चंद्रपूर/प्रतिनिधी:
कुंदन प्लाझा ते ऊर्जानगर रस्त्यावर दुर्मिळ सायाळ प्राण्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने ऊर्जानगर वसाहत मधील लोकांचा चर्चेचा विषय ठरला आहे,नेमके किती प्राणी ऊर्जानगर वसाहतीत च्या आवारात आहेत याला कळायला मार्ग नाही,ह्या भागात नेहमीच वाघ,बिबट,अस्वल असे दाट जंगलात आढळणारे प्राणी,आज ऊर्जानगर वसाहतीच्या आजूबाजूला सहज दिसत आहेत. सायाळ हा प्राणी आशिया खंडतात जवळपास सर्वत्र आढळतो,उष्णकटिबंधिय तसेच पानगळती वनांमध्ये त्याचे अस्तित्व दिसते,शेतात सुद्धा हा प्राणी बिळात राहतो.
सोमवारच्या रात्री कुंदन प्लाझा रस्त्यावरून जात असतांना हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटी,चंद्रपूर चे सदस्य श्री.केशव कुळमेथे यांना एक प्राणी रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत मृत अस्वस्थेत दिसला,शहानिशा केली असता,तो प्राणी सायाळ ह्या प्रजातीचा असल्याचे समजले,लगेच अपघाताची माहिती वनविभागाला दिली गेली,हा प्राणी दुर्मिळ असून त्याचा रंग काळा असून,पाठीच्या मागच्या भागावर असलेले केस विशिष्ट पद्धतीने विकसित झालेले असतात,ते केस कडक असल्याने ते काट्यासारखे काम करतात,ते केस काळ्या-पांढऱ्या रंगाचे असून,२५-३० सेंमी पर्यंत लांब वाढ होत असतात,जीवाला धोका असल्यास ती आक्रमक पणे स्वतःचे केस जे काट्याचे काम करते,ते काटेदार केस उभे करून करून,शिकारी प्राणी जवळ येत असल्याचे दिसल्यास विरुद्ध दिशेने वेगाने धावत जाऊन ते काटे त्याच्या शरीरात खुपसून परत समोर येते,हि प्रक्रिया इतक्या वेगाने होत असते कि सायाळ काटे आपोआप निघून शिकारी प्राण्यास लागतात असा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे,पण अस्तित्वात शिकारी प्राण्याच्या शरीराच्या आरपार काटे खुपसल्याच्या घटना जंगलात घडल्याचे छायाचित्र नेहमीच बघायला मिळतात,अश्या घटनेत वाघ,बिबट सुद्धा घायाळ केल्याच्या घटना जंगलामध्ये घडल्या आहे,सायाळ च्या , व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आव्हाहन करण्यात आले कि वाहने अतिवेगाने नेऊ नये,प्राणी जातांना दिसला कि वाहनाचा वेग हळू करून,त्यांना आधी रस्ता द्यावे, हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटी चे सदस्य पप्पी यादव,मोनू खोब्रागडे,कृपाल नाकाडे,हर्षल पिदूरकर,पिंटू उईके,सुरज डहाके,प्रणय मगरे,रविकिरण गेडाम, साईनाथ चौधरी, यांनी सहकार्य केले.