Tuesday, July 03, 2018
Friday, June 15, 2018
बघा महाराष्ट्रातील आमदारांचा पगार आहे तरी किती?
Wednesday, November 22, 2017
उज्वला गॅस योजनेच्या लाभ घेऊन जंगलतोड थांबवा
आमदार नानाजी शामकुळे : धानोरा, महाकुर्ला येथे विविध कार्यक्रम
चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये भोगोलिक विकास करण्याचा हेतूने सरकारच्या योजनेच्या लाभ घेऊन विकास करणे सोपी होणार आहे. उज्वला गॅस योजनेच्या लाभ घेऊन जंगलतोड थांबवून प्रदूषण मुक्त गाव करण्याच्या संकल्प सर्वानी करावा असे आवाहन आमदार नानाजी शामकुळे यांनी केले. ते धानोरा येथे उज्वला गॅस वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी धानोरा येथे २६ लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले तसेच नालीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासोबतच महाकुर्ला येथे प्रवेशद्वाराचे व एल. इ. डी. लाईट चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार नानाजी शामकुळे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभापती प. स. वंदनाताई पिंपळशेन्डे, सरपंच धानोरा हरीश गोखरे, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच नरेश देवाळकर, शेषराव आस्वले, विजयजी आगरे, विठोबा खोवले, श्रवण जुनघरे, दिवाकर बोन्डे, उपसरपंच उत्तमजी आमडे, इंदुराताई लोणगाडगे, कल्पनाताई मासिरकार, मंगलाताई गौरकार, मंगलाताई ठावरी, गीताताई आमडे, दशरथ बोन्डे, विठोबा कर्मणकार, विनायक बोबडे, अमोल नागराळे, संजय पटले यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार नानाजी शामकुळे म्हणाले कि, चंद्रपूर विधान सभेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे होत आहे. पुढे देखील अनेक योजनेच्या माध्यमातून विकास साधला जाईल. ग्रामस्थांनी देखील प्रत्येक योजनेच्या लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आपल्या भाषणात म्हणाले कि, चंद्रपूर जिल्याचा विकास झपाट्याने होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी आणून विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. यावेळी धानोरा, महाकुर्ला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
Friday, November 17, 2017
जगाच्या विकासात विज्ञान महत्वाचे
दोन दिवसीय तालुका विज्ञान प्रदर्शन
-आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी
रामटेक /प्रतिनिधी-विज्ञानाचा अर्थ विषेश ज्ञान असा होतो. मानवाने आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी नवनविन षोध लावले आहेत. या षोधांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर झाले आहे. आजचे युग हे विज्ञानयुग आहे. विद्याथ्र्यांनी विज्ञानाच्या सर्वच षाखांमध्ये रूची घ्यावी असे आवाहन रामटेकचे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केले. ते रामटेकच्या श्रीराम कनिश्ठ महाविद्यालयांत आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आपले विचार व्यक्त करीत होते.
जनतेच्या समस्या तात्काल निकाली काढा:-आ.संजय धोटे
कोरपना तालुक्याची आढावा बैठक नुकतीच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आरोग्य,कृषी,वीज वितरन,पाणीपुरवठा, दक्षता समिती संदर्भात शिधापत्रिका व कोरपना तालुक़्यातील रस्ते बांधकाम याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विभागाच्या पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून माहिती तसेच योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.व प्रलंबित कामे त्वरित करण्याच्या आदेश आमदार संजयभाऊ धोटे यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाला अध्यक्ष आमदार संजय धोटे होते तर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय मुसळे,पंचायत समिती सभापती श्याम रणदिवे,रमेश पाटिल मालेकार,किशोर बावणे,अरुण मडावी,विनोद नवले,अबिद अली,भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने तसेच बीडीओ घोंसिकर,तहसीलदार गाडे,साळवे सर, इतर पदाधिकारी तसेच प्रदीप पिंपळशेंडे,कवडू जरीले,कोल्हे,,युवा नेते सचिन गुरनुले,तन्वीर शेख,किशोर देवतळे ग्रा.प.सदस्य पुरुषोत्तम भोंगळें,प्रल्हाद पवार,शशिकांत आडकीने,हेटीच्या सरपंच सौ.बालभारती जरिले,येरगव्हान सरपंच सत्यवान आत्राम,अनिल कौरासे,गजानन भोंगले,सत्यवान चामाटे व कोरपना तालुक़्यातील सरपंच,उपसरपंच,ग्राम पंचायत सद्यस्य व नगरिकांची मोठ्या प्रामानात उपस्थित होती.
Friday, November 10, 2017
आमदार बाळू धानोरकरसह 30 आंदोलनकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल.

Thursday, November 09, 2017

रब्बी पिकाला पाणी नाही तर पेंच चे पाणी कुणाला?
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वरोऱ्यात आ.धानोरकरांच्या नेतृत्वात मुंडन व भीकमांगो आंदोलन
तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केले व त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने गुरुवारी प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या करीता शिवसेनेच्या आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात खांबाळा येथे मुंडन व भीक मांगो आंदोलन अरण्यात आले. या आंदोलनाने चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतुक चांगलीच प्रभावित झाली होती,
गेल्या सोमवारी आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालून दोन दिवसांत करारनामा करा आणि त्यानंतरच बांधकामासाठी शेतात पाय ठेवा, असा इशारा शेतकऱ्यानी दिला होता.वर्धा ते नागरी येथे ४०० केव्ही टॉवर उभारली. शिवाय, नागरी ते परळी ७६५ केव्ही टॉवरची उभारणी केली जात आहे. वर्धा ते नागरी मार्गावरील शेतात टॉवर उभारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टॉवर १५ लाख रूपये तर नागरी परळी मार्गावरील टॉवरखाली आलेल्या शेताला २५ लाख रूपये प्रति टॉवर मोबइला द्यावा, टॉवर लाईनमुळे अशंत: बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही मोबदला देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली होती .
मात्र ३ दिवस उलटूनही प्रशासनाने यावर तोडगा काढला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना आमदार बाळू धानोरकर, यांच्या नेतृत्वात चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खाम्बाडा येथे मुंडन व भीक मांगो आंदोलन करून ऊर्जामंत्रालयाच्या प्रधानसचिवांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे,पहिले संपूर्ण योग्य मोबदला देण्यात यावा त्यानंतरच शेतकऱ्यांच्या शेतात पाय ठेवायचा अश्या शिवसेना स्टाईलने यावेळी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते किशोर जोरगेवार, सुरेश पचारे, मनोज पॉल ,यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Sunday, November 05, 2017
सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अंजलीताई घोटेकर या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार, नगरसेवक मायाताई उईके, नगरसेवक शिलाताई चौहान, देवस्थानचे अध्यक्ष मनोहरराव बोक्कावार होते. प्रस्थाविक मनोहर बोक्कावार यांनी केले.
पुढे बोलताना नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार म्हणाले कि, आमदार नानाजी शामकुळे यांनी तुकूम येथील विकासासाठी कधीही निधीची कमी पडू दिला नाही. या प्रभागाच्या विकास साधण्यासाठी आमदार शामकुळे यांनी मदत केली आहे. हे सांस्कृतिक सभागृह देखील आमदार निधीतून बांधून दिले. यामुळे या भागातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्द्य झाले आहे.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झालीत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीत सुरेश देशपांडे, शैलेश जुमडे, उशाल घटे, निळकंठराव डांगरे, रमेश मूलकालवार, विलास माहूरवार, भाऊराव साठोने, वसंतराव येरने, वाय. आर. रेड्डी यांनी सहकार्य केले.
Friday, November 03, 2017

शंकरपूर परिसरात 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु होणार
शंकरपूर / प्रतिनिधी:
चिमूर तालुक्यातील शंकरपूर डोमा जी प क्षेत्र परिसरात विदुयत सिंगल फेज सुरु असल्याने शेतकरी वर्गास अडचण निर्माण झाली असताना साठगाव येथील शेतकऱ्या नि आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचेकडे निवेदन देऊन 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु करण्याची मागणी केली होती याची दखल घेत आमदार किर्तीकुमार भांगडीया यानी एम एस इ बी च्या अधिकारी वर्गा सोबत चर्चा केली असता अखेर 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु राहणार असल्याची माहिती सांगण्यात आली