काव्यशिल्प Digital Media: नागपूर शाळा

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label नागपूर शाळा. Show all posts
Showing posts with label नागपूर शाळा. Show all posts

Friday, July 06, 2018

नागपुर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

नागपुर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

nagpur collector साठी इमेज परिणामनागपूर/प्रतिनिधी:
नागपूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी बरसलेला पाऊस व पावसाचा वाढलेला जोर बघता पुढील ४८ तासांत संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने खबरदारी म्हणून उद्या शनिवारी 7जुलै ला जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.नागपूर शहरात मागील सहा तासात 263.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या मुसळधार पावसामुळे खोलगट भागात राहणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
हवामान खात्याने पुढील चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे खालच्या भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देतानांच अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जवळ असलेल्या शाळांमध्ये तात्पुरती व्यवस्था करा. तसेच अतिवृष्टीची परिस्थिती हाताळण्यासाठी एमडीआरएफच्या चमूलाही व्यवस्थेसाठी तैनात करण्याची तयारी ठेवा. अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या रस्त्यांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा चोवीस तास सज्ज ठेवा. कोणत्याही प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी संपूर्ण चमू सज्ज राहील अशी दक्षता घ्या. असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलेत.
अतिवृष्टीमुळे शाळांना तसेच महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याच्या सूचना देताना ‍जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी सतत होणाऱ्या पावसात अत्यावश्यक कारणांशिवाय घराच्या बाहेर पडू नये. शहरातील विविध वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहने पाणी साचलेल्या भागातून चालवू नये. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनतेने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.