काव्यशिल्प Digital Media: गोंडपिपरी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label गोंडपिपरी. Show all posts
Showing posts with label गोंडपिपरी. Show all posts

Wednesday, November 29, 2017

पोंभुर्णा कृउबास संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावे

पोंभुर्णा कृउबास संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावे

माजी सभापती कवडू कुंदावार यांची मागणी

पोंभूर्णा प्रतिनिधी : पोंभुर्णा कृउबास संचालक मंडळाचा कार्यकाल पूर्ण होवून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. तरीपण पूर्ववत मुदतवाढ न देता शासन नियमानुसार संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी माजी सभापती कवडू उंदरूजी कुंदावार यांनी केलेली आहे.
           पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आल्यानंतर प्रथम सभापती पदावर कवडू कुंदावार हे दि.२४. ८. २००९ ते २६. ४. २०१२ पर्यंत कार्यरत होते. तद्नंतर निवडणूक होवून विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल दि.२६ | ४ |२०१२ ते दि. २६ | ४ | २०१७ पर्यंत पूर्ण झालेला आहे. या मुदतीमध्येच नवीन संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पाडणे गरजेची होती. परंतू विद्यमान संचालक मंडळाला दिलेली मुदतवाढ ही बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचे मत माजी सभापती कवडू कुंदावार यांनी व्यक्त करून बाजार समितीवर प्रशासक नेमावे अशी मागणी संबंधीताना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.