काव्यशिल्प Digital Media: भारिप

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label भारिप. Show all posts
Showing posts with label भारिप. Show all posts

Wednesday, April 11, 2018

भारिप तर्फ़े महात्मा जोतिबा फुलेना अभिवादन

भारिप तर्फ़े महात्मा जोतिबा फुलेना अभिवादन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
        भारिप बहुजन महासंघ जिल्हा चंद्रपूर तर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रथम आझाद बाग येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्य अर्पण करण्यात आले त्यानंतर ठाकरे वाळी भिवापूर वार्ड चंद्रपूर येतील पुतळ्याला आणि नंतर भारिप बहुजन महासंघ जिल्हा कार्यालयात माल्यार्पण करून महात्मा जोतिबा फुलेच्या 191 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले 
अभिवादन प्रसंगी भारिप बहुजन महासंघ जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे , जिल्हा महासचिव धीरज बांबोड , महिला जिल्हाध्यक्ष लताताई साव , महिला महासचिव  कविताताई गौरकर , युवक जिल्हाध्यक्ष  रमेश ठेंगरे , युवक महासचिव  सुमित मेश्राम , राजुभाऊ किर्तक , रामजी जुनघरे,बंडूभाऊ ठेंगरे,भीमलाल साव,कल्पनाताई अलोने,निशाताई ठेंगरे  तनुजा रायपूरे , नेहा मेश्राम , राहुल गौरकर ,देवींदा घडले इत्यादी उपस्थित होते .