काव्यशिल्प Digital Media: बंदूक

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label बंदूक. Show all posts
Showing posts with label बंदूक. Show all posts

Tuesday, April 10, 2018

बंदूक सापडल्याने उडाली खळबळ

बंदूक सापडल्याने उडाली खळबळ

चंद्रपूर/ललित लांजेवार 
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील थेरगावयेथील लालहेती गावालगतच्या एका पाइपमध्ये गावठी बनावटीची मोठी बंदूक आढळल्याने एकच खळबळ उडाली. या बंदुकीची वर्णन हे 36 इंच नळी व 52 इंच लांब असलेली ही भरमार बंदुकीची संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू आहे .पोंभुर्णा तालुका हा नक्षलग्रस्त प्रभावित व जंगलाचे वेढले आहे येतुन काहीच अंतरावर नक्षल्यांच्या नेहमी कारवाया होत असलेला गडचिरोली जिल्हा देखील आहे या पोंभुर्ण्यावरून गडचिरोली आतून मार्ग आहे.
अश्या परिस्थिती नाक्षवाद्यांशी देखील याचा संपर्क जोडला जाऊ शकतो. या बंदुकीची माहिती मिळताच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोंभुर्णाचे ठाणेदार सुधीर बोरकुटे व सहाय्यक फौजदार सापावर यांनी आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले व संपूर्ण क्षेत्र पिंजून काढला. यात एका पाईपमध्ये बंदूक लपवून ठेवल्याचे आढळल्याने त्यांनी घटनास्थळावरून बंदूक जप्त केली. बंदुकीवर पंजाबी अक्षर लिखित असा मजकूर लिहिलेला आहे. बंदुकी सोबत पिशवी आढळली असून त्यात दोन बाटल्यात सिमेंट रंगाचा पावडर,छरा,आगपेटी असे साहित्य आढळून आले 
.हे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत. पोंभूर्णा तालुका नक्षलग्रस्त प्रभावीत क्षेत्र परिचित असल्याने तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे साहित्य आढळून आल्याने नागरिकांत एकच खळबळ उडाली असून या सोबत शिकार करणारी टोळी तर सक्रिय नाही ना? असाही अंदाज देखील लावला जात आहे. सदर जप्त केलेली बंदूक पोलिस स्टेशनबेंबाळ क्षेत्रात सापडल्याने पोंभूर्णा पोलिसांनी त्याच्या स्वाधीन केली असून पुढील चौकशी बेंबाळ पोलिस करीत आहे.