काव्यशिल्प Digital Media: मूल

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मूल. Show all posts
Showing posts with label मूल. Show all posts

Thursday, November 23, 2017

कर्जापायी शेतक-याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

कर्जापायी शेतक-याची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

मूल: तालुक्यातील गांगलवाडी येथिल शेतकरी परशुराम सकाराम बोलमवार वय 42 या शेतक—याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 
  मृतक शेतकरी परशुराम बोलमवार याला तीन मुली, पत्नी व आई असा परीवार असुन अनु्क्रमे मोठी मुलगी 5 व्या वर्गात, 2 —या वर्गात व पहिल्या वर्गात आहे. त्याला दीड एकर शेती असून शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते.या मृतक  शेतक—याने 2008—9या वर्षात कर्ज घेतले होते अशी माहिती आहे. यावर्षी पाणी पाऊस नसून धानाला मावा,तुळतुळा,खोड किडी या रोगाने ग्रासले असून शेतक—याचे पिकही झाले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आला असतांनाच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी केली असल्याने शेतक—याला ना​हक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेची माहिती मिळताच मूल पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य संजय पाटील मारकवार व मूल नगर परीषदेचे नगरसेवक विनोद कामडे यांनी लगेच घटनास्थळी भेट घेतली व घटनेचा रोष व्यक्त करत शेतक—याच्या कुटंबाला सरकारने भरीव मदत करावी असे मत व्यक्त केले.  मूल तालुका अर्थमंत्री व जिल्हृयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असून त्यांचे क्षेत्रात या शेतक—याची आत्महत्या होत असल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे.

Tuesday, November 14, 2017

श्रमिक एल्गारची शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडक

श्रमिक एल्गारची शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वनपरीक्षेत्र कार्यालयावर धडक

मूल/प्रतिनिधी:
 मुल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या  मागण्या घेवुन श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अँड. पाराेमिता गाेस्वामी यांचे नेतृत्वात मुल येथील वनपरीक्षेत्र कार्यालयवर माेर्चा काढण्यात आला. अँड पाराेमिता गाेस्वामी यांनी शेतकऱ्यांच्या गंभिर समस्यावर प्रकाश टाकत शेतकरी शेतात रात्राे बे रात्राे डुक्करांसाठी शेतात जागली जातात त्याचीमाेर्चा राेजी सरकारने राेजगार हमी मधुन द्यावी. तसेच शेतकरी डुक्कर मारला तर त्याचेवर फाँरेस्ट ने गुन्हा दाखल करु नये स्वरक्षण करण्याचा अधिकार प्रत्येक नागरीकाला आहे हेही माेर्चातुन आपल्या भाषनात ठनकावुन सांगीतले. यावेळी शेतकरी तथा श्रमिक एल्गारचे माजी तालुका अध्यक्ष अरुन जराते, श्रमिक एल्गारचे मुल तालुका अध्यक्ष रवि शेरकी यांनी शेतीची बिकट परीस्थीती कथन केली. तर घनश्याम मेश्राम महासचिव श्रमिक एल्गार, विजय सिद्धावार उपाध्यक्ष श्रमिक एल्गार यांची भाषने झाली . एल्गार आँफीस ते वनपरीक्षेत्र कार्यालय असा माेर्चा काढण्यात आला. माेर्चात मुल तालुक्यातील टेकाडी,डाेंगरगाव, पडझरी, चितेगाव, येजगाव, चिखली, पिपरीदिक्षित, चकबेंबाळ, येरगाव , जानाळा, चिराेली येथिल शेकडाे शेतकरी बांधव माेर्चात सहभागी झाले हाेते. १ ) वन्य प्राण्यापासुन हाेत असलेल्या शेतीची नुकसान भरपाई देण्यात यावी २) रानटी डुक्कराचा बंदाेबस्त करण्यात यावा. ३) शेतकऱ्यांना माेफत साेलर कुंपन देण्यात यावा. ४) ग्रामपंचायत स्तरावर सरपनासाठी जळाऊ लाकडाची व्यवस्था करण्यात यावी. या प्रमुख मागण्या माेर्चातुन  शासनाकडे करण्यात आल्या. मोर्चा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुका सचिव दिनेश घाटे, संगीता गेडाम, विशाल नर्मलवार, रश्मा गेडाम, रानी भाेयर, यांनी परीश्रम घेतले.  उपस्तितांचे आभार मानुन माेर्चा राष्ट गिताने समाप्त करण्यात आला.

Tuesday, November 07, 2017

राज्य महिला आयोग मूल पोलिसांना जाब विचारणार

राज्य महिला आयोग मूल पोलिसांना जाब विचारणार

मूल/ प्रतिनिधी -गिरीश महाजन यांनी शहादा येथे महिला विरोधी भाष्य केले आणि दारू ला महिलांची नावे दया असे विधान केल्यानंतर श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अड.पारोमिता गोस्वामी यांनी मूल पोलिसात महाजन विरुद्ध तक्रार दाखल केली होती.  दाखल केलेल्या  तक्रारींवर मूल पोलिसांनी कोणतीही कारवाही न केल्याची गंभिर दखल राज्य महिला आयोगच्या अध्यक्षा विजया रहाटकर याबाबत  मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहेत शिवाय मूल पोलिसांना विचारणा करणार आहेत.काल एका दुरचित्रवाहिनी वरील चर्चेत संस्थेच्या अध्यक्षा अड. पारोमिता गोस्वामी यांनी महिलांचा एवढा धडधडीत अपमान झाल्याची तक्रार मूल पोलिसांना दिल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल केला नाही किंवा  अदखलपात्राची नोंद घेतली नाही. ही बाब पुढे आणताच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत मुखमंत्राशी यावर बोलू व मूल पोलीसांना जाब विचारू असे जाहिर केले.यासोबतच ज्या दारूचे नाव महिलांच्या नावाने आहे अशी नावे देखील बद्दलवणास भाग पाडू असे यावेळी बोलत असताना सांगितले.
 सविस्तर वृत्त 

Sunday, November 05, 2017

दारूसंपदेसाठी महाजनकी

दारूसंपदेसाठी महाजनकी

महिलांचा अपमान करणा-या गिरिश महाजन मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

मूल/प्रतिनिधी -
दारूचा खप वाढविण्यांसाठी दारूला महिलांचे नांवे द्या अशी मागणी करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विरोधात अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी मूल पोलिसांत तक्रार दाखल केली असून, महाजन यांची मागणी ही संविधानाचे विरोधात असल्यांने त्यांचे मंत्रीपद काढून घ्यावे अशी राज्यपालांकडे मागणी करण्यात आली आहे.

मूल पोलिसांनी मंत्री गिरीश महाजन यांचे विरोधातील तक्रार दाखल करवून घेतली असून, कायदेशीर सल्ला घेवून पुढील कारवाई करण्यांचे मान्य केले आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे उस गाळप हंगामात मंत्री गिरीष महाजन यांनी, ‘दारूचा खप वाढवायचा असेल तर, दारूला महिलांची नांवे द्या’ असे वक्तव्य केले.  सार्वजनिक कार्यक्रमात दारूसारख्या घाणेरड्या पदार्थाची खप वाढविण्यासाठी महिलांचे नांवे देण्यांस प्रोत्साहन देणे हा महिलांचा अपमान असल्यांचे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

राज्यातील महिला एकीकडे दारूबंदीसाठी आंदोलन करीत असतांना, राज्यातील मंत्री मात्र दारू वाढली पाहीजे यासाठी भूमिका घेत आहेत हे निशेधार्ह आहे.

संविधानाच्या अनुच्छेद 47 नुसार राज्यांनी दारूबंदीच्या दृष्टीने निर्णय घेणे आवश्यक असतांना, संविधानाचे रक्षण करण्यांसाठी मंत्रीपदाची शपथ घेणारे मंत्री महाजन मात्र संविधानातील तरतुदीच्या विसंगत भूमिका घेतल्यांने त्यांनी संविधानाचाही अपमान केला आहे.  त्यामुळे त्यांचे विरोधात राज्यपाल यांचेकडे तक्रार करून त्यांचे मंत्रीपद काढून घ्यावी अशी मागणी श्रमिक एल्गारने केली आहे.  या गंभीर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गिरीश महाजन प्रकरणी भूमिका जाहीर करावी अषी श्रमिक एल्गारची मागणी आहे.

वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केल्यानंतर त्याच्या प्रभावी अमंलबजावणीची मागणी होत असतांना, ज्यांचा या खात्याशी संबध नाही, अशा व्यक्तीने महिलांचा अपमान करणारे वक्तव्य महाराष्टासारख्या पुरोगामी राज्याला अस्वस्थ करणारे आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याअभावी रोवणी झालेली नाही.  अनेक धरणे 25 टक्केही भरली नाही, गोसीखुर्दचे नहराचे कामे अजूनही पूर्ण झालेली नाही. शतक—यांना सिंचनासाठी पाणी पाहीजे असतांना, ते न वाढविता, सबंध नसलेल्या खात्यांचे मंत्री गिरीश महाजन यांना राज्यात दारू कशी वाढेल याची चिंता आहे. हे निशेधार्ह आहे.