काव्यशिल्प Digital Media: हेल्मेट

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label हेल्मेट. Show all posts
Showing posts with label हेल्मेट. Show all posts

Friday, July 20, 2018

चंद्रपुच्या रस्त्यांवर १०० रुपयांत मिळतो मृत्यू

चंद्रपुच्या रस्त्यांवर १०० रुपयांत मिळतो मृत्यू

नागपूर/ललित लांजेवार:
आठवड्याभरापूर्वी चंद्रपूर शहरातील वाहतूक विभाग शाखा तसेच बंगाली कॅम्प परिसरात २ अपघात झाले. या दोन्ही अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. घडलेल्या घटनेनंतर काव्यशिल्प डिजिटल मीडियाने बंगाली कॅम्प येथील घटनेची माहिती देत "हेल्मेट असता तर वाचला असता जीव" या मथड्याखाली वृत्त प्रकशित केले होते.या वृत्ताची दखल खुद्द चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी घेतली.आणि  चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक दुचाकी स्वारांसाठी हेल्मेट सक्तीचा आदेश काढला. आदेश निघताच जिल्हाभरात हेल्मेट सक्ती झाली.
पोलीस विभाग नियमाचे उलंघन करत असणार्यांवर कारवाई करू लागले. जागोजागी गल्लोगल्ली फुटपाथवर हेल्मेटची दुकाने थाटली गेली.अश्यातच टुकार हेल्मेट चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले.
शहरातील रस्त्यांवर जागोजागी हेल्मेटची दुकाने लागली, याचाच कानोसा काव्यशिल्पने घेतले असता चक्क १०० रुपयांत मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या बोगस म्हणजे प्रमाणित नसलेल्या हेल्मेटची विक्री सध्या चंद्रपुरात सुरु असल्याचे निदर्शनात आले.चंद्रपुरात आयएसआय मार्क नसलेली हेल्मेट सर्रासपणे विकली जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होत आहे. शहरात हेल्मेट सक्ती लागू झाल्यानंतर वाहनचालकांची हेल्मेटच्या दुकानावर गर्दी वाढली. यामुळे हेल्मेटचा काळाबाजार वाढला असून बनावट आयएसआय क्रमांकासोबत बाजारभावापेक्षा अधिक पैसे घेऊन हेल्मेटची धडाक्यात विक्री सुरू आहे.

शहरातील अनेक वाहनचालकांच्या डोक्‍यात केवळ १०० ते १५० रुपये किमतीचे हेल्मेट दिसू लागले आहे. फक्‍त पोलिसांनी दंडात्मक कारवाई करू नये, म्हणून ते हेल्मेट घातल्या जात आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी दुचाकीचालक रस्त्यावरून हेल्मेट विकत घेतात. हे सर्व शंभर -दीडशे रुपयाचे हेल्मेट "आयएसआय' होलोग्राम मार्क नसलेले हेल्मेट आहे. यात प्लॅस्टिकपासून बनविलेले हलक्‍या दर्जाचे हेल्मेट रस्त्यावर विक्रीस उपलब्ध असतात. १००  रुपयांपासून १५००  हजार रुपयांपर्यंत हेल्मेट रस्त्यावर विकले जात असून हेल्मेट विक्रेते कोणतेही बिल किंवा वॉरंटी कार्डही खरेदी कर्त्यांना देत नाही आहेत.
सोबतच निकृष्ट दर्जाचे प्लॅस्टिक वापरल्याने हेल्मेट तुटण्याचे प्रमाणही जास्त आहे. हातातून खाली पडल्यानंतही हेल्मेटला तडे जाऊ शकतात, अशी स्थिती रस्त्यावरील हेल्मेटची असते.
अपघात झाल्यास हे स्वस्तातील हेल्मेटस् वाहन चालकाचे संरक्षण करू शकत नाहीत. मोटर वाहन कायद्यातील कलम १२९ मध्ये हेल्मेटबाबत स्पष्ट तरतूद आहे. त्यानुसार, दुचाकी चालविणाऱ्याने व दुचाकीवर प्रवास करणाऱ्याने आयएसआय प्रमाणित हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. परंतु, या तरतुदीचे काटेकोर पालन होत नसतांना चंद्रपुरात दिसत आहे.
संग्रहित
चंद्रपुरात वाहतूक पोलीस केवळ वाहन चालकाने हेल्मेट घातले आहे की नाही एवढीच शहानिशा करतात. ते हेल्मेट कायद्यानुसार आहे काय? हे पाहिले जात नाही. आयएसआय प्रमाणित नसलेले हेल्मेट स्वस्त दरात मिळतात. त्यामुळे बहुतांश नागरिक निकृष्ट दर्जाचे हेल्मेटस् घालून वाहन चालवित आहेत. परिणामी, कायद्यातील तरतुदीचा उद्देश अयशस्वी ठरत आहे.
हेल्मेट घेताना वाहनचालक केवळ वाहतूक पोलिसांची भीती मनात बाळगतो. त्यामुळे पोलिसांनी पावती फाडण्यासाठी थांबवू नये म्हणून रस्त्यावरील हलक्‍या दर्जाचे हेल्मेट घालण्यास वाहनचालक पसंती देतात. आतापर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे आयएसआय मार्कच्या बनावट हेल्मेटच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढत आहे. हेल्मेटची गुणवत्ता आणि किंमत यासाठी जबाबदार विभाग सुस्त असून, त्यामुळे रस्त्यावर हेल्मेट विक्रेत्यांची चांदी होत आहे.मात्र हेच निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वाहन चालकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. वाहन चालकांच्या जिवाशी खेळणारा धंदा सुरू असूनही पोलिस आणि जिल्हा प्रशासन फक्त बघ्याची भूमिका बजावत असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
दिल्ली-मुंबईतून येत आहेत निकृष्ट हेल्मेट
non isi mark helmet साठी इमेज परिणामदेशात हेल्मेट तयार करणाऱ्या नऊ प्रमुख कंपन्या आहेत. रस्तां‌वर किंवा काही दुकानांमध्ये विकण्यात येत असलेल्या हेल्मेटवरील आयएसआय मार्कही बनावट आहे. चांगल्या दर्जाच्या हेल्मेटची किंमत ७०० ते ८०० रुपयांपासून सुरू होते. निकृष्ट दर्जाच्या हेल्मेट निर्मितीची किमत केवळ १५० ते २०० रुपये असून, रस्त्यावरील हेल्मेट २५० ते ४५० रुपयांत मिळते. दिल्लीहून मुंबईमार्गे हे हेल्मेट नागपुरात आणले जातात व नागपूरवरून हे विक्रेते हेल्मेट चंद्रपुरात विक्रीसाठी आणत आहेत .