काव्यशिल्प Digital Media: जप्त

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label जप्त. Show all posts
Showing posts with label जप्त. Show all posts

Saturday, August 25, 2018

६०० पेटी दारू तस्करीतील मुख्य आरोपी गजाआड

६०० पेटी दारू तस्करीतील मुख्य आरोपी गजाआड

Image result for दारू पेट्या
संग्रहित छायाचित्र 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हयात दारूबंदी घोषित झाल्यापासुन पोलीस विभाग अवैध दारू तस्करांना वेठीस आणण्याकरीता अहोरात्र प्रयत्न करीत आहे. दिनांक 15/07/2018 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन नागभिड अंतर्गत दोन ठिकाणी अवैध दारू तस्करी बाबत कार्यवाही करीत दारू तस्करी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकुण 559 पेटी व 1000 देशी विदेशी दारूच्या निपा किंमत 76,08,670/-रू चा मुद्देमाल जप्त केला होता. सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन नागभिड येथे नोंद करण्यात आला होता. 
सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे श्रीनिवास कोलावार रा. पवनी जि. भंडारा हा गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार होता.स्थागुशा पथक त्याची सतत गोपनीय माहिती काढुन त्याचा पाठलाग करीत होते. आज दिनांक 25/08/2018 रोजी मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थागुशा पथक पवनी भंडारा  येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशा पथकाने सापळा रचुन त्यास पवनी जि. भंडारा येथुन अटक केली.श्रीनिवास कोलावार हा स्वतःच्या भट्टीत दारू तयार करीत असुन त्याच्याकडे दारू विक्रीचे दाेन परवाने त्याद्वारे तो  भंडारा जिल्हयातुन ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभिड आणि चिमुर या परिसरात माेठया प्रमाणात अवैध रित्या दारूचा पुरवठा करीत हाेता. यापरिसरातील सदर आराेपी हा मुख्य पुरवठादार आणि चंद्रपुर जिल्हयातील नाेंद गुन्हयातील फरार आराेपी असल्याने पाेलीस पथक याचे सतत मागावर हाेते.
सदर गुन्हयाचा तपास श्री. महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक चंद्रपुर, श्री. हेमराजसिंह राजपूत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्ग दर्शनात  स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोनिसुधाकर अंभोरे यांचे नेतृत्वात पोउपनि जितंेद्र वैरागडे, पोहवा संगीडवार, पोशी अविनाश दशमवार, अमजद, संदीप मुळे, मयुर येरमे यांनी पार पाडली. सदर आरोपीस पुढिल तपासाकरीता नागभिड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Thursday, April 05, 2018

प्लास्टिक बंदीनंतरही ५० किलो प्लास्टिक जप्त

प्लास्टिक बंदीनंतरही ५० किलो प्लास्टिक जप्त

चंद्रपूर/रोषण दुर्योधन: 
 राज्यात प्लास्टिक, थर्माकोलवर बंदी असतांना देखील चंद्रपूर शहरातील अनेक दुकानात प्लास्तीलचा वापर सर्हासपने केल्या जात असल्याचे आढळून आल्यावर गुरुवारी मनपा प्रशासनाने गुरुवारी शहरातील गोलबाजारातील दुकानदार, नागरिकांकडून सुमारे ५० किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केला महापालिकेची ही मोहीम कायम सुरू राहणार असून प्लास्टिकविरोधी मोहीम अधिक तीव्र होत जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त संजय काकडे यांनी दिला. 
 राज्य सरकारनेच १ महिना सवलत दिली असून त्यानंतर म्हणजे २३ एप्रिलनंतर प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांना दंड करण्यात येणार आहे. विकणारे व वापरणारे अशा दोघांनाही यात दोषी धरण्यात येणार आहे.  बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यासाठी स्वतंत्र पथकच स्थापन केले आहे. शहराच्या सर्व भागातून सध्या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे.
किरकोळ विक्रेत्यांकडूनही प्लॅस्टिकच्या पिशव्या जमा करण्यात येत आहेत. सरकारने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आदेशात अद्याप काही गोष्टींबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे काही माल कंपनीमधूनच प्लॅस्टिक पिशवीत बंद होऊन येतो त्याचे काय करायचे याबद्धल अद्याप स्पष्ट आदेश नाहीत, कदाचित तो माल थेट कंपनीमधूनच २३ तारखेनंतर बंद होईल असे दिसते आहे. कंपनीवरच सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता आहे असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. 
शहरातील कापड दुकानदार, मॉल्स यांच्याकडून ग्राहकांना सर्रासपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून माल दिला जातो. त्यासाठी पैसेही घेतले जातात. त्यांच्यावरही बंदी आहे, मात्र सध्या त्यांना व सर्वांनाच २३ एप्रिलपर्यंत त्यांच्याकडे असलेला साठा नष्ट करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र राज्यात सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर पुर्णपणे बंद करावाच लागेल, 
प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू वापरावर बंदी घालण्यात आली असून, दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील दुकानदारांना प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू वापरू नये असे आवाहन केले आहे. मात्र आजही अनेक दुकानांत प्लास्टिक, थर्माकोलचा वापर सुरू आहे. त्यामुळे आज स्वच्छता विभागाने गोल बाजारातील दुकानांची तपासणी केली. सुमारे ५० किलो प्लास्टिक, थर्माकोल जप्त केला.अधिकच्या माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केले असता संपर्क होऊ शकला नाही. 

Thursday, February 15, 2018

बियरसह ६५ पेट्या दारू जप्त ;एकाला अटक

बियरसह ६५ पेट्या दारू जप्त ;एकाला अटक


चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यात दारूबंदी असतांना देखील दोन वाहनातून विदेशी दारूची तस्करी करणाऱ्याला  रामनगर पोलिसांनी   जप्त केले आहे  पोलिसांनी बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास विवेकनरात ही कारवाई केली़ या प्रकरणात प्रदीप जयस्वाल याला अटक करण्यात आली़
विवेकनगरातील प्रदीप जयस्वाल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दारुची उलाढाल होणार असल्याची गुप्त माहिती    रामनगर पोलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने प्रदीप जयस्वाल यांच्या राहत्या घरी छापा मारला त्यात जयस्वाल यांच्या घरी असलेल्या दोन चार चाकी गाड्यांची झडती घेतली. त्यात बियरसह ६५ पेट्या दारू जप्त करण्यात आली असून, एमएच ३१/ईए ३७५४, एमएच ३४/एए १३७८ ही दोन वाहने असा एकूण २३ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे ठाणेदार दीपक गोतमारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नेतृत्वात प्रमोद कोटनाके, राकेेश निमगडे, नीलेश मुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली़

Tuesday, February 13, 2018

चंद्रपुरात ब्रॅण्डेड विदेशी दारूसाठा जप्त

चंद्रपुरात ब्रॅण्डेड विदेशी दारूसाठा जप्त

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्ह्यात दारूबंदी असतांना देखील विविध छुप्या मार्गाने दारूची तस्करी केल्या जात आहे,अश्याच पद्धतीने दारू आणणाऱ्या एका स्वीफ्ट डिझायर गाडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली आहे
नागपूरहून एम.एच.०२ बी.आर.१२६७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने ब्रॅण्डेड कंपनीच्या विदेशी दारू चंद्रपुरात आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक वैरागडे यांच्या नेतृत्त्वातील चमूने जगन्नाथबाबा नगर परिसरात नाकाबंदी करून नागपूरहून येणाऱ्या एम.एच.०२.बी.आर.१२६७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता तपासणीत वाहनात अ‍ॅन्टीक्युटी, मॅकडॉल, पोर्ट वाईन या ब्रॅण्डेड कंपनीसह व अन्य कंपन्यांचा दारूसाठा आढळून आला.
यात १७ बॉक्समध्ये १२० बॉटल्स होत्या.पोलिसांनी दारूसाठा आणि चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन चालकाविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असुन दोघे फरार आहेत.