शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना मालमत्त
कराची माफी पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दृष्ट सत्ताधारी आणि भ्रष्ट सत्ताधारी कविता सभागृहात वाचवून दाखवतांना प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख |
मौजा दे.गो. तुकूम मधील 8 जागेवरील आरक्षण काढण्याचा विषय आज आमसभेमध्ये आला होता. यावर वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मुद्द्याला धरून आमसभेत प्रश्नांची सरबत्ती केली.वडगाव प्रभागामध्ये सुद्धा अनेक जमिनीवर आरक्षण आहेत. आरक्षण असलेल्या जमिनीवर रहिवाशी घरे झालेली आहेत. शासनाच्या नियमानुसार 50 टक्केपेक्षा जास्त घरे झालेली असताना व आरक्षणाची गरज नसल्यास अशा प्रकारचे आरक्षण काढण्याची तरतूद आहे.असे पप्पू देशमुख यांचा आमसभेत सांगितले.
या तरतुदीचा वापर करीत मौजा दे गो. तुकुम मधील आरक्षण काढण्याचा विषय महासभेमध्ये घेण्यात आला.मग वडगाव प्रभागात सोबत दुजाभाव का करण्यात येत आहे,वडगाव प्रभागातील नागरिक गुंठेवारीसाठी चकरा मारत आहेत. अशा वेळी वडगाव प्रभागांमधील ट्रक टर्मिनल व इतर आरक्षण जिथे 50 टक्केपेक्षा जास्त निवासी घरे झाली,ही आरक्षणे काढण्याचा विषय का घेण्यात आला नाही.हा वडगाव प्रभागावर अन्याय असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी आमसभेत केला.तसेच वडगाव प्रभागातील गुंठेवारीची आरक्षणे काढण्याचा विषय घेतल्याशिवाय इतर विषयांना स्थगिती द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर बराच वेळ गदारोळ झाला यानंतर वडगाव प्रभागातील पात्र प्रकरणे आरक्षण काढण्यासाठी घेण्यात येतील असे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.
आमसभेमध्ये माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात आली.मागील आमसभेमध्ये प्रहार चे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हा विषय लावून धरला होता. त्यामुळे या आमसभेत अजेंड्यावर चर्चेमध्ये हा विषय घेण्यात आला होता.आमसभेत सर्वानुमते माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र त्याच वेळी गोवा स्वातंत्र्य लढ्यातले शहीद बाबूराव थोरात यांच्या वारसदाराला टॅक्स माफी देण्याच्या मुद्द्यावरून पप्पू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विशेष म्हणजे शहीद बाबूराव थोरात यांच्या कुटुंबीयांना टॅक्स माफी देण्याचा ठराव चंद्रपूर नगरपालिकेमध्ये घेण्यात आला होता.या ठरावानुसार मागील अनेक वर्षांपासून बाबूराव थोरात यांच्या कुटुंबियांना मालमत्ता करातून सूट देण्यात येत होती.२०१८ मध्ये महानगरपालिकेने शहीद थोरात यांच्या मुलाला ४०००० मालमत्ता कर पाठविला .याबाबत सभेमध्ये मुद्दा उपस्थित करून शहीद थोरात यांच्या कुटुंबियांना पूर्ववत मालमत्ता करमाफी सुरू ठेवण्याची मागणी देशमुख यांनी केली. यावर सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्वासन महापौरांनी दिले.