काव्यशिल्प Digital Media: अहीर

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label अहीर. Show all posts
Showing posts with label अहीर. Show all posts

Tuesday, June 12, 2018

 अहीर यांनी मांडला 4 वर्षांच्या विकासात्मक कारकीर्दीचा आलेख

अहीर यांनी मांडला 4 वर्षांच्या विकासात्मक कारकीर्दीचा आलेख

चंद्रपूर/प्रतिनिधी:
केंद्रातील मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या 04 वर्षातील विकासात्मक उपलब्धींचा गोषवारा लोकांसमोर मांडण्यासाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी गोंडपिपरी व राजुरा या दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवुन नागरिकांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्रयांनी आपल्या 4 वर्षांच्या कारकीर्दीत मोदी सरकारने विविध कल्याणकारी तसेच विकासाभिमुख योजनांच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांमध्ये केलेला अभुतपुर्व विकास विरोधकांना व्यथित करणारा असल्याने विरोधकांनी लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न चालविला असुन विरोधकांचे हे प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी सज्ज होत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची, विविध क्षेत्रात होत असलेल्या विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन ना. अहीर यांनी केले.
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगांव, लाठी, सोनापूर (देश.), धाबा तसेच राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे.) या गावातील नागरिकांशी मंत्राी महोदयांनी संवाद साधत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची व विकासात्मक धोरणांची माहिती दिली. अवघ्या 04 वर्षामध्ये लोकांना अपेक्षीत असलेला विकास साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द पाळला आहे. मुख्यमंत्राी देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत महाराष्ट्राने विकासाच्या दिशेने झेप घेतली असतांना या विकास कार्याने व्यथीत झालेल्या विरोधकांनी लोकांची दिशाभुल चालविली असली तरी नागरिक या फसव्या अपप्रचाराला महत्व देणार नाही असा विश्वास व्यक्त करून केंद्रीय गृह राज्यमंत्रयानी ग्रामीण व शहरी लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना, जन धन योजना, सौभाग्य योजना व अनेक योजनांच्या माध्यमातून देशामध्ये समाजाभिमुख विकास होत असल्याचे सांगीतले. ज्यांनी अव्याहतपणे प्रदिर्घ सत्तेचा उपभोग घेतला. परंतू जनसामान्यांच्या प्रश्नांना कधीही समजुन घेतले नाही. लोकांच्या विश्वासाला सदैव तडा दिला अशा लोकांनी जनतेमध्ये भ्रम पसरवून सरकारच्या चांगल्या कामांना नख लावण्याचा प्रयत्न चालविला असला तरी अशा खोट्या व भ्रामक प्रचाराला नागरिक भीक घालणार नाही असा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्राी अहीर यांनी या संवाद कार्यक्रमातून व्यक्त केला.
या कार्यक्रमास राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रमुख खुशाल बोंडे, भाजपा जिल्हा सचिव अरूण मस्की, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, सतिश धोटे, तालुका अध्यक्ष सुनिल उरकुडे, किसान आघाडी जिल्हा महामंत्राी राजु घरोटे, गोंडपिपरी पं.स. सभापती दिपक सातपुते, गोंडपिपरीचे नगराध्यक्ष संजय झाडे, उपसभापती मनिष वासमवार, नगरसेवक राधेश्याम अडाणिया, जि.प. सदस्या वैष्णवी अमर बोडलावार, जि.प. सदस्या स्वाती वडपल्लीवार, विस्तारक सतिष दांडगे, मधुकर नरड, तोहगावचे सरपंच हंसराज रागीट, तिरूपती नल्लाला, किट्टी बावेजा, सतिष कोमडपल्लीवार, गोंडपिपरीच्या तहसिलदार श्रीमती. मिटकरी, गोंडपिपरीचे गट विकास अधिकारी श्री. मोहीतकर यांचेसह भाजपाचे तालुका पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी ना. अहीर यांनी नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या उपस्थित अधिकाÚयांद्वारा तालुक्यातील विकासकामांची माहिती जाणुन घेतली. विकासकामे कालबध्द कार्यक्रमानुसार गतीशीलतेने होण्याकरिता अधिकाÚयांनी व्यक्तीगत पातळीवर नियंत्राण ठेवावे अशा सुचना केल्या यावेळी संबंधीत गावातील नागरिक बहुसंख्येनी उपस्थित होते.

Monday, June 04, 2018

शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय  मिळेपर्यंत पाठपुरावा करणार:हंसराज अहीर

शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार:हंसराज अहीर

  प्रकल्पग्रस्त 52 गावांमध्ये सुविधा देणे,        प्रकल्पग्रस्तांना 5 ऐवजी 3 वर्षात नियमित, करणवंचित गावांना 15 लाखांची तत्काळ मदत,    28 गावांना शुध्द पाण्याचे एटीएम देणार,
·         अनुदानात वाढ, पगारात वाढ करण्याची मागणी,

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील जगप्रसिध्द महाऔष्णिक विद्युत केंद्र उभारणी ज्या 52 गावाच्या शेकडो शेतक-यांच्या जमिनी गेल्यात, त्या सर्वांचे दायित्व राज्य सरकार वेगवेगळया योजनेतून पार पाडत आहे. यामध्ये काही उणीवा राहिल्या असतील, तर शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी येथे शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या समक्ष केले. स्थानिक उर्जानगर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
 केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहिर  यांच्या पुढाकारात  चंद्रपरातील ऊर्जानगर  परिसरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांच्यातर्फे जिल्ह्यातील  औष्णिक वीज केंद्राच्या प्रकल्पग्रस्तांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक जबाबदारी व प्रकल्पग्रस्तांच्या योजना यांची माहिती देण्यासाठी  महाजनकोने  पुढाकार घेतला होता. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या 52 गावांचा सार्वत्रिक विकास, प्रकल्पग्रस्तांच्या सानुग्रहनिधी व पगारामध्ये वाढ प्रकल्पग्रस्तांना वेगवेगळया नियुक्तीवर नियमित करण्यासाठी 5 वर्षा ऐवजी 3 वर्षाचा कालावधी निश्चित करणे, 28 गावांमध्ये शुध्द पाण्याचे एटीएम उभारणे आदी मागण्यांसाठी आपण स्वत: उर्जामंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करु, असे प्रतिपादनही ना.अहीर यांनी यावेळी केले.
1977-78 मध्ये चंद्रपूर येथे उभारण्यात आलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या या प्रकल्पामध्ये 12 हजार 292 हेक्टर जमिन अधिग्रहीत करण्यात आली होती. जवळपास 52 गावातील जमीन संपादित करण्याचे काम त्यावेळी झाले होते. या प्रकल्पामुळे अनेकांना आपल्या जमिनी द्याव्या लागल्या होत्या. तत्कालीन राज्य शासनाने त्या वेळी आवश्यक ती मदत केली. मात्र अनेक प्रकल्पग्रस्तांना मदतीची अधिक अपेक्षा होती. याबाबत तक्रारी होत्या. त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना या मेळाव्यामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. राज्य शासनाने आतापर्यंत काय केले, राज्य शासन यापुढे काय करणार याची माहिती यावेळी मुख्य अभियंता जे.एच.बोबडे, राजेंद्र घुगे यांनी दिली. राज्य शासनाची प्रकल्पग्रस्त बद्दलची जी भूमिका आहे. ती मुंबई मुख्यालयातून आलेले कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे यांनी मांडली. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी या आयोजनामागील भूमिका विद करताना कोणत्याही प्रकल्पग्रस्ताला मागणीसाठी ताटकळत ठेवले जाणार नाही. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताला न्याय मिळण्याची व मिळून देण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्त, प्रगत कुशल कामगार व सानुग्रह निधीमध्ये वाढ करण्याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले. प्रकल्पग्रस्तांना सामहून घेण्यासाठी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी योजनेच्या निकषात बदल करणे, पात्र प्रकल्पग्रस्तांना सद्या 5 लाख रुपये एक रक्कमी मिळत असून त्यामध्ये भरीव वाढ करणे,  याबाबत शासन सकारात्मकपणे विचार करेल, असे त्यांनी आश्वस्त केले. महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे या ठिकाणी कागदपत्राची तपासणी व प्रकल्पग्रस्तांच्या नाव नोंदणीचा स्टॉल लावण्यात आला होता. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांना मांडण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त नागरिक, सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संबोधित केले. व्यासपीठावर उपमहापौर अनिल फुलझेले आणि मुख्य अभियंता जे.एच.बोबडे, राहूल सराफ, विद्याताई कांबळे, वनिताताई असटकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात 



 विसापूर येथील रेल्वे अंडरपास पुलाच्या बांधकामास मंजूरी

विसापूर येथील रेल्वे अंडरपास पुलाच्या बांधकामास मंजूरी

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
वर्धा-बल्लारशाह सेक्शन क्राॅसिंग गेट च्या फाटक क्र. 45 एसपीएल वर अंडरटाईप पुलाच्या बांधकामास वर्ष 2018-19 अंतर्गत रेल्वे मंत्रालयाने मंजूरी प्रदान केली असून या कामासाठीच्या निवीदा अंतिम टप्प्यात असुन या कामास लवकरच सुरूवात होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे मुंबई चे महाव्यवस्थापक बी.के. शर्मा यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना पत्राद्वारे अवगत केले आहे. 
विसापूर ग्रा.पं.चे सरपंच तसेच विसापूर वासीयांनी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांना निवेदन सादर करून अंडरपास पुलाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत ना. अहीर यांनी या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्रालयास पत्रा पाठवुन या ठिकाणी तातडीने अंडरटाईप रेल्वे पुलाचे बांधकाम करण्याची सुचना केली होती. 
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हे 15 हजार लोकसंख्येचे गाव मध्य रेल्वेच्या लाईनवर पूर्व, पश्चिम बाजुने वसलेला असून येथील नागरिकांना रेल्वे गेट मधून येणे-जाणे करावे लागत होते. त्यामुळे तीन रेल्वेलाईनमधुन मार्गक्रमण करतांना नागरिकांना कायम अपघाताची भीती होती व तशा दुर्घटनासुध्दा या ठिकाणी घडल्या होत्या. हा गंभीर प्रकार थांबविण्यासाठी या पुलाची अत्यावश्यकता असल्याची बाब केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर रेल्वे मंत्रालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या  निदर्शनास आणुन दिली होती. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेत या अंडरटाईप रेल्वे पुलास मान्यता प्रदान करून त्याच्या बांधकामासाठी कार्यवाही लवकरच सुरू होणार असल्याने विसापूरवासीय नागरिकांना या पुलामुळे येणे-जाणे करण्यास फार मोठी सोय उपलब्ध होणार आहे.


Thursday, May 10, 2018

हंसराज अहीर ठरले सर्वाधिक रेल्वे थांबे मिळवून देणारे एकमेव मंत्री

हंसराज अहीर ठरले सर्वाधिक रेल्वे थांबे मिळवून देणारे एकमेव मंत्री

चंद्रपूर/प्रतिनिधी:

रेल्वे प्रवशांच्या सोयी, सुविधांसाठी सातत्याने आग्रही राहुन या सुविधांची पुर्तता करण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार हंसराज अहीर यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्हयात अनेक रेल्वे गाडया सुरू झालेल्या आहेत. तसेच, अनेक सुपरफास्ट गाडयांचे थांबेही चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयात मंजुर करवून घेण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. सन मे 2014 ते मार्च 2018 पावेतो ना. हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही जिल्हयात 38 थांब्यांना मंजुरी मिळाली असून या थांब्यांवर
रेल्वे गाडया थांबत आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळातील केंद्रीय व राज्यमंत्र्यांपैकी सवार्धिक रेल्वे गाडयांचे थांबे मंजुर करवून घेणारे देशातील एकमेव मंत्री म्हणून ना. अहीर यांचे केंद्रीय स्तरावर नामांकन झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयातील नागरीकांकडून त्यांचे  सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या खासदारकीच्या कार्यकाळापासून जिल्हयातील रेल्वे प्रवाशांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ना. हंसराज अहीर सतत प्रयत्नशील राहीले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे चंद्रपूरच नव्हे तर यवतमाळ जिल्हयातील व लगतच्या गडचिरोली जिल्हयातील रेल्वे प्रवशांना रेल्वे विषयक सुविधा उपलब्ध झाले आहेत. चंद्रपूर व जिल्हयातील अनेक रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट तसेच अन्य रेल्वे गाडयांचे थांबे नव्हते त्याठिकाणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी थांबे मंजुर करून रेल्वे प्रवाशांना न्याय दिला आहे. त्यांनी आपल्या या कार्यकाळात अनेक नव्या रेल्वे गाडया सुरू करून चंद्रपूर, यवतमाळ तसेच गडचिरोली या जिल्हयातील विद्यार्थी, व्यवसायी, उद्योजक व नागरीकांना मोठी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या प्रवासीभीमूख कार्याबद्दल या सर्व जिल्हयातील
प्रवाशांबरोबरच रेल्वे सुविधा संघर्ष समिती, रेलयात्री संघटना द्वारा ना. अहीर यांचे वेळोवेळी आभार मानन्यात आले आहे. ना. अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून काझीपेठ - पुणे या सुपरफास्ट साप्ताहीक गाडीचे नुकतीच रेल्वे
डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सेवाग्राम एक्सप्रेस ला सुध्दा त्यांच्याय प्रयत्नांने वातानुकूलीत डब्यांची सुविधा उपलब्ध झाली होती.
या नामांकनात सर्वाधिक थांबे मिळवून घेणारे देशातील एकमेव मंत्री म्हणून ना. हंसराज अहीर यांची वर्णी लागली आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे या दोन्ही जिल्हयात अनेक स्थानकांवर रेल्वे थांब्याची मागणी केली असून या
थांब्यांनाही नजीकच्या कालावधीत मान्यता मिळेल असा विश्वास ना. हंसराज अहीर यांनी व्यक्त केला आहे.
------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 

Friday, May 04, 2018

चंद्रपुरात निवडणूकीच्या आचारसंहितेनंतर सुरु होणार दीनदयाल कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात

चंद्रपुरात निवडणूकीच्या आचारसंहितेनंतर सुरु होणार दीनदयाल कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सुरुवात

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या विशेष प्रयत्नातून चंद्रपूरात दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राची सुरूवात दि. 5 मे 2018 करण्यात येणार होती. चंद्रपूर व यवतमाळ जिल्हयातील गरीब विद्याथ्र्यांना अभिनव प्रशिक्षण तसेच रोजगाराच्या संधी मिळाव्या या संकल्पनेतून ना. हंसराज अहीर यांनी 100 टक्के शिष्यवृत्ती असणारे प्रशिक्षण केंद्राची सुरूवात दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून साकार करण्यासाठी पुढाकार घेत या प्रशिक्षण केंद्राची मुहूर्तमेढ दि. 5 मे रोजी ठरली असता विधान परिषदे निवडणुक आचारसंहीतेच्या कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या कार्यालयातून पत्राकाद्वारे देण्यात आली आहे. 
प्रशिक्षण इच्छुक ग्रामीण युवक, युवतींनी या योजनेसंदर्भात अधिक माहितीकरिता केंद्रीय गृहराज्यमंत्री  यांचे स्वीय सहायक रवि चावरे मो.नं. 9552597392/9923171698 अथवा राहुल बनकर 9422137086 यावर संपर्क साधुन आपले शैक्षणीक कागदपत्रे  व आवश्यक माहितीसह केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या  स्थानिक चंद्रपूर येथील कार्यालयास सादर करावे असे कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

Monday, April 09, 2018

मुद्रा बँकेचे कर्ज वाटप करतांना येणा-या प्रत्येक अर्जाची नोंद ठेवा:अहीर

मुद्रा बँकेचे कर्ज वाटप करतांना येणा-या प्रत्येक अर्जाची नोंद ठेवा:अहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:        
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, खरीप कर्ज वाटप व विविध योजनातून जिल्हयातील बँका, विविध मंडळे यांच्याकडून होत असलेल्या पतपुरवठा व त्यावर आधारीत राज्य व केंद्राच्या विविध योजनांचा आढावा केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी आज घेतला.
       या बैठकीला आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा व जिल्हयातील सर्व बँकाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी तालुकानिहाय बँकाचा आढावा घेण्यात आला. मुद्रा बँक योजनेच्या संदर्भात घेण्यात आलेला आढावा. यावर्षी मार्च अखरेपर्यंत 147.52 कोटी रुपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात आले आहे. या कर्जासाठी जिल्हाभरातून 17 हजार 510 लोकांनी अर्ज दाखल केले होते. लोकप्रतिनिधींकडे या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून स्वत: प्रधानमंत्री या योजनेबाबत अतिशय सकारात्मक असून बँकानी पतपुरवठा करतांना विनाकारण अटी व शर्ती घालू नये. कर्ज घेणा-या नागरिकांनी देखील अल्पदरातील कर्ज व्यवसाय सुरु करताच परत करावे. अन्य लोकांना देखील त्याचा फायदा मिळेल, असे सांगितले. यावेळी काही तक्रारींचा त्यांनी उल्लेख केला.  जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना बँकेने कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याचे तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून आले. मात्र हंसराज अहीर यांनी आज सर्व बँकेच्या अधिका-यांना तरुणांना बँकेतून परत पाठवू नका, कोणत्याही कारणासाठी मुद्रा बँक योजनेतून कर्ज नाकारु नका, पतपुरवठा करण्यासाठी कोणतीही अट नसून प्रत्येकाला कर्ज देता येईल, अशा पध्दतीने बँकेने तरुणांना मदत करावी, असे आवाहन केले.  तसेच उपजिवीका विकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या व्यवसायाचा आढावा त्यांनी घेतला. त्याचप्रमाणे जिवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वंय सहायता समुहाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या लघु उद्योगाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.

पीक कर्जाचा आढावा
यावेळी जिल्हयातील सर्व बँकांना पीक कर्ज वाटपाबाबत सूचना त्यांनी केली. कर्ज वाटपाच्या यशस्वी मोहीमेनंतर यावर्षीच्या पीक कर्ज वाटपाच्या हयगय होऊ देवू नये, याबद्दल त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. सन 2018-19 या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्हयाचा पीककर्जाचा 1036.26 कोटी रुपयांचे उद्दिष्ट  निश्चित केले आहे. सदर उद्दिष्ट सर्व बँकांना कळविण्यात आले असून बँकनिहाय पीककर्ज वाटपाची सूचना सर्व बँकांना देण्यात आली आहे.  बँकानी शेतक-यांना कर्ज वाटप करतांना हयगय करु नये, असेही त्यांनी सांगितले.

Saturday, March 31, 2018

कमल स्पोर्टींग क्लब च्या वतीने महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरण

कमल स्पोर्टींग क्लब च्या वतीने महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरण

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 कमल स्पोर्टींग क्लबचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर दि. 31 मार्च रोजी श्री महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहूल सराफ व कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 
या मसाला भात वितरण कार्यक्रमास भाजपा किसान आघाडीचे जिल्हा महामंत्री राजू घरोटे, भाजयुमोचे युवा नेते मोहन चैधरी यांचेसह राजेंद्र कागदेलवार, पूर्व नगरसेवक शंकर वाकोडे, महेश अहीर, शामल अहीर, विनय अहीर, अजेय अहीर, तेजा सिंह, राजेश वाकोडे, स्वप्नील मून, अभिनव लिंगोजवार, राहूल बोरकर, अरविंद जामुनकर, जितू शर्मा, मयुर झाडे, विपीन मेंढे, प्रविण वाकोडे, पियुष बुरांडे, जितू वासेकर, ललीत गुलानी यांचेसह कमल स्पोर्टींग क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 
कमल स्पोर्टींग क्लबच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरण करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले जात आहे. यंदाही कमल स्पोर्टींग क्लबने महाकाली यात्रेकरूंसाठी मसाला भात वितरण करून सामाजिक कार्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. 

Monday, February 05, 2018

ज्ञानवंतांनी समाजाच्या हितासाठी झटावे

ज्ञानवंतांनी समाजाच्या हितासाठी झटावे

चंद्रपूर/प्रतिनिधी: 


 माळी समाज हा परीश्रम घेणारा आहे. निर्मिती करणे हा या समाजाचा स्थायीभाव आहे. मेहनतीतून कार्य करून आपले उत्कर्ष साधणारा हा समाज इतरांपुढे आदर्श ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्राीबाई यांचा आदर्श डोळद्घासमोर ठेवून या समाजाने विविधांगी क्षेत्रास गवसणी घातली आहे. समाजाची आणखी प्रगती करण्यासाठी समाजातील ज्ञानवंतानी समाजाच्या उत्कर्षासासाठी झटावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी केले.
स्थानिक महात्मा ज्योतीबा फुले सांस्कृतिक सभागृहात क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ व अखिल भारतीय माळी समाज महासंघाच्या संयुक्त विद्यमाने सर्वशाखीय माळी समाज उपवर-उपवधू परिचय मेळावा रविवारी पार पडला. या मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश ठाकरे, क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, जि.प.च्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार, जि.प.चे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, महाराष्ट्र माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण तिखे, मंडळाचे माजी अध्यक्ष बबनराव वानखेडे, प्रभाकरराव बनकर, डॉ.संजय घाटे, नगरसेवक प्रशांत दानव, विजय चहारे, पांडूरंग गावतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, नगरसेविका वंदना तिखे, नगरसेविका शितल गुरनुले, लोनबले, संजिवनी चहारे, राजू बनकर, निलेश खरबडे, डॉ. मनोहर लेनगुरे, धनंजय दानव, विलास वानखेडे, माजी नगरसेवक रवि गुरनुले, भाजपा जिल्हा महामंत्री राहूल सराफ, राजेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते.
ना. अहीर पुढे म्हणाले शेती विकास, युवकांना प्रशिक्षण व कौशल्य विकास आदी विषयावर केंद्र व राज्य सरकार प्राधान्य क्रमाने कार्यरत आहे. व त्याचे चांगले परिणाम आपण अनुभवतो आहोत. शेवटच्या घटकांचा विकास हे सरकारचे धोरण असल्याने या घटकांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. मातीशी नाड जोडलेल्या व मातीशी नाते जपणाºया माळी समाज बांधवांनी या योजनांचा लाभ घेत उत्कर्ष साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ. शामकुळे यांनी उपवर-उपवधू मेळाव्याचे आयोजन हे बदलत्या काळाला व परिवर्तनशील विचाराला अंगिकृत करणारे लक्षण आहे. असे प्रतिपादन केले. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे, माळी समाज महासंघाचे पदाधिकारी व माळी समाजातील उपवर- उपवधू व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

Gyanwantas fight for the welfare of society | ज्ञानवंतांनी समाजाच्या हितासाठी झटावे