काव्यशिल्प Digital Media: मनसे

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label मनसे. Show all posts
Showing posts with label मनसे. Show all posts

Tuesday, July 17, 2018

मनसेचे शिट्टी बजाव आंदोलन

मनसेचे शिट्टी बजाव आंदोलन

अवैध्य बांधकाम विरोधात मनपाचे वेधले लक्ष 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरात मुख्य रस्त्यावर हॉस्पीटल, व्यापारी इमारती परवानगी न घेता अवैध्यपने बांधकाम केले आहे. यामुळे पार्किंग,अपघाताचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन मनसे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आज दि. १७ जुलैला दुपारी ३.३० वाजता शिट्टी बजाव आंदोलन करुन मनपा आयुक्तांचे अवैध्य बांधकाम विरोधात कारवाई करण्याबाबत लक्ष वेधण्यात आले.
चंद्रपूर शहरात मनपा, नगररचना विभाग अग्निशामक विभाग यांची परवानगी न घेता अनेक इमारती बांधकाम करण्यातआल्या. अनेक हॉस्पीटल, व्यापारी संकुलात वाहन पार्किंग सारखी अत्यावश्यक सुविधा देण्यात येत नाही. यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हॉस्पीटल, व्यापारी इमारतमध्ये येणारे नागरिक पार्किंग नसल्याने रस्त्यावर वाहने ठेवतात, बाहेर रस्त्यावर उभे राहतात यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असतो तर अनेकदा नागरिकांना अपघाताला बळी पडावे लागते. 
या अवैध्य बांधकामामुडे गंभीर नागरी प्रश्न निर्माण झाले असतांना मनपाकडुन कुठलीही कारवाई केली जात नाही. वर्षानुवर्षे अवैध्य बांधकाम मोठ्या दिमाखात उभ्या आहे. शासकीय नियम पायदळी तुडवीत कायद्याचे सर्रास उल्लंघन करीत असल्याने मनपाला जाग येण्यासाठी मनसेने शिट्टी बजाओ आंदोलन करुन मनपा आयुक्ताचे लक्ष वेधले. मनपाने अवैध्य बांधकामावर कडक कारवाई न केल्यास येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा करून मनपा परिसर दणाणून सोडला. आंदोलनात मनसे कार्यकर्ता, मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या शिट्टी बजाओ या अनोख्या आंदोलनाने मनसे अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांचे लक्ष वेधले. आंदोलनात मनसे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकारी शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, राहुल चव्हाण, बाळा चंदनवार, सुमित करपे सर्कल अध्यक्ष, व्यंकटेश मुक्तलवार, मुकेश मेहता, आशिष उराडे, दिनेश इंगडे, पुनित लोणकर, अजय मुक्तलवार, वाकटोल, सोमेश्वर टेकाम, स्वप्नील, नितीन बावणे, नागाजी गनफाडे, राजा मेहता, सन्नि मंडल, मिथुन महाकुलकर, कुणाल ठेंगणे, कपील डंभारे, आतिश वडते, रितीक बिसेन, अजिंक्य वाबिटकर,शाहरुख शेख, अमन शेख, मुकेश बावणे,तेजस रामेजवार, रोहन अगडे, तेजस कोतपल्लीवार, अनिकेत उईके, यश तुमसरे, देवानंद ठेंगणे, आकाश शुभम पटले, रोहन साव, अनुराग बोंडे, आकाश बरुडे, आदी मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

Wednesday, February 28, 2018

मनसेच्या ९ कार्यकर्त्याची न्यायालयातून निर्दोष सुटका

मनसेच्या ९ कार्यकर्त्याची न्यायालयातून निर्दोष सुटका


चंद्रपूर/प्रतिनिधी:
                महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ कार्यकर्त्यांनी डिसेंबर 2013 ला कन्याका नागरिक बैक कार्यालयावर एका महिला बैंक कर्मचाऱ्यांची छेडखानी केल्या प्रकरणी आंदोलन केले होते या आंदोलन ना दरम्यान बैंकचे अध्यक्ष प्रफुल भास्करवार यांच्यावर काळीशाई फेकून त्याना मारहाण केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यावर करून त्यांचेवर गंभीर गुन्हे चंद्रपूर येथील शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते, सदर प्रकरण चंद्रपुर न्यायालयात तब्बल चार वर्ष चालल्यानंतर अखेर दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ ला विद्द्यमान् न्यायाधीश खोत यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली, यामधे मनसेचे राजू कुकडे, सुनीता गायकवाड़,मनोज ताम्बेकर माया मेश्राम,संदीप शिडम.भारत गुप्ता, प्रकाश चंदनखेडे,सुजय अवथरे व योगिता कुंभारे इत्यादिचा समावेश आहे, त्यांच्या सुटकेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे.
  मनसैनिकवर लागलेले गुन्हे न्यायालयाने ख़ारिज करुण न्याय दिल्याबद्दल मनसेचे राजू कुकडे यांनी न्यायाधीशयाचे आभार मानले.  

Monday, January 22, 2018

मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये: मनसेचे  हाप पॅन्टवर आंदोलन

मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये: मनसेचे हाप पॅन्टवर आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
    मराठी माणसाचे हित जोपासत आता मनसे सरकारविरोधात आक्रमक झाली आहे चंद्रपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हाप पॅन्टवर शिक्षण अधिकारी कार्यालयात तब्बल एकतास विध्यार्थी म्हणून बसून शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे , गोरगरिबांचे शिक्षण हिस्कावू देणार नाही, अश्या प्रकारचे नारे देत चंद्रपूर मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात  अनोखे आंदोलन पुकारले आहे ,
यावेळी  मनदीप रोडे यांनी शिक्षण अधिकारी यांनाच धारेवर धरत करोडो रुपये शासन शिक्षकांवर खर्च करते मात्र शाळेचा दर्जा कमी कसा होतो सोबतच मुलांची पटसंख्या कमी कशी काय होते याचे उत्तर मागितले. 
 
 गुणवत्तेमुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १३१२ शाळांना कुलूप लागणार आहे. या शाळांतील विद्यार्थी अन्य ठिकाणी समायोजित केले जाणार असल्याचा दावा सरकार करत असली तरी  डोंगराळ, दुर्गम भागातील शाळांतील शेकडो मुलांना याचा फटका बसणार आहे. बंद होणाऱ्या अनेक शाळा दोन किमीपेक्षाही अधिक अंतरावर आहेत. नदी नाले ओलांडून, जंगलवाटांनी मुलांनी शाळांपर्यंत पोहचावे अशी अपेक्षा करणेच अमानवी आहे. त्यामळे मराठी शाळा बंद   करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असे देखील शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मनसेचा सूर होता . 
यावेळी आंदोलनात मनसे शहर उपाध्यक्ष राहुल चव्हाण,व्यंकटेश मुत्कलवार ,शहर सचिव सचिन कोतपल्लीवार , सुमित खेडनकर , सुमित करपे ,नितीन बावणे,नितीन कुमरे, नागाजी गंफाडे , यासह आदी मनसे आंदोलक कार्यकतें उपस्थित होते. 

Sunday, November 26, 2017

चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली

चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली

चंद्रपूर प्रतिनिधी :
चंद्रपुरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.शहरातील तुकूम परिसरात दुपारच्या सुमारास मराठी पाट्यासाठी आंदोलन करत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दुकान चाळीतील इंग्रजी पाट्यांना काळफासत इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून टाकली.

शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर दुपारी हा प्रकार घडला.तुकूमपरिसरात दुपारी मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या हातात मनसेचे झेंडे देखील होते. मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर या कार्यकर्त्यांनी अचानक इंग्रजी पाट्यांना लक्ष करत काळफ़ासले आणि काही इंग्रजी बॅनरही फाडले.अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण  निर्माण झाले होते. काही दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केली.
चंद्रपुरात मनसेने नवीन शाखेचे उदघाटन केल्या नंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केले होते.आता पुन्हा एकदा मनसेने मराठी पाट्यांसाठी आक्रमक झाली आहे.



Wednesday, November 22, 2017

मराठीत करा दुकानांचे फलक

मराठीत करा दुकानांचे फलक

मनसे करणार चंद्रपुर मध्ये खळ्ळ फट्याक

चंद्रपूर -  मराठी राज्य भाषेचा सन्मान करण्यासाठी सर्व  दुकाने व आस्थापनांचे फलक हे मराठीत असले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य भाषा सन्मान आंदोलन चालू करणार अाहे. जर  दुकाने व आस्थापनांनी आपले फलक मराठीत लावले नाहीत तर खळ्ळ फट्याक करण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांनी ठाण्यामध्ये झालेल्या जाहीर सभेत दिले असून त्यांच्या आदेशानुसार आता चंद्रपुर शहरा मध्ये आंदोलन करणार मनदिप भाऊ रोडे शहर अध्यक्ष मनसे यांच्या नेत्रुत्वात  ,अभिनव देशपांडे शहर उपाध्यक्ष, बाळा  चंदनवार  शहर उपाध्यक्ष, राहुल चव्हाण, व्यंकटेश मुकतलवार आदी उपस्थित होते

Monday, November 13, 2017

 वरोऱ्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश

वरोऱ्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश

वरोरा/प्रतिनिधी:
 येत्या २०१९ च्या निवडणुकीचा मुहूर्त बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेन्याच्या पधाधिकाऱ्यानी कंबर कसणे सुरु केले असून आठवडाभर पहिले चंद्रपूर शहरात मनसेच्या नवीन ८ शाखांचे उदघाटन करण्यात आले.त्यापाठोपाठ वरोरा शहर तसेच सोईट, पाटाळा, चरुरखटी येथील शेकडो युवकांनी व शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मा.दिलीपभाऊ रामेडवार व राहुल बालमवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला

    चंद्रपूर जिल्ह्याच्या विद्यार्थी सेनेची सर्व विधानसभेची धुरा राहुल बालमवार व वरोरा मनसे तालुकाध्यक्ष पदी  राहुल खारकर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस  हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यात नियुक्त्याही करण्यात आल्या त्यापाठोपाठ आता पक्ष बळकटीसाठी माणसे ने सदस्य संख्या पढवण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलले आहे 

   येत्या काही दिवसात शाखा उदघाटन व आंदोलनाच्या माध्यमातून पक्ष वाढीस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनवीसे जिल्हासंघटक कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, आशिष पीजदूरकर, राहुल लोणारे, विशाल नागभिडकर, गणेश खापणे, नितीन टेकाम स्वप्नील राठोड व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.