Saturday, September 15, 2018

पोलिसांनी टेम्पोसह उचलला DJ
रायगड - गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे वाजवायला बंदी घालण्यात आली आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून दीड दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत अलिबागमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाले. याप्रकरणी कारवाई करत अलिबाग पोलिसांनी डीजेचे साहित्य, टेम्पो आणि जनरेट असा 9 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
अलिबाग शहरातील तळकर नगर येथे राहणारे संतोष जाधव यांनी दीड दिवसाची गणपती विसर्जन मिरवणूक काढली होती. यावेळी ध्वनी प्रदूषण पथक हे ब्राम्हण आळी ते रामनाथ येथे पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी जाधव यांच्या गणरायाच्या मिरवणुकीत डीजे सारखे ध्वनी प्रदूषण वाद्य मोठ्या कर्कश आवाजात वाजविले जात असल्याचे पथकाच्या निर्दशनात आले. डीजेच्या ध्वनी तीव्रता यंत्राने तपासणी करुन प्रिंट काढली असता ती 63.3 डेसीबल एवढी इतकी भरली.
ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संतोष जाधव, डीजे चालक रोहित सुरेश पाटील, वाहन चालक स्वप्नील दिलीप लिंगम, जनरेटर चालक उत्कर्ष विकास चवरकर यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 अन्वये अलिबाग पोलिसांनी कारवाई केली.
Thursday, January 25, 2018
15 हजाराची लाच घेतांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात अटक
Sunday, January 07, 2018
गर्द पावडरसह १ आरोपी अटकेत
सीताबर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे व पोलिसांनी ५१३ ग्राम गर्द पावडर सह एकूण ५ लाख १३ हजाराचा मुद्देमाल शहर बस्थानाक नागपूर येथून जप्त केला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या परिसरात एक इसम अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी एक संशयित ईसमाला दोन पंचासमक्ष ताब्यात घेतले व आरोपीकडून कडून ५ लाख १४ हजार ३४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलसांनी कारवाई करत एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शाखेने पूर्ण केली.
Monday, November 27, 2017
चंद्रपूर जिल्हा पोलीस वार्तापत्र
![]() |
एकुण 26 केसेस:-
महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्याात दिनांक 01/04/2015 पासुन दारूबंदी घोषीत
करण्यात आलेली असुन पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात विशेष मोहीम राबवुन दिनांक
26/11/2017 चे 00ः01 ते 23ः59 वाजता पर्यंत जिल्ह्याात पोलीस स्टेशन घुग्घुस, दुर्गापुर, शेगाव,
माजरी, ब्रम्हपुरी, नागभिड, चिमुर, सिंदेवाही, पोंभुर्णा, सावली, राजुरा, विरूर हददीत एकुण
20,00,870/-रू ची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन ला एकुण 26 गुन्हयाची नोंद
करण्यात आली असुन 03 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
----------------------------------------------------------------------------------
❖ रोडवर धोकादायक स्थितीत वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन धारकांवर कार्यवाही:-
पोलीस स्टेशन घुग्घुस:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन घुग्घुस अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अषा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन घुग्घुस येथे
अप.क्र. 678/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01
आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन चिमुर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन चिमुर अंतर्गत 02 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
चिमुर येथे अप.क्र. 651/2017 व 652/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदर गुन्हयातील 02 आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन दुर्गापुर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन दुर्गापुर अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले ताब्यातील
वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे अप.क्र. 458/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01
आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास दुर्गापुर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन भद्रावती:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन भद्रावती अंतर्गत 02 आरोपी इसम हे आपआपले
ताब्यातील वाहन रोडवर मानवी जिवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभे केल्याने पोलीस स्टेशन
भद्रावती येथे अप.क्र. 1086/2017 व 1087/2017 कलम 283 भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले
आहे. सदर गुन्हयातील 02 आरोपींना अटक करण्यात आली असुन पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
❖ मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या मद्यपी वाहन चालकांवर कार्यवाही:-
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहरः-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप.क्र. 1569/2017 कलम
184, 185 मोवाका अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक
करण्यात आली असून पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
पोलीस स्टेशन ब्रम्हपुरीः-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत 01 आरोपी इसम हा आपले
ताब्यातील वाहन दारू पिवुन दारूचे नशेत रोडवर धोकादायक स्थितीत भरधाव वेगाने व निश्काळजीपणे
चालवित असताना मिळुन आल्याने पोलीस स्टेषन ब्रम्हपुरी येथे अप.क्र. 1124/2017 कलम 184,
185 मोवाका अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक करण्यात
आली असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
❖ पोलीस स्टेशन रामनगर हददी त संषयास्पदरित्या फिरणाऱ्या आरोपीतांना अटकः-
दिनांक 26/11/2017 रोजी रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत रामनगर येथे 23ः45 वाजता
दरम्यान 01 आरोपी इसम हा आपले अस्तित्व लपवुन कोणतातरी हस्तपेक्षीय गुन्हा करण्याचे उद्देशाने
फिरत असता मिळुन आल्याने पोलीस स्टेशन रामनगर येथे अप. क्र. 1614/2017 कलम 122 (ब)
मुंबंई पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील 01 आरोपीस अटक
करण्यात आले असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
----------------------------------------------------------------------------------
❖ मुंबई जुगार कायदा अन्वये कार्यवाही:-
पोलीस स्टेशन विरूर:-
दिनांक 26/11/2017 रोजी पोलीस स्टेशन विरूर अंतर्गत कविठपेठ येथे 02 आरोपी इसम हा
सार्वजनिक ठिकाणी कोंबडयांची झुंजीवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगाराचा खेळ खेळताना
मिळुन आल्याने पो.स्टे. विरूर येथे अप.क्र. 437/2017 कलम 12 (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये
गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हयात घटनास्थळावरून जुगारच्या साहीत्यासह नगदी
असा एकुण 3,850/-रू चा माल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास विरूर पोलीस करीत
आहे.
----------------------------------------------------------------------------------
❖ प्रतिबंधक कारवाई:-
दिनांक 26/11/2017 रोजी जिल्ह्यात कलम 107 दंड प्रक्रिया संहिता अन्वये 12, कलम 122 मुंबई
पोलीस कायदा अन्वये 01, कलम 110/117 मुंबई पोलीस कायदा अन्वये 01 असे एकुण 14 ईसमांवर
प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
----------------------------------------------------------------------------------
❖ मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई:-
दिनांक 26/11/2017 रोजी जिल्ह्याात मोटार वाहन कायदा अन्वये रिफलेक्टर/नोपार्किंग 03, दारू
प्राशन 02, इतर केसेस 166 एकुण 171 केसेस करण्यात आल्या आहेत.
----------------------------------------------------------------------------------
Tuesday, November 21, 2017
सशस्त्र दलांतील निवृत्त श्वानांबाबत काय धोरण आहे?
नागपूर : सशस्त्र बलांमध्ये आवश्यक सेवा दिल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांबाबत काय धोरण आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी केंद्रीय पशू कल्याण मंडळाला करून यावर सहा आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.रेल्वे पोलीस बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सशस्त्र सीमा बल, पोलीस विभाग यासह अन्य विविध सुरक्षा संस्थांमध्ये प्रशिक्षित श्वानांची नियुक्ती केली जाते. हे श्वान सुरक्षाविषयक मोहिमेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडीत असतात. सेवाकाळात त्यांना श्रेणीनुसार वेतन दिल्या जाते. एक श्वान सुमारे १० ते १२ वर्षे सेवा देतो. त्यानंतर त्याला सेवामुक्त केले जाते. परंतु, निवृत्तीनंतर त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यांचे पालनपोषण व त्यांना दत्तक देण्यासंदर्भात देशात धोरण अस्तित्वात नाही. परिणामी अनेक श्वानांना इंजेक्शन देऊन किंवा गोळी झाडून ठार मारले जाते.
अमेरिकेत मात्र अशा श्वानांचे पालनपोषण केले जाते. त्याचा खर्च शासनाद्वारे उचलला जातो. रेल्वे सुरक्षा बलाच्या ‘रेनो’ या श्वानाला एका सधन गृहस्थाने दत्तक घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, तशी कोठेच तरतूद नसल्याचे कारण सांगून त्यांना श्वान दत्तक देण्यात आला नाही. यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. अॅड. एस. एस. संन्याल हे या प्रकरणात न्यायालय मित्र आहेत. अशा श्वानांसाठी धोरण तयार करण्याचे शासनाला निर्देश देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे.
Monday, November 20, 2017
चंद्रपूर पोलिस सलग तिसऱ्यांदा ठरले चॅम्पीयन
चंद्रपूर /प्रतिनिधी:
पोलीस दलामध्ये दैनंदीन असणारे आवाहानात्मक कर्तव्य बजावितांना, खेळामध्ये सुध्दा नैपुण्य दाखविण्याकरीता चंद्रपुर पोलीस दलाने सातत्य राखले आहे. अशीच एक नैपुण्यपुर्ण कामगीरीस चंद्रपुर पोलीस दलातील खेळाडु कर्मचारी यांनी गवसणी घातलेली आहे. सन 2015 मध्ये गोंदिया येथे, सन 2016 मध्ये स्वतःच्या मैदानावर चंद्रपुर येथे आणि नुकतेच नागपुर येथे संपन्न झालेल्या 2017 नागपुर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा मध्ये सलग तिसऱ्यांदा जनरल चॅम्पीयनशिपवर चंद्रपुर पोलीस दलाने विजयाची मोहर लावली आहे.
Saturday, November 18, 2017

महाविद्यालयीन युवकाचा धारदार शस्त्राने भोकसून खून
Tuesday, November 14, 2017
रामटेक पोलिस स्टेशन समोर दारु विक्रिचे स्टॉल लावू
ही अवैध दारु विक्री पोलिसांचा संरकक्षणात सुरु असल्याचा आरोप करत आज प्रहार महिला आघाडी रामटेक तालुक्याचा वतीने पोलिस स्टेशन रामटेक वर धड़क देण्यात आली व् पोलिस उपनिरीक्षक तालिकोटे यांना निवेदन देवून तत्काळ ही अवैध दारु विक्री बंद करावी अन्यथा पोलिस स्टेशन रामटेक समोर दारु विक्रीचा स्टॉल लावू अशा इशारा प्रहार तर्फे पोलिस स्टेशन ला देण्यात आला.
पोलिसांच्या ताब्यातून सोनू उर्फ काल्या पळाला
नागपूर : चोरीच्या गुन्ह्यात इमामवाडा पोलिसांच्या ताब्यात असलेला सोनू उर्फ काल्या बैसवारे हा आरोपी medical हॉस्पिटलमधून पळून गेला.
Monday, November 13, 2017

नवी मुंबईत भुयार खोदून बँक लुटली
नवी मुंबई : नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिल्मी स्टाइलने बँकेवर टाकण्यात आलेल्या या दरोड्यामुळे नवी मुंबई पोलीसही चक्रावून गेले आहेत.जुई नगर सेक्टर-११ मध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडा पडल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी बँक उघडण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या बाजूला असलेलेल्या दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी या बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याची माहिती मिळू शकली नाही. बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानात या भुयाराचे उगमस्थान आढळून आलंय. त्यामुळे या दुकानाचा मालक आणि दुकानातील नोकरांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. हे भुयार एका रात्रीत खोदलं गेलं नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. पूर्ण प्लॅनिंग करूनच एखाद्या टोळीने हे भुयार खोदलं असावं, असं पोलीस सुत्रांनी सांगितलं. एवढं मोठं भुयार खोदलं जात असताना आसपासच्या परिसरातील लोकांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? यावर पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

कोथळे मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा गृहराज्यमंत्र्यांवर निशाणा
मुंबई : "थर्ड डिग्री"चा वापर करून पोलीस अधिकारी युवराज कामटे याने अनिकेत कोथळे याला बेदम मारहाण केली. यात कोथळे याचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे तर कोथळे याचा मृतदेह गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात नेऊन टाकला. केसरकर यांचे गृहराज्यमंत्री या नात्याने हे अपयश आहे. त्यामुळे केसरकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.*
*संबंधित पोलिसांच्या हिंमतीला दाद दिली पाहीजे. मृतदेह जाळण्याचे ठिकाण गृहराज्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात निवडणे म्हणजे मंत्र्यांची पोलीस खात्यावर किती वचक आहे, याचेच हे उत्तम उदाहरण असल्याचा टोला राणे यांनी हाणला आहे. कोथळे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशीही मागणी त्यांनी केली आहे...*

अनिकेतच्या खूनातील आरोपींच्या फाशीसाठी सरकार प्रयत्नशील
सांगली/प्रतिनिधी -येथील अनिकेत कोथळे या तरुणाच्या खूनाला आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास जबाबदार असणार्या सर्वांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न राहिल. त्यासाठी सरकार न्यायालयात भक्कमपणे पुरव्यानिशी बाजू मांडणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान पोलिस दलातील चुका शोधून दुरुस्थ करण्यासाठी वरीष्ठ दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.*
*पोलिसांनी कोठडीत केलेल्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. त्यानंतर अनिकेत आणि त्याचा साथीदार पळून गेल्याचा बनाव पोलिसांनी केला. अनिकेतच्या मृतदेहाची आंबोली येथे जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र अनिकेतचे कुटुंबीय, लोकप्रतिनीधी यांच्या दबावामुळे पोलिसांचा कारणामा चव्हाट्यावर आला. त्यामुळे पोलिस उपनिरिक्षक युवराज कामटे याच्यासह त्याच्या पाच साथीदारांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी जाहीर केले.*
*या प्रकरणी कामटेसह सहा जणांना अटक झाली असून त्यांच्यासह आणखी सात जणांना निलंबीत करण्यात आले आहे. तरीही पोलिस दलाविषयी लोकांच्यात रोष कायम आहे. या प्रकरणात असलेल्या वरीष्ठ अधिकार्यासह सर्व दोषीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सोमवारी सांगलीबंदचे आवाहनही करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी अनिकेतच्या कुटुंबियांची भेट घेतली. पोलिस अधिकार्यांची बैठक घेऊन आढावा घेतला..*
विश्वास नांगरे यांच्या बदलीसाठी दबाव
या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी कोल्हापुरात दिली. केसरकर यांनी सांगलीत जाऊन अनिकेतच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मोठा- छोटा अधिकारी न पाहता दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.
अनिकेतच्या मृत्यूचा प्रत्यक्षदश्री साक्षीदार अमोल भंडारे यालाही मारण्याचा कट निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती सीआयडीच्या तपासातून बाहेर आली आहे.
आमच्या मागण्या मान्य न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अनिकेतच्या कुटुंबाने केसरकर यांना दिला.
अनिकेतच्या मृत्यूप्रकरणी सोमवारी सांगलीत सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कृती समितीतर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात येईल.
Sunday, November 12, 2017
चंद्रपुरात घरफोडी पोलीस सुस्त, चोरटे मस्त
शनिवारच्या रात्री रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्या रामनगर परिसरातील श्री. अरुण चिंतलवार यांच्या राहत्या घरी रात्रीच्या सुमारास घरफोडी झाली. या घरफोडीत अरुण चिंतलवार
यांच्या घरून दहा हजार रुपये रोख व दोन हजार रुपये चिल्लर त्याच सोबत महत्वपूर्ण सामानही चोरीला गेल.
चोरट्यांनी जेव्हा घर फोडलं तेव्हा चिंतलवार दाम्पत्य हे एका वैवाहिक कार्यक्रमासाठी अकोला येथे गेले होते. सकाळ होताच शेजारी राहणारे सुनील तिवारी यांच्या हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. त्यांनी या घटनेची माहिती चिंतलवार दांपत्यास फोनवरून दिली मात्र अकोला- चंद्रपूर अंतर लांब असल्याने त्यांनी संध्याकाळपर्यंत पोहोचातोय असे फोनवरून तिवारी यांना कडविले. व घटनेची माहिती पोलिसांना देण्यास सांगितले. तिवारी यांनी या घटनेची माहिती रामनगर पोलीस स्टेशनला फोन करून दिली, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात त्यांना घटनास्थळावर जाणे बंधनकारक असते. पोलिस स्टेशन ते घटनास्थळ हे अंतर जवळपास अडीच किमी. मात्र घटनेच्या 50 मिनिटानंतरही पोलिस घटनास्थळी दाखल झाली नव्हती. त्यामुळे शेजारी तक्रारदार पोलिसांची वाट पाहत घटनास्थळी बराच वेळ होते. घटनेचा 50 मिनिटांनीही पोलीस घटनास्थळावर दाखल झाली नाही हे बघून तिवारी यांनी रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार जी.बी.गोटमारे यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्याचाही काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परत फोन रामनगर पोलिसांना करण्यात आला. मात्र त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे जे उत्तर होते ते सामान्य जनतेसाठी चीड़ निर्माण करणारे होते.
संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलीस दादांनी फोनवर घेऊन घेतली मात्र या घटनेला प्राधान्य न देता, या घटनेबद्दल गांभीर्य न जाणता त्यांनी सर्वात पहिले मुद्देमाल गेला आहे का? किंवा चोरीचा प्रकार मोठा आहे की छोटा असा प्रश्न केला. इतका सर्व खटाटोप झाला असतानाही पोलिस स्टेशन पासून निव्वळ दोन ते अडीच किलोमीटर अंतर यासाठी पोलिसांना इतका खटाटोप का करावा लागला? असाही प्रश्न यावेळी निर्माण होत आहे. यातही तक्रारकर्त्याने इतका वेळ घटनास्थळावर पोहोचण्यासाठी का होतोय अशी विचारणा केली असता पोलिसांनी फोनवरून उत्तर दिले 'सकाळची वेळ असल्याने पोलीस स्टेशनमध्ये स्टाफ कमी व कामात आहे त्यामुळे घटनास्थळावर कर्मचारी पोहोचून जाईल थोडा वेळ लागेल'.
चंद्रपुरातील रामनगर परिसर हा उच्चभ्रू वस्तीत मोडतो या वस्तीत शहरातील धनाढ्य व सुशिक्षित नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तक्रारदाराच्या सांगण्यावरून या परिसरात पोलीस कधीच गस्त घालत नाही असे निदर्शनास आले आहे. तक्रारदार हे कामानिमित्य रात्रीचे दोन वाजेच्या दरम्यान घरी परततात तरीही पोलिसांची पेट्रोललिंग या प्रभागात कधीच दिसली नाही असे सांगण्यात येते. हा मार्ग म्हणजे शहराच्या बाहेर चहूबाजूंनी निघण्यासाठी सोईस्कर आहे. घुग्घुस- चंद्रपूर, घुग्घुस- नागपूर, घुग्गुस- राजुरा, आणि परत शहरात हा मार्ग येतो. त्यात हा मार्ग भामटे -भुरट्याना शहराबाहेर जाण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर आहे. मात्र या परिसरात पोलिसांची गस्त नसल्याने चोरटे आपल्या संधीचा पुर्ण फायदा घेत असतात.त्यामुळे आता रामनगर पोलिसांना आपल्या हदीत गस्त घालन्याची गरज या निमित्याने निर्माण होत आहे
या संपूर्ण प्रकारात प्रश्न हा तक्रार करण्याचा किंवा घेण्याचा नसून पोलिसांवरील आक्षेपाचा देखील नाही.प्रश्न आहे तो पोलिसांनी दिलेल्या "असमाधानकारक उत्तरांचा" आहे.
त्यामुळे रामनगर पोलिसांच्या अशा बेजबाबदार प्रश्नांमुळे व लेटलतीफ पणामुळे नागरिक पोलिसांवर विश्वास ठेवणार का ?असाच प्रश्न निर्माण होत आहे.या संपूर्ण प्रकरनावरुण वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा कर्मचार्यांना काय सबब देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.
Friday, November 10, 2017

नागपूर : मानकापूर ठाण्यांतर्गत पोलीस कॉन्स्टेबल विजय झोलदेव -याला लाच घेताना एसीबीने अटक केली
नागपूर : मानकापूर ठाण्यांतर्गत पोलीस कॉन्स्टेबल विजय झोलदेव -याला लाच घेताना एसीबीने अटक केली.