काव्यशिल्प Digital Media: बल्लारशाह

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बल्लारशाह. Show all posts
Showing posts with label बल्लारशाह. Show all posts

Friday, October 19, 2018

 चंद्रपुरात धारधार शस्त्राने युवकाची हत्या

चंद्रपुरात धारधार शस्त्राने युवकाची हत्या

बल्लारपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे युवकाची धारधार शस्त्राने हत्या 
शिवीगाळ केल्याने करण्यात आली हत्या 
खून साठी इमेज परिणामबल्लारपूर शांती नगर येथील गणेश बंडु दाडंगे (17) हा गेल्या २ ते ३ दिवसापासून नगर परिषद समोर असणाऱ्या भंगार व्यवसाईक आरिफ मो. शरिफ शेख (30) याला शिवीगाळ करत असल्याने मनात राग धरून दसर्याच्या दिवशी संध्याकाळी पेपर मिल मागे बल्लारपूर-विसापूर मार्गावर चाकूने गळा कापून हत्या केली.या  हत्येनंतर आरोपीनेच बल्लारपूर पोलिसांना घटनेची माहिती देत स्वताला पोलिसांच्या स्वाधीन केले.लगेच आरोपीच्या सांगण्यावरून त्याला अटक करण्यात आली.घटनेनंतर अप्पर पुलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांनी घटनास्थळी भेट दिली.या संपूर्ण खून प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस स्टेशन असलेले शहर म्हणून बल्लारपूर पोलीस स्टेशनचे राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.या नंतर एका आठवड्यातच येथे खुनाची घटना घडली.

Friday, February 16, 2018

दुचाकीला धडक देत अंड्याचा ट्रक पलटला नाल्यात

दुचाकीला धडक देत अंड्याचा ट्रक पलटला नाल्यात


चंद्रपूर/प्रतिनिधी:
शोरूम मधून नवी कोरी गाडी घेऊन जात असलेल्या एका दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली,त्यात भरधाव ट्रक हा जवळच असेलल्या भिवकुंड नाल्यात पलटला.हि घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता दरम्यान चंद्रपूर कडून बल्लारशाह मार्गावरील निर्मल धाब्याजावळील भिवकुंड नाल्यासमोर घडली.
शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कांदा व अंडे घेऊन जात असलेल्या AP.15 - TC.0288 क्रमांकाचा भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.  चंद्रपूर येथील शोरूम मधून दुचाकीस्वार राजेश वनकर  व उदय कुंभारे रा.चंद्रपूर हे  राजुरा येथे घेऊन जात असतांना  बाल्लारशाह मार्गावरील भिव्कून नाल्यावर हा अपघात घडला.  
 या अपघातात दुचाकीस्वार राजेश वनकर  व उदय कुंभारे रा.चंद्रपूर हे दोघेही गंभीर जखमी झाले  असून ट्रक चाल मुरली व  त्याचा सोबती हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना बल्लारशाह येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.या अपघातानंतर महामर्गावर चांगलीच गर्दी बघायला मिळाली.तर ट्रकमध्ये अंडे व कांदे असल्याने संपूर्ण अंडे फुटून कांदे सर्वत्र पसरल्या गेले