काव्यशिल्प Digital Media: सामूहिक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label सामूहिक. Show all posts
Showing posts with label सामूहिक. Show all posts

Sunday, May 13, 2018

सामूहिक विवाह होणे काळाची गरज:आ.विजय वडेट्टीवार

सामूहिक विवाह होणे काळाची गरज:आ.विजय वडेट्टीवार

१२जोडप्यांचे लागले लग्न ५ हजार समाज बांधवांची उपस्थिती 
 चिमूर प्रतिनिधी:
      चिमूर विधानसभा क्षेत्र हे माझे पूर्वी चे क्षेत्र असून अजून हि सलोख्याचे संबंध जनतेशी आहे सामूहिक  विवाह मेळाव्यातून सामाजिक विचारांची देवाण घेवाण होत असून  माना जमातीतील अरविद सांदेकर हे युवा  नेतृत्व समोर आले असून त्यान्च्या पुढाकारातून सामूहिक मेळावा आयोजित केल्याचे स्वागत करीत पुढे म्हणाले की यंदा शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात नापिकी झाली आहे शेतकरी कर्ज बाजरी होऊ नये समाज बांधवांनी सामूहिक मेळाव्यात विवाह करावे जेणेकरून आर्थिक बचत होते सामूहिक विवाह मेळावे या पुढे हि होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन विधान सभा उप नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले>
      जांभुळ घाट येथील डॉ रमेश कुमार गजभे कला म्हाविद्यालयात  माना आदिम जमात मंडळ मुबई द्वारा पुरस्कृत तालुका शाखा चिमूर व माना आदिम जमात समनव्य समिती यांचे संयुक्त विधमानाने आयोजित  माना आदिम जमाती चा सामूहिक विवाह मेळाव्यात विधान सभा उप नेते आमदार विजय वडेट्टीवार बोलत होते
 या सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माना आदिम जमात मंडळ मुबई चे अध्यक्ष वासुदेव धारने राहणार असून उदघाटक माना आदिम समनव्य समिती अध्यक्ष डॉ रमेश कुमार गजभे तर प्रमुख अतिथी विधान सभा उप नेते ,आमदार विजय वडेट्टीवार माजी आमदार डॉ रमेशकुमार गजभे ,जी प गट नेते डॉ सतीश वारजूकर ,जी प सदस्य गजानन बुटके,जी प सदस्य ममता डुकरे पस सभापती विद्या चौधरी उप सभापती शांताराम सेलवटकर , पस सदस्य  रोशन ढोक ,दामोदर केदार, भाऊराव गजभे, मधुकर ढोक ,शालीकरांम सोनवणे,भाष्कर गायकवाड,विजय घरत   सूर्यकांत जीवतोडे,कमलिनी जीवतोडे, शांताराम चौखे  यशवंत घोडमारे आदी उपस्थित होते.
 या वेळी  प्रास्ताविक करताना  कार्यध्यक्ष अरविद सांदेकर म्हणाले की माना समाज मोठया संख्येने राहत असून समाज आदिवासी असताना सुद्धा शासन दर्जा देत नाही यंदा नापिकी झाल्याने समाज बांधव कर्ज बाजरी होऊ नये या साठी समाज संघटनेच्या माध्यमातून विवाह सोहळा आयोजीत केलेले आहे सदर  सामूहिकविवाह सोहळा लोक वर्गणीतून होत असल्याची माहिती दिली संचालन डॉ गोविद् राव चौधरी,डॉ दिनकर चौधरी तर आभार भाष्कर गायकवाड यांनी केले.
 सामूहिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी माना जमात समनयव्य समिती कार्याध्यक्ष अरविंद सांदेकर, गडचिरोली जिल्हा सचिव वामन सावसाकडे ,भाऊराव दांडेकर,सूर्यकांत जीवतोडे तसेच माना आदिम जमात मंडळ शाखा चिमूर चे प्रमुख वासुदेव श्रीरामे ,माना आदिम जमात समनव्य समिती चे कार्याध्यक्ष अरविद सांदेकर ,पुरुषोत्तम गायकवाड, खेमराज गुडध्ये ,रमेश दांडेकर, बबन गायकवाड, शामराव धारने, नानाजी दडमल, राजेंद्र बारेकर,रामचंद्र श्रीरामे, पत्रू दडमल ,मोहन दोडके अनिल करपाते माया ननावरे,सुनीता जांभुळे आदींनी केली आहे. दरम्यान प्रवीण  सांदेकर यांनी वर वधू ना वस्त्र भेट  दिले ५ हजार समाज बांधव उपस्थित होते.