সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 09, 2019

नागपूर:बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक

नागपूर:बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक

वाडीतील मतिमंद युवतीवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक;सात दिवसाची पोलीस कोठडी
वाडी ( नागपूर ) /अरूण कराळे:

जवळच्या नात्याला काळिमा फासत पाहुणे म्हणून नातेवाईकाकडे आलेल्या दोन आरोपीनी मुलीच्या मतिमंदपणाचा फायदा घेत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून बलात्कार केल्याची घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आठवा मैल परिसरात घडली होती.

यातच मतिमंद मुलगी गर्भवती राहली,परंतु आपण याला दोषी नाहीत म्हणून फरार झालेले आरोपी रामूगोपाल बोई वय (२६)रा.गणेश नगर,सोलापूर रोड, उस्मानाबाद व व्यंकटेश कलराज पलस्पेटी वय(३२) यांना वाडी पोलिसांनी दोन पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणावरून आठ दिवसात आरोपी रामू बोई ला उस्मानाबाद येथून तर व्यंकटेश ला करनुल, तेलगांना येथून अटक केली.

यांच्यावर कलम ३७६,२ एफ जे एल एन ३७६(ड),५०६(३४) व सामाजिक बहीष्कार कायदा कलम४,५ (२),६,७ या अंतर्गत कार्यवाही करुन आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात  दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.आरोपी व्यंकटेश हा चैन स्कॅनिंग प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती पुढे आली आहे.

          उपरोक्त प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल टाकसांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत देशमुख,दिलीप आडे,गोपी राठोड,सूनील डगवाल,विजय पेंदाम,गिते यांनी यशस्विरित्या पार पाडली.
खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणार

खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देणार

उद्योग मंत्री सुभाष देसाई
‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन
राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन
खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत

नागपूर, दि. 9 :  राज्यात खनिजउद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असून ज्या ठिकाणी खनिजसंपदा आढळते तेथेच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळही भरीव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
उद्योग आणि खनिकर्म विभाग, ‘एमएसएमसी’, विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) यांच्या सहकार्याने हॉटेल सेंटर पॉईंट येथे दोन दिवसीय ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले. यावेळी  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ ‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई, व्यवस्थापकीय संचालक एस. राममुर्ती, देवेंद्र पारेख, सुधीर पालिवाल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी ‘एमएसएमसी’ आणि खनिज क्षेत्रातील विविध उद्योग समुहांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. ‘महासँड’ आणि खनिज क्षेत्रातील उद्योग संधी यासंदर्भातील ध्वनीचित्रफितीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, वनसंपदा आणि खनिज संपदेच्या बाबतीत विदर्भ समृध्द प्रदेश आहे. खनिजउद्योग क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध असून या परिषदेच्या आयोजनामुळे या क्षेत्रातील संधींसंदर्भात साकल्याने विचारमंथन होईल. खनिजपदार्थ उत्त्खननातून शासनाला महसूल प्राप्त होतो. महत्वाच्या खनिजातून मिळणाऱ्या महसूलात वाढ होण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणपूरक आणि संवर्धक असे खनिज उद्योग वाढले पाहिजेत यावर भर देण्यात येत आहेत. वनसंपदेला धोका पोहचू न देता खनिज उत्त्खनन करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. उद्योगांसाठी कोळसा उपलब्ध करुन देवून यावर आधारित उद्योग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योगांना वीजदरात सवलत देण्यात आली असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टरलाही वीजदरात सवलत देण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीचे आव्हान पेलतांना खनिज क्षेत्रातील उद्योग यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतील. खनिज क्षेत्रातील उद्योगांनाही भरीव सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासाठी या क्षेत्रातील उद्योगांनी सूचना द्याव्यात. त्यांचा नक्कीच सकारात्मतेने विचार करण्यात येईल. राज्यातील सर्व खाणपट्टयांचे डिजीटलायजेशन करण्यात आले असून महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गौण खनिज आणि मुख्य खनिजांपासून महसूल प्राप्त होतो. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी विदर्भात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही शक्य आहे. वन आधारित आणि खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष धोरण व सवलती देण्यावर भर देण्यात येत आहे. सर्व भागांचा समतोल विकास साधण्याची आवश्यकता असून विदर्भात मॅगनिजवर आधारित उद्योग वाढीस मोठी संधी आहे. विदर्भातील बंद पडलेल्या कोळसा खाणी सुरु करुन तेथे कोळशापासून युरिया तसेच मिथेनॉल अशी इतर उत्पादने निर्मिती करण्याचे उद्योग उभारणीवर भर देण्याची आवश्यकता आहे. मिथेनॉलवर चालणाऱ्या ट्रक आणि बसेस आगामी काळात सुरु करण्यात येणार आहेत. विदर्भातील कोळशाला त्याच्या दर्जानुसार भाव मिळाला पाहिजे, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासंदर्भात श्री. गडकरी म्हणाले, खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीबरोबरच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या वृक्षलागवडीमुळे राज्याच्या वनक्षेत्रात वाढ झाली आहे. नालाखोलीकरणाच्या कामातून निघणारी माती व मुरुम यांचा उपयोग रस्ते उभारणीसाठी करण्यात येत आहे. बायोडिझेलवर विमानांचे उड्डाण यशस्वी करण्यात येत आहे. बांबूपासून इंधन निर्मितीचे प्रयोगही यशस्वी होत आहेत. विदर्भ हे आगामी काळात जैवइंधनाचे ‘हब’ म्हणून विकसित होवू शकते. उद्योगांच्या विकेंद्रीकरणावर भर देण्यात येत असून यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचेही श्री. गडकरी यांनी सांगितले. 
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भातील खनिजक्षेत्रात उद्योग उभारणीची मोठी संधी असून विदर्भ खनिज समृध्द प्रदेश आहे. राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील उद्योग क्षेत्रात वाढ होत असल्याचेच हे सकारात्मक चिन्ह आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही क्रांतीकारक बदल होत आहे.  फ्लायॲश संदर्भात स्वतंत्र धोरण असून फ्लायॲश क्लस्टरची उभारणी नागपूर व चंद्रपूर येथे होत आहे. कोळसा उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येत असून खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी एक्सप्रेस फिडरद्वारे मुबलक वीज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
‘एमएसएमसी’चे अध्यक्ष आशिष जयस्वाल म्हणाले, वने, पर्यटन आणि खनिजसंपदा ही विदर्भाची बलस्थाने असून खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न कण्यात येत आहेत. या क्षेत्रातील उद्योगांना आता अधिक सुविधा व सवलती उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. खनिज क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग व मुल्यवर्धीत उद्योग विदर्भातच निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. कोळशाचे उत्पादन विदर्भात मोठ्या प्रमाणात होते. या  क्षेत्रात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढविण्यात येणार आहे. खनिजाच्या रॉयल्टीतून मिळणाऱ्या निधीतून काही भाग संबंधित जिल्हयाच्या विकासासाठी वापरण्याचे धोरण त्या जिल्हयांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.
अतिरिक्त मुख्य सचिव सतिश गवई म्हणाले, खनिज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असून विदर्भाचे या क्षेत्रात मोठे योगदान आहे. अर्थव्यवस्थेला आणि उद्योगक्षेत्राला चालना देणे गरजेचे आहेच परंतु त्याबरोबरच पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी असून खनिज उत्त्खननाबरोबरच पर्यावरणाचे जतन व संवर्धनाचा विचारही करणे गरजेचे आहे. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी सकारात्मक पाऊले उचलण्यात येत असल्याचे श्री. गवई यांनी सांगितले.
देवेंद्र पारेख म्हणाले, आपला देश विविध खनिज संपत्तीचे विपुल भांडार असून या क्षेत्रातील उद्योगांमध्ये वाढीच्या आणि विकासाच्या संधी आहेत. या क्षेत्रातील उद्योगात आता प्रक्रिया उद्योग आणि मुल्यसंवर्धन उद्योगांची वाढ होणे गरजेच आहे. ‘मिनकॉन’ कॉनक्लेव्हद्वारे खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी सर्वांगिण विचारमंथन होईल, असेही श्री. पारेख यांनी सांगितले.
रिना सिन्हा, अतुल ताजपुरिया यांनी सुत्रसंचालन केले. शिवकुमार राव यांनी आभार मानले.
· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

· एक लाख ५७ हजार मतदारांनी केले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक

  • - व्हीव्हीपॅटमुळे मतदानामध्ये अधिक पारदर्शकता  - अश्विन मुदगल
  • - उच्च न्यायालय येथे व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक


नागपूर, दि. 8 : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रासह प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून, मतदान करताना झालेल्या मतदानासंदर्भातील माहिती सात सेकंदापर्यंत प्रत्यक्ष पाहता येणार आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून, केलेले मतदान सुरक्षित असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण होणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथील सभागृहात मतदार जागृती अभियानांतर्गंत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅटच्या वापरासंबंधीचे सादरीकरण व प्रात्यक्षिक बार असोशिएशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी हायकोर्ट बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲङ अनिल किलोर, तसेच बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन, प्रफुल्ल कुबाळकर, जयदीप चांदूरकर, मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, पुरुषोत्तम पाटील तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा तसेच बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी यावेळीउपस्थित होते.

निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचा वापर प्रारंभी केरळ राज्यातील पारावूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आला होता. त्याच्या उपयुक्ततेमुळे भारत निवडणूक आयोगाने ‘भेल’ व ‘इसीआयएल’ या शासनाच्या कंपन्यांमार्फत इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राच्या निर्मितीला सुरुवात केली असून, 15 मार्च 1989 पासून संपूर्ण राज्यात निवडणुकांमध्ये या यंत्रांचा वापर करण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की,नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात या यंत्रासोबतच प्रथमच व्हीव्हीपॅटचासुद्धा वापर करण्यात येत आहे. ही संपूर्ण यंत्रणा अत्यंत सुरक्षित असून, मतदानापूर्वी सर्व मशीनची तपासणी व मॉक पोल नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

मतदानासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशीन मतदानाच्या ४८ तासापूर्वी रॅडमायझेशन करुन पाठविण्यात येत असल्यामुळे मतदानकेंद्रांवर पाठवण्यात येणाऱ्या मशीनची पूर्वकल्पना कुणालाही असूच शकत नाही. तसेच प्रत्यक्ष मतदानापूर्वी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर मॉक पोल घेण्यात येत असल्यामुळे आपले मतदान सुरक्षित आहे, याची ग्वाही या संपूर्ण प्रक्रियेमार्फत देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडल्या जाते. प्रत्यक्ष निवडणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिंग एजंट, मायक्रो ऑब्झर्व्हर, वेब कॉस्टींग, सीसीटीव्ही, सेक्टर ऑफिसर तसेच मीडियाचे प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रियेनंतर अत्यंत सुरक्षिततेतर्गंत स्ट्राँगरुममध्ये मतमोजणीपर्यंत सर्व मशीन ठेवण्यात येतात.

यावेळी जिल्हा‍धिकारी अश्विन मुदगल यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत असल्या तरी भारतीय निवडणूक आयोगाने सर्व शंकांचे समाधान केले असून, आतापर्यंत देशातील विविध उच्च न्यायालयात 37 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 30 याचिकांचा निकाल हा भारतीय निवडणूक आयोगाच्या बाजूने लागला आहे. तर 7 याचिकांवर सुनावणी सुरु आहे. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राद्वारे होणारे मतदान अत्यंत सुरक्षित असल्यामुळेच संपूर्ण देशात ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेबद्दल संभ्रम असल्यास तात्काळ आपले मत नोंदविण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे.


गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा, आणि कर्नाटक या राज्यात झालेल्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा यशस्वी वापर करण्यात आला असून, देशभरात 5हजार 626 कोटी रुपये किमतीच्या 40 लाख युनिटचा वापर करण्यात आला आहे.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होत असल्यामुळे जनतेला मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 हजार 832 मतदान केंद्र असून, सर्वच मतदान केंद्रांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गंत जिल्ह्यातील आतापर्यंत 1 लाख 56 हजार 696 नागरिकांनी व्हीव्हीपॅटवर प्रत्यक्ष मतदानाची माहिती घेतली आहे. ही जनजागृती मोहिमेतर्गंत चित्ररथासह विविध माध्यमांचा प्रभावी वापर सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी हायकोर्ट बार असोशिएशनच्या श्रीमती वेंकटरमन यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. तर ॲङ पुरुषोत्तम पाटील यांनी आभार मानले. इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन झालेल्या मतदानाची माहिती यावेळी सर्व उपस्थितांनी घेतली.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारीला हिरकणी योजनेचे आयोजन

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारीला हिरकणी योजनेचे आयोजन


बचत गटांच्या मार्फत उद्योजकता विकासासाठी
जिल्हा प्रशासनांनी पुढे येण्याचे सुरेश प्रभू यांचे आवाहन


चंद्रपूर, दि 9 फेब्रुवारी : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधत बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये अधिक उद्योजकता निर्माण करावी यासाठी हिरकणी योजनेची घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 17 फेब्रुवारी पासून तालुकास्तरीय आयोजनाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्यावतीने महापौर अंजली घोटेकर यांनी दिले.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मुंबई येथील मंत्रालयातील वार रूममध्ये यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, अकोला येथून कौशल विकास राज्यमंत्री रणजीत पाटील, संबंधित विभागाचे सचिव असीम गुप्ता, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर आदी सहभागी झाले होते.

राज्य शासनामार्फत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणी योजनेची सुरुवात आज करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील अभिनव प्रयोग करणाऱ्या 10 बचत गटांची निवड केली जाणार आहे. या बचत गटांना आर्थिक मदत केली जाणार आहे. याशिवाय उत्तम काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार देखील प्रदान केले जाणार आहे.

महाराष्ट्रातील चांगल्या बचत गटांना केंद्र पातळीवर काम करण्याची संधी देखील दिली जाईल, असेही आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सुरेश प्रभू यांनी जाहीर केले.

चंद्रपूर येथून संपर्क साधताना महापौर अंजली घोटेकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी महिला बचत गटांसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. महिला बचत गटांसाठी ही एक नवीन संधी असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे महिला बचत गटांचे कार्य चालू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी हिरकणी योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत गटांचा सहभाग नोंदविण्याबाबत यापूर्वी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार जिल्ह्यामध्ये काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बचत गट अतिशय सक्षमतेने काम करत असताना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी देखील केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन देखील यावेळी घोटेकर यांनी केले

आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भैय्यासाहेब येरमे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन थाटात

आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन थाटात

नागपूर/प्रतिनिधी:

आदिवासी समाजाला पुरातन संस्कृतीसह शौर्याचा इतिहास लाभला आहे. बदलत्या युगात आदिवासी समाजाने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र प्रगतीचे शिखर गाठताना आपल्या पुरातन संस्कृतीचे जतन होणेही आवश्‍यक आहे. आपल्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्रयांना हा इतिहास अवगत व्हावा यासाठी आदिवासी महोत्सवाद्वारे संधी उपलब्ध करण्यात आली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.   

परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार (ता. ८) आयोजित आदिवासी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. मंचावर महोत्सवाचे उद्घाटक राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय, प्रमुख ‍अतिथी म्हणून आमदार सुधाकर देशमुख, महोत्सवाच्या आयोजक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आयोगाचे सदस्य हरीकृष्ण दामोद, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक संदीप जाधव, नगरसेविका रूतिका मसराम, गोंड राजमाता राजश्रीदेवी उईके,‍ शिवाणी दाणी, दिगंबर चौहाण, श्री. पंजवानी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आज आदिवासी समाजातील प्रतिभावंतांनी विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त केले आहे. या समाजाने इतिहासात केलेल्या शौर्याची महतीही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन महत्वाचे ठरते. प्रत्येक समाजबांधवाने आपली संस्कृती न विसरता या संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय म्हणाले, देशासाठी बलिदानात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. मात्र देशासाठी आपले शौर्य पणाला लावणाऱ्या या महावीरांच्या कार्याला हवा तो सन्मान मिळू शकला नाही.‍ देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना योग्य सन्मान ‍मिळावा, लुप्त पडलेल्या इतिहासाचा अध्याय पुन्हा लिहीला जावा यासाठी राष्ट्रीय जनजाति आयोगाद्वारा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या व महोत्सवाच्या आयोजक माया इवनाते यांनी केले.

नागपुर का राजा’चे सादरीकरण शनिवारी

महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी ५.३० वाजता ‘नागपुर का राजा’ या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर नंदा जिचकार भूषवतील. 

कढरे येथे अनुलोमच्या माध्यमातून गॅस वितरण

कढरे येथे अनुलोमच्या माध्यमातून गॅस वितरण

खबरबात / गणेश जैन ( धुळे)*

बळसाणे  :  ता. ८ रोजी कढरे तालुका साक्री येथे अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 26 महिला लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा वाटप करण्यात आले , शासकीय योजना तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहोचाव्या आणि त्याचा लाभ जनतेला व्हावा यासाठी अनुलोम सामाजिक संस्था शासकीय योजनांचा प्रचार प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मा मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते , या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांना योजना मिळवून देण्यासाठी सहकार्य मिळत असते त्याचाच भाग म्हणून अनुलोम सामाजिक संस्थेच्या स्थान मित्रांच्या मदतीने गावात महिलांना गॅस जोडणी मोफत देण्यात आले , या कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच श्री जगतसिंग राजपूत , स्थान मित्र रावसाहेब गिरासे , श्री जगदीश माळी , सामाजिक कार्यकर्ते श्री जितू गिरासे गॅस एजन्सीचे श्री संदीप वाघ आदी उपस्थित होते शासकीय योजना व त्यात जनतेचा सहभाग व उज्ज्वला योजनेचे फायदे याविषयात अनुलोम भाग जनसेवक निलेश राजपूत यांनी मार्गदर्शन केले , गॅस कसा वापरावा यासाठी संदीप वाघ यांनी माहिती दिली , योजनेचा लाभ गावातील जनतेला व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रदीप राजपूत यांनी सर्व कागदपत्र अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एजन्सीकडे सोपवली होती , या कार्यक्रमासाठी गावातील महिला व पुरुष उपस्थित होते , साक्री येथील शुभंकर गॅस एजन्सीचे सहकार्य लाभले

Friday, February 08, 2019

बिलावरील मीटरचा फ़ोटो झाला इतिहासजमा

बिलावरील मीटरचा फ़ोटो झाला इतिहासजमा

वीजग्राहकांना मोबाईलवर मीटर रिडींगची इत्यंभूत माहिती

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जात आहे. याशिवाय एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना यापुर्वीच उपलब्ध करून दिली असल्याने महावितरण आता वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद केली आहे. यामुळे आता ग्राहकांना मीटरचा फ़ोटो नसलेले वीजबिल मिळण्यास सुरुवात झाली आहे.


वीज ग्राहकांना वीज मीटरच्या रिडींगची अचूक माहिती मिळावी म्हणून 2008 साली देशात महावितरणने सर्वप्रथम वीजबिलावर मीटर रिडींगचा फोटो छापण्याची पध्दत सुरू केली होती. या पद्धतीचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. महावितरणच्या या प्रयोगाचे अनुकरण देशभरातील अनेक वीज वितरण कंपन्या, पाणी पुरवठा संस्था आणि इतरही अनेक संस्थांनी मोठ्या प्रमाणात केले आहे. महावितरणकडून ग्राहकसेवा अधिकाधिक तत्पर, लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी नवनवीन आद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरु केल्याने ज्या ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची इत्यंभूत माहिती एसएमएसद्वारे दिली जात आहे. त्यामुळे मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीजबील मिळण्यापूर्वीच मीटर रिडींग घेताच त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याने ग्राहकांना आपले मीटर रिडींग पडताळणीसाठी सुविधा उपलब्ध आहे. सोबतच मीटर रिडींगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्रि क्रमांक अथवा नजिकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरूस्त करता येणे शक्य आहे.

वीज ग्राहकाला बिलावर फ़ोटो देण्याएवजी ‘रिअल टाईम’ माहिती देऊन ग्राहकाला अधिक स्मार्ट सेवा देण्याकडे महावितरणने एक पाऊल पुढे टाकले आहे. महावितरणने बिलावर फ़ोटो देण्याचा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरीही फ़ोटो मीटर रिडींग सुरु राहणार असल्याने ग्राहकांना त्यांच्या चालू महिन्यातील वीज वापर असलेल्या मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे. तसेच मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर ग्राहकांना वीजबिलासंबंधी पुरक माहिती देण्यात येणार आहे.

मोबाईल क्रमांकाची नोंद सहज शक्य

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर 'एसएमएस'द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून 'एसएमएस' केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24x7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्रि क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून, बिल भरणा केंद्रांवरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय सहजरित्या उपलब्ध आहे. 

गो ग्रीनचा ही उत्तम पर्याय

महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना अनेक सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार लाखो ग्राहक बसल्या जागेवरून कधीही वीजदेयकाचा भरणा ऑनलाईन करीत आहेत. ऑनलाईन असणारया ग्राहकांना ‘गो ग्रीन’चा पर्याय स्विकारीत ई-बिल चा वापर करणे म्हणजेच झाडांचे आणि पर्यायाने पर्यावरण संरक्षणास मदत करण्यासोबतच मासिक बिलात दहा रुपयांची बचतही आहे.

सर्व वर्गवारीतील सुमारे दोन कोटी सात लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. उर्वरित वीजग्राहकांनीही महावितरणच्या वीजसेवेचा लाभ सोबतच वीजबिलाबाबतची तसेच इतर महत्वाची माहिती मिळविण्यासाठी ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
डी.पी.कदम इंग्लिश मिडीयम चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

डी.पी.कदम इंग्लिश मिडीयम चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

पुसेसावळी(राजु पिसाळ) :

शिक्षणाबरोबर मुलांच्या अंगी असणाऱ्या इतर कलागुणाना वाव दिला तर मुले अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही गरूड झेप घेऊ शकतात. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ सुनिता धैर्यशिल कदम यांनी केले.

डी.पी. कदम प्रायमरी स्कूल इंग्लिश मीडियम यांच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा व बक्षीस वितरण सोहळा  दत्त मंगल  कार्यालय पुसेसावळी येथे संपन्न झाला यावेळी सौ कदम बोलत होत्या . 

यावेळी श्री. बी.टी. घार्गे सर (ध्येयसिद्धी ॲकॅडमी) पुसेसावळी सरपंच सौ. मंगल ज्ञानदेव पवार, मुख्याध्यापिका एस.बी. घोडके मॅडम, 

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग आदी उपस्थित होते.

शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमूंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. अनमोल असे हे जीवन आनंदाने व उत्साहाने जगण्याचा तसेच शेतकर्‍यांच्या व्यथा आपल्या गाण्यातून मांडून समाजामध्ये मोलाचा संदेश लहानग्यांनी दिला.लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृती व लोकगीतांकडे दृष्टिक्षेप टाकत अस्सल मराठमोळी गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला.भक्तिगीत,ओवी,वासुदेव गीत, गोंधळ, शेतकरी गीत,धनगरी गीत,कोळी गीत,गवळण, वाघ्या मुरुळी, जोगवा आदी गीतांनी परिसर रंगून गेला. विविधरंगी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षक वर्गाची मने जिंकली. मराठी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी यातून घालून दिला.

यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी, यांचेसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वडी हायस्कूलच्या ८ वी च्या विद्यार्थीनीचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

वडी हायस्कूलच्या ८ वी च्या विद्यार्थीनीचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

पुसेसावळी (राजु पिसाळ):


वडी (ता.खटाव) येथील पदम.वसंतदादा पाटील शिक्षण संस्था रहिमतपुर संचलित वडी हायस्कूलची ८ वी ची विद्यार्थीनी विजया सुनिल कदम हिने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत १७८ पैकी १०३ गुण प्राप्त करुन शिष्यवृत्तीस पात्र झाली असुन तिला वार्षीक बारा हजार रुपयेची शिष्यवृत्ती १२वी पर्यंत मिळणार आहे.

त्याचबरोबर याच हायस्कूलचे विद्यार्थी किरण घाडगे,अक्षता कबुले, रेवती येवले, अंकिता घाडगे,प्रणव येवले शेखर पवार, यांनीही या शिष्यवृत्ती परिक्षेत उज्ज्वल यश संपादन केले,
तरी यशस्वी विद्यार्थ्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे,
तसेच संस्थेचे अध्यक्ष सुनिल माने ,सचिव एस.के.माने सर ,मुख्याध्यापक विकास अडसुळे, सर्व  शिक्षक व  ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दंतरोग निदान व वैद्यकीय उपचार

उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दंतरोग निदान व वैद्यकीय उपचार

चिमूर/रोहित रामटेके        

चिमूर : - दिनांक.०८/०२/२०१९ ला उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे  राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा  नागपूर , जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर, वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय चिमूर यांच्या सयुक्त विद्यमानाने उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे ८ फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता वैद्यकिय व दंतरोग निदान व उपचार , शस्त्रकीया शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले हे शिबिर ३ दिवस नियमित सुरु राहणार आहे. या शिबीरातील वैद्यकिय रोगनिदान व उपचार मध्ये तज्ञ डॉक्टराकडुन रोगनिदान, चाचण्या, उपचार, मार्गदर्शण व समुपदेशन करन्यात येनार असून या शिबिराचे लाभ शेकडो रुग्णांनी घेतले. या संपूर्ण शस्त्रक्रियामध्ये आवश्यकतेनुसार निवडण्यात आलेल्या गरजू  रुग्णावर ८ फरवरी ते १० फेब्रुवारी पर्यत उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करन्यात येईल . रूग्ण व एका नातेवाईकास मोफत आहार देन्यात येईल. दंतरोग निदान व उपचार यामध्ये शासकिय दंत महाविद्यालय नागपूर , शरद पवार दंत महाविधालय मेघे सावनगी येथील दंतरोग तंज्ञाची चमू व वरोरा आनंदवन फिरत्या दंत रुग्णवाहीकेसह हजर राहुन ८ ते १० फरवरी पर्यत १० ते ३ वाजेपर्यत दंतरोग निदान व यावरील उपचार करन्यात येणार असून या शिबिराला राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाचे राष्ट्रिय छात्र सेना यांचा हि यामध्ये सहभाग होता तसेच आठवले समाज कार्यालयाच्या विदयार्थ्यांनीही व विदयार्थिनी यांनीही या शिबिराला सहकार्य केले. या शिबीरामध्ये बालरोग तज्ञ,भिषीक तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, कान - नाक व घसा तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, चर्मरोग तज्ञ, मानसिक रोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, बधिरी करण तज्ञ, क्ष - किरण तज्ञ, फिजीओ थेरेपी , अक्युप्रेशर थेरेपी आदी विशेष तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध केलेली आहे. चिमूर तालुक्यातील संपूर्ण परिसरातील नागरीकांनी या निशुल्क शिबीराला मोठ्या प्रमाणात उपस्थीत राहुन शिबीरातील तज्ञ डॉक्टराचा लाभ घेतला असे आवाहन केले कि उपजिल्हा रुग्णालय चिमूर चे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गो.वा.भगत , डॉ.अश्विन अगडे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.रवि गेडाम व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिगांबर मेश्राम यांनी या शिबिराला प्रामुख्याने हजर राहून योग्य त्या प्रकारे कसे मार्गदर्शन करून योग्य त्या प्रकारे उपचार करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले या निशुल्क शिबिराची समुर्ण चिमूर तालुक्यात चर्चा रंगली आहे.

खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न

खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा संपन्न

नागपूर/अरूण कराळे:

नागपूर पंचायत समिती  अंतर्गत जि. प . प्राथमिक  व उच्च प्राथमिक शाळांमधील बालकांच्या क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्यासाठी  खंडस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन खापरी रेल्वे येथे करण्यात आले होते . सभापती नम्रता राऊत यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहन व उपसभापती सुजित नितनवरे यांच्या हस्ते  क्रीडाज्योत प्रज्वलित करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पं स . सदस्य रेखा मसराम, दिलीप नंदागवळी, प्रभाकर उईके, गट विकास अधिकारी किरण कोवे, सहाय्यक गविअ तथा गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव, शा . व्य . स . अध्यक्ष  गजानन टिळक, सरपंच पप्पू ठाकूर, सुरेंद्र बानाईत, दीपक राऊत ,ज्योत्स्ना नितनवरे प्रामुख्याने  उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान तालुक्यातील शाळांना उत्कृष्ठ सहकार्य करणाऱ्या निवडक ग्राम पंचायत सरपंच/सचिव, दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुखांचा शाल श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत तेरा समूहसाधन केंद्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या १३ शिक्षकांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मान्यवरांची मने जिंकली . प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव ,संचालन सरिता बाजारे व विलास भोतमांगे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी छाया इंगोले यांनी केले.आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर गुलाब उमाठे, छाया इंगोले, रामराव मडावी, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, प्रेमा दिघोरे, हेमचंद्र भानारकर, राजेंद्र देशमुख, सीमा फेंडर आदींनी केले.  

विभागीय क्रीडा स्पर्धेत पांजराघाट अव्वल

विभागीय क्रीडा स्पर्धेत पांजराघाट अव्वल

नागपूर/अरूण कराळे 

नागपूर तालुक्यातील बाजारगाव केंद्रातील  जि.प.प्राथमिक शाळा ,पांजराघाट मधील विद्यार्थीनीनी  हिंगणा तालुक्यातील  आमगाव (देवळी ) येथे  झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेतील कनिष्ठ गट लंगडी खेळात अव्वल स्थान पटकाविले . विजयी चमुचे मुख्याध्यापक कृष्णा चावके, क्रीडाशिक्षक सुभाष कोल्हे, गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी गोपाळ कुणघटकर, गुलाब उमाठे, रामराव मडावी ,छाया इंगोले, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, दीपक तिडके, प्रकाश कोल्हे ,प्रवीण मेश्राम, सरपंच  तुषार चौधरी, उपसरपंच प्रकाश भोले, ग्रामपंचायत सदस्य झिंगूबाई टेकाम ,सुरेश कोल्हे ,शा.व्य.स. अध्यक्ष विठ्ठल येडमे तसेच सर्व  ग्रा.पं. सदस्य यांनी  अभिनंदन केले.  
रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाचे उद्दीष्ट आता 7000

रमाई आवास योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाचे उद्दीष्ट आता 7000

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित
 चंद्रपूर, दि.8 फेब्रुवारी – राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री  तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणा-या रमाई आवास घरकुल योजनेसाठी (ग्रामीण) चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट आता 7 हजार इतके झाले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत सदर योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात या सरकारच्या काळात तिप्पट वाढ झाली आहे.
            शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय्य विभागातर्फे 8फेब्रुवारी 2019 रोजी याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. सन 2018-19 या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयासाठी सदर योजनेकरीता 4500 इतके मंजूर उद्दीष्ट होते. त्यात आता 2500 इतके अतिरीक्त उद्दीष्ट मंजूर करण्यात आले आहे. आता चंद्रपूर जिल्हयाचे एकूण उद्दीष्ट 7 हजार इतके झाले आहे.
            जानेवारी 2019 मध्ये वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत रमाई आवास घरकुल योजना (ग्रामीण) साठी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता मंजूर उद्दीष्ट अपूरे पडत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाला अतिरिक्त उद्दीष्ट मंजूर करण्यासाठी निर्देश दिले होते. त्यानुसार आता चंद्रपूर जिल्हयाच्या एकूण उद्दीष्टात 2500 ने वाढ झाली आहे.
            याआधी 2010-11 मध्ये 512, सन 2011-12 मध्ये 950, सन 2012-13 मध्ये 370, सन 2013-14 मध्ये 220, सन 2014-15मध्ये 1000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 3052 तर सन 2015-16 मध्ये 390, सन 2016-17 मध्ये1252,  सन 2017-18मध्ये 2000 तर सन 2018-19 मध्ये 7000 याप्रमाणे या सरकारच्या कार्यकाळात 10642 इतके उद्दीष्ट चंद्रपूर जिल्हयासाठी निर्धारित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत यासरकारच्या कार्यकाळात उद्दीष्टातील ही वाढ तिप्पट आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता सदर योजनेचे एकूण उद्दीष्ट 7000 इतके झाले आहे.
            अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात रमाई आवास योजनेसाठी उद्दीष्टात झालेल्या भरीव वाढीमुळे मोठया संख्येने या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार आहे. 


चंद्रपुरात आजपासून पक्षिमित्रांचा चिवचिवाट

चंद्रपुरात आजपासून पक्षिमित्रांचा चिवचिवाट

19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपुरात*

पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक, मार्गदर्शकांची मांदियाळी

चंद्रपूरः 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन 9 व 10 फेब्रुवारी 2019 ला चंद्रपूरात आयोजित होत असून इको-प्रो संस्थेतर्फे सदर आयोजनाची तयारी पूर्ण झालेली आहे.


या संमेलनाचे उद्घाटक राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री नितिन काकोडकर यांचे हस्ते होत असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोपाल ठोसर, जेष्ठ पक्षी अभ्यासक असनार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षीमित्र, संमेलन अध्यक्ष श्री दिलीप विरखडे, विशेष उपस्थिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चे क्षेत्रसंचालक श्री एन आर प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार, स्वागताध्यक्ष डॉ अशोक जीवतोड़े, श्री मनोहर पाऊनकर, अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, श्री सुरेश चोपणे, अध्यक्ष ग्रीन प्लैनेट प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.


सदर संमेलन मधे विदर्भातील पक्षीमित्र, अभ्यासक, मार्गदर्शक उपस्थित होणार असून या संमेलन मधे जवळपास 140 पक्षीमित्र यांनी नोंदणी केलेली आहे. सदर संमेलन जिल्ह्यातील माळढोक व सारस पक्षी संरक्षण व अधिवास संरक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. दोन दिवसीय चालणाऱ्या या संमेलना मधे जिल्ह्यातील पक्षी अधिवास संरक्षण, विदर्भातील माळराने, पक्षी संरक्षण व संवर्धन, शहरी पक्षी अधिवास व सध्यस्थिति, पक्षी व पक्ष्याची अधिवास संरक्षण व संवर्धनापुढील आवाहने या विषयावर चर्चा सत्र आयोजित होणार आहे. या दरम्यान विविध अभ्यासकाचे प्रेजेंटेशन सादरिकरण होणार आहे.

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम

अंधश्रद्धेचा समाजावर होणार परिणाम या विषयावर कारंजा येथील महाविद्यालाययात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती व राष्ट्रीय सेवा योजना रा.तू.म.नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवा जागृती अभियान 2018-2019 अंतर्गत अंधश्रद्धाचां समाजावर होणारा परिणाम या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कारंजा यांच्या आयोजनाखाली तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्ध्येचे आयोजन नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज कारंजा येथे आयोजित करण्यात आला होता.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पी.जे काळे सर उद्घाटक प्राचार्य अंधारे   हे तर प्रमुख पाहुणे अंनिस चे तालुका संघटक राजकुमार तिर्भाने , डॉ अमित याहूल .डॉ मेंढे ,बार्टी चे समतादूत विनायक भांगे, सिध्दार्थ सोमकुवर  हे उपस्थित होते

यावेळी स्पर्ध्येचे मुल्यांकनाची  जवाबदारी समतादूत सिध्दार्थ सोमकुवर व अंनिस सहसंघटक राणसिंग बावरी यांनी पार पाडली. या स्पर्ध्येत तालुक्यातील  साक्षी सावरकर,प्रज्वल शिरपूरकर,कांचन बसिने,कोमल खवशी,भावना बंनगरे या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला यात   प्रथम   वैभव ढोबळे, द्वितीय लोकेश सोनोने  व तृतीय कोमल खवसे यांनीं  प्राविण्य प्राप्त केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अंकित खांडवे,उद्देश वाल गावकार,प्रेरणा सावरकर,पूजा हिंगवे,प्रेमीला भांगे,वैभव ढोबळे अपेक्षा वरकडे, वैभव ठाकूर, रश्मी हिंगवे व निशा नासारे यांनी अथक परिश्रम घेतले.

 स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र सुरु करा

स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र सुरु करा

मनोज चिचघरे, भंडारा प्रतिनिधी 

पवनी : तालुक्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी तालुका पवनी, यांनी केली. 


भंडारा जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस असल्यामुळे ८०,०४८ नोंदणीकृत बेरोजगार व अनोंदणीकृत लाखो बेरोजगार रोजगाराच्या शोधात ईतरस्त्र भटकत आहेत. 

अशोक लेलैन्ड, सनफ्लँग एम, एम, पी, (महाराष्ट्र मेटल पावडर) 

हिंदुस्तान कोमझेप, ई -लाईट या कंपन्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी तालुका, अध्यक्ष शुभम वंजारी, 

व लोमेश वैद्य, शैलेश मयूर, लोकेश वैद्य  प्रफुल्ल रघूते, शुभम देशमुख, अजय धेग्रे, यांनी केली. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 


 पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

परभणी/ प्रतिनिधी :-

  केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली असून यामध्ये 5 एकर शेती असणाऱ्या कुटुंबातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये मिळणार आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी आधारकार्ड व बँक पासबुकाची छायांकीत प्रत संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक गावात हजर राहतील त्यांच्याकडे शुक्रवार दि.8 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याबाबत दि.6 फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक मंगेश  सुरवसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


ग्रामस्तरीय समितीमध्ये तलाठी हे समिती प्रमुख तर ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सचिव हे सदस्य असणार आहेत. तरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.

 परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबीर

परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबीर

प्रशांत गेडाम/ प्रतिनिधी

 सिंदेवाही -:  तालुक्यातील सर्वोदय विद्यालय  गडबोरी येथे प्रथम  (NGO) आणि सिंदेवाही  पंचायत समिती  मधील शिक्षण विभाग  यांच्या  तर्फ़े   सिंदेवाही तालुक्यातील विद्यार्थ्यांची  परीक्षेबद्दल भीती दूर व्हावी,  परीक्षेचा जास्तीत जास्त सराव व्हावा याकरिता तालुक्यातील गडबोरी ,वासेरा ,रामाळा देवाडा या गावातील    वर्ग 10 वीच्या   विद्यार्थ्यांना करीता परीक्षा पूर्व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि माता रमाई यांच्या प्रतिमचे पुजन करून उद्घाटक करण्यात आले. यावेळी गणित आणि इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन तालुक्यातील तज्ञ मार्गदर्शन श्री मांडवकर सर , ठवकर सर आणि करंबे सर  विषय तज्ञ मेश्राम सर  प्रथम चे विनोद ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून बोर्ड परीक्षेच्या कृतीप्रतिका कश्याप्रकार चे असतात .हे  समजावून सांगण्यात आले. तसेच गडबोरी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले व  परीक्षेकरिता  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .

या कार्यमाला पंचायत समिती सिंदेवाही विषय तज्ञ भारत मेश्राम सर आणि प्रथम चे प्रतिनिधी विनोद ठाकरे ,सपना कुलमेथे ,आरती नागदेवते ,  भूषण निशाणे यांनी सहकार्य केले यावेळी सर्वोदय शाळेचे मुख्याध्यापक  शिक्षक वर्ग आणी शाळेचे तसेच परीसरातील  विद्यार्थी उपस्थित होते.

मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा १९ फेब्रुवारीला

मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा १९ फेब्रुवारीला

श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ येथे समाज मेळावा व सामुहिक विवाह सोहळा
नागपूर/ अरूण कराळे :


श्री संत दौलत महाराज संगमेश्वर शिवमंदिर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा) येथे दरवर्षी प्रमाणे माघ् पौर्णिमा उत्साहाच्या पावन पर्वावर सोमवार १८ फेब्रुवारी व मंगळवार  १९ फेब्रुवारी रोजी मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, मातंग समाज मेळावा व सामाजिक सत्कार सोहळा संस्थेच्या वतीने व माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने यांच्या प्रमुख  उपस्थितीत आयोजित केलेला आहे.
 श्री संत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ (जलालखेडा, तालुका नरखेड) येथे आयोजित १८ फेब्रुवारी रोजी दुपारी संस्थान परिसरात ग्राम स्वच्छता अभियान  राबविण्यात येईल. तर सायंकाळी सहा वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सामुदायिक प्रार्थना होईल. नंतर रामभाऊ निमकर यांचे शहनाई वादन तर हरिनाम व सामाजिक किर्तन ह .भ.प. रामचंद्र महाराज काळबांडे यांचे होईल. गितगायन मुक्ताताई, श्रीराम जोंधळकर, भक्तीमय संगीत संजय तिळके, सुगम गायन पुजा किशोर वानखेडे, वंदना खंडारे अन्य समाजातील कलावंताचे प्रबोधन, गायन करण्यात येईल.


      १९ फेब्रुवारीला दुपारी १ ते २  मातंग समाजांचा सामुहिक विवाह सोहळा, समाज मेळावा व सामाजिक सत्कारमुर्तीचे स्वागत समारोहाचे औचित्य साधून अरुण गायकवाड यांच्या शहनाई वादनासह महाराष्ट्र शासन समाजभुषन पुरस्कृत संजय ठोसर,शंकर ठोसर प्रस्तुत स्वररंग म्युजिकल ग्रुप नागपूरच्या वतीने अभंगवाणीचे सादरीकरण मनवर ठोसरसह क्रिष्णा गायकवाड यांचे राहील. गोपालकाल्याचे किर्तन ह .भ .प .रामचंद्र काळबांडे, संगीतमय समाज प्रबोधन अशोक वानखेडे व संच  अंजनसिंग जि.अमरावती यांचे राहील.
     मातंग समाजातील इच्छुक वधु-वरांनी आपली नावे आयोजक समीतीच्या श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्था मुक्तापूर पेठ यांचेकडे  रविवार १० फेब्रुवारी  पर्यंत निःशुल्क नोंद नोंदविली जाईल. तसेच मातंग समाज बांधवानी या संधीचा लाभ घ्यावा. व जास्तीतजास्त संखने उपस्थित राहवे असे आवाहन श्रीसंत दौलत महाराज संगमेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बालकदास खंडारे, उपाध्यक्ष अशोक डोके, सचिव नत्थु अडागळे, सहसचिव रामदास खडसे, कोषाध्यक्ष अरुण गायकवाड, संपर्क सचिव संजय ठोसर यांनी केले आहे .
      संस्थान परिसर श्रीक्षेत्र मुक्तापूर पेठ या मंगलमय कार्यक्रमास लाभणारे सत्कारमुर्ती माजी राज्यमंत्री अनिल देशमुख, खासदार कृपाल तुमाने,माजी जि.प.सदस्य डॉ.आनंद खडसे, जि.प.उपाध्यक्ष शरद डोनेकर, जि .प. माजी अध्यक्ष बंडोपत उमरकर, जि.प.शिक्षण सभापती उकेश चव्हाण, पं.स. सभापती राजेंद्र हरणे, मुक्तापूर पेठ सरपंचा द्वारकाबाई नाखले, जेष्ठ समाजसेवक डॉ .अशोक कांबळे, लहानु इंगळे, महादेव जाधव, केशव कांबळे, रविंद्र खडसे, सुनिल सोनवाने, साहेबराव वानखेडेसह पदाधिकारी व सदस्यगण यांच्या उपस्थितीत मंगलमय विवाह सोहळा कार्यक्रम होणार आहे.


Thursday, February 07, 2019

शेतकऱ्यांच्या खात्यात 7200 कोटी रुपये जमा होणार

शेतकऱ्यांच्या खात्यात 7200 कोटी रुपये जमा होणार



प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा
महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकऱ्यांना लाभ

मुंबई, दि. 7 : केंद्र शासनाने जाहिर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या 80 टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात 7 हजार 200 कोटी रुपये जमा होणार असून योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मुख्य सचिवांनी सूचना दिल्या आहेत. अशी माहिती कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार ही योजना राज्यात राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गरजू शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

सन 2015-16 मध्ये झालेल्या कृषी गणनेनुसार राज्यात 1 कोटी 52 लाख 85 हजार 439 शेतकरी आहेत. कोकण विभागात 14 लाख 86 हजार 144 शेतकरी आहेत त्यापैकी अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी संख्या 84.50 टक्के एवढी आहे. नाशिक विभागात 26 लाख 94 हजार 481 शेतकरी असून त्यापैकी 78 टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. पुणे विभागात 37 लाख 23 हजार 673 पैकी 84 टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. औरंगाबाद विभागात 39 लाख 53 हजार 400 शेतकऱ्यांपैकी 79.50 टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक आहेत. अमरावती विभागात एकूण शेतकऱ्यांची संख्या 19 लाख 13 हजार 258 असून 73 टक्के अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी असून नागपूर विभागातील 15 लाख 14 हजार 483 शेतकऱ्यांपैकी 76 टक्के शेतकरी अत्यल्प आणि अल्प भूधारक गटातील आहेत.

ज्या कुटुंबाचे (पती-पत्नी आणि त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्यांचा समावेश) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकुण कमाल धारणक्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल अशा कुटुंबाना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबाचा देखील या योजनेत समावेश करण्याचा तसेच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी कृषी विभागाने नोडल विभाग म्हणून कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

संवैधानिक पद धारण करणारे/केलेले आजी व माजी व्यक्ती, आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य, आजी/माजी महानगरपालिकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी/कर्मचारी (चतुर्थश्रेणी/गड-ड वर्गातील कर्मचारी वगळून), मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती,निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता,सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊटंट), वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट), इ. क्षेत्रातील व्यक्ती यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. अपात्रतेचे निकष केंद्र शासनाने निश्चित केले आहेत.

एखाद्या संयुक्त कुटुंबामध्ये चार किंवा पाच उपकुटुंब असतील आणि त्यातील प्रत्येकाच्या नावावर दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असेल तर त्या उपकुटुंब प्रमुखालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्र कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार असून ते दोन हजार रुपये याप्रमाणे तीन टप्प्यात देण्यात येतील.

राज्यात अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 80 टक्के म्हणजे जवळपास एक कोटी 20 लाख एवढी असून त्यातील निकषास पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत वर्षभरात 7200 कोटी रुपये मिळणार आहेत. गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?


▪माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अर्ज केलाच नाही

▪काँग्रेसकडून 12 जणानी केले अर्ज


चंद्रपूर/ प्रातिनिधी :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून कोण?, असा प्रश्न चर्चेत आहे. यातच माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अर्ज केलाच नाही. त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एकूण बारा जणांनी अर्ज केले. यावेळी या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपकडून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना परत उमेदवारीची शक्यता वर्तविली जात असताना काँग्रेसकडून मात्र इच्छुक दावेदारांची यादी वाढत आहे. पण कॉंग्रेसचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्यातील चंद्रपूर,बल्लारपूर, राजुरा व वरोरा या चार तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. हा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र १९९६मध्ये या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले. त्यानंतरच्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. २००४ नंतर मात्र भाजपने आजतागायत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या लोकसभेच्या दृष्टीने राजकीय हालचालींनी वेग पकडला असला तरी अद्यापही कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी स्पष्ट झालेली नाही.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात खरी लढत भाजप-काँग्रेसमध्येच होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला आता सुरुवात झालेली आहे. विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार हे लोकसभा लढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत, तर दुसरीकडे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मात्र आपला अर्ज भरलेला नाही. मागील वेळेस पुगलिया यांना डावलून संजय देवतळे यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यानंतर देवतळे भाजपवासी झाले. ते बघता आता नविन चेहऱ्याला संधी मिळण्याची  शक्यता आहे. यात तेली समाजातील नेते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. माजी खासदार दिवंगत नेते शांताराम पोटदुखे यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारली होती. त्यांच्या निमित्ताने तेली समाजाला संधी मिळाली. या लोकसभा मतदारसंघात तेली समाज सर्वाधिक असून, त्यातील अनेक दावेदार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यात प्रामुख्याने तेली समाजाचे वरिष्ठ नेते आणि सेवादलचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, देवराव घटे यांचा समावेश आहे. समाजा पाठोपाठ कुणबी समाजाचीही संख्या मोठी असल्याने या समाजातूनही इच्छुकांची यादी पुढे आली आहे. यात मनोहर पाउनकर, दिनेश चोखारे, बाळू गोहोकार यांचा समावेश आहे. याशिवाय प्राध्यापक कोंगरे, आमदार कासावार, सुनीता लोढीया, शिवा राव यांनीही उमेदवारी साठी अर्ज दाखल केला आहे.


चंद्रपूरची जागा सेवादलला राखीव 
केंद्रीय स्तरावर पक्ष नेतृत्त्वात मोठ्या प्रमाणात  झालेले बदल आणि आगामी लोकसभा बहुमताने जिंकण्यासाठी कांग्रेस रणनीती आखत आहे. त्यानुसार काँग्रेसच्या विविध विंगमधील लोकांना पुढे आणण्यासाठी योजना आखली जात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील मागील १५ वर्षांचा इतिहास बघता यंदा चंद्रपूरची जागा सेवादल साठी राखीव ठेवण्याचा विचार पक्ष निरीक्षक करीत आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील काही जेष्ठ नेत्यांना २६ जानेवारी ला प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईला बोलाविले होते. त्यानंतर वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या सर्वांना ५ फेब्रुवारीला दिल्लीला बोलावून घेतले. चंद्रपूरच्या या जागेवर चर्चा करण्यासाठी सेवादल चे राष्ट्रीय संघटक लालजी देसाई यांनी हि जागा सेवादलच्याच एखाद्या कार्यकुशल कार्यकर्त्याला देण्याची आग्रही भूमिका मांडली. यावेळी नागपूर, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर येथील वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.

शिवाणीचे ब्रह्मपुरीत दौरे वाढले 
चंद्रपूर लोकसभेची जागा मिळावी, यासाठी विजय वडेट्टीवार प्रयत्नशील असून, तसे झालेच तर वारसदार म्हणून ब्रह्मपुरी विधानसभेतून सुपुत्री शिवाणी वडेट्टीवार निवडणूक लढू शकते. त्यासाठीच ती गेल्या ८ दिवसापासून ब्रह्मपुरीत दौरे करीत आहे. सावलीतील मेहा बुज येथे महिला काँग्रेसचा मेळावा, आरोग्य मार्गदर्शन व हळदीकुंकु कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थिती होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या सावली तालुक्याचा दौरा करीत आहेत.

नाहीतर हे येणार बाहेरील चेहेरे 
चंद्रपूर काँग्रेस कमेटीतील २ गटातील वाद जर निवडणूक काळापर्यंत शमला नाहीतर बाहेरील चेहेरे उभे करण्याचा प्रस्ताव सुरु आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांना तिकीट देण्याचा विचार पक्षातील काही नेते करीत आहेत.

पारोमिता विधानसभा लढणार
श्रमिक एल्गारच्या प्रमुख तथा दारूबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील,अशी चर्चा मागील काही दिवसापासून होती. शिवाय त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात होते. मात्र त्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करित असल्याची चर्चा पुढे आली आहे. 
राष्ट्रपतींनी घेतली जुन्या पेन्शनच्या लढाईची दखल

राष्ट्रपतींनी घेतली जुन्या पेन्शनच्या लढाईची दखल



🔵 विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनाची दखल

🔵 जुनी पेन्शन व शिक्षण हितार्थ एकीने लढण्याचे मिलिंद वानखेडे यांचे आवाहन



नागपूर - देशभरात जुन्या पेन्शनच्या मागणीचा आवाज सर्वदूर घुमत आहे. हा आवाज विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरने थेट राष्ट्रपतीं पर्यंत पोहोचविला. राष्ट्रपतींनी या निवेदनाची दखल घेतली असून संबंधित कार्यालयांना यात लक्ष घालण्याचे कळविले असल्याचे पत्र संघटनेला पाठविले आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपसी मतभेद विसरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक नेते व विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे संस्थापक मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.

राज्य सरकारने एक नोव्हेंबर 2005 पासून लागलेल्या कर्मचार्‍यांना 1982-84 ची पेन्शन योजना बंद केली. त्याऐवजी खासगी कंपनीच्या धोरणावर अवलंबून असलेली फसवी नवीन अंशदाय पेंशन योजना (DCPS /NPS) लागू केली आहे. या योजनेत कर्मचार्‍यांचे कुठलेही संरक्षण नसल्याने मृत्यू पश्चात किंवा निवृत्ती नंतर कुटुंबाची वाताहत करणारी हि योजना आहे. राज्यात आजमितीस 3500 कुटुंबावर हा डोंगर कोसळला असून त्यातून गोंडस पेन्शन योजनेचे दुष्परिणाम दिसून येत आहे. राज्यात अत्यंत आक्रमक पध्दतीने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे मोठे आंदोलन सुरू आहे.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर तर्फे 27 सप्टेंबर 2018 रोजी थेट राष्ट्रपतींना 1700 पोस्टकार्ड व 80 पानाचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत पाठविण्यात आले होते. या आंदोलनाची राष्ट्रपतींनी दखल घेतली असून या विषयावर गांभीर्यपूर्वक निर्णय घेण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे पाठविले आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजमितीस संपूर्ण देश एकवटला आहे. नवी दिल्ली येथे NMOPS च्या माध्यमातून अटेवा बंधू यांनी पाच लाख कर्मचार्‍यांच्या उपस्थित शंखनाद फुंकला आहे.

कर्मचारीवर्गाच्या हितार्थ जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे धाडस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखविले. मात्र राज्यातील राज्यकर्ते आताही केवळ अभ्यास करीत असल्याच्या थापा मारून कर्मचार्‍यांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे No Pension - No Vote चा बिगुल फुंकला असून जुन्या पेन्शनसाठी वेगवेगळ्या मंचावर लढाई लढणा-या सर्व शासकीय कर्मचारी संघटनेने एकजुटीनं जुनी पेन्शनचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे माजी शिक्षण मंडळ सदस्य व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.

राष्ट्रपतींना 1700 पोस्टकार्ड पाठविण्याच्या आंदोलनात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे राजेंद्र खंडाईत, खिमेश बढिये, गणेश खोब्रागडे, गणेश उघडे, रविकांत गेडाम, समीर काळे, भिमराव शिंदेमेश्राम, संजय धरममाळी, सुरेश धारणे, राजु हारगुडे, गोंदिया जिल्हा संघटक बालकृष्ण बालपांडे, प्रणाली रंगारी, रिना टाले, आत्माराम बावनकुळे, राजु भस्मे, गौरीशंकर साठवणे, अरविंद घोडमारे, आशा कास्त्री,सारिका पैडलवार यांच्यासह शिक्षक, वनविभाग, ग्रामसेवक, टपालसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बळसाणेत शालेय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश  वाटप

बळसाणेत शालेय गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

खबरबात, गणेश जैन, धुळे

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील कै.एन.पी.जी.विद्यालयात  हुशार , होतकरू व गरजू मुला, मुलींना नुकतेच ६५० शालेय गणवेश मोफत वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाल्याचे महावीर जैन यांनी सांगितले. 

शिक्षण म्हणजे जीवन जगण्याची कला पण हीच कला काही दिवसांनी संपण्याच्या मार्गावर आहे  बळसाणेसह माळमाथा भागात शेतकऱ्यांची व सर्व साधारण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण अर्धवट च राहून जात आहे व बळसाणेसह माळमाथा परिसरात बहुतांश ठिकाणी अशीच परिस्थिती आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून जैन समाजाने दुष्काळ ग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषाखा पासून ते स्कूल बँग्स , वह्या , कंपास , वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे गेल्या वर्षी बळसाणे विद्यालयात बावीशे रजिस्टर नोटबुक्स वाटपाचा कार्यक्रम मुंबई च्या प्रेम स्पर्श मार्फत झाला त्याच प्रमाणे महावीर जैन यांनी विश्वकल्याणकाचे ट्रस्ट गण यांना सांगितले की बळसाणे गावात दुष्काळ परिस्थिती असल्याने विद्यार्थी शालेय जीवनात लागणाऱ्या साहित्यास खरेदी करावयास मोठी अडचण भासत असल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून अलिप्त होताना दिसून येत आहे यासाठी आपण शालेय विद्यार्थ्यांना गणवेश भेट द्यावे अशी अपेक्षा महावीर जैन यांनी केली जैन यांच्या सांगण्याप्रमाणे धुळे येथील कमलेश गांधी यांनी मुंबई येथील दानशूर चंद्रहास वोरा यांना बळसाणे येथील विद्यार्थी पैसे अभावी शिक्षणाला तऱ्हे देत आहे तरी आपण आपल्या इच्छा शक्तीनुसार शालेय गणवेश देण्यात यावे त्याचप्रमाणे मुंबई चे चंद्रहस वोरा यांच्या वतीने कै. एन.पी.जी.विद्यालयाला साडे सहाशे विद्यार्थ्यांना गणवेश भेट देण्यात आले नियमितपणे समाजकार्यासाठी जैन समाज खरोखरच पुढे येत असल्याचे सरपंच दरबारसिंग गिरासे यांनी मनोगतातून सांगितले व कमलेश गांधी म्हणाले की आमच्या संस्था कायम सामाजिक उपक्रमास अग्रेसर राहत असल्याची ग्वाही गांधी यांनी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेंद्र टाटीया होते याकामी विश्वकल्याणकाचे ट्रस्टचे संचालक विजय राठोड, कमलेश गांधी , सुरेंद्र टाटिया  , सुरेंद्र भंसाली , पत्रकार गणेश जैन ,चंदन टाटीया व महावीर जैन व प्रमुख पाहुणा म्हणून दरबारसिंग गिरासे यांच्या उपस्थितीत शालेय गणवेश मुप्त वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.बी.पटेल व आभार प्रा.एस.बी. मोहने यांनी केले तसेच

कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेचे प्राचार्य , उपप्राचार्य यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले

NSS शिबिर म्हणजे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र

NSS शिबिर म्हणजे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र

www.khabarbat.com

www.khabarbat.com

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात  अनिल दबडे यांचे प्रतिपादन

मायणीः ता. खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे)

  "राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र आहे. या शिबिरांमधून प्रेरणा व बळ घेऊन समाजकार्य करणारे कार्यकर्ते घडतात. तरुणांना समाजकार्याची नवी दिशा मिळते, " असे प्रतिपादन  जयभवानी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल दबडे यांनी केले. ते कला, वाणिज्य महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच श्री. भास्कर खरात हे होते. यावेळी पोलीस पाटील सचिन शेटे,  प्राचार्य डॉ सयाजीराव मोकाशी,श्री यशवंत माळी, श्री राजू रसाळ, श्री अलीभाई तांबोळी (स्वच्छता दूत), सत्यजीत साळुंखे, श्री दीपक नामदे, श्री विठ्ठल पाटील, नदीम शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते


कार्यक्रमाच्या प्रारंभी रासेयो प्रकल्पाधिकारी डॉ. उत्तम टेंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस पाटील सचिन शेटे यांनी ग्रामस्थांच्यावतीने संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. श्री विठ्ठल पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या जुन्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. शिवशंकर माळी यांनी केले. ग्रामस्थ, प्राध्यापक वृंद याची मोठी उपस्थिती होती.

 अँग्रो साखर कारखान्यात विद्यार्थ्यांनी घेतले औद्योगिकीकरणाचे धडे

अँग्रो साखर कारखान्यात विद्यार्थ्यांनी घेतले औद्योगिकीकरणाचे धडे


मायणी :-ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)

    सध्याच्या शिक्षण प्रणाली मध्ये परिसर अभ्यास , भूगोल या विषयातून मुले उद्योग, दळणवळण, नद्या, संपर्क साधने, हवामान, नकाशा आदी घटकांची माहिती मिळवत असतात. पण पुस्तकात दिलेली उद्योग व कारखान्यांची माहिती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देऊन पूर्वज्ञानाची सांगड घालण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी शिंदे विद्यालय ,एनकुळ च्या विद्यार्थ्यांनी खटाव माण तालुका अँग्रो साखर कारखान्याची क्षेत्रभेटीसाठी निवड केली. 
        
           यावेळी विद्यार्थ्यांनी औद्योगिकीकरणाचे धडे घेत ,आपल्या रोजच्या  आहारात विविध पदार्थांमध्ये आवश्यक असणारी साखर प्रत्येक्ष कोणत्या कोणत्या प्रक्रियेतून तयार होते .यासाठी लागणारी यंत्रसामग्री कोणती याची माहिती कारखान्याचे इंजिनिअर अभिजित बाबर,शिवराज चव्हाण,लेबर ऑफिसर प्रसाद बिडकर यांचेकडून घेतली.

नुकताच बॉयलर प्रदिपन झालेल्या या कारखान्यात लवकरच साखर उत्पादनास सुरुवात होणार असून कारखान्यात असणारी मोठी यंत्र सामग्री ,भली मोठी धूर सोडणारी चिमणी,मोठमोठ्या रसाच्या,पाण्याच्या टाक्या,वीज निर्माण कक्ष हे सर्व पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. मुलांनी येथे काम करणाऱ्या काही कामगार बंधूंशी सुद्धा संवाद साधला. कारखान्याच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या समवेत महर्षी शिंदे विद्यालयाचे डी बी खाडे ,आर के पोतदार, रेखा देसाई ,वसंत पिसे ,आर जी केंगार,एच बी मुलाणी आदी शिक्षक उपस्थित होते.

 चौकट :- कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे यांनी गुरुकुल अभ्यासक्रमअंतर्गत असणाऱ्या या क्षेत्रभेटीत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी घेतलेल्या माहितीची उजळणी घेतली . विद्यार्थ्यां व शिक्षक यांनी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या सोबत फोटो घेतले. यावेळी संचालक विक्रम घोरपडे,महेश घार्गे, टेक्निकल डायरेक्टर बालाजी जाधव यांची उपस्थिती होती.

Wednesday, February 06, 2019

चारचाकी वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार

चारचाकी वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:

 ब्रम्हपुरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खेड रोडवरील डीएफओ यांच्या बंगल्याजवळ् अज्ञात चारचाकी वाहनाने सायकलस्वारास धडक दिली असता सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना रात्री ७.३० वाजता घडली. अपघातानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला.

प्राप्त माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील खेड येथील रहिवासी रामचंद्र मेश्राम वय ५० हे आपल्या सायकलने आपल्या स्वगावी परतत असतांना डीएफओ यांच्या बंगल्याजवळ् अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या सायकलला धडक दिली. यात रामचंद्र मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अज्ञात चारचाकी वाहन चालक घटनास्थळून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू


उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):
कारंजा (घा.) तालुक्यातील आजनडोह येथून कन्नमवरग्राम मार्ग धावसा या आपल्या गावाला जात असलेला रणजीत मानमोडे वय ४२वर्ष याची दुचाकी क्र. MH31CX2562 रोडवरील सागाच्या झाडावर धडकली आणि या अपघातात रणजीत मानमोडे यांचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीवर जखमी दोघांना कन्नमवरग्राम ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेले असून मृत रणजीत मानमोडे याचे शव कारंजा रुग्णालयात आणले आहे. दुचाकीवर तिघे जण स्वार होते. अपघात आज संध्याकाळी ६ वाजत्याच्या दरम्यान आजनडोह जवळील शिव नाल्याजवळ झाली. कारंजा पोलीस घटना स्थळी दाखल झाली आहेत.



 सावित्रीच्या लेकींनी पकडली दारू अन श्रेय लाटले गडचांदूर पोलिसांनी

सावित्रीच्या लेकींनी पकडली दारू अन श्रेय लाटले गडचांदूर पोलिसांनी

नागपूर/खबरबात:

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नंतरही अवैध दारू येणे थांबत नसल्याने आणि याचमुळे गावातील युवक वाईट मार्गाने लागू नये म्हणून गावासाठी संघर्ष करणाऱ्या गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांनी मोठ्या धाडसाने गावात येणाऱ्या दारूच्या वाहनासह दारूच्या ७४ पेट्या पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत शाब्बासकीचे काम केले आहे.मात्र महिलांनी केलेल्या या कारवाईचे श्रेय लाटण्याचे काम गडचांदूर पोलिस करीत असल्याचे लक्षात येत आहे.

 मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शिरपूर ते गाडेगाव मार्गाने पोलीस पाटील यांच्या घरासमोर टाटा सफारी क्रमांक एच.आर 26 ए.के.0612 वाहनातून अवैध दारू येत असल्याची माहिती गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांना मिळाली,या समितीतील काही महिलांनी पुढाकार घेत अवैध दारू वाहतूक होणाऱ्या गाडीला पकडण्याचे ठरविले व महिलांनी मोठ्या शिताफीने गाडी पकडली या सोबतच या गाडीत २ ड्रायव्हर होते. त्यातील एक ड्रायवर पडून जाण्यास यशस्वी ठरला मात्र नरेश विठ्ठल बावणे वय 21 रा. खिर्डी  ता.कोरपना जि. चंद्रपुर यास  ड्रायव्हरला पकडण्यास महिलांना यश आले.व याला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाला गावाच्या लोकांची मोठी मदत मिळाली व याचमुळे महिलांना अवैध दारू पकडता आली.

दारूचे वाहन पकडल्या नंतर याची माहिती पोलिसांना दिली.व नंतर पुढील कारवाई झाली,मात्र पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीमध्ये हि कारवाई गडचांदूर पोलिसांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र हि कारवाई गडचांदूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्या महिलांनी केली.असून त्याला नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण प्रकरणात पोलीस आपली पाठ थोपटवून घेण्यासाठी असे करत असल्याचे लक्षात येत आहे, या कारवाईत बराच संभ्रम निर्माण होत असून पोलिसांना त्यांच्या हदीतील अवैध दारू पास होण्याची माहिती मिळाली नाही का?असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे ,तर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली नसून हि कारवाई महिलांनी करून पोलिसांच्या स्वाधीन आले आहे. सावित्रीच्या लेकीने दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर गावच्या संघर्ष समित्यांनी देखील बोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार

१५ फेब्रुवारी रोजी पुण्यात वितरणढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. ६ : राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला असून, १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तमाशा क्षेत्रात विठाबाई नारायणगावकर यांनी केलेली प्रदीर्घ सेवा विचारात घेता त्यांच्या नावे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र शासनातर्फे सन २००५ पासून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार विविध कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा लोकशाहीर बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना घोषित करण्यात आला आहे. गतवर्षीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ कलाकार मधुकर नेराळे यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५ लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे औचित्य साधून राज्य शासनाच्यावतीने पाच दिवसाच्या ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ढोलकीफड तमाशा महोत्सव १४ ते १८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वाघोली बाजारतळ तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

ढोलकीफड तमाशा महोत्सवात दरदिवशी एका लोकनाट्य मंडळाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. गुरुवार दि. १४ फेब्रुवारी रोजी हरिभाऊ बडे नगरकर सह शिवकन्या बडे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शुक्रवार दि. १५ फेब्रुवारी रोजी भिका भीमा सांगवीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, शनिवार दि. १६ फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ, रविवार १७ फेब्रुवारी रोजी सौ. मालती इनामदार नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, सोमवार दि. १८ फेब्रुवारी रोजी श्रीमती मंगला बनसोडे करवडीकर सह नितीन बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ हि लोकनाट्य मंडळे ढोलकीफड तमाशा महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

तरी रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा भरभरून आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक यांनी केले आहे.