काव्यशिल्प Digital Media: पिशवी

সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu
Showing posts with label पिशवी. Show all posts
Showing posts with label पिशवी. Show all posts

Monday, April 16, 2018

कापडी पिशवी निर्मीतीतून काटवनच्या महिलांना रोजगार

कापडी पिशवी निर्मीतीतून काटवनच्या महिलांना रोजगार

विकास कामांना गती : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान
 चंद्रपूर/प्रतिनिधी:
मुल तालुक्यातील काटवन हे आदिवासी बहूल गाव. 800 लोकसंख्या असलेल्या या ग्राम पंचायत अंतर्गत काटवन, करवन, करवनटोला, चिंचोली या गावाचा समावेश होतो. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत या गावाची निवड करण्यात आली असून विविध विकास कामांना गती मिळाली आहे. नुकतेच गावातील 30 महिलांना कागदी व कापडी पिशवी निर्मीतीचे प्रशिक्षण देण्यात आले असून महिलांना यातून रोजगार मिळाला आहे.
काटवन येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक वर्षा कोडापे यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सुरु केले आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने राज्यात प्लँष्टीक बंदी केली आहे. त्यामुळे कापडी व कागदी पिशवी निर्मीतीसाठी करवन, काटवन, चिंचोली व करवन टोला येथील महिला बचत गटाच्या महिलांना गावातच 10 दिवसाचे प्रशिक्षण  देण्यात आले. चंद्रपूर येथील संयुक्त महिला मंचाने प्रशिक्षण दिले. येथील आदिवासी महिलांना रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. जंगल व वन्यप्राण्याच्या भितीने  शेतीतही फारसे उत्पन्न मिळत नसल्याने येथील महिलांनी आता लघुउद्योगासाठी पुढाकार घेतला आहे. विविध किराणा दुकान, बाजारपेठेत आता काटवनच्या महिला कागदी व कापडी पिशवी विकण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. यातून महिलांना आर्थिक मिळकत मिळत असल्याने या लघुद्योगामूळे महिलांच्या उपजिवीकेला हातभार मिळाला आहे.