चंद्रपूर/रोषण दुर्योधन:

चंद्रपूर येथील माजी नगरसेविका सुषमा शरद नागोसे यांच्या उत्कर्ष नागासे या २६ वर्षीय मुलाने बाबूपेठ येथील रहिवासी असलेल्या दीपक लक्ष्मण टवलाकर यांच्या मालकीची घरासमोर ठेवलेले वाहन चोरून जुनोना येथील जंगलात जाळून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे .या प्रकाराबाबत विचारणा करनारया वाहन मालकास देखील मारहाण  केली आणि नंतर वाहन पेटवून दिले.ही घटना सोमवारी (ता. २) रात्री ११ वाजताच्या सुमारास जुनोना मार्गावर घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी उत्कर्ष नागासे याला अटक करून त्यावर  गुन्हा दाखल केला आहे. 
 सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उत्कर्षने मित्राच्या मदतीने बाबूपेठ परिसरातील दीपक लक्ष्मण टवलाकर (वय ४८) यांच्या मालकीची घरासमोर ठेवलेली एम.एच ३४ एङ्क २५२५ क्रमांकाचे चारचाकी वाहन चोरले.वाहन चोरीला गेल्याचे लक्षात येताच वाहन मालक दीपक टवलाकर यांनी परिसरात शोध घेतला मात्र वाहन कुठे आठळून आले नाही.शोधाशोध सुरु असतांना जुनोना मार्गावर आरोपी उत्कर्ष आणि त्याचा मित्र चोरीच्या वाहनात बसलेले आढळून आले. गाडी मालक टवलाकर यांनी जुनोना रोड  गाठून गाडी चोरल्याबाबत विचारणा केली. या प्रकाराने संतापलेल्या उत्कृर्ष आणि त्याच्या मित्राने दीपक टवलाकर याला मारहाण केली.व गाडीच्या  काचा फोडून वाहनाला आग लावली व संपूर्ण गाडी आगीच्या स्वाधीन केली.
या आगीत वाहनाचे पूर्णपने नुकसान झाले असून  या प्रकाराची तक्रार दीपक टवलाकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मानकर यांनी सहकारी कर्मचार्यांसह  घटनास्थळ गाठले. व उत्कर्ष नागोसे याला अटक केली. घटनास्थळी आगीत खाख झालेल्या गाडीचा शर्पोलीसांना पंचनामा केला, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गौंड करीत आहे.