हेल्मेट असता तर वाचला असता जीव
नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुरात दरवर्षी खड्डे चुकविण्याच्या नादात दरवर्षी अनेक निर्दोष नागरिकांचा बळी जातो. मात्र याकडे स्थानिक प्रशासन व आमदार खासदार मंत्री महोदय व संबंधित विभागाचे अधिकारी गांभीर्याने बघत नाही, तसेच वर्ष भाराअगोदर बनलेला रस्ता एका पावसात फुटल्या जातो.त्यामुळे रस्त्याच्या दर्जाचा प्रश्न देखील या अपघाताला कारणीभूत आहेत.सत्ताधारी विकास कामांकडे करोडो रुपये खर्च करीत आहेत मात्र शहरातील नागरिकांच्या मुलभूत गरजाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा बळी जात आहे.
चंद्रपूर शहरात प्रवेश करण्यासाठीचा आणि तेलंगणा राज्यात जाण्यासाठी वापरावा लागणार एकमेव मार्ग म्हणजे मूल मार्ग. या मार्गावर असलेला सर्वाधिक वर्दळीचा चौक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक. याच चौकात लावलेले बाहुबली हेल्मेटण घालून असलेले हे पोस्टर गेल्या काही दिवसा अगोदर शहरभरात चर्चेचा विषय ठरला होता .‘जेव्हा बाहुबली हेल्मेट घालू शकतो तर आपण का लाजता’.असा मजकूर देखील यावर लिहिला होता, चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाने अत्यंत नेमक्या जागी योग्य विषयाला हात घातलेले हे पोस्टर लावल्याने या चौकातील प्रत्येकाच्या नजरा यावर खिळून राहत आहेत. चंद्रपूर शहरात हेल्मेटची फारशी सक्ती नाही मात्र अंतर्गत मार्ग महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणारा राज्य महामार्गाचा भाग आहे. म्हणूनच या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील अधिक आहे. हे टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने लढविलेली शक्कल चर्चेचा विषय ठरली होती. मात्र परिवहन विभाग नुसते पोस्टर लाऊन गप्प बसले अन प्रत्यक्षात जनजागृती करण्यासाठी विसरले असे या पोस्टरबाजी व आजच्या अपघातावरून लक्षात येते.

हेल्मेट असता तर वाचला असता जीव
शहरातील या दोन्ही अपघात हेल्मेट असता तर कदाचित जीव वाचला असता अशी चर्चा सुरु आहे,गेल्या कधी दिवसान अगोदर चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत जनजागृतीसाठी बाहुबलीचे लावलेले हेल्मेट घातलेले पोस्टर शहरातील विविध ठिकाणी लावले होते मात्र नुसते पोस्टर लाऊन विभागाने आमचे काम सुरु असल्याचे दाखवून दिले मात्र प्रत्यक्षात असे काहीही घडले नाही.
या अपघातानंतर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी पोलीस विभागाला हेल्मेट विषयी जनजागृती करण्याची मोहिम वेगाने राबविण्याचे आदेश दिले आहे.गेल्या ६ महिन्या अगोदरच हि जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती मात्र शहरात घडलेल्या दोन अपघातानंतर या मोहिमेला पोलीस विभाग आणखी वेग देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी काव्यशिल्पशी बातचीत करतांना सांगितले.