काव्यशिल्प Digital Media: जिओ

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label जिओ. Show all posts
Showing posts with label जिओ. Show all posts

Wednesday, January 24, 2018

 26 जानेवारीपासून पुन्हा एकदा मिळणार फ्री डेटा

26 जानेवारीपासून पुन्हा एकदा मिळणार फ्री डेटा

मुंबईएअरटेलनंतर आता रिलायन्स जिओने त्यांचे सगळे डेटाप्लॅन्स स्वस्त केले आहेत. तसंच रिलायन्स जिओने डेटाची मर्यादाही वाढविली आहे. जिओने प्रत्येक डेटाप्लॅनमध्ये 50 रूपयांची कपात केली आहे. याशिवाय हायस्पीड डेटाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढविली आहे. जिओच्या या विशेष ऑफर्स 26 जानेवारीपासून लागू होतील. रिलायन्स जिओ कंपनीकडून एका महिन्याचा अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा प्लॅन 98 रूपयांना दिला जाणार आहे. या प्लॅनमध्ये युजरला 2 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हायस्पीड डेटाची लिमिट पूर्ण झाल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन तो 64 केबीपीएस इतका होईल. 28 दिवसांसाठी हा प्लॅन असून याबरोबर ग्राहकांना जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन फ्री मिळेल. 
jio साठी इमेज परिणामजिओ 149 प्लॅन- जिओच्या 149 च्या प्लॅनमध्ये युजरला दररोज 1.5 जीबी हायस्पीड डेटा प्लॅन मिळेल. 1.5 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतर लिमिट कमी होऊन इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस होईल. याशिवाय युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. आधी या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळत होता. तसंच प्लॅनची किंमत 199 रूपये होती. डेटा प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल. 
जिओ 349 प्लॅन- जिओच्या 349च्या प्लॅनमध्ये दररोज युजर्सना हायस्पीड 1.5 जीबी डेटा मिळेल. दररोज मिळणाऱ्या डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस इतका मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल. तसंत जिओ अॅपचं सब्प्सक्रिप्शनही फ्री मिळेल. आधी या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा मिळत होता तसंच त्याची किंमत 399 होती. हा प्लॅन 70 दिवसांसाठी असेल.

जिओ 349 प्लॅन- जिओच्या 349च्या प्लॅनमध्ये दररोज युजर्सना हायस्पीड 1.5 जीबी डेटा मिळेल. दररोज मिळणाऱ्या डेटाची मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस इतका मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगही मिळेल. तसंत जिओ अॅपचं सब्प्सक्रिप्शनही फ्री मिळेल. आधी या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा मिळत होता तसंच त्याची किंमत 399 होती. हा प्लॅन 70 दिवसांसाठी असेल