स्वामी फ्युएल कंपनीत लेखापाल अशोक अग्रवाल यांच्या आत्महत्या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. अशोक अग्रवाल यांच्या आत्महत्तेनंतर हे सर्व आरोपी फरार होते.पोलीस त्यांच्या मागावर होती. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी या चारही जणांना जामीन मिळाला.या चारही जणांवर गुन्हे दाखल झाले तेव्हापासून हे चारही आरोपी फरार होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोडक यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर शनिवारला न्यायालयाने या चारही जणांना जामीन मंजूर केला आहे.या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना ८ ऑगस्ट परियंत रामनगर पोलीस स्टेशन येथे उपस्थित राहत पोलीस कारवाईत मदत करण्याचे व साक्षीदारावर कोणताही दबाव आणू नये अशे आदेश दिले असल्याची माहिती आहे,या प्रकणात झालेल्या अटकपूर्व जमिनेकडे सर्वांचे लक्ष लागले.
Showing posts with label अग्रवाल. Show all posts
Showing posts with label अग्रवाल. Show all posts