সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 13, 2018

गडचांदूर शहराच्या विकासात्मक कार्याचा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचेद्वारा आढावा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 गडचांदूर शहराचा दिवसंेदिवस विस्तार होत असल्याने या शहराची व्याप्ती लक्षात घेवून शहर विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा तसेच गडचांदूर नगरपरिषदेने या शहरातील नागरी सुविधांबाबतच्या उणीवा दूर करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलावीत, येथील रस्ते, नाल्या व अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्धतेकरिता पाठपुरावा करावा याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी गडचांदूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीमध्ये दिले. 
दि. 11 जुलै रोजी गडचांदूर येथील दौ-यात ना. अहीर यांनी नगरपरिषदेच्या अधिकारी, पदाधिका-यांची बैठक बोलावून या बैठकीमध्ये गडचांदूरच्या विकासात्मक बाबींचा आढावा घेतला. न.प. द्वारा राबविण्यात येणा-या विविध विकास कामाची माहिती उपस्थित अधिका-यांकडून घेतली. यावेळी त्यांनी पालीका प्रशासनाच्या मोकळया जागेवर युवकांसाठी क्रीडांगण, बगीचा व ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी करण्या संबंधातील प्रस्ताव तयार करून शासनाद्वारा निधीची उपलब्धता करावी असे सुचविले. 
गडचांदूर शहरातील विद्यूत विषयक समस्या तसेच लगतच्या गावातील व तालुका स्तरावरील कृषिपंप जोडणीचा अनुशेष भरून काढण्याकरिता मराविवि कंपनीच्या अधिका-यांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी असे निर्देश मंत्राी महोदयांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले. गडचांदूरातील अनेक नागरिकांनी घरगुती मीटरकरिता डिमांड भरूनही त्यांना मीटरची उपलब्धता नसल्याचे कारणे सांगुन मीटर देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत स्थानिक अधिका-यांनी वरीष्ठ कार्यालयाकडे मीटरची मागणी नोंदवावी याबद्दल मराविवि कंपनीच्या मुख्य अभियंता तसेच अधीक्षक अभियंत्यांना सुचित केले जाईल असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. 
या बैठकीला गडचांदूरच्या नगराध्यक्ष सौ. विजयालक्ष्मी डोहे, शहर अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, विस्तारक सतिश दांडगे, जिल्हा महामंत्राी किसान आघाडी राजू घरोटे, नगरसेवक सतिश उपलेंचवार, भाजयुमोचे रोहन काकडे, मुख्याधिकारी जाधव, म.रा.वि.वि.कंपनीचे उपविभागीय अभियंता इंदूरकर, रमेश मालेकर, रऊफ शेख, रामसेवक मोरे, हरिभाऊ घोरे, महादेव एकरे, महादेव जयस्वाल, राकेश अरोरा, सत्यजीत शर्मा, पुरूषोत्तम निब्रड, संजय मुसळे, सुरेश बेसुरवार, किशोर बावणे, रक्षक भांदककर, संदीप शेरकी, शंकर आकुलकर यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.