काव्यशिल्प Digital Media: दुर्गापूर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label दुर्गापूर. Show all posts
Showing posts with label दुर्गापूर. Show all posts

Thursday, February 01, 2018

मित्रानेच केला मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार: ताडोबातील MTDC च्या रेस्टहाऊसमधील घटना

मित्रानेच केला मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार: ताडोबातील MTDC च्या रेस्टहाऊसमधील घटना

चंद्रपूर/प्रतीनिधी:
ps-durgapur-749
ताडोबामध्ये व्याघ्रदर्शनासाठी सोबत आलेल्या 21 वर्षीय मैत्रिणीवर चाकूचा धाक दाखवून सलग लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घटनेच्या १५ दिवसानंतर  बुधवारी उघडकीस आली. 
 17 जानेवारी रोजी ताडोबाचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या मोहुर्ली येथील MTDC च्या रेस्टहाऊसमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात  पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी मित्र शुभम काळबेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सध्यातरी आरोपीला अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात यात आहे .आरोपी व त्याची २१ वर्षीय मैत्रीन हे दोघेही १७ जानेवारीला ताडोबा भ्रमंती करण्यासाठी आले होते.ते MTDC च्या रेस्टहाऊसमध्ये थांबले होते. दुपारी जेवण केल्यानंतर तो मैत्रिणीसह खोली क्रमांक १०१ मध्ये गेला या नंतर त्याने तिच्यावर चाकूचा धाक दाखावत अत्याचार केला. रात्रभर दोघेही तेथेच थांबले होते रात्रीही त्याने चाकूचा धाक दाखवीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या संपूर्ण प्रकरणाचा विडीओ त्याने केला होता .18 जानेवारी रोजी दोघेही जेवण करून नागपूरला निघुन गेले दरम्यान त्याने पीडित मुलीला आपल्या सोबत लग्न करण्याचा अट्टाहास केला.  मात्र तिने नकार दिल्याने त्याने अश्लील चित्रफीत व्हायरल केली.  यावरून संपूर्ण घटनेचे बिंग फुटले.  घटनेच्या पंधरा दिवसांनी म्हणजेच बुधवारी पीडित युवतीने दुर्गापूर पोलिस ठाणे गाठून आरोपी शुभम काळबेंडे विरुद्ध तक्रार केली ,दुर्गापूर पोलिसांनी या प्रकरणी शुभम काळबेंडे यांचेवर कलम ३७६ (अ ) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

Monday, December 04, 2017

 विहिरीत उडीघेवून आत्महत्या

विहिरीत उडीघेवून आत्महत्या

चंद्रपूर /प्रतिनिधी:
चंद्र्पुर येथील दुर्गापूर वार्ड क्र, 2 एकता चौक येथे जिल्हा परिषद शाळे जवळ राहणाऱ्या एक व्यक्तीने सोमवारी रातरी १२.३० वाजता परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.  संदीप  मन्साराम गायकवाड़ असे मृतकाचे नाव असून  संदीप गायकवाड़ हा नोव्हेंबर महिन्यापासून तेथील व्यंकटराव दुर्योधन यांच्या घरी आपल्या दोंन मुलांसोबत व पत्नीसोबत किरायाने राहत होता. हा परिसरात असलेले मजुरी सारखे छोटेमोठे काम करून आपल्या उदर्निवाह भागवत होता .   

रविवार रात्री  10:30 वाजताच्या सुमारास संदीप हा घराबाहेर पडला मात्र उशिरापरीयंत घरी न आल्याने परिसरात शोधाशोध केली तितक्यात परिसरातील नागरिकांना  विचारणा केली असता  आज़ाद चौक येथील पिंपळाच्या झाडाखाली बसलेला लोकांनी त्याला बघितले होते . सोमवारी सकाळी विहिरीवर पाणी भरायची केलेल्या महिलेवर शुद्ध विहिरीच्या पाण्यात २ चप्पल तरंगतांना दिसल्या हे बघून नागरिकांना शंका आली व नागरिकांनी पाण्यात हुक टाकून शोधण्याचा प्रयत्न केला असता पाण्यातून मृतदेह तरंगत बाहेर आल्याने  घटनेची माहिती दुर्गापूर स्टेशनला देण्यात आली. मृतदेहाला पाण्याबाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत आहे Image result for आत्महत्या