काव्यशिल्प Digital Media: खंडणी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label खंडणी. Show all posts
Showing posts with label खंडणी. Show all posts

Wednesday, January 17, 2018

बौध्द भंतेला मागितली ५0 हजारांची खंडणी

बौध्द भंतेला मागितली ५0 हजारांची खंडणी

नागपूर/प्रतिनिधी:

तुम्ही बांगलादेशचे रहिवासी आहात, आम्ही तुम्हाला पकडून नेऊ अशी धमकी देऊन बौध्द भंतेकडून खंडणी वसूल केली. हा खळबळ जनक प्रकार जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी भंतेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकासह तिघांना ताब्यात घेतले. सूरज सुभाष नागदिवे (२0, रा. घोरपड, त. कामठी), अभिषेक संजय शेलारे (१८, रा. यशोधरानगर) अशी खंडणीबाज आरोपींची नावे आहेत.
khandni साठी इमेज परिणामरायगढ जिल्हय़ातील (प. बंगाल) बौद्ध भंते शंकर अमिरत चौधरी (५0) हे पारस ता. दौंड (पुणे) येथील शांती बुद्ध विहार येथे राहतात. बौद्ध धम्माचा प्रसार- प्रचार करण्यासाठी नागपुरात आले होते. नागपुरात त्यांचा मुक्काम पिवळी नदी येथील धम्मक्रांती बुद्ध विहारात आहे. रविवार १४ जानेवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास शंकर हे बुद्ध विहारात आराम करीत होते. त्यावेळी सूरज, अभिषेक आणि विधीसंघर्ष बालक हे तेथे आले. सूरज व अभिषेक यांनी शंकर यांना तुम्ही बांगलादेशचे रहिवासी आहात. आम्ही सीआयडी पोलिस आहोत. तुम्हाला पकडून नेऊ अशी दमदाटी केली. त्यामुळे शंकर घाबरले. शंकर यांनी आम्ही भारताचेच रहिवासी आहोत असे सांगितले. त्यावर तिघांनीही कारवाई न करण्यासाठी ५0 हजाराची मागणी केली. शंकरजवळ पैसे नसल्याने त्यांनी असर्मथता दर्शविली. त्यावर तिघांनीही त्यांना मारण्याची धमकी देत तुमच्याजवळील एटीएममधून पैसे काढून द्या असे म्हटले. त्यानंतर शंकर व त्यांच्यासोबत राहणारे शुभ भंते यांना ऑटोत बसवून राणी दुर्गावती चौकातील सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये नेले. शंकर यांनी त्यांच्या खात्यातून २0 हजार तर शुभ भंतेच्या खात्यातून १५ हजार रुपये असे ३५ हजार रुपये काढून त्यांना दिले. त्यानंतर दोन्ही भंतेंना बुद्ध विहारात आणून सोडले आणि ते पसार झाले. 
आपल्याला गंडविण्यात आल्याचे भंते शंकर यांच्या लक्षात येताच त्यांनी जरीपटका पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उत्तम मुळक, हेड कॉन्स्टेबल मुन्ना ठाकूर, शिपाई गणेश बरडे, आसीफ शेख, रवींद्र भंगाडे हे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले. पोलिसांनी तिघांचाही शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सूरज आणि अभिषेक यांना अटक केली.