काव्यशिल्प Digital Media: प्लास्टिक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label प्लास्टिक. Show all posts
Showing posts with label प्लास्टिक. Show all posts

Wednesday, June 27, 2018

प्लास्टिक बंदी उठणार?

प्लास्टिक बंदी उठणार?

प्लास्टिक बंदीवरून यू टर्न, आता छोट्या दुकानदारांना पिशव्या वापरण्याची परवानगीमुंबई/प्रतिनिधी:
प्लास्टिक बंदीवरून अवघ्या पाच दिवसांमध्ये पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यू टर्न घेतला आहे. दुकानदारांची नाराजी ओढवल्यानं गुरूवारपासून छोट्या दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे संकेत कदम यांनी दिले आहे.
या निर्णयामुळे प्लास्टिक बंदीचा फज्जा उडणार हे आता स्पष्ट झालं आहे. अपुरी तयारी आणि अकार्यक्षमता यामुळं एका चांगल्या निर्णयाचा बोजवारा उडणार हे आता स्पष्ट झालंय.प्लास्टिक बंदी करताना त्याला पर्याय काय असेल याची सरकारनं पुरेशी तयारी केली नाही.
छोटे दुकानदार, किरकोळ भाजी विक्रेते,दुध विक्रेते, हॉटेल चालक यांनी पर्याय देण्याची मागणी सरकारकडे केली होती. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्याने या दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळं सरकारच्या निर्णयावर चौफेर टीका झाली होती.नाराजी वाढत असल्याने आणि त्याचं राजकारण होत असल्याने रामदास कदम यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

Thursday, April 05, 2018

प्लास्टिक बंदीनंतरही ५० किलो प्लास्टिक जप्त

प्लास्टिक बंदीनंतरही ५० किलो प्लास्टिक जप्त

चंद्रपूर/रोषण दुर्योधन: 
 राज्यात प्लास्टिक, थर्माकोलवर बंदी असतांना देखील चंद्रपूर शहरातील अनेक दुकानात प्लास्तीलचा वापर सर्हासपने केल्या जात असल्याचे आढळून आल्यावर गुरुवारी मनपा प्रशासनाने गुरुवारी शहरातील गोलबाजारातील दुकानदार, नागरिकांकडून सुमारे ५० किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केला महापालिकेची ही मोहीम कायम सुरू राहणार असून प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक तीव्र होत जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त संजय काकडे यांनी दिला. 
 राज्य सरकारनेच १ महिना सवलत दिली असून त्यानंतर म्हणजे २३ एप्रिलनंतर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. विकणारे व वापरणारे अशा दोघांनाही यात दोषी धरण्यात येणार आहे.  बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी स्वतंत्र पथकच स्थापन केले आहे. शहराच्या सर्व भागातून सध्या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे.
किरकोळ विक्रेत्यांकडूनही प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करण्यात येत आहेत. सरकारने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आदेशात अद्याप काही गोष्टींबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे काही माल कंपनीमधूनच प्लॅस्टिक पिशवीत बंद होऊन येतो त्याचे काय करायचे याबद्धल अद्याप स्पष्ट आदेश नाहीत, कदाचित तो माल थेट कंपनीमधूनच २३ तारखेनंतर बंद होईल असे दिसते आहे. कंपनीवरच सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता आहे असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. 
शहरातील कापड दुकानदार, मॉल्स यांच्याकडून ग्राहकांना सर्रासपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून माल दिला जातो. त्यासाठी पैसेही घेतले जातात. त्यांच्यावरही बंदी आहे, मात्र सध्या त्यांना व सर्वांनाच २३ एप्रिलपर्यंत त्यांच्याकडे असलेला साठा नष्ट करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र राज्यात सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर पुर्णपणे बंद करावाच लागेल, 
प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू वापरावर बंदी घालण्यात आली असून, दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील दुकानदारांना प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू वापरू नये असे आवाहन केले आहे. मात्र आजही अनेक दुकानांत प्लास्टिक, थर्माकोलचा वापर सुरू आहे. त्यामुळे आज स्वच्छता विभागाने गोल बाजारातील दुकानांची तपासणी केली. सुमारे ५० किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केला.अधिकच्या माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केले असता संपर्क होऊ शकला नाही. 

Wednesday, February 14, 2018

 पर्यावरण संवर्धन समीतीचा प्लास्टिक मुक्तीचा निर्धार

पर्यावरण संवर्धन समीतीचा प्लास्टिक मुक्तीचा निर्धार

चिमुर/प्रतिनिधी:
 कोणत्याही सामाजिक ऊपक्रमाची सुरुवात स्वत: पासुन करायची या भावनेने प्रेरित होउन पर्यावरण संवर्धन समीती भिसी तर्फे भिसी प्लास्टिक मुक्तीची सुरुवात प्राथमिक आरोग्य केंद्र भीसी पासुन करण्यातआली. 
                      प्लास्टिक हा पर्यावरणाला धोका पोहचविणारा घटक आहे . प्लास्टिकमुळे पर्यावरण प्रदूषण  दिवसेदीवस वाढत आहे .त्यातच भीसी येथील प्राथमीक आरोग्य केंद्र प्लास्टिकच्या साम्राज्यात फसले होते. प्लास्टिक कूजत नसल्यामुळे प्लास्टिकचे प्रमाण वाढतच आहे. भीसी येथिल आरोग्य केंद्रामध्ये सलाईन, ईन्जेक्शन , विघटन न होणारे पदार्थ  असल्यामुळे  सर्व परिसर प्लास्टिकमय झाला होता.
 पर्यावरण संवर्धन समीती भीसी कडुन प्राथमीक आरोग्य केद्र प्लास्टिक मुक्त करण्यात आले  यावेळी  पर्यावरण संवर्धन समीतीचे अध्यक्ष कवडू लोहकरे,  प्रा. गजानन माडवे ,पंकज वर्मा, सुरेशजी बैनलवार, श्रीकांत ठोबरे ऊमाकांत कामडी,  कुणाल खवसे, कैलास रामटेके , सचीन खडके ,प्रविन लोहकरे , मोहन केडझरकर, आशिष पडोडे , अक्षय खवसे, रमेश हीवरे , आबीद शेख, चंद्रशेखर रेवतकर, आदि सदस्य उपस्थित होते . तथा आरोग्य केद्रा तील कर्मचारी वृंद उपस्थित  राहून प्लास्टिक मुक्तीसाठी सहकार्य केले . पर्यावरण समीतीच्या सामाजिक उपक्रमाचे जीकडे - तीकडे कौतुक होत आहे. 

Monday, January 22, 2018

प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवी लघुउद्योग प्रेरणादायी:प्रविण टाके

प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवी लघुउद्योग प्रेरणादायी:प्रविण टाके

संयुक्त महिला मंचचा पुढाकार
चंद्र्पुर/प्रतिनिधी:
पर्यावरण बचाव मोहिमेला हातभार लावण्यासाठी संयुक्त महिला मंच प्लास्टिक मुक्त भारत ही चळवळ राबविण्यासाठी कापडी पिशव्या बनवून जनजागृती करीत आहे.यातून आर्थिक विकास साधण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून महिलांसाठी हा लघुउद्योग प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जपणारा आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांनी केले. स्थानिक इंदिरानगर येथील संयुक्त महिला मंच आयोजित कापडी पिशवी लघुउद्योग प्रकल्प उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजिका आरती प्रविण टाके यांची विशेष उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत इंदुमती पाटील यांनी केले.संस्थेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संयुक्त महिला मंचाने कापडी पिशवी लघुउद्योग सुरु करुन जनजागृती सोबतच महिला वर्गाला यातून रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मत उद्योजिका आरती प्रविण टाके यांनी व्यक्त केले. 

प्रास्तविक व संचालन डॉ प्रतिभा वाघमारे तर आभार वर्षा कोडापे यांनी माणले. कार्यक्रमाला शीला देवगडे, गजानन राऊत यांनी सहकार्य केले. प्रा.विमल गाडेकर यांच्या मार्गदर्शनात निमंत्रित महिलांना संस्थेतर्फे कापडी पिशवी भेट देण्यात आली.