काव्यशिल्प Digital Media: मनोरंजन

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मनोरंजन. Show all posts
Showing posts with label मनोरंजन. Show all posts

Tuesday, October 23, 2018

फँड्री’आणि‘सैराट’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार "नाळ"

फँड्री’आणि‘सैराट’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार "नाळ"


एका छोट्या मुलाचं भावनिक विश्व उलगडणारा सिनेमा "नाळ"
खबरबात /वेब टीम:
फँड्री’ आणि ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘नाळ’ असे या सिनेमाचे नाव असून त्याची निर्मिती स्वतः नागराज मंजुळे करत आहेत. या सिनेमाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला.‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.आई मला खेळायला जायचं .जाऊ दे न व ...या ३ मिनिट ४४ सेकंदाच्या टीजरने सिनेमाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे..या निव्वळ चार दिवसात या विडीओला जवळपास १४ लाख लोकांनी बघितले असून प्रत्येकाच्या मोबाईलचा हा विडीओ स्टेटस बनत चालला आहे.