अक्षांश-रेखांशच्या मदतीने देण्यात येणार वीजजोडणी
३१ मार्च २०१८ अखेर कृषीपंपासाठी प्रलंबित असलेल्या कृषीपंप ग्राहकांना नजिकच्या उच्चदाब वीज यंत्रणेतून वीजजोडणी देण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केले आहे. यासाठी कृषीपंप ग्राहकांच्या स्थळाचे अशांश-रेखांश याची आवश्यकता आहे व ते मिळविण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. ही माहिती लवकर मिळण्यासाठी ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपला मोबाईल नंबर नोंदविला आहे अशा ग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे मोबाईलवर संपर्क साधला जात आहे.
महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहकसेवा केंद्रांद्वारे पाठविलेल्या एसएमएस व सूचनेनुसार शेतकऱ्यांनी https://goo.gl/GtMGVD यावर क्लिक करून फोटोद्वारे कृषीसंचाच्या मांडणीची अक्षांश व रेखांशची माहिती पाठवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. आतापर्यन्त राज्यातील ८६२ कृषीपंपग्राहकांनी कृषीसंचाच्या मांडणीच्या फोटोची माहिती यशस्वीरित्या दिलेली आहे.