সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, April 30, 2015

 विविध समस्यांवर मुनगंटीवारांशी सकारात्मक चर्चा

विविध समस्यांवर मुनगंटीवारांशी सकारात्मक चर्चा

चंद्रपूर -शहराच्या सौंदर्यात भर टाकणाºया रामाळा तलावातील इकोर्नियाच्या समस्येसह, शहरातील रस्ते, वाहतूक व इतर विषयांवर राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी बुधवारी चर्चा केली. या चर्चेदरम्यान ना. मुनगंटीवारांनी इकोर्नियाच्या समूळ नायनाटासह रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण व इतर समस्या सोडविण्याचे ठोस आश्वासन दिले. 
राज्यात 1 मे पासून दर रविवारी 12 ठिकाणी ‘कलांगण’

राज्यात 1 मे पासून दर रविवारी 12 ठिकाणी ‘कलांगण’

राज्यात 1 मे पासून दर रविवारी 12 ठिकाणी ‘कलांगण’
देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा होणार अनोखा संगम

महाराष्ट्रात पहिल्यांदाच 1 मेपासुन विविध ठिकाणी देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम ‘कलांगण’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे. विरश्री आणि संगीत यांचा मिलाप असलेला पोलीस बॅंड, संरक्षण बॅंड, वैभवी गोरवगाथेचे कथन करणारा लघुपट, संस्कृतीच्या वारशाचे लोककलेव्दारे दर्शन असा हा उपक्रम दि. 1 मे 2015 पासून मुंबइ्र्र आणि महसुली विभागाच्या मुख्यालयासह अन्य जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी दर रविवारी सायंकाळी 7 ते 8 या वेळेत सादर होणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिली.
लोप पावत चाललेल्या लोक कला यांच संर्वधन, लोकान मध्ये ती कला रूजावी, सोबतच स्थानिक लोककलावंताना सादरीकरणासाठी मंच देऊन प्रोत्साहन व युवकांमध्ये देशभक्तीची भावना रूजावी असा उद्देश ‘कलागंण’ कार्यक्रमाचा असुन राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणविस, राज्याचे सांस्कृतीक मंत्री मा. विनोद तावडे, व चंद्रपूरचे पालक मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतुन साकार होणारा आहे.
शहराच्या मुख्य भागात लोकांना सहज पाहता येईल. या अनुषंगाने चंद्रपूर मधिल ‘आझाद गार्डन’ येथे ‘कलांगण’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात चंद्रपूर पोलीस बॅंड ने होईल त्यांनतर समुहगाण, वैभवी गोरवगाथेचे कथन करणारा लघुपट, संस्कृतीच्या वारशाचे लोककलेव्दारे दर्शन या मध्ये 1 शाहीरी पोवाडा, खडी गंमत, दंडार, डहाका, घोडा नाच, गोंधळ, दंडी गाण, ददरीया असे एकापेक्षा एक असे सरस लोककलांचे सादरीकरण स्थानिक लोककलावंतांकडून केले जाईल व शेवट पोलीस बॅंड ने होईल. सदर कार्यक्रम ‘आझाद गार्डन’’ येथे संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत सादर होणार आहे. तरी चंद्रपूर रसीकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान कार्यक्रमाचे समन्वयक सुशील सहारे यांनी केली  आहे.

Wednesday, April 29, 2015

केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना आता राज्याचेही पेन्शन

केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना आता राज्याचेही पेन्शन

- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : केंद्र सरकारच्या माजी सैनिकांना राज्यात सेवा केल्यानंतर आतापर्यंत फक्त केंद्र सरकारचेच निवृत्ती वेतन मिळत होते. यापुढे राज्यात सेवा करणाऱ्या माजी सैनिकांना केंद्रासह राज्याचेही निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. यासंबंधीचा शासन आदेश 27 एप्रिल रोजी निर्गमीत केल्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्र, गोवा व गुजरात क्षेत्राचे ले. जनरल आर.आर.निंभोरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, आमदार ॲड. संजय धोटे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, बिग्रेडियर डी.व्ही.सिंग, कर्नल दलबिरसिंगआदी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, सैनिकांमुळे राष्ट्राचा सन्मान असून सिमेवर लढणाऱ्या सैनिकामुळेच आपण निश्चिंत झोपू शकतो. सैनिक आपली शक्ती असून सैनिकांच्या कल्याणासाठी शासन सदैव प्रयत्न करणार आहे. राज्यात सेवा देणाऱ्या माजी सैनिकांना राज्य सरकारचे निवृत्ती वेतन लागू करण्याचा शासन आदेश निर्गमीत केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सैनिक विभागाच्या वतीने चंद्रपूर येथे मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह व विश्रामगृह बांधण्याचा विचार आहे. यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून निधी देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली. परमवीर चक्र प्राप्त सैनिकांचे स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ले.जनरल आर.आर.निंभोरकर म्हणाले, माजी सैनिकांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना असून या योजनांचा माजी सैनिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा. सैनिकांच्या कल्याणासाठी आपण सदैव पुढे असून माजी सैनिकांना काही अडचणी असल्यास त्या प्राध्यान्याने सोडविण्यात येतील.

मेळाव्यात वीर पत्नी व वीर मातांचा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर पाहुण्यांनी सैनिक विभागाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात युद्ध काळात वापरले जाणारे शस्त्र सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. पालकमंत्री व ले.जनरल यांनी माजी सैनिकांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. या मेळाव्यात ऐरोमॉडेलिंग शो करण्यात आला. मिल्ट्रीच्या पाईप बँडने उपस्थितांचे मने जिंकली.

Sunday, April 26, 2015

महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित आणणार

महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षित आणणार

नेपाळ येथे दिनांक 25 एप्रिल 2015 रोजी झालेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवित व वित्त हानी झालेली आहे. नेपाळ येथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना भारतात सुरक्षितपणे परत आणण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येत आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे समीर सहाय, अतिरिक्त निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन यांचे नेतृत्वाखाली स्वतंत्र सेलची स्थापना केली असून हेल्प लाईन देखील सुरू केलेली आहे. नवी दिल्ली येथील हेल्प लाईन क्रमांक 011-23380324 011-23380325 आहे. मुंबई मंत्रालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक 022-22027990 हा आपत्कालीन क्रमांक म्हणून जाहीर करण्यात आला आहे.मंत्रालय नियंत्रण कक्ष 24 x7 कार्यरत असून संबंधित अधिकारी दिनांक 24एप्रिल रोजी दुपारपासून नियंत्रण कक्षात उपस्थित असून परिस्थतीवर लक्ष ठेऊन आहेत. दिनांक 26.4.2015 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली यांना राज्यातील संपर्क झालेल्या 600 पर्यटकांची आणि संपर्क न (न) झालेल्या 150 पर्यटकांची यादी मंत्रालय नियंत्रण कक्षातून पाठविण्यात आली आहे. सदर यादी नेपाळ येथील भारतीय दूतावासामार्फत नेपाळ सरकारकडे सादर करण्यात आली आहे. संपर्क झालेल्या 600 पर्यटक हे सुरक्षित असून या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाची व्यवस्था परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत करण्यात आली आहे. काठमांडू विमानतळावरुन उपलब्ध विमानाद्वारे महिला, वृध्द आणि लहान मुले यांना प्राधानान्याने भारतात पाठविण्यात येत असून उर्वरित पर्यटकांना देखील लवकरच भारतात परत आणण्यात येईल.
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा. मंत्री, महसूल हे परिस्थितीवर जातीने लक्ष ठेऊन असून महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सतत संपर्कात आहेत.
सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांनी नेपाळ येथे गेलेल्या त्यांच्या जिल्हया तील पर्यटकांबाबत माहिती मिळवण्यासाठी दूरदर्शन, आकाशवाणी, स्थानिक टि.व्ही चॅनल/वर्तमानपत्रामध्ये जाहीर आवाहन केले आहे. पर्यटकांची माहिती संकलीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.
मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक सज्ज ठेवण्यात आले असून आवश्यकता भासल्यास सदर पथकांना शोध व बचाव कार्यासाठी नेपाळ येथे पाठविण्यात येईल.
ड़ॉ. विकास आमटे यांना 'नागभूषण' पुरस्कार

ड़ॉ. विकास आमटे यांना 'नागभूषण' पुरस्कार

नागपूर : विदर्भाचा लौकिक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविला, समाजकार्यासाठी आयुष्य वेचले व नि:स्पृहतेने देशसेवा केली अशा मान्यवरांना नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येतो. यंदा २0१५चा 'नागभूषण पुरस्कार' महारोगी सेवा समिती, 'आनंदवन' वरोरा, जि. चंद्रपूर अंतर्गत समाजातील उपेक्षित बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे डॉ. विकास आमटे यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
 
महापूरग्रस्त  भानेगाव

महापूरग्रस्त भानेगाव

महापूरग्रस्त
भानेगाव

भानेगाव हे गाव खापरखेडा वीज केंद्रालगत कन्हान व कोलार नदीच्या मधोमध वसले आहे. त्यामुळे हे गाव महापुराने बाधित होत असते. सावनेर तालुक्‍याअंतर्गत ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. याच गावापासून कामठी आणि पारशिवनी तालुक्‍यांच्या सीमारेषा सुरू होतात. त्यामुळे या दोन्ही शहरांचे अंतर येथून जवळ आहे. पूर्वी येथील नागरिक शेती करायचे. मात्र, औद्योगिकीकरणामुळे या शेती वीज केंद्र आणि वेकोलिने भूसंपादित केल्या. त्यामुळे शेतमालाचे उत्पन्न घटले. तरुणवर्ग कंत्राटी पद्धतीने वीज केंद्रात नोकरी करतो. वेकोलिने अद्याप नोकरी न दिल्याने अनेक तरुण रोजगारापासून वंचित आहेत. येथून आठ किलोमीटरवर कामठी येथे सैनिक प्रशिक्षण केंद्र आहे. येथे प्रशिक्षण घेणारे सैनिक फायरिंगच्या सरावासाठी भानेगाव परिसरात यायचे. भानेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत नवीन भानेगाव आणि नवीन बिना या पुनर्वसित वस्त्या जोडल्या आहेत.

Saturday, April 25, 2015

नागपुर, चंद्रपूर मध्ये भूंकप चा हलका  झटका

नागपुर, चंद्रपूर मध्ये भूंकप चा हलका झटका

नागपुर, चंद्रपूर मध्ये भूंकप चा हलका झटका

नेपाळसह राजधानी दिल्ली व संपूर्ण उत्तर भारताला आज (शनिवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा धक्का महाराष्ट्रातही नागपूर व अकोला जिल्ह्यातही बसला आहे.

आज नागपूरत १२ च्या सुमारास नागपुर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून नागपूरकर चांगलेच हादरले. शासकीय तसेच खासगी अस्थापनातील कर्मचारी भूकंपाच्या भीतीने कार्यालय सोडून बहेरचा मार्ग धरला. भूकंपाच्या भीतीने कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांमधे ही धावपळ निर्माण झाली होती.
राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखण्ड आदि ठिकाणी भूकंपाचे तीव्र झटके जनावले असून मुख्य केंद्र नेपाल येथे असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाची तीव्रता ७.५ असून मणिपुर ते लाहोर पर्यन्त ही धक्के जाणवले .

Friday, April 24, 2015

आमदार सुधीर पारवे यांना २ वर्षांची शिक्षा

आमदार सुधीर पारवे यांना २ वर्षांची शिक्षा



नागपूर - उमरेडचे भाजपचे आमदार सुधीर पारवे यांना शिक्षकाला केलेली मारहाण प्रकरणी भिवापूर न्यायालयाने सुधीर पारवे यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दीड हजारांचा दंडही ठोठावला आहे

शिक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी नागपूर येथील भाजप आमदार सुधीर पारवे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली, व्हिवापूर न्यायालयाने आज(शुक्रवार) हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

जिल्हा परिषद सदस्य असताना सुधीर पारवे य़ांनी 2005 साली महेंद्र धहाडगावे या शिक्षकाला मारहाण केली असल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. व्हिवापूर न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणावर आज न्यायालयाने सुनावणी दिली. तत्कालीन भाजपचे आमदार असलेल्या सुधीर पारवे यांना दहा वर्षानंतर न्यायालयाने दोन वर्षासाठी तुरुंगात पाठवले आहे.

Sunday, April 19, 2015

उपसरपंचाची गोळया घालून हत्या

उपसरपंचाची गोळया घालून हत्या

गडचिरोली,-जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असताना नक्षल्यांनी आज(ता.१९) मध्यरात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील उपसरपंचाची गोळया घालून हत्या केली. पत्रू बालाजी दुर्गे(५०) असे मृत उपसरपंचाचे नाव आहे.
रात्री सशस्त्र नक्षली दामरंचा येथे गेले. त्यांनी पत्रू दुर्गे यांना झोपेतून उठविले आणि घराबाहेरच त्यांची गोळया झाडून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. येत्या २४ एप्रिलला अहेरी उपविभागातील अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या चार तालुक्यांतील ग्रामपंचायतींची निवडणूक आहे. मात्र नक्षल्यांच्या दहशतीमुळे सुमारे ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. त्यातच आज नक्षल्यांनी उपसरपंचाची हत्या केल्याने उमेदवारांसह नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, नक्षल्यांनी जिमलगट्टा-गुंडेरा मार्गावरील हनुमान मंदिराजवळ एक बॅनर बांधल्याचे आढळून आले. तसेच रस्त्यावर पत्रकेही टाकण्यात आली आहेत. नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालावा, अशी ताकीद या बॅनर व पत्रकांमधून देण्यात आली आहे.

Friday, April 17, 2015

हिरव्या सोन्याला नवी झळाळी...

हिरव्या सोन्याला नवी झळाळी...

हिरव्या सोन्याला नवी झळाळी...गुरुवार, १६ एप्रिल, २०१५
हिरव सोनं म्हणून ज्या गवताला ओळखलं जातं ते सोन्याचं गवत म्हणजे बांबू. शेती प्रधान असलेल्या आपल्या देशात बांबूचे उत्पादन आणि त्यावर आधारीत उभी राहणारी इंडस्ट्री खरं तर एका कृषी क्रांती इतकी महत्त्वाची. हीच बाब लक्षात घेऊन नवीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बांबू धोरणाला चालना दिली आहे. खास महान्युजसाठी त्यांच्याशी केलेली ही बातचीत.
चंद्रपूर चे प्रदूषण घटले…

चंद्रपूर चे प्रदूषण घटले…

  • शुभ वार्ता 
  • चंद्रपूर चे प्रदूषण घटले… 
  • चौथ्या वरून सहाव्या क्रमांकावर …


  • वायू प्रदूषणात २२ वा, जलप्रदुषणात २४ वा क्रमांक 

Wednesday, April 15, 2015

पारोमिता गोस्वामींना पुरस्कार

पारोमिता गोस्वामींना पुरस्कार

नागपूर : मानवाधिकार कार्यकर्त्या व श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्ष ऍड. पारोमिता गोस्वामी यांना शुक्रवारी (ता.17) सायंकाळी सहा वाजता सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात "जनमंच गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येईल, अशी माहिती जनमंचचे अध्यक्ष ऍड. अनिल किलोर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयंत पाटील राहतील. तर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री जयराम नरेश व माजी खासदार नरेश पुगलिया उपस्थित असतील.
चोरट्याने फोडला डोळा

चोरट्याने फोडला डोळा

नागपूर : एका ऑटो चालकाच्या घरात चोरटा शिरला. चोरीचा प्रयत्न करणार तोच घरात झोपून असलेल्या ऑटो चालकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. मग काय, चोर-चोर म्हणून आरडाओरड करुन चोरट्याशी त्यांनी दोन हात केले. मात्र चोरट्याने फायटरने प्राणघातक हल्ला करुन त्यांचा एक डोळा फोडला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी ऑटो चालकाच्या तक्रारीवरुन गिट्टीखदान पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र त्याला अटक करण्याऐवजी अभय दिल्याचा आरोप आहे. शेख गनी (४८) रा. गिट्टीखदान, बोरगाव, वेलकम सोसायटी प्लॉट नं. १०७ असे फिर्यादी जखमी ऑटो चालकाचे नाव आहे. सोहेल रा. बोरगाव असे चोरट्याचे नाव आहे. तो गुंडप्रवृत्तीचा असून स्थानिक पोलिस 'ाण्यातील काही कर्मचाNयांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने त्याची परिसरात प्रचंड दहशत आहे. शेख गनी हे ऑटो चालक आहेत. त्यांना पत्नी व दोन लहान मुले आहेत.
काही वर्षापूर्वी त्यांनी फायनांसवर ऑटो विकत घेतला होता. सुरुवातीला ते दरमहा प्रिमियम भरत गेले. मात्र मधल्या काळात प्रिमियन थकल्याने कर्जासोबत व्याजाचेही डोंगर वाढले. त्यामुळे घरची बिकट परिस्थिती बघता, त्यांनी ऑटोच विवूâन टाकला. चोरटा वस्तीतीलच असल्याने त्याला याची कल्पना असावी, त्यामुळे रकम चोरी करण्याच्या उद्देशाने त्याने घरात प्रवेश केला. सोमवारी घटनेच्या दिवशी शेख गनी यांची पत्नी मो'्या मुलाला घेऊन बाजारात भाजी आणण्याकरीता गेली होती. दरम्यान रात्री ९.३० च्या सुमारास चोरट्या सोहेल हा त्यांच्या घरात शिरला. मात्र ऑटो चालक गनी यांचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी त्याच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने फायटरने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा एक डोळा पुâटला. शेख गनी यांच्यावर मेयो रुग्नालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी चोरट्याला वेळीच अटक करण्याऐवजी त्याला अभय दिल्याचा गनी यांच्या पत्नीच्या आरोप आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक सुनिल बोंडे यांच्याशी संपर्वâ करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

चोरट्याचा आत्महत्येचा प्रयत्न ब्लेडने केले गळ्यावर वार

चोरट्याचा आत्महत्येचा प्रयत्न ब्लेडने केले गळ्यावर वार

नागपूर : गुन्हे शाखा पोलिस आपल्याला खोट्या गुन्ह्यात फसविणार या भितीपोटी एका घरफोड्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने तीन वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ११.३० च्या सुमारास सिव्हील लाईन स्थित प्रशासकीय इमारत क्र. १ मधील गुन्हे शाखा कार्यालयात घडली.
प्रविण दादाराव वंजारी (२८) रा. भिमनगर, रामेश्वरी रोड असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-याचे नाव आहे. प्रविणने प्रेमविवाह केला असून त्याला पत्नी व एक पाच वर्षाचा मुलगा आहे. पत्नी एका खाजगी रुग्णालयात काम करते. त्याचे आई-वडील प्रतापनगर हद्दीत राहतात. लग्नाच्या आधीपासूनच तो चोरी आणि घरफोडी करण्याच्या प्रवृत्तीचा आहे. शहर पोलिसांनी यापूर्वी त्याला दोन वर्षाकरीता तडीपार केले होते. वर्धा जिल्ह्यात तडीपारीचे दिवस काढले. नोव्हेंबर २०१४ मध्ये तडीपारी संपवून त्याने पत्नी व मुलासह परत नागपूर गाठले. मात्र यावेळी भिमनगर येथे बागडे यांच्या घरी किरायाची खोली घेऊन तो पत्नी व मुलासह राहतो. मात्र आज सकाळी गुन्हे शाखा पोलिसांच्या चार्ली कमांडोने नियमीत चौकशीचा भाग म्हणून त्याला गुन्हे शाखा कार्यालयात आणले होते. दरम्यान प्रविणने नजर चुकवून आपल्याजवळील ब्लेडने गळ्यावर तीन वार करुन घेतले. रक्तबंबाळ प्रविणला बघून पोलिसांचे अवसानच गळाले. घाबरलेल्या पोलिसांनी लगेच त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर शध्Eाक्रिया केली. प्रविणच्या पत्नीच्या मते, आत्महत्येच्या प्रवृतीचा असून त्याच्या गळ्यावर यापूर्वीच्याही गळा चिरल्याच्या खुना आहेत. याप्रकरणी सदर पोलिसांनी प्रविणविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.

Tuesday, April 14, 2015

चंद्रपुरात साकारले तिरुपती मंदिर

चंद्रपुरात साकारले तिरुपती मंदिर

शुभारंभ महोत्सवाला 19 एप्रिलपासून सुरुवात

चंद्रपूर, येथील दाताळा मार्गावर तिरुपती मंदिर साकारण्यात आले. या मंदिराचे जवळपास काम अंतिम टप्प्यात आले. मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि शुभारंभ महोत्सवाला 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. 23 एप्रिलपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दाताळा मार्गावर गेल्या काही वर्षांपूर्वी तिरुपती बालाजी मंदिराचे काम हाती घेण्यात आले होते. या मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. दोन- चार दिवसांत हेही काम पूर्ण होईल. 19 ते 23 एप्रिल रोजी प्राणप्रतिष्ठा महोत्सव होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्ताने 22 एप्रिल रोजी विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री आठ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येईल. यातील प्रथम विजेत्यास 11 हजार, द्वितीय विजेत्यास पाच हजार, तृतीय विजेत्यास तीन हजार, चतुर्थ दोन हजार आणि पाचव्या विजेत्यास एक हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेत भजन मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला राहुल पुगलिया, टी. पद्‌माराव, गजानन गावंडे, प्रवीण पडवेकर यांची उपस्थिती होती. 
तुमसर मध्ये पती- पत्नीची आत्महत्या

तुमसर मध्ये पती- पत्नीची आत्महत्या

भंडारा- तुमसर येथील गांधी नगर निवासी तुमसर न.प. के कर्मचारी धर्मेन्द्र किसान निकोसे (वय42) आणि पत्नी कल्पना धर्मेन्द्र निकोसे ने जहर पिवून आत्महत्या केली. ही घटना सोमवार 13 अप्रैल रात्री 12 वाजता घडली. त्यांना दिक्षा (वय 10) नामक मुलगी आहे

Sunday, April 12, 2015

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात

इको-प्रो तर्फे ‘पक्षी जलपात्र वितरण अभियानास’ सुरूवात
‘इको-प्रो मिशन सेव्ह बर्ड’ अंतर्गत ठिक-ठिकाणी पक्ष्यांकरीता ‘जलपात्र’ ची सोय

चंद्रपूरः इको-प्रो पर्यावरण संस्थेतर्फे ‘इको-प्रो मिशन सेव्ह बर्ड’ या अभियाना अंतर्गत पक्ष्यांकरीता जलपात्र वितरण अभियानाची सुरूवात आज करण्यात आली.
इको-प्रो तर्फे आज या अभियानाची सुरूवात श्री गणपती गरड, क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक, ताडोबा-अंधारी व्याघ्र  प्रकल्प, चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी श्री गजेन्द्र नरवणे, उप संचालक, बफर, श्री मजहर अली, श्री मंदार नाईक, भक्ती नाईक, मुंबई व इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे प्रामुख्यांने उपस्थित होते. श्री गणपती गरड यांनी उपस्थितांना उन्हाच्या दाहकतेमुळे वन्यप्राणी पशु-पक्षी यांना संकटाना सामोरे जावे लागते, यांचे संरक्षणासाठी नागरीकांनी सुध्दा पुढकार घ्यावा असे आवाहन करीत, घरोघरी पक्ष्यांकरीता जलपात्र ठेवण्याचे महत्व विषद केले.
चंद्रपूर शहरात उन्हाची दाहकता अधिक असल्याने मनुष्य प्राण्यासोबत पशु-पक्षीना सुध्दा याचा त्रास सहन करावा लागतो. शहरी भागात क्राकींट च्या जंगलात असणाÚया पशु-पक्षीना पाण्याची सोय व्हावी याकरीता इको-प्रो तर्फे दरवर्षी शहरात ठिकठिकाणी मानवी वसाहतीत येणाÚया पक्षी करीता उन्हाच्या दाहकतेपासुन सुटका व्हावी, पाण्याची सोय व्हावी या हेतुने पक्ष्यांकरीता विशेष करून तयार करण्यात आलेले मातीचे जलपात्र च्या माध्यमाने पाण्याची सोय करून देण्यात येते. शहरातील सुजाण व पर्यावरण, पक्षी प्रेमी नागरीकांना आपल्या घरी येणाÚया पक्षांकरीता पाण्याची सोय करता यावी याकरीता पक्षी जलपात्र वाटप केले जाते.
संस्थेच्या माध्यमाने यंदा 1000 जलपात्र तयार करण्यात आले असुन याचे चंद्रपूर शहरात वाटप केले जाणार आहे. शहरातील उन्हाची दाहकता आणी पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटंकती काही अंशी कमी व्हावी हा प्रयत्न असणार आहे. सोबतच नागरीकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी हा सुध्दा या अभियानाचा भाग आहे. यंदा या अभियानाअंतर्गत ज्या-ज्या ठिकाणी पक्षी जलपात्र ठेवले जाणार आहे त्याची संस्थेतर्फे नांेद केली जाणार असुन.
कार्यक्रमाचे संचालन नितीन रामटेके व आभार विजय हेडाऊ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संस्थेचे अमोल उटट्लवार, राहुल कुचनकर, शंशाक मुजंनकर, विश्वजीत इंगलवार, अभय अमुतकर, सचिन धोतरे, करिश्मा सोनपिंपरे, मयुरी आत्राम, हर्षा पोटदुखे, शुभांगी दांडेकर यांनी सहकार्य केले.

उमरेड

उमरेड

महाराष्ट्राची पहिली भंगीमुक्‍त नगरपालिका म्हणून नावलौकिकास असलेल्या उमरेड नगरपालिकेने स्वच्छतेचे पुरस्कारही पटकावले. 16 व्या शतकापूर्वी निर्माण झालेले, ब्रिटिशांची राजवट पाहिलेले हे शहर नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नागपूरपासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. कोळसा खाणीमुळे प्रकाशझोतात आलेल्या या शहरातून विणकरांचा खडखडाट कायमचा बंद झाला. गोंड राजा बख्त बुलंद शहाच्या कारकिर्दीतील हे पुरातन शहर. परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या उंबराच्या झाडांमुळे या भागाला "उमरेड' असे नाव पडल्याचे पुरातन दाखले आहेत. 
.... 
महामानवांचा पदस्पर्श 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माई साहेबांनी या परिसराला भेट दिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी येथे भजनाद्वारे जनजागृती केली. 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी याच ठिकाणी विशाल जनसमुदायाला मार्गदर्शन केले. याचवेळी इतवारीपेठेत त्यांचा सत्कारही करण्यात आला. या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले उमरेड शहर विकासाचे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. 

Friday, April 10, 2015

साताऱ्याच्या धर्तीवर चंद्रपुरात सैनिकी शाळा

साताऱ्याच्या धर्तीवर चंद्रपुरात सैनिकी शाळा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर नवीन सैनिकी शाळा सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात यावा, असा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. अर्थ व वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय राज्य शासनाने घेतला.
शुक्रवारी (ता. 10) विधानसभेत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा ठराव मांडला. विधानसभागृहाने एकमताने हा ठराव मंजूर केला. 9 एप्रिल रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभेत या विषयाबाबत ठराव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाबाबत सतत प्रयत्न व पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र, गुजरात तथा गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांच्याशी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी या विषयाबाबत चर्चा केली.
आत्महत्येच्या देखाव्यासाठी जाळला मृतदेह

आत्महत्येच्या देखाव्यासाठी जाळला मृतदेह

नागपूर : गळा दाबून मुलीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळणाऱ्या वडिलास पोलिसांनी अटक केली. दीपक नागोराव पाटील (वय 45) असे आरोपीचे नाव आहे.
केळवद येथून 36 किमी अंतरावरील बुधला येथे प्रिया दीपक पाटील या 14 वर्षीय बालिकेचा सात एप्रिलला जळून मृत्यू झाला होता. या घटनेची तक्रार मुलीचे काका बबन नागोराव पाटील (वय 36) यांनी केळवद पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सावनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. मुलीचा गळा दाबल्याने तिची श्‍वसननलिका बंद झाली. त्यात तिचा मृत्यू झाला.
कुख्यात राजा गौसने उकळली लाखाची खंडणी

कुख्यात राजा गौसने उकळली लाखाची खंडणी

नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील काही अधिकारी आणि कर्मचाNयांनी उपलब्ध करुन दिलेल्या मोबाईलवरुन कुख्यात राजा गौसने शहरातील व्यापाNयांना फोन करुन लाखाची खंडणी उकळल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी वाडी, सक्करदरा व पाचपावली पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला.
रविना

रविना

अभिनेत्री रविना टंडन हि शुक्रवारी चंद्रपूर येथे एका कार्यक्रमासाठी आली होती. पत्रकारांशी संवाद साधताना 

तिघांच्या खून प्रकरणी ४ ताब्यात

तिघांच्या खून प्रकरणी ४ ताब्यात

नागपूर - तीन सख्ख्या भावांना भोसकून ठार केल्याची घटना गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सक्करदर्‍यातील भांडेप्लॉटमध्ये घडली. यामुळे परिसरात मध्यरात्रीपर्यंत प्रचंड तणाव होता. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली.
एकनाथ उगले (३५), संजय उगले (३२) आणि केशव उगले (३0) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे बिडीपेठमध्ये राहात होते. एकनाथ हा अट्टल गुन्हेगार होता. चार वर्षांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर एका कुख्यात गुन्हेगाराचा तो जुगार क्लब चालवायचा. त्याच्यासोबतच संजय आणि केशवही हेच काम करायचे. परिसरातील एका कुख्यात गुन्हेगाराशी त्यांचे काही दिवसांपासून बिनसले होते. त्यावरून खून झाला.

Thursday, April 09, 2015

202 गावात कामांना जोमाने सुरुवात

202 गावात कामांना जोमाने सुरुवात

जिल्हा जलयुक्त शिवार अभियान
- अभिषेक कृष्णा यांची माहिती

नागपूर, दि.9 :   नागपूर जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत 202 गावांमध्ये सर्वांसाठी    पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी अभियानाची कामे जोमात सुरु झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी आज दिली.
बंदूकीचा धाक दाखवून लूटले

बंदूकीचा धाक दाखवून लूटले


नागपूर - वर्धा मार्गावरील अजनी चौकात अजीत बेकरीच्या प्रबंधक कडून मोटरसाइकलवर आलेल्या गुंडानी बंदूकीचा धाक दाखवून 90,000 रुपए लूटले
ऑस्ट्रेलिया के चमू कि नागपूर भेट

ऑस्ट्रेलिया के चमू कि नागपूर भेट

नागपुर : फ्रांसीसी विकास एजेंसी प्रतिनिधिमंडल का दौरा और नागपुर नगर निगम (NMC) करने के लिए एक 14 सदस्यीय चीनी प्रतिनिधिमंडल के बाद ऑस्ट्रेलिया के मार्क साथियों के महावाणिज्य एक सद्भावना यात्रा पर आए और परियोजनाओं में गहरी रुचि स्थानीय निकाय द्वारा किए जा दिखाई। सार्वजनिक कूटनीति अधिकारी सदा Elaris महावाणिज्य के साथ थे। उप महापौर मुन्ना पोकलवार, स्थायी समिति के अध्यक्ष रमेश शृंगार, नगर निगम आयुक्त हार्डीकर, वरिष्ठ पार्षद सुनील अग्रवाल, और दूसरों NMC के मुख्य प्रशासनिक भवन में आयोजित एक छोटे से समारोह में उन्हें गुलदस्ते की पेशकश के द्वारा ऑस्ट्रेलियाई महावाणिज्य और उनकी टीम का स्वागत किया। उपायुक्त जेड आर  सिद्दीकी, अपर उपायुक्त प्रमोद भुसारी, अधीक्षण अभियंता प्रकाश उरडे, टैक्स निर्धारक शशिकांत हस्तक, सहायक आयुक्त महेश धमेचा  और दूसरों को इस अवसर पर उपस्थित थे


Wednesday, April 08, 2015

कारागृहात गांजाच्या ५ चिलम जप्त

कारागृहात गांजाच्या ५ चिलम जप्त

९ मोबाईल, १६ मेमरी कार्ड आढळले

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकाNयांनी वैâद्यांसाठी जणूकाही मोबाईल शॉपीच उघडली
की काय? असा सर्वांना प्रश्न पडला आहे. कारण बुधवारी झडती पथकाने बडी गोल बॅरेक क्र. १ व ५ मध्ये झडती घेतली असता २५ किलो गांज्यासह ९ मोबाईल, ७ बॅटरी, २ चार्जर, ४ हेड फोन, १ युनियार वंâपनीचे सिम, १६ मेमरी कार्ड, ३ वैâची, १ वस्तरा, १ लाईट टेस्टर असा मुद्देमाल जप्त केला. झडतीदरम्यान सात दिवसांपासून प्रत्येक बॅरेकमध्ये मोबाईल आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. याविषयी उलट सुलट चर्चा असून कुख्यात पाच वैâदी पळून गेल्यानंतरच प्रशासनाला जाग आल्याने राज्य कारागृह विभागातील वरिष्ठ अधिकाNयांनी यापूर्वी प्रभावी अशी झडती मोहिम का राबविली नाही. असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
मंगळवारी कारागृहात घेण्यात आलेल्या झडतीत २५ ग्रॅम गांजा, सात मोबाईल, ४ पेनड्राईव्ह, दोन
चार्जर आणि एक मेमोरी कार्ड आढळून आले होते. आतापर्यंत कारागृहातून ६७ मोबाईल झडती
पथकाने शोधून काढलेत. यासोबतच कारागृहात मंगळवारी पहिल्यांदाच गांजा तर आज बुधवारी ५
चिलम आढळून आला. याप्रकरणी कारागृह विभागाच्या तक्रारीवरुन धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल
केला. मध्यवर्ती कारागृहातून कुख्यात पाच कैदी पळून गेल्यानंतर येथील अधिकाNयांचे एक-एक पाप समोर
येत आहेत. अप्पर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्या आदेशाने कारागृहात रोज झडती
घेण्यात येत आहे. कारागृहातील अधीक्षकासह तब्बल ११ अधिकारी व कर्मचारी निलंबीत केल्यानंतर
तसेच पोलिस महासंचालक एसीबी प्रविण दिक्षीत यांच्याकडे देखरेखीकाली चौकशी सुरु असल्याने
झडती घेणाNया पथकांना स्वातंत्र्य मिळाले आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, मोर्शी आणि बुलडाणा
येथून आलेल्या झडती पथकांतील रक्षकांना त्यांच्या सोबतचे अधिकारी व्यवस्थीत झडती घेऊ देत
नव्हते. हे विशेष.
आज आढळून आलेले मोबाईल नागपुरातील कुख्यात गुंडांच्या बरॅकमधून जप्त केल्याची माहिती
आहे. ९ पैकी सहा मोबाईल सॅमसंग, २ मायक्रो मॅक्स, १ आयबाल वंâपनीचे आहेत. कारागृह
प्रशासनाने आतापर्यंत सात दिवसांत ११ तक्रारी दाखल केल्या असून ६७ मोबाईल धंतोली
पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
‘‘जंगल वाले बाबा’’

‘‘जंगल वाले बाबा’’

राश्ट्र संत मुनिश्री चिन्मय सागर जी महाराज ‘‘जंगल वाले बाबा’’ का संदेष



मुनिश्री का आप सबके लिये आषीर्वाद। धर्मानुरागी बधुओं! गोवा के लोकोपयोगी मंत्री सुदीन धवलीकर ने जो जैन दिगम्बर मुनिराजो के प्रति प्रतिक्रिया व्यक्त की है। वह घोर निंदनीय और असहनीय है। ये सिर्फ दिगम्बर जैन साधु और जैन धर्म के ऊपर ही नहीं, सत्य, अहिंसा, तप और त्याग करने वाले सभी धर्म के साधु, संतों का घोर अपमान है। उन पर कुठाराघात है। मुबंई पत्रकार संघ के अध्यक्ष तिवारी ने जो प्रतिबंध की कार्यवाही हेतु डी.जी.पी. के लिये जो बात कही वह भी घोर आपत्तिजनक है। हमारे देष की संस्कृति सत्य, अहिंसा, त्याग है। दिगम्बर श्रमण संत हमारे संरक्षक है। इनका सत्य, अहिंसा, संयम, तप और त्याग चरम सीमा का है। दिगम्बर जैन साधु दया की मूर्ति हैं और हमारे देष की धरोहर हैं। जिनके तप, त्याग और अहिंसा की साधना से समाज और विष्व में षांति और स्थिरता बनी हुई है। ऐसे संतों पर कुछ पदासीन लोगों के बयान इनकी मानसिकता को दर्षातें है। बिकनी से दिगम्बर जैन साधुओं जैसे महान तपस्वियों की तुलना करना उनके चारित्र को दर्षाती है। ऐसे लोगों की वजह से ही देष व समाज चरित्रहीन होता जा रहा है। लगता है दिगम्बर साधुओं की तरह तप, त्याग, अहिंसा को धारण नहीं कर पाने के कारण ये ईश्र्या रखते है, द्वेश रखते है। जैन समाज, जैन धर्म और अल्संख्यकों के साथ यह बहुत बड़ी साजिष और शंड़यंत्र लग रहा है। इसलिये देष भर की जैन समाज और सभी षीर्श संस्थानें एवं सभी साधु, संत खुलकर सामने आयें। ऐसे लोगों को उनके पीछे रहने वालों को जैन समाज के अस्तित्व का अहसास करायें। आगे इस प्रकार कोई शंड़यंत्र न रचा सके, ऐसा घोर प्रतिकार करें और देष के प्रधान मंत्री, गृह मंत्री और भाजपा सरकार के सारे मुख्यमंत्री और षीर्श नेताओं से इस बयान के बारे में प्रतिक्रिया मांगे। जब तक प्रतिक्रिया नहीं देते है तब तक घोर प्रतिरोध करें साथ ही जैन समाज यह समझे कि कौन-कौन हमारे साथ क्या-क्या कर रहा है ? चरित्र चक्रवती आचार्य षांतिसागर जी महाराज का स्मरण करें जिन्होंने हमारे लिये कितना बड़ा उपकार किया था। और सभी समाधान होने तक घोर प्रतिरोध और प्रतिकार करते रहें।