काव्यशिल्प Digital Media: मेट्रो

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मेट्रो. Show all posts
Showing posts with label मेट्रो. Show all posts

Saturday, February 02, 2019

 पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होणार; अफवा

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होणार; अफवा

नागपूर/ प्रतिनिधि

मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोची व्यावसायिक सेवा फेब्रुवारीअखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. खापरी ते सीताबर्डी १३ कि़मी. आणि लोकमान्यनगर ते सुभाषनगर सहा कि़मी. असे दोन टप्पे राहणार आहे. 26 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होइल, अशी बातमी काही वहिन्यानी दाखविले. मात्र, ती अफवाच आहे.  

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*


नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे लोकार्पण दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार असून या कार्यक्रमा करता पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी येणार असल्याची चर्चा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम मध्ये सुरु आहे. पण असा कुठलाही कार्यक्रमा अद्याप ठरला नाही अश्या प्रकारची कुठलीही बातमी देतांना कृपया महा मेट्रोच्या अधिकाऱ्या कडून खात्री करून घ्यावी ही विनंती,मेट्रोने केली आहे. 

राज्य शासनाच्या २०१४ च्या जीआरनुसार महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पात मेट्रोचे प्रवासी भाडे निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या दोन कि़मी.करिता १५ रुपये निर्धारित करण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

नागपुरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्येच्या अनुषंगाने निर्माण झालेली वाहतूक समस्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून सुटणार आहे. शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पेट्रोलच्या किमतीपेक्षा अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करणे शक्य आहे. याशिवाय मानसिक त्रासाची झंझट राहणार नाही. आॅटोमोटिव्ह चौक ते खापरी (मिहान) आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर जवळपास ३९ कि़मी. अंतरावर मेट्रो धावणार आहे. दीक्षित यांनी नागपूर मेट्रो रेल्वेत प्रवास करण्यासाठी कि़मी.नुसार किती भाडे लागेल, याची माहिती दिली. त्यानुसार दोन कि़मी.पर्यंत १५ रुपये, चार कि़मी.पर्यंत १९ रुपये, सहा कि़मी.पर्यंत २३ रुपये, नऊ कि़मी.पर्यंत २८ रुपये, १२ कि़मी.पर्यंत ३० रुपये, १५ कि़मी.पर्यंत ३४ रुपये, १८ कि़मी.पर्यंत ३६ रुपये, २१ कि़मी.पर्यंत ३९ आणि २१ पेक्षा जास्त कि़मी.करिता ४१ रुपये भाडे लागणार आहे. हे भाडे दुचाकी वा चारचाकीने प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीपेक्षा अर्धे असल्याचा दावा दीक्षित यांनी केला आहे. 

Saturday, January 26, 2019

मेट्रोच्या मासिक प्रवासी दरात मिळावी सवलत

मेट्रोच्या मासिक प्रवासी दरात मिळावी सवलत


khabarbat.in

धावणार माझी मेट्रो कार्यक्रमात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मागणी

 

नागपूर : लवकरच महा मेट्रो नागपूरची प्रवासी सेवा नागरिकांसाठी सुरु होणार आहे. सीताबर्डी स्थित मुंजे चौक मेट्रो जंक्शन ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सुभाष नगर मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन पर्यंत एकूण १८ किमीसाठी मेट्रो धावणार आहे. तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी मेट्रोतून प्रवास करावा यासाठी विविध उपक्रम महा मेट्रोतर्फे राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने हिंगणा एमआयडीसी'च्या महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवार दिनांक२५ जानेवारी रोजी धावणार माझी मेट्रो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

 

कार्यक्रमाच्या निमित्याने मेट्रोच्या मासिक प्रवासी दरात सवलत देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडे केली. तसेच महा मेट्रो नागपुर प्रकल्पात आकर्षणाचे केंद्र असलेल्या व्हर्टिकल गार्डन महिंद्रा कंपनीच्या गेट समोर असलेल्या मेट्रो पिलरवर लावण्याचा आग्रह अधिकाऱ्यांनी केला. कार्यक्रमात प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली. फिडर सेवाचा आणि सायकलई-वाहनांचा उपयोग नागरिकांनी ज्यास्तीत ज्यास्त करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच प्रवासासाठी मेट्रोचा वापर केल्याने प्रदूषणावर कस मात करता येईल तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी झाल्यास रस्ते अपघातांवर कस नियंत्रण आणता येईल यावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

उल्लेखनीय म्हणजे या कार्यक्रमात#धावणारमाझीमेट्रो कॅम्पेन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खास आकर्षणाचे केंद्र ठरले. 

महिंद्रा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेट्रोच्या#धावणारमाझीमेट्रो विश वॉलवरून महा मेट्रोला शुभेच्या दिल्या. महा मेट्रो राबिवत असलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची प्रशंसा त्यांनी केली. तसेच सजेशन फॉर्मच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपल्या सूचना/इच्छा महा मेट्रोपुढे व्यक्त केल्या. कार्यक्रमात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या विविध विभागातील व्यवस्थापकअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Thursday, September 06, 2018

Ganesh Festival Metro Nagpur

Ganesh Festival Metro Nagpur



  • मेट्रोची गणेश उत्सव स्पर्धा
  • मेट्रो थीम वर करा पेंडालची आकर्षक सजावट
  • तुमच्या मंडळाला भेट देण्यासाठी येणार मेट्रोची टिम
नागपूर  :
 नागपुरात गणेश उत्सवाची जय्यत तयारी सर्वीकडे होताना दिसत आहे. बाल गणेश उत्सव मंडळ, युवा गणेश उत्सव मंडळ असे विविध मंडळ आणि त्यात कार्य करणारे बाप्पाचे लाडके भक्त तयारीला लागले आहे. गणेश उत्सवासाठी नागरिकांची आपुलकी पाहून महा मेट्रोने नागपूरने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महा मेट्रो नागपूरने गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत मेट्रोच्या थीमवर डिझाईन तयार करून उत्कृष्ट सजावट करणाऱ्या मंडळांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी व कौटुंबिक सदस्यांनी महा मेट्रोच्या ganeshotsav.mazimetro@gmail.com या ई-मेल वर सजावट केलेले फोटो पाठविण्याचे आणि ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महा मेट्रो नागपूरने केले आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भक्तांना आपल्या सार्वजनिक मंडळाची सजावट मेट्रोच्या थीमवर करणे आवश्यक आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत विविध कार्याची प्रतिकृती मंडळांना देता येईल. एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन खापरी मेट्रो स्टेशन याशिवाय महा मेट्रो कोचची थीम मंडळांना सादर करता येणार आहे. तर मेट्रो थीमशी संबंधित रेखाचित्र देखील मंडळे आपल्या पेंडाल मध्ये लावून स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. महा मेट्रोच्या ई-मेल (ganeshotsav.mazimetro@gmail.com) वर पाठविण्यात आलेल्या छायाचित्रांची निवड करण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या मंडळांना महा मेट्रोची टिम प्रत्यक्ष भेट देऊन पेंडाल सजावटीचे निरीक्षण करेल.

महा मेट्रो प्रकल्पाविषयी नागरिकांना सविस्तर माहिती देण्याकरता विविध उपक्रम महा मेट्रो राबवित असते. वाहतुकीचे नियम पाळण्याचा व पर्यावरणाचे संवर्धनाचा संदेश नागपूरकरांना देऊन जनजागृती केली जाते. या पार्शवभूमीवर गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या महा मेट्रोच्या गणेश उत्सव स्पर्धेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. तब्बल १ हजारच्या वर सार्वजनिक मंडळाने स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. घरी गणेश मूर्ती बसवून आकर्षक सजावट करणारे भक्त देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावर्षी देखील मोठ्या संख्येने मंडळे या स्पर्धेत सहभागी होणार असा विश्वास महा मेट्रो तर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Tuesday, July 03, 2018

 महा मेट्रो:हिंगणा मार्गावर(रिच – ३) मेट्रोचे ६५ टक्के कार्य पूर्ण

महा मेट्रो:हिंगणा मार्गावर(रिच – ३) मेट्रोचे ६५ टक्के कार्य पूर्ण

नागपूर/प्रतिनिधी:
शहरात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गिकांवर मेट्रो प्रकल्पाचे वेगाने कार्य पूर्ण होत आहे. ज्याप्रमाणे वर्धा मार्गावरिल रिच-१ कॉरिडोरचे कार्य पूर्ण केले जात आहे त्याचप्रमाणे हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे कार्य वेगाने पूर्ण होताना दिसत आहे. याठिकाणी कार्याचा आढावा घेतला असता ६५ टक्क्याहुन अधिक कार्य आतापर्यंत पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर पर्यंत अश्या १०.३ किमीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन प्रस्तावित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एमआयडीसीमुळे रिच-३ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना निदर्शनास येते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणारच. सध्या याठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. या भागात मेट्रोच्या कार्याला नागरिकांचा देखील उत्तम सहकार्य याठिकाणी महा मेट्रोला मिळत आहे.

Sunday, July 01, 2018

पोलिसांचे वाहन मेट्रो स्टेशनमध्ये घुसले

पोलिसांचे वाहन मेट्रो स्टेशनमध्ये घुसले


नागपूर/प्रतिनिधी 

 : काल ३० जून रोजी सायंकाळी औरंगाबाद येथून एमएच -20 / सीवी-११३ क्रमांकाचे पोलिसांचे वाहन नागपूरला पोहोचल्या नंतर अचानक दुर्घटनाग्रस्त झाले. पोलिसांचे वाहन बॅरीगेट्सला धडक देत वर्धा मार्गावरील निर्माणाधीन उज्वला नगर मेट्रो स्टेशनच्या आत शिरले. वाहन चालकाचा अचानक तोल बिघडल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कार्यस्तळी कार्यरत डीजी मशीन ऑपरेटर आशीष जाधव जख्मी झाल्याने रुग्णालायत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. वाहन चालकाच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने हा संपूर्ण प्रकार घडला असून वाहन चालकाला तात्काळ इस्पितळात दाखल करण्यात आले. २६ वर्षीय पुरुषोत्तम जाधव असे या वाहन चालकाचे नाव असून तो औरंगाबाद येथे आहे. घटनेची माहिती मिळताच महा मेट्रोतर्फे तात्काळ उपाय योजना करण्यात आल्या असून घटनेची संपूर्ण माहिती सोनेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली.

Tuesday, June 19, 2018

अजनी स्टेशन मार्ग यातायात के लिए सुलभ  टू-व्हिलर और ऑटो को सुविधा

अजनी स्टेशन मार्ग यातायात के लिए सुलभ टू-व्हिलर और ऑटो को सुविधा

नागपूर १९ : महा मेट्रो कि ओर से अजनी रेल्वे स्टेशन के समीप किए जा रहे निर्माण कार्य के दौरान नागरीकों की सुरक्षा को ध्यान में रखते हुए कॉंग्रेस नगर बगीचे की ओर से यातायात परिवर्तीत किया गया था !

वाहन चालको की दिक्कतो को देखते हुए मंगलवार को कॉंग्रेस नगर चौक से अजनी स्टेशन की ओर जानेवाले मार्गपर टू-व्हिलर और ऑटो का यातायात शुरू कर दिया गया ! इसी तरह अजनी स्टेशन से कॉंग्रेस नगर की ओर आनेवाले मार्गपर लगे बेरीगेड को पीछे कर इस मार्ग को चौडा कर दिया गया है ! ताकी टू-व्हिलर और ऑटो आसानी से निकल सके ! उल्लेखनीय है की निर्माण कार्य के चलते अप और डाऊन दोनो मार्ग पर केवल टू-व्हिलर को आवागमन की छुट दी गई थी ! ऑटो चालको को कॉंग्रेस नगर बगीचे से होकर अजनी स्टेशन की ओर जाना पडता था ! यातयात पुर्ववत मार्ग से शुरू होने से जहा ट्राफिक जाम से वाहन चालको को राहत मिली है वही दुसरी ओर घुमकर जाने की परेशानी से निजात मिली है ! नागरीको द्वारा महा मेट्रो के निर्माण कार्य के दौरान जो सहयोग किया जा रहा है उसके प्रती महा मेट्रो प्रशासन ने आभार व्यक्त किया !

Friday, June 01, 2018

महा मेट्रो करणार पॉकेट ट्रॅकचे निर्माण

महा मेट्रो करणार पॉकेट ट्रॅकचे निर्माण

मेट्रो मार्गावर खोळंबा टाळण्यास होणार मदत

नागपूर/प्रतिनिधी:

 तांत्रिक बिगाडामुळे गाडी रुळावरच बंद पडल्यास त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून महा मेट्रो नागपूर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही भागांमध्ये पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. वाहतुकीदरम्यान आलेले अडथळे हटविण्यासाठी पॉकेट ट्रॅक उपयोगी ठरेल. 
प्रत्येक मेट्रो प्रकल्पात अप आणि डाउन असे दोन रेल मार्ग असतात. पण याशिवाय सुमारे १०० मीटर लांबीच्या ट्रॅकचे बांधकाम ठराविक ठिकाणी करण्यात येते. वरीलमाहिती प्रमाणे बंद पडलेली गाडी उभी करण्याकरता होत असल्याने या ठरावीक ट्रॅकला पॉकेट ट्रॅक असे म्हणतात. सर्वसामान्यपणे मेट्रो रेल करता बीछवल्या जाणाऱ्या रुळांचे बांधकाम सेगमेंटल गर्डरच्या माध्यमाने होते. मात्र पॉकेट ट्रॅकच्या बांधकामात आय गर्डरचा उपयोग होतो. अप किंवा डाउन मार्गावर बंद पडलेली मेट्रो रेल गाडी बॅटरीद्वारे संचालित होणाऱ्या पॉवर इंजिनच्या मदतीने ओढत पॉकेट ट्रॅकपर्यंत पोहोचविली जाते. मेट्रो मार्गावर रहदारी कमी झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस बिगड झालेली गाडी दुरुस्तीसाठी डेपोला नेली जाते. 
नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेल्या चारही मार्गिकांवर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. खापरी मेट्रो स्टेशन ते मुंजे चौक मेट्रो स्टेशन दरम्यान असेलल्या रिच-१ भागातील रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशनजवळ पॉकेट ट्रॅकचे बांधकाम निर्माणाधीन आहे. तसेच लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते मुंजे चौक मेट्रो स्टेशन दरम्यान असेलल्या रिच-३ भागातील रचना मेट्रो स्टेशनयेथे पॉकेट ट्रॅकचे बांधकाम निर्माणाधीन आहे. याशिवाय रिच-२ आणि रिच-४ याभागांमध्ये देखील येत्या काळात पॉकेट ट्रॅक तयार करण्यात येईल.
    -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...


भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Thursday, May 17, 2018

गांधीबाग स्केटिंग क्लबच्या स्केटर्सनी रैलीतुन दिला स्वच्छता आणि रस्ता सुरक्षेचा संदेश

गांधीबाग स्केटिंग क्लबच्या स्केटर्सनी रैलीतुन दिला स्वच्छता आणि रस्ता सुरक्षेचा संदेश

महामेट्रोच्या वतीने गांधीबाग येथे मेट्रो संवाद
नागपूर प्रतिनिधी:
महा मेट्रो नागपूर आणि गांधीबाग स्केटिंग क्लब तर्फे गुरुवार सकाळी नागपूर मेट्रोशी संबंधित कार्यगुणांची ‘स्केटिंग संदेश रैली’ आणि या कार्यविभागातील नागरिकांसाठी ‘मेट्रो संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रैलीत मोठ्या संख्येने लहान स्केटर्सचा सहभाग होता. तर ‘मेट्रो संवाद’ कार्यक्रमात त्यांचे पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘माझी मेट्रो-नागपूर मेट्रो’, ‘रस्ता सुरक्षा’, ‘स्वच्छ आणि हिरवे नागपूर’, अश्या विविध घोषवाक्याचे फलक हाती घेऊन लहान मुलांनी ‘स्केटिंग संदेश रैली’च्या माध्यमातून नागपूरकरांना जागृती संदेश दिला. गांधीबाग स्केटिंग क्लबमधून ‘स्केटिंग संदेश रैली’चा प्रारंभ झाल्यानंतर पुढे गांधीबाग उद्यान प्रवेशद्वार मार्गे नंगा पुतळा, टांगा स्टँड, साई बेकरी, गांधी पुतळा, बडकस चौक, चिटणीस पार्क, अग्रेसन चौक व येथून परत स्केटिंग क्लबपर्यंत रैलीचा प्रवास होता. यानंतर मेट्रो अधिकाऱ्यांकडून जनसमुदायास नागपूर मेट्रोबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे आणि शंकांचे निरसन देखील यावेळी करण्यात आले. 
‘जहा सवांद है, वहा विवाद कि कोई आशंका नही’ अश्या शब्दात महानगर पालिकेचे माझी स्थायी समिती अध्यक्ष व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी महा मेट्रोच्या ‘मेट्रो सवांद’ संकल्पनाची प्रशंसा केली. तसेच मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी लहान मुलांसह त्यांचा पालकांना नागपूर मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी बळकट होईल व त्यामुळे निसर्गाचे कश्याप्रकारे संतुलन राखले जाईल यावर मार्दर्शन केले. श्री सुनील तिवारी यांनी मेट्रो प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली, तसेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील मेट्रोच्या कार्याबद्दल तांत्रिक माहिती मुख्य प्रकल्प प्रबंधक(रिच-४) श्री.एम.सुरेश आणि राजेश ताभने यांनी नागरिकांना दिली.
यावेळी आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू असलेल्यापैंकी भारताचा सर्वात वेगवान स्केटर व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेता निखिलेश निरंजन तभाने, गाँधीबाग स्केटिंग क्लबचा आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेता पियुष किशोर आकरे आणि आंतरराष्ट्रीय स्केटिंग रोलर हॉकी खेळाडू प्रित उपेंद्र वर्मा यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच आकर्षक घोषवाक्य हाथी घेऊन स्केटिंग करणाऱ्या लहान मुलांना देखील मेडल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.दिपराज पार्डीकर,शैलेन्द्र पाराशर ,उपेन्द्र वर्मा व महा मेट्रो नागपूरच्या रिच-४ चे मुख्य प्रकल्प प्रबंधक श्री.एम.सुरेश, सीनियर सेक्शन इंजीनियर श्री.राजेश तभाने उपस्थीत होते.
                                -----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

Tuesday, November 21, 2017

 ‘लाईफस्टाईल’मध्ये आमूलाग्र परिवर्तन

‘लाईफस्टाईल’मध्ये आमूलाग्र परिवर्तन


नागपूर : नोकरीवर जाण्यासाठी प्रवासाला लागणारा वेळ, गर्दी, प्रवासाचा खर्च, अपघाताचा धोका, महिलांची सुरक्षा आणि प्रदूषण, या साऱ्या  समस्या मेट्रोमुळे दूर होतील. स्वस्त प्रवासभाडे, सर्व स्तराची कनेक्टीव्हिटी, मेट्रो स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी फीडर सुविधा आणि जागतिक स्तराच्या सुविधांमुळे गरीबच नाही तर श्रीमंतही मेट्रोचा पर्याय निवडतील. मेट्रोमुळे नागपूरकरांच्या ‘लाईफस्टाईल’मध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल, असा विश्वास महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.