Saturday, December 09, 2017
Thursday, November 30, 2017
रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह
पारशिवणी ::
पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्ज अँड ह्यूमन रिसोर्सेस नागपूर व दणका युवा संघटन,कांद्री,कन्हान यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या रोग निदान शिबिराचे पदार्पण तेराव्या आठवड्यात पोचले आहे.या शिबिराने तालुक्यासह कन्हान उपशहरा लगत असलेल्या साटक जिल्हा परिषद व टेकाडी जिल्हा परिषद क्षेत्रा लगत तालुक्या बाहेर सुद्धा ग्रामीण व शहरी भागात गर्जुना मोफत रोग निदान तपासनी,मोफत चष्मे वितरण शिबिराच्या या आयोजना ला सातत्याने जोपासण्याची धुरा माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली होती.आणी यशस्वी रित्या या रोग निदान शिबिराचा लाभ ग्रामस्थांन पर्यंत पोचत असल्याने क्षेत्रात दणका युवा संघटनेच्या शिरावर यशाचा तुरा क्षेत्रातील लोकांनी रोवून दिलेला आहे.
याच उपक्रमात मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी निशुल्क रोग निदान शिबिराचा तेरावा सप्ताह शिव नगर कान्द्री- कन्हान येथे आयोजित करण्यात आलेला होता.या शिबिरात विविध प्रकार च्या रोगांची तपासणी करण्यात आली ज्यात ब्लड प्रेशर, शुगर, नेत्र रोग, मोतीया बिंद अश्या इतरत्र रोगांच्या निदानाचा लाभ कांद्री वासीयांनी घेतला,नेत्र रोग्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले.प्रसंगी शिबिराचे मुख्य आयोजक दणका युवा संघटन,युवा चेतना मंच कान्द्री आणि नेहरू युवा केंद्र पारशिवणी,माजी.जील्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे,दिनेश नानवटकर, रिंकेश चवरे, सुरेश तिवाडे, शैलेश शेळके, विनोद कोहळे, गौरव माहोर, राहुल चामट, सौरभ पोटभरे, यांची उपस्थित होती तर मंगळवार ५ डिसेंम्बर रोजी सालवा येथे चौदाव्या शिबिराचे लाभ घेण्या करिता जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहण्याचे आयोजकांकडून करण्यात आले.
Saturday, November 25, 2017
राष्ट्रवादीकाँग्रेसला सोडचिठ्ठी; तालुकाध्यक्षांचा शिवसेनेत गृहप्रवेश
शक्यतो फरवरी मार्च मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे वारे तालुक्यात वाहायला सुरवात झाली असून पक्षांच्या पुढाऱ्यांचे मतभेदांमुळे पक्षीय नेत्यांची पक्षांतर करण्याला सुरवात झाली असल्याचे चित्र २४ नोव्हेंबर ला चांपा येथे माजी आमदारांच्या सत्कार कार्यक्रमात पाहायला मिळाले.खंडार हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हा परिषद साटक-गोंडेगाव साठी जिल्हा परिषदेचे प्रबळ दावेदार म्हणून उदयास आले होते.परंतु पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण व खंडार यांच्यात आगामी जिल्हा परिषद उमेदवारी वरून दोघात अंतर्गत कलह उफाडुन आल्याची चर्चा तहसील तसेच राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीत सुद्धा सुरू होती.अशातच खंडार यांनी पक्षीय कलह कायमस्वरूपी संपविन्यासाठी रब्बी पिकाला पाणी मिडवून देण्याच्या विषयाला धरून माजी आमदार आशिष जैस्वाल यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करीत त्याच कार्यक्रमात खंडार यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस कन्हान शहर अध्यक्ष नेवालाल सहारे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर विघे,युवक तालुका अध्यक्ष नरेश भोंदे,किंग कोब्रा युथ फोर्स चे तालुका संपर्क प्रमुख अनिल गजभिये,केरडी सरपंच प्रकाश पडोळे, उपसरपंच लक्ष्मण खंडाळ, बनपुरी उपसरपंच राकेश उपासे, सदस्य मारोती वानखेडे, धनराज खंडाळ ,प्रकाश काठोके, गजानन हिवसे, सह शेकडो कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेष घेतला.
ज्यामुळे गोंडेगाव जिल्हा परिषद अंतर्गत शिवसेनेची ताकत वाढली परंतु शिवसेनेतून आगामी निवडणुकीत आपली दावेदार ठेवणार्या शिवसेनेतील पक्षनिष्ठ कार्यकर्ता व पदाधिकारी यांच्या इच्छा आकांक्षांची हिरमोळ होण्याची शक्यता खंडार यांच्या शेकडो कार्यकर्त्यां सह शिवसेनेत आगमनाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार कृपाल तुमाने हे होते. सत्कारमूर्ति माजी आमदार आशीष जैसवाल,जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोनेकर,उप जिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले,माजी जिल्हा परिषद सदस्य नरेश धोपटे,पंचायत समिती उपसभापति जिवलंग पाटील,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख नरेश राऊत,तालुका अध्यक्ष राजू भोस्कर यांची उपस्थिती होती.
Thursday, November 23, 2017
जुनी कामठीवर भाजपची एकहाती सत्ता

Wednesday, November 22, 2017
गोंडेगावात अपक्षाचे वर्चस्व
पारशिवनी - तालुक्यातील साटक जिल्हा परिषद अंतर्गत सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या गोंडेगाव येथील ग्राम पंचायतीवर सरपंच उपसरपंच पदावर अपक्ष उमेदवारांनि आपल्या कुशल नेतृत्वाचा झेंडा रोवल्याने क्षेत्रातील राजकीय पुढाऱ्यांच्या तोंड चे पाणी उडाल्याचे चित्र दिसून पडत आहे.
११ सदस्यीय असलेल्या ग्राम पंचायत गोंडेगाव मध्ये सरपंच जनतेतून झाल्याने ग्राम पंचायत गोंडेगाव मध्ये झालेल्या सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणुकीत बर्याच उमेदवारांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आपल्या कामांचा दाखला देत गोंडेगाव सरपंच पदावर आपल्या आपल्या नावांची वर्णी लावलेली होती.जिथे कुठल्याही प्रकारची राजकीय पाश्र्वभूमी नसलेल्या २४ वर्षीय युवा उमेदवार नितेश सीताराम राऊत याला ग्रामस्थानी बहुमताने आपल्या गावाचे नेतृत्व सांभाडण्याची जबाबदारी देण्याचे ठरवत राजकीय पक्षांना देखील इथे ग्रामस्थांनि शिथिल करून सोडत सरपंचपदाचा एकतर्फी बहुमान राऊत वर्णी लाग्ली
गोंडेगाव ग्राम पंचायत येथील उपसरपंच पदाचे निवडणूक दि.२२ नोव्हे ला गोंडेगाव ग्राम पंचायत कार्यालय येथे झाली ज्यात अपक्ष उमेदवार विनोद सोमकुंवर यांनी तर आशिमा वासनिक यांनी उपसरपंच पदासाठी आपली नामांकने पीठासीन निवडणूक अधिकारी नवनिर्वाचित सरपंच नितेश राऊत व ग्राम विकास अधिकारी रत्नाकर पालांदुरकर यांच्या सुपूर्द केले.जिंकून आलेल्या उमेदवारांपैकी कुणाचीही राजकीय वरचढ नसल्याने पक्षीय झेंडा व पक्षाचा अजेंडा गोंडेगाव येथे पाहायला मिळाला नाही त्यामुळे उपसरपंच पदासाठी चुरशीच्या लढाई चे चित्र सोमकुंवर या उमेदवाराने रंगवून आणले ११ सदस्यांन पैकी ५ उमेदवारांना सोमकुंवर यांनी राजकीय बेरीज वजाबाकीचे गणित करत आपल्या बाजूने करून घेतले ज्यामुळे दुपारी २ वाजता सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेत ११ सदस्यांनी आपली मते गुप्त पद्धतीने उपसरपंच पदाच्या उमेदवारांना दिले.ज्यात मत मोजणी मध्ये आशिमा वासनिक यांना ५ मते तर सोमकुंवर यांना स्वतःच्या मता सह ६ मते मिडाल्याने उपसरपंच पदाची माळ विनोद सोमकुंवर यांच्या गळ्यात पडली व गोंडेगाव ग्राम पंचायतीवर कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा न फडकता स्वतंत्र युवा नेतृत्वाच्या माध्यमाने विकासाचा झेंडा लागल्याचे चित्र दिसून पडले.विनोद सोमकुंवर,मोरेश्वर शिंगणे,पूजा रासेगावकर,रेखा काळे,शेंद्रे,सुनील धुरिया,सुभाष डोकरीमारे,असीमाँ वासनिक,ललिता पहाडे,निर्मला सरवारे,आकाश कोडवते या नवनियुक्त सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला.
Tuesday, November 21, 2017
बर्वेची एकतर्फी निवड; सरपंचपदावर पडोळे
Monday, November 20, 2017
चिमोटे ठरला उपसरपंच पदाचा किंगमेकर
निवडणूक अधिकारी म्हणून नवनियुक्त सरपंच सुनीता मेश्राम व ग्राम विकास अधिकारी भरत मेश्राम यांनी बाजू सांभाडली उपसरपंच पदासाठी काँग्रेस कडून आशा राऊत तर ग्राम विकास पॅनल कडून ऋषी नागरकर भाजप कडून संध्या सिंह व मीनाक्षी बुधे यांनी आपली नामांकने सादर केली ज्यात २ वाजता गुप्त मतदान निवडणूक प्रक्रियेत पद्धतीने निवडणूकिला सुरवात झाली भाजपच्या मीनाक्षी बुधे यांच्या कडे हक्काची ७ मते तर तडजोडीच्या राजकारणा मध्ये २ मते अपक्ष उमेदवारची ओढून आणण्यात भाजपला यश आल्याने भाजपची बळ संख्या ९ वर जाऊन पोचलेली होती अश्यात भाजप कडून संध्या सिंह यांनी आपल्या नावाची वर्णी काँग्रेस व ग्राम विकास पॅनल कडून लावल्याने भाजप च्या मीनाक्षी बुधे यांची बळ संख्या ९ वरून ८ वर आली तर संध्या सिंह यांची सदस्य बळ संख्या काँग्रेस व ग्राम विकास पॅनल यांच्या संगमताने ८ वर जाऊन पोचली अश्यात टेकाडी येथील अपक्ष उमेदवार दिनेश चिमोटे यांनी अडीच वर्षे उपसरपंच पदाची अट सुरवातीला ठेवलेली होती.परंतु राजकीय डाव पेच बघता कुठल्याही आर्थिक व पदाच्या प्रलोभनात न पडता शेवटी चिमोटे यांनी उपसरपंच पदाचे नामांकन भरले नाही व गावाच्या एकीकरणासाठी मीनाक्षी बुधे यांना आपले मत दिल्याने भाजपच्या पदरात ९ मते पडली ज्यामुळे उपसरपंचाचे पद भाजप च्या पदरात आले व टेकाडी ( को. ख.) ग्राम पंचायतींवर बहुमताने भाजपला सत्ता काबीज करण्यात यश आले.
Sunday, November 19, 2017
राष्ट्रीय महामार्गाने बांधकामात घेतला एक बळी
सुरक्षा व्यवस्थे ला कंत्राट दाराकडून काना डोळा
पारशिवणी :: सतीश घारड
नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील एनएचआय ४४ चे रुंदीकरनाचे कार्य प्रगतीवर आहे.बांधकामाचे कंत्राट केसीसी बिल्डकॉन या कंपनीला असून कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील कांद्री पेट्रोल पंपा सामोरील महामार्गाचे कार्य सुरू असताना कंत्राट दाराकडून सुरक्षेच्या अभावी व ग्रेडर चालकाच्या निष्काळजी पणाने वेकोली येथील एका २२ वर्षीय युवकाला अपघातात आपले प्राण गमवावे लागले.
फिर्यादी आशिफ निजामुद्दीन अंसारी वय २० राहणार टेकाडी कामठी कॉलरी खदान नंबर ३ दयानगर माडीबाबा
यांच्या तक्रारी नुसार फिर्यादी व अपघातातील मृतक एजाज उर्फ पंमी जमशेद अंसारी वय २२ वर्षे राहणार वेकोली कामठी कॉलरी टेकाडी नंबर ३ येथील होता.हे दोघेही स्प्लेंडर प्रो क्रमांक एमएच ४० एयु २८९१ या क्रमांकाच्या गाडीने डबल सीट घरून निघाले होते.एजाज अंसारी याची बहिण ही डागा हॉस्पिटल नागपूर येथे असल्याने तिचा जेवणाचा डबा घेऊन व संगतीला आशिफ निजामुद्दीन अंसारी हा कामठी येथे काचाच्या दुकानात कामाला असल्याने दोघेही सकाळी १० वाजता घरून निघाले असता राष्ट्रीय महामार्गाला लागले कांद्री पेट्रोल पंपाच्या थोड्या सामोर महामार्गाच्या दोन्ही बाजूने माती भरुन लेव्हल करण्याचे कार्य सुरू असल्यामुळे रोडवर दोन्ही बाजूने ट्रक उभे होते. तर रोडच्या एका बाजूला ग्रेडर म्हणजे माती लेव्हल करणाऱ्या मशीन चे काम सुरू होते.अश्यात रोड च्या एका कोपऱ्यातून दुचाकी काढत असताना ग्रेडर चालक याने बेजबाबदार पणे ग्रेडर रिव्हर्स घेतले असता दुचाकीला धक्का लागला ज्यात दुचाकी चालक एजाज उर्फ पंमी जमशेद अंसारी व फिर्यादी हे गाडी घेऊन रोड वर आधळले ज्यात एजाज याच्या डोक्याला जबर मार लागला तर आसिफ याला थोडी फार दुखापत झाली.एजाज ला महामार्गावरील वेकोली जे.एन.हॉस्पिटल ला नेले असता त्याला ताबडतोब कामठी येथील आशा हॉस्पिटल ला हलविण्यात आले.जिथे आय.सी.यु मध्ये एजाज याने तास भरात प्राण सोडले मृतकाला शवविच्छेदना साठी कामठी येथील शाष्कीय रुग्णालयात नेण्यात आले.कन्हान पोलिसांनी अनोळखी फरार आरोपी ग्रेडर चालक याच्या विरोधात ३७६/१७ कलम ३३६,३३७,३०४ ( अ ) भांदवी च्या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून सामोरील तपास कन्हान पोलीस करीत आहे.
नागपूर जबलपूर महामार्ग हा कन्हान शहर ते टेकाडी फाट्या पर्यंत अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे.महामार्गाचे कार्य वेगाने सुरू असताना केसीसी बिल्डकॉन कंपणी कडून कुठल्याही प्रकारचा सुरक्षा इंचार्ज,सुरक्षा बेल्ट,रस्त्याच्या कोपऱ्यामध्ये बॅरिकेट्स,रात्रीला रेडियम किंवा सूचना फलके अश्या कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने अपघातात वाढ होत असल्याचे आरोप जमावाने करतच असताना मृतकाची बातमी क्षेत्रात पसरताच महामार्गावर लोकांच्या जमावाने २ वाजताच्या सुमारास महामार्गाचे बांधकाम बंद पाळून केसीसी कंपनी चा ट्रक क्रमांक एमएच ४० बिजी २५१९ याला जाळन्याचा प्रयत्न केला असून ट्रक ची काचा फोडली तर टायर पंक्चर केली.जमावाचा आक्रोश बघता कन्हान पोलीस पीएसआई धवड़,हाके,राजेंद्र पाली,नितिन आगाशे,शिता यांनी घटना स्थळ गाठले ज्यांनतर परिस्थिती हाताबाहेर बघता काँग्रेस नेते नरेश बर्वे,जिल्हा परिषद सदस्य शिवकुमार यादव,प.स.सदस्य साबिर सिद्दीकी, कांद्री सरपंच बलवंत पडोले,ग्राप सदस्य ऋषि नगरकर,आनंद नायडू यांनी पुढाकार घेत लोकांचा आक्रोश कमी करून २ ते ३ तासांनी रस्त्यांचा जाम थांबवुन कन्हान ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.ज्यांतर एसडीपीओ ईश्वर कातकडे,कन्हान थानेदार चंद्रकांत काले खापरखेड़ा येथून एपीआय डेकाटे, मौदा येथून एपीआय मस्के आपल्या ताफ्या सह कन्हान पोलीस स्टेशन ला पोचले असता फिर्यादी आप्तस्वकीयांच्या जमावाने कन्हान पोलीस स्टेशन गाठत केसीसी बिल्डकॉन कँपनी चा ग्रेडर चालका विरोधात गुन्हा दाखल करून घेतला.
# या आधीही झाली होती अवैध माती वाहतुकीची कार्यवाही....
केसीसी बिल्डकॉन कँपनी च्या माती ओव्हरलोड केलेल्या ५ ट्रॅकांवर कार्यवाही झाली आहे.नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील एनएचआय ४४ चे कार्य कांद्री,टेकाडी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या महामार्गाचे कार्य बिल्डकॉन प्रा.ली.कंपनी कडून २५३ कोटी रकमेने बनत आहे.रोड साठी लागणारा मुरूम बिल्डकॉन कंपनी कामठी वेकोली येथून २ नोव्हेंबर २०१७ ते ९ फेब्रुवारी २०१८ पर्यंत रॉयल्टी घेऊन माती नेण्याचा परवाना जिल्हाधिकारी कार्यलय खनिकर्म विभागातून घेतला. केसीसी प्रा.ली.कडून कामठी ओपन कास्ट येथून पिवळ्या मातीची वाहतूक सुरू करण्यात आली.केसीसी च्या ट्रकांन मध्ये रॉयल्टी पेक्षा जास्त माती वाहून नेण्याच्या चोरीच्या प्रकरणात माजी आमदार आशिष जैस्वाल यांनी पकडून त्यांच्यावर कार्यवाही करून घेतलेली होती.