সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, April 30, 2011

सेलिब्रिटीं'च्या साक्षीने 773 जोडपी विवाहबद्ध

सेलिब्रिटीं'च्या साक्षीने 773 जोडपी विवाहबद्ध

Friday, April 29, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: marriage, celebrities, chandrapur, vidarbha

चंद्रपूर, : सामूहिक विवाहसोहळे सामाजिक जाणिवेतून घेतले जात असले, तरी ते "उरकून' टाकण्यावरच आयोजकांचा भर असतो. मात्र, कॉंग्रेसचे चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतलेला सर्वधर्म सामूहिक विवाहसोहळा प्रत्येकाला आपल्या घरचा मंगलसोहळा वाटावा असाच ठरला. लाखो वऱ्हाड्यांची उपस्थिती, उंट-घोड्यांवरून निघालेली वरात, श्रीमंत आयोजन, त्यावर सिने कलावंतांचे दर्शन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती, या साऱ्यांमुळे हा विवाहसोहळा प्रत्येकाच्या मनात घर करून गेला.
आमदार विजय वडेट्टीवार बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे गुरुवारी (ता. 28) सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठपासून राममंदिर चौकातून नवरदेवांची मिरवणूक निघाली. नवरदेवांना विवाहस्थळी आणण्यासाठी उंट व घोडे यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अनेक नवरदेव ट्रॅक्‍टरमधूनही आले.
सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळ्याचे विधिवत उद्‌घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्याचे समाजकल्याणमंत्री शिवाजीराव मोघे, रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री संजय देवतळे, ऊर्जाराज्यमंत्री राजेंद्र मुळक, खासदार अविनाश पांडे, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आमदार आनंदराव मडावी, आमदार दीपक आत्राम, आमदार सुभाष धोटे, डॉ. रजनी हजारे, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष नंदा अल्लुरवार, चंदू पाटील मारकवार, रवींद्र दरेकर, ऍड. दिगंबर गुरपुडे यांची उपस्थिती होती. मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणून "नटरंग' चित्रपटातील "अप्सरा' सोनाली कुळकर्णी, अभिनेते असरानी, हास्यकलावंत सुनील पाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्प त्वरित नियोजन करून पूर्णत्वास न्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांनी शासनाच्या भरवशावर राहण्यापेक्षा सामूहिक विवाहात सहभागी व्हावे. लग्नासाठी कर्जबाजारी होऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी पालकमंत्री संजय देवतळे यांनीही वरवधूंना आशीर्वाद दिला. मान्यवरांच्या भाषणानंतर सुरवातीला बौद्ध धार्मिक पद्धतीने धम्मवंदना देण्यात आली. त्यानंतर हिंदू पद्धतीने मंगलाष्टके झाली. शेवटी मुस्लिम पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. विवाहसोहळ्यानंतर वरवधूंसाठी लकी-ड्रॉ सोडत काढण्यात आली. यात प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बैलबंडी किंवा 25 हजार, तृतीय फ्रीज, चतुर्थ एलसीडी टीव्ही, पाचवे बक्षीस सोफासेट आदी भेट देण्यात आले. वधूवरांना घड्याळ, ब्रिफकेस, मंगळसूत्रे, वॉटर फिल्टर भेट स्वरूपात देण्यात आले. वधूंना राहण्यासाठी जनता ज्युनिअर कॉलेज, तर वरांची व्यवस्था जनता कन्या विद्यालयात करण्यात आली होती. या सोहळ्याकरिता अडीच लाख स्क्वेअर फुटांमध्ये भव्य शामियाना उभारण्यात आला होता. दीड लाख स्क्वेअर फूट जागेत वऱ्हाड्यांच्या भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. बसस्थानक ते विवाहमंडपादरम्यान जागोजागी पाणपोईची व्यवस्थाही होती. या मेळाव्यात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यांतील जोडप्यांसह त्यांचे 35 हजार नातलग उपस्थित होते.

घरगुती लग्नामुळे अनाठायी खर्च होतो. तो टाळण्यासाठी सामूहिक विवाहसोहळे हा चांगला पर्याय आहे. शासन त्याला आर्थिक मदत करीत आहे. अशा सोहळ्यांमुळे विविध धर्माचे लोक एकत्र येऊन स्नेह वृद्धिंगत होते. पूर्व विदर्भाला निसर्गाची साथ लाभत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. झुडपी जंगलामुळे अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहेत. विदर्भातील 92 हजार 500 हेक्‍टर झुडपी जंगलाचा पर्यायी वनजमीन म्हणून विकास करण्यात येईल. तसेच सिंचन, नागरी सुविधा पुरविण्यात येतील.


- पृथ्वीराज चव्हाण




असरानी म्हणाले "अटेन्शन!'
"रामराम, नमस्कार' म्हणत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते असरानी यांनी विवाहसोहळ्याला उपस्थित वऱ्हाड्यांची मने जिंकली. "आधे इधर जाओ, आधे उधर जाओ और बाकी के सब वडेट्टीवार के पिछे आओ..' म्हणताच गर्दीतून हास्यकल्लोळ उठला. यातच "अटेन्शन' म्हणताच सर्वत्र शांतता पसरली.



अप्सरा म्हणाली, "मला जाऊ द्या ना घरी..'
विवाहसोहळा आटोपल्यानंतर व्यासपीठावरून परत जाण्यासाठी निघालेली अप्सरा ऊर्फ सोनाली कुळकर्णी हिला तिच्या चाहत्यांनी घेरले. कशीबशी ती वाहनापर्यंत गेली. मात्र, अवतीभोवती चाहत्यांचा गराडा होता. "मला जाऊ द्या ना घरी' म्हणणाऱ्या अप्सरेला अखेर पोलिसांची मदत घ्यावी लागली.

Saturday, April 23, 2011

आदिवासी महिलांच्या सुधारित शेतीने दिलीय भात उत्पादकांना प्रेरणा

आदिवासी महिलांच्या सुधारित शेतीने दिलीय भात उत्पादकांना प्रेरणा

Monday, April 18, 2011 AT 12:00 AM (IST)
महाराष्ट्र - आंध्र प्रदेश सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्‍यातील सोनापूर देशपांडे या गावातील महिला शेतकऱ्यांनी एसआरआय पद्धतीने म्हणजे सुधारित पद्धतीने भाताची शेती करीत स्वतःचा त्याचबरोबर गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. सेंद्रिय शेतीवर भर दिल्याने त्यांनी पिकविलेल्या भाताला दरही चांगला मिळाला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने व कृषी विभागाच्या सहकार्याने या महिला शेतकऱ्यांनी परिसरातीलही अनेक गावांच्या प्रगतीला चालना दिली आहे.



महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर गोंडपिपरी तालुक्‍यातील सोनापूर देशपांडे हे एक हजार लोकसंख्येचे गाव असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. सोनापुरात आदिवासी समुदायातील लोकांची संख्या अधिक आहे. प्रौढ महिलांची संख्या सुमारे 175 आहे. सुमारे पाच वर्षांपासून संपूर्ण तालुक्‍यावर मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे सावट आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचा जोरदार फटका बसला आहे. सोनापूरची परिस्थिती काही वेगळी नव्हती. शेतीचा मुख्य हंगाम संपल्यानंतर येथील महिलांना रोजगारासाठी अन्यत्र जावे लागायचे. प्रसंगी परजिल्ह्यांमध्येही कामाचा शोध घ्यावा लागायचा. अशा संकटकालीन परिस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला.



इथल्या भात शेतीत महिलांचा सहभाग वाढविणे व त्यातून त्यांच्या शेतीचा तसेच कुटुंबाचा विकास साधणे हा उपक्रम सुरू केला. त्यातून गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी बचत गटांची स्थापना केली. हळूहळू महिला ंचा सहभाग अधिक वाढू लागला. गावात एकूण चौदा बचत गट निर्माण झाले. यात संबंधित महामंडळाचे सहा गट आहेत व त्यात 66 महिलांचा समावेश आहे. या महिलांना महामंडळाने कृषी विभागाच्या सहकार्यातून भाताच्या एसआरआय पद्धतीचे प्रशिक्षण दिले. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर दिला. प्रात्यक्षिकांवर भर दिला. त्यातून महिला वर्गात प्रचंड आत्मविश्‍वास निर्माण झाला.

कृषी सहायक प्रफुल्ल तावाडे, संतोष कोसरे, "माविमा'च्या तालुका व्यवस्थापक सीमा इंगोले, सपना भगत आदींनी यासाठी पुढाकार घेतला. सेंद्रिय शेतीचा वापर करण्यासाठी त्यांनी गावात जनजागृती केली. महिलांना माती परीक्षण, गांडूळ युनिट उभारणे, रोपवाटिका तयार करणे या गोष्टी शिकवताना रोवणी केलेल्या धान्याचे पीकही दाखविण्यात आले. कोणत्याही नव्या प्रयोगांची अंमलबजावणी करताना विरोध हा होतोच. सोनापुरातील काही लोकांनीही सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनावर अविश्‍वास दाखवत विरोध व्यक्त केला. एसआरआय पद्धतीत बियाणे प्रमाण कमी लागत असल्याने उत्पादन अपेक्षित मिळणार नाही याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. यामुळे महिलांत सुरवातीला नैराश्‍य आले, पण दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शेती पिकलीच नाही असे समजून सुरवातीला एक एकर शेतीत हा प्रयोग करण्याचे ठरले. गावातील 31 महिलांनी प्रेरणा घेत आपल्या एक एक एकर शेतीत हा उपक्रम राबविला. यानुसार सेंद्रिय प्रयोगासाठी 18.40 हेक्‍टर क्षेत्र निवडण्यात आले. श्री. तावाडे यांनी तांत्रिक मार्गदर्शन करताना शेतीची पूर्वमशागत, बियाणे घेताना घ्यावयाची काळजी, त्याची उगवणक्षमता चाचणी, बीजप्रक्रिया, रोपवाटिका, एसआरआय पद्धतीने लागवड, पाणी नियोजन, आंतरमशागत, सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर, मित्रकीटक व शत्रूकीटक यांची प्रत्यक्ष शेतावर ओळख करून देणे आदी गोष्टी महिलांना शिकवल्या. तसेच निंबोळी अर्काचा वापर, दशपर्णी अर्क तयार करणे, गांडूळ खते, व्हर्मिवॉश, पीक कापणी, काढणी व पिकाची साठवणूक करणे आदी गोष्टींबाबतही प्रशिक्षित करण्यात आले. कोनोविडरचा वापर करून तणनियंत्रण करण्यात आले. आदर्श पीक व्यवस्थापनाचा अवलंब केल्याने उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनवाढ होण्यास मदत झाली. ज्या शेतात एकरी पाच ते सात क्विंटल उत्पादन व्हायचे तिथे एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळाले. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही प्रयोगात आलेल्या निष्कर्षांचे आश्‍चर्य वाटले व ही पद्धत किफायतशीर असल्याची त्यांनी मनोमन खात्री पटली.



एसआरआय पद्धतीमुळे बियाण्यात बचत होतेच. शिवाय पाणी, खते, मजुरी यांच्या वापरात पर्यायाने खर्चात बचत होते. त्याचबरोबर उत्पादनवाढही होण्यास मदत होते. सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्याने रासायनिक अंश कमी करण्याच्या अनुषंगाने भाताची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न झाला. बचत गटाच्या महिलांकडून गावातील अन्य महिलांनीही या सुधारित शेती पद्धतीची माहिती घेत त्यांच्या वाटेने जाणे पसंत केले. सोनापूर गावाने केलेल्या परिवर्तनशील प्रयोगामुळे परिसरातील अनेक गावांना नवी चालना मिळाली.



बेबीताईंची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

सोनापूर देशपांडे गावातील 30 वर्षीय बेबीताई धनंजय चौधरी या महिलेचे गावातील या शेती परिवर्तनात मोठे योगदान आहे. बेबीताईंनीच सर्वप्रथम सुधारित आणि सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना संघटित केले. त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. घरातून, गावातून विरोध होऊनही कुणालाही न जुमानता गावात सुधारित शेतीबाबत जागृती करण्यात त्यांचे काम महत्त्वाचे ठरले आहे. शेतीसोबतच ग्रामविकासासाठी बेबीताईंनी स्वतःच्या बचत गटातून 6000 रुपये देऊन व प्रति कुटुंब 500 रुपये वर्गणी जमा केली. त्यातून प्रत्येकाच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या साह्याने उपलब्ध केली. गावात माविमा मित्रमंडळाची स्थापना करून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले. सोनापूरसारख्या अ तिदुर्गम भागात राहून बेबीताईंनी बचत गटाच्या माध्यमातून विकासाचा व परिवर्तनाचा झेंडा रोवला. त्यांच्या या यशोगाथेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. रोम येथील ऑयफॉड इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट यांच्या आगामी वार्षिकांकात बेबाताईंच्या यशोगाथेची विशेष स्टोरी प्रकाशित होणार आहे. यामुळे सोनापूर देशपांडे या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रोम (इटली) येथील आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी या कृषी क्षेत्रातील संस्थेच्या पथकाने गावाला भेट देऊन गावात घडलेल्या यशकथेची दखल घेतली आहे.

- प्रफुल्ल तावडे, 9403785167

- कांता मिश्रा, 9420188331



ठळक नोंदी

- सुमारे 18.40 हेक्‍टर शेतातून महिलांनी एसआरआय पद्धतीचा वापर करून एकरी 15 क्विंटल याप्रमाणे 690 क्विंटल भाताचे उत्पादन केले. सद्य परिस्थितीतील भाताचा दर 1100 रुपये प्रति क्विंटल आहे; मात्र सें द्रिय पद्धतीतून महिलांनी पिकविलेल्या भाताला तब्बल 1500 ते 1700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गावातच धान्य विक्रेत्याने या महिलांकडून धान्य विकत घेतले.

- विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी झालेल्या एका प्रदर्शनात सोनापूर देशपांडे येथील महिलांनी पिकविलेल्या तांदळाला साठ रुपये प्रति किलो एवढा विक्रमी भाव मिळाला.



बचत गटांद्वारे महिला घेताहेत आघाडी

बोर्डा हे गाव चंद्रपूर जिल्ह्यापासून 26 कि.मी. अंतरावरील आदिवासी गाव आहे. येथे महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापित 11 बचत गट आहेत. त्याअंतर्गत महिला सक्षमीकरण समिती स्थापन करण्यात आली. त्याद्वारे सुरवातीला गाव सभा घेऊन त्यांना एसआरआय पद्धतीने भात लागवड महिला करू शकतील काय या मुद्यावर चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे गावातील 33 महिला तयार झाल्या. त्यांनी एक एकर क्षेत्रावर हा प्रयोग नक्कीच करू असा आत्मविश्‍वास दिला. त्यानंतर माती परीक्षण, त्यासाठी मातीचे नमुने कसे घ्यावे, एसआरआय पद्धतीने भात लागवड म्हणजे काय हे महिलांना प्रात्यक्षिकाद्वारे पटवून देण्यात आले. महामं डळाच्या मार्गदर्शनातून महिलांना शेती अवजारे देखील पुरवण्यात आली. डिझेल इंजिन, फवारणी पंप, कोनोवीडर आदींचा त्यात समावेश होता. गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले. त्याकरिता गावामध्ये शेतीशाळा घेण्यात आली. शेतीचा मुख्य हंगाम संपल्यानंतर येथील महिलांना कामासाठी भटकंती करावी लागायची. वेळप्रसंगी परजिल्ह्यात जावे लागायचे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता गावातच त्यांना रोजगार उपलब्ध झाला असल्याची प्रतिक्रिया या प्रकल्पातील भारती वासेकर यांनी दिली आहे. सावली तालुक्‍यातील बोथली हे गाव. गावात रमाबाई महिला स्वयंसाह्यता गटाची फेब्रुवारी 2010 ला स्थापना झाली. गटात दहा सभासद आहेत. या गावात ऑक्‍टोबर 2003 मध्ये समृद्धी नावाचा गटही स्थापन झाला आहे. त्याच्या तुलनेत रमाबाई गटाची कमी कालावधीत प्रगती झाली आहे. या गटाने दोन दिवसांचे गांडूळ खत प्रशिक्षणही पूर्ण केले.

Thank you.

Your Comment will be published after Screening.

Wednesday, April 20, 2011

अधिकाऱ्यांनी घेतले तालुके "दत्तक'

अधिकाऱ्यांनी घेतले तालुके "दत्तक'

सकाळ वृत्तसेवा

Wednesday, April 13, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: chandrapur, officer, vidarbha

चंद्रपूर - ग्रामीण भागांतील मजुरांना मुबलक काम मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी तालुके दत्तक घेतले आहेत. जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्याकडे सिंदेवाहीची जबाबदारी आहे.
राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 305 कामांवर 24 हजार 168 मजूर कामाला आहेत. दरम्यानच्या काळात रोजगार हमी योजनेनुसार कामेच उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मजुरांनी केल्या. शिवाय स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून कामाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. या कामात गती यावी आणि मजुरांना नियमित काम उपलब्ध व्हावे, यासाठी मुख्य सचिवांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना तालुके दत्तक घेऊन जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रोजगार हमीच्या कामासाठी अधिकाऱ्यांना तालुके दत्तक दिले आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांकडे सिंदेवाही तालुका आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे यांच्याकडे मूल, उपजिल्हाधिकारी दामोधर नाने यांच्याकडे गोंडपिंपरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नामदेव वटी यांच्याकडे पोंभूर्णा, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे कोरपना, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राठोड यांच्याकडे ब्रह्मपुरी, वरोऱ्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी उमेश काळे, नागभीडची उपविभागीय अधिकारी संदूरवार, राजुरा मेश्राम यांच्याकडे, तर सावलीची जबाबदारी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर यांच्याकडे आहे. तालुक्‍याचे पालक या नात्याने संबंधित अधिकाऱ्यांना कामाची पाहणी करणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडून कामाला मान्यता मिळवून देणे, तांत्रिक मान्यता घेणे आदी कामे आहेत. जिल्ह्यात सध्या 305 कामे असून, यात पांदण रस्ते, साठवण तलाव, कृषी विहीर पुनर्भरण, मजगी शेततळे, जलसंधारण आणि सिंचन विभागातील कामे करण्यात येत आहेत.



कामांत गती
मागील आठवड्यापर्यंत कोरपना तालुक्‍यात एकही काम नव्हते. मात्र, तालुका दत्तक दिल्यापासून कामात गती आली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभू राजगडकर यांनी दोनदा बैठका घेऊन दोन कामे सुरू केली आहेत. शिवाय सिंदेवाही, ब्रह्मपुरीतही गती आली आहे.

पावित्र्य कायम; गर्दी घटली

पावित्र्य कायम; गर्दी घटली

देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, April 14, 2011 AT 12:00 AM (IST)

Tags: chandrapur, vidarbha, mahakali devi

चंद्रपूर - महाकालीदेवीवर अपार श्रद्धा ठेवणारे भाविक लाखोंच्या संख्येत आहेत. मात्र, येथील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे मागील शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेतील गर्दी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. धर्मशाळा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हा अपवाद सोडला, तर कोणतीही नवी व्यवस्था येथे करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन नवे काही करण्यास पुढाकार घेताना दिसत नाही.
महाकाली ही विदर्भातील अष्टशक्तिपीठांपैकी एक आहे. चंद्रपूरचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. देवी महाकालीच्या मंदिराचे बांधकाम 1704 ते 1719 च्या काळात पूर्ण झाले. भिंतीवरील शिल्प गोंडकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना होय.

यात्रेला प्रारंभ

भोसलेंच्या काळापासूनच येथे यात्रा भरण्यास सुरवात झाली. मात्र, दरोडेखोरांमुळे शहरात अशांतता निर्माण व्हायची. त्यामुळे भोसले सरकारने यात्राच बंद केली. 20 मे 1818 मध्ये चंद्रपूर इंग्रजांनी आपल्या ताब्यात करून घेतले. 1905-06 च्या आसपास यात्रेला पुन्हा सुरवात झाली. यात्रेत नांदेड, परभणी, उस्मानाबाद, माहूर आणि आंध्रप्रदेशातील भक्त मोठ्या संख्येने येतात.



मंदिरातील व्यवस्था

महाकाली मंदिर व्यवस्थापनाने पाच हजार चौरस फूट जागेत चार मजली धर्मशाळा निर्माण केली आहे. दोन हजार चौरस फुटांचे सभागृह आहे. त्यात निःशुल्क निवासव्यवस्था आहे. मात्र, ती अपुरी पडत असल्याने यात्रेकरू तंबू ठोकून, झाडाच्या आडोशाने, पाण्याच्या टाकीखाली रात्र काढतात. ही यात्रा उन्हाळ्यात भरत असल्याने दिवसभर अंग भाजून निघते. परिसरातील घरांमध्ये विसावा मागितल्यास प्रतिव्यक्ती 100 ते 50 रुपये मागितले जातात. 40 खोल्यांची एक धर्मशाळा सोडली, तर थांबण्याची व्यवस्था कुठेच नाही. या धर्मशाळेची क्षमता केवळ दोन हजारांची आहे. म्हणजे यात्रेकरूंच्या तुलनेत एक टक्काही नाही. धर्मशाळेची स्वच्छता राखण्यात भाविकांकडून सहकार्य मिळत नाही. स्वयंपाकासाठी जागा उपलब्ध करून दिलेली नाही. थोडीशी जागा मिळाली की, गोट्यांची चूल मांडून भाविकांचे जत्थे स्वयंपाकास बसतात. अशातच उरलेले शिळे अन्नही कुठेही फेकून दिले जात असल्याने दुर्गंधी पसरते.

50 हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्‍या असून, मंदिर परिसरात काही ठिकाणीच नळ लावण्यात आले आहेत. मंदिरानेही स्वतःची यंत्रणा उभारली. पण, भाविकांची संख्या पाहता ही व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. शिवाय या नळातून मिळणारे पाणी गरम असते. यात्रेला शहरीकरणाचा धोका निर्माण होत आहे. मंदिर परिसरात असलेल्या मोकळ्या जागा झपाट्याने काबीज केल्या जात आहेत. येत्या पाच-सात वर्षांत या रिकाम्या जागा पूर्णपणे भरण्याची शक्‍यता आहे. एक दसरा मैदान सोडले, तर दुसरे सुरक्षित ठिकाण नाही. आता काही मोकळ्या जागांवर मंदिर व पालिका प्रशासनातर्फे मंडप टाकून भाविकांना थांबण्याची व्यवस्था केली जाते. पण, या जागा भरल्यावर कुठे व्यवस्था करणार, हा प्रश्‍न प्रशासन नजरेआड करीत आहे. भाविकांना धर्मशाळेसारख्या इमारती बांधून स्थायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. दरवर्षी कोट्यवधींचा धर्मार्थ निधी येथे गोळा होतो. मात्र, सुधारणा करण्यात आलेली नाही.
महाकाली यात्रा आणि समश्या

महाकाली यात्रा आणि समश्या

माता महाकालीवर अपार श्रद्धा ठेवून हजारो भक्तगण दरवर्षी यात्रेनिमित्त चंद्रपुरात दाखल होतात आणि तिच्या चरणी नतमस्तक होऊन गावाकडे परततात. येथे येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न होतो. मात्र, हा नुसता देखावा असून, येथे येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांना सामना करावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे.


विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी महाकालीचे देवस्थान एक महत्वाचे शक्तिपीठ आहे. चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेत नांदेड, परभणी, उस्मानाबाद, माहूर आणि आंध्र प्रदेशातील भक्त मोठय़ा संख्येने येतात. लाखोंच्या संख्येने येणारे भाविक कसे राहतात, कुठे झोपतात, कुठे खातात, कोणते पाणी पितात याच्याशी कुणालाच काही सोयरसुतक नाही. केवळ एक परंपरा म्हणून ही जत्रा भरते. मात्र, जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन नवे काही करण्यास पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे येथील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे मागील शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेतील गर्दी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. केवळ धर्मशाळा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हा अपवाद सोडला, तर कोणतीही नवी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

मंदिर व पालिका प्रशासनातर्फे मंडप टाकून भाविकांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, नुकत्याच झालेल्या अकाली पावसाने तंबू उडून गेले. वादळामुळे काही ठिकाणचे मंडप फाटले. पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचे अन्नधान्य भिजले. त्यामुळे वेळेवर काही भाविकांनी दुकानातून विकत घेतलेल्या खाद्यान्नावर भूक भागवली. यात्रा परिसरात घाणीचे साम्राज्य, दूषित पाणी असून, भाविकांना राहण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. वादळवारा आणि अकाली पावसामुळे भाविकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मात्र, याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. महाकाली मंदिर व्यवस्थापनाने पाच हजार चौरस फूट जागेत चार मजली धर्मशाळेचे निर्माण केले आहे. दोन हजार चौरस फुटांचे सभागृह आहे. त्यात नि:शुल्क निवास व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तीसुद्धा अपुरी पडत असल्याने यात्रेकरू तंबू ठोकून, झाडाच्या आडोशाने, पाण्याच्या टाकीखाली रात्र काढताना दिसतात. कडक उन्हाळ्यात ही यात्रा भरत असल्याने दिवसभर अंग भाजून निघते. कुठेच थंडावा नाही. शरीराची लाही लाही होत असतानाही भाविकांना ते सहन करावे लागते.

४० खोल्यांची एक धर्मशाळा सोडली, तर थांबण्याची व्यवस्था कुठेच नाही. या धर्मशाळेची क्षमता केवळ दोन हजारांची आहे. म्हणजे, यात्रेकरूंच्या तुलनेत एक टक्काही नाही. शिवाय, उपलब्ध असलेल्या धर्मशाळेची स्वच्छता राखण्यात भाविकांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात घाण दिसून येते. यात्रा काळात स्वच्छता राखण्यासाठी नगर पालिकेचे सफाई कामगार येत नाही. त्यामुळे शिळे अन्न, पोळी फेकलेल्या ठिकाणीच स्वयंपाकाची सोय करावी लागते. स्वयंपाक करणे, जेवण करणे, झोपणे आणि सकाळी आंघोळ आणि प्रातर्विधीही एकाच स्थळी उघडय़ावर होत आहे. शिळे अन्नही कुठेही फेकून दिले जात असल्याने दरुगधी पसरत आहे.

५० हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या असून, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. मंदिर परिसरात काही ठिकाणीच नळ लावण्यात आले आहेत. मंदिरानेही स्वत:ची यंत्रणा उभारली, पण भाविकांची संख्या पाहता ही व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. शिवाय, या नळातून मिळणारे पाणी गरम असते. थंड पाण्याचा पत्ता नाही. या गरम पाण्यावरच भाविकांना तहान भागवावी लागते. त्यामुळे त्रस्त झालेल्या काही भाविकांनी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि यात्रेतील असुविधांची माहिती दिली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांची गैरासोय होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल, असे आश्वासन दिले.

चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेटजवळ असलेली पोलीस चौकी एरवी बंद दिसत होती. मात्र, यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, त्यांना वेळेवर मदत मिळावी, या उद्देशातून ती सुरू करण्यात आली आहे. मात्र, येथे नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी भाविकांची मदत करताना दिसत नाही. माता महाकालीची पहाटे ३ वाजेपासून महापुजेला सुरुवात झाली. पूजन आंघोळीनंतर दही व तुपाचा अभिषेक करण्यात आला. देवीला दागिने परिधान केल्यानंतर ५.३० वाजता महाआरती पार पडली. यापुढे तरी येथे आलेल्या भाविकांना समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा नगर प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा, अशी आशा उराशी बाळगून परतीच्या प्रवासाला लागले आहेत.

Tuesday, April 19, 2011

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 3 जवान शहीद

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 3 जवान शहीद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 19, 2011 AT 07:03 PM (IST)
Tags: Gadchiroli, cobra, crpf, naxalites
गडचिरोली - येथील कुरखेडा तालुक्‍यातील खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत "कोब्रा' या विशेष दलाचे 3 जवान शहीद झाले असून सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, या चकमकीत किती नक्षलवादी ठार झाले याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास खोब्रोमेंढा जंगलात नक्षलवादी आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये भीषण धुमश्‍चक्री उडाली. यात कोब्राचे 3 जवान शहीद झाले असून सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, चकमकीनंतर नक्षलवादी ठार झालेल्या सहकाऱ्यांचे मृतदेह सोबत घेऊन जात असल्याने किती नक्षलवादी ठार झाले याचा आकडा कळालेला नाही.
शहीद झालेल्या जवानांमध्ये महेंद्र सिंग (पंजाब) याचा समावेश असून इतर दोन जवानांची नावे कळु शकली नाहीत. जखमी जवानांची नावे खालीलप्रमाणे - अरुणकुमार मार्कंडे (राहुरी, जिल्हा नगर), सतीश शिंदे (जळगाव), अशोक कावरे (भंडारा), राजेश पटेलिया (गुजरात) आणि योगेशकुमार प्रसाद (दिल्ली) .

कोतवालांच्या संख्येत सहा पटीने घट

कोतवालांच्या संख्येत सहा पटीने घट

श्रीकांत पेशट्टीवार : सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, April 16, 2011 AT 12:30 AM (IST)
Tags: kotwal, revenue, reduce, chandrapur, viderbha
चंद्रपूर - महसूल विभागातील महत्त्वाचा घटक असलेले कोतवालांच्या संख्येत गेल्या पन्नास वर्षांत तब्बल सहा पटीने घट झाली आहे. केवळ दोन हजार दहा रुपये अशा तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या घटकाला वाढीव वेतन आणि चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्यात यावा, अशा मागण्या आहेत. मात्र, शासन दरबारी त्या अजूनही प्रलंबितच आहेत.
राज्यात 1959 मध्ये कोतवाल दरमहा केवळ सोळा रुपयांवर काम करीत होते. 1960 मध्ये 72 हजार असलेल्या कोतवालांची संख्या आता 12 हजार 637 येऊन ठेपली आहे. गावनिहाय नियुक्तीची पद्धत रद्द करून सांजानिहाय करण्यात आल्याचा हा परिणाम झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोतवालांची संख्या घटत असल्याने गावपातळीवर महसूल गोळा करण्यावरही परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
ग्रामपातळीवर महसूल व्यवस्थेचा प्रमुख घटक म्हणून कोतवाल ओळखला जातो. तहसीलदारांमार्फत तलाठ्याची नियुक्ती केली जाते. तलाठ्यासोबतच काम करावे लागत असलेल्या कोतवालांवर विविध कामे सोपविण्यात आली आहेत. नोटीस, अपघात, चोरी, खून, नैसर्गिक आपत्तीची सूचना देणे, वसुली, सर्वेक्षण ही कामे त्यांना करावी लागतात. पूर्वी "गाव तेथे कोतवाल' अशी नियुक्तीची पद्धत होती. आता त्यात बदल करण्यात आला. सध्या "सजानिहाय कोतवाल' अशी नियुक्तीची पद्धत करण्यात आली आहे. त्यातही अनेक पदे रिक्त असल्याने व त्या जागी नवीन नियुक्ती करण्यात येत नसल्याने कोतवालांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे.
कोतवालांना 1959 मध्ये त्यांना 16 रुपये मानधन दिले जायचे. त्यात टप्प्या-टप्प्याने वाढ झाली. 2004 पासून त्यांचे मानधन 1 हजार 600 वरून 2 हजार 10 रुपये करण्यात आले. मात्र, ही वाढ तुटपुंजी असल्याचे कोतवाल संघटनेचे म्हणणे आहे. हे मानधन त्यांना तहसील कार्यालयातून मिळते. मानधन कमी आणि जबाबदाऱ्या मात्र ढीगभर, अशी त्यांची अवस्था आहे. कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्यात यावा, अशी संघटनेची कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडेही शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कोतवालाची गावनिहाय नियुक्ती पद्धत बंद करून त्याऐवजी सजानिहाय नियुक्ती केली जाणार आहे. तसेच कोतवालांसाठी "एमएससीआयटी' संगणक प्रशिक्षणासोबतच बारावीची परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. या नव्या अटींवर कोतवाल संघटनेने नाराजी दर्शविली आहे.

""गुजरातमध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. अशाच मागणीसाठी आम्ही आजवर अनेकदा हिवाळी अधिवेशनात आंदोलने केली. मात्र, हा प्रश्‍न अद्याप सुटू शकलेला नाही.''


उमेशकुमार अलोने, जिल्हाध्यक्ष, कोतवाल संघटना,

प्रतिक्रिया
On 16/04/2011 01:58 PM Ek samanya Nagrik said:

मानधन कमी ...... तुटपुंज्या मानधनावर ? aaho lakho rupaye kamvitat te lok , revenue che ekhade kam gheun ja paha kiti paise magtat... Ek samanya Nagrik

On 16/04/2011 05:45 AM pallavi said:

ओह.. मला वाटले कोतवाल पक्षी ... :-!

Monday, April 11, 2011

लोकपाल विधेयकामुळे काळा पैसा उघड होईल

लोकपाल विधेयकामुळे काळा पैसा उघड होईल


चंद्रपूर - अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला समर्थन देत लोकपाल विधेयकामुळे राजकीय व्यक्तींशिवाय चित्रपटसृष्टीत येणारा काळा पैसा निश्‍चितपणे उघड होईल, असे मत मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवनात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आयोजित प्रकट मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे उपस्थित होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी प्रास्ताविक केले. ही प्रकट मुलाखत ऍड. वर्षा जामदार आणि प्रा. जयश्री कापसे यांनी घेतली. मुलाखतीची सुरवात श्री. दामले यांनी बालपणातील आठवणींतून केली. लहान असताना शालेय शिक्षणात एनसीसी कॅडरचे विद्यार्थी होते. सैन्यात जाण्याची इच्छा होती. मात्र, शारीरिक साथ नव्हती. गाणी, कॅरम आणि बुद्धिबळ खेळात रस होता. कुटुंबातच नाटकाचा वारसा असल्याने शालेय नाट्यस्पर्धेत काम करण्याची संधी मिळाली. छंद म्हणून जोपासलेले नाटक आता व्यवसाय झाल्याचेही त्याने यावेळी सांगितले. नाटक हे टीमवर्क आहे. त्यामुळे कुणा एकट्यामुळे प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही. सर्व कलावंतांचा चांगला समन्वय असणे आणि पडद्यामागील कलावंतांची साथ महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. नाटकात काम करताना रिलॅक्‍स होण्यासाठी गमतीजमती कराव्या लागतात, अभिनयातील बेसिक गोष्टी नाटकातून शिकायला मिळतात. टीव्ही मालिका केवळ पैशासाठी, तर नाटक प्रेक्षकांच्या प्रेमापोटी करत असल्याचेही प्रशांतने सांगितले. आतापर्यंत नऊ हजार 600 प्रयोग करून लिम्का रेकॉर्ड झाले असून, 10 हजार नाटकांचा टप्पा गाठून वर्ल्ड रेकॉर्ड करणार असल्याचा विश्‍वास बोलून दाखविला.