সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 25, 2017

परमात्मा एक

परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा

मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम

मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर अंधश्रद्धा निर्मुलन, दारूबंदी, स्त्रीभ्रूण हत्या बंदी, व्यसन मुक्ती, जातीय भेदभाव नष्ठ करणे, मर्यादित कुटुंब, बालविवाह प्रथा बंदी, हुंडा पद्धती बंद यावर जनजागृती करिता दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २६ जानेवारीला संस्थेचे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम मौदा येथे हवन कार्य, झेंडावंदन, भव्य सेवक मेळावा व वनभोजन कार्यक्रम साजरा होत आहे. दरवर्षी सेवक संमेलनाच्या कार्यक्रमाला लाखो सेवकांची गर्दी होते. तर दरदिवशी हजोरोच्या संख्येत सेवक वनभोजनाकरिता येत असतात.

अंधश्रद्धा निर्मुलन, वाईट व्यसन मुक्त समाज तसेच आदर्श मानव घडवून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे, दुखी व गरीब मानवाला एका भगवंताचा परिचय करून देऊन निष्काम कार्ये करणारे, सत्याचे पुजारी, मानव धर्माचे प्रणेते व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा नागपूर येथील नावाजलेले गोळीबार चौक येथील टिमकी भागात एका सर्वसाधारण ठुब्रिकर कुटुंबात दि. ०३ एप्रिल १९२१ ला जन्म झाला.

बाबांच्या घरची परिस्थिती नाजूक होती. खर्च जास्त मिळकत कमी त्यामुळे त्यांना चौथी पर्यन्त शिक्षण घेऊन शाळा सोडावी लागली. त्यानंतर बाबांनी वयाच्या बाराव्या वर्षी वडिलोपार्जित विणकर व्यवसाय यात हातभार लावण्याचे काम केले. लहानपणापासूनच बाबांचा उमदा स्वभाव होता. चेहऱ्यावर तेज होते. सौष्ठव देहयस्टी होती. लहानपणापासूनच त्यांच्यात कणखरपणा होता. नितीमत्ता बाळगत होते. बाबा दयाळू स्वभावाचे होते, परमेश्वरावर त्यांचा बालपणापासूनच विस्वास होता. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झाले. नागपूर जिल्यात खापा गावातील निवासी श्री बाबूजी बुरडे यांची सुकन्या वाराणशी बाई हिच्या बरोबर मे १९३८ मध्ये लग्न झाले बाबांच्या घरी मुल जन्माला आले ह्याचे नाव मनो ठेवण्यात आले. नाजूक परिस्थितीतून मनोचे शिक्षण झाले व ते आज अमेरीकेमध्ये साईनस्टीट आहेत. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे बाबांनी सोने चांदीच्या दुकानामध्ये सुद्धा नौकरी केली.

महानत्यागी बाबा जुमदेवजीचा परमेश्वरावर फार विस्वास होता. तरीसुद्धा बाबांचे कुटुंब अंधश्रद्धेच्या त्रासामुळे त्रस्त होते. त्यांना पुष्कळश्या दुखाना सामोरे जावे लागले. बाबा ह्या त्रासाचा निवारा करण्याकरिता बाहेर जात होते तेव्हा नागपूर जिल्यात्तील मौदा ह्या शहरातून एक व्यक्ती बाबांच्या घरी आले. ह्या व्यक्तींनी बाबांना एक मंत्र दिले. ह्या मंत्राच्या सहायाने विधिवत कार्य करून सन २६ नोव्हेंबर १९४५ मध्ये भगवान बाबा हनुमानजी ची कृपा प्राप्त केली. तसेच भगवान बाबा हनुमानजीच्या मार्गदर्शनानुसार एका रात्रीत तीन हवन या प्रमाणे पाच दिवस त्रिताल हवन करून राक्षबंधानानंतर सहाव्या दिवशी म्हणजे २५ आगस्त १९४८ मध्ये सृष्टी निर्मात्या एका परमेश्वाची प्राप्ती केली. परमेश्वरी कृपा प्राप्ती नंतर बाबांनी हि कृपा आपल्यापर्यतच किंव्हा आपल्या परिवारापर्यतच मर्यादित न ठेवता त्याच्या कडे येणाऱ्या दुखी लोकांना बाबा परमेश्वरी कृपेच्या सहायाने मार्गदर्शन करून त्यांचे दुख दूर करीत होते. बाबांनी चार तत्व, तीन शब्द व पाच नियमाच्या आधारे दुखी कष्टी व गरीब लोकांमध्ये परमेश्वरी कृपेबद्दल प्रचीती करून दिली व त्यांचे जीवन सुखमय केले. अश्या प्रकारे परमात्मा एक सेवक समाज निर्माण करून मानव धर्माची स्थापना केली.

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर त्या कृपेचा परिचय त्यांनी सर्वसाधारण दुखी, कष्टी लोकांना बिनामुल्य करून दिला. बाबांनी कधीही कोणत्याही व्यक्तीकडून कसल्याही प्रकारची गुरु दक्षिणा घेतली नाही. तसेच कोणालाही आपल्या पाया पडू दिले नाही. बाबांनी गावो-गावी खेडो-पाडी, पायदळ, सायकल बैलगाडी किंव्हा मिळेल त्या साधनाने स्वखर्चानी प्रवास करून सर्वसामान्य माणसाला परमेश्वराबद्दल जागउन त्यांना दारू, जुव्वा, गांजा, सटटा, लॉटरी, कोंबड्याची काती, पटाची होड या सारखे अनेक वाईट व्यसन बंद करण्यास सांगून सत्य, मर्यादा, प्रेमाची शिकवण देऊन अंधश्रद्धा निर्मुलन, वाईट व्यसन, मुक्त समाज, मर्यादित कुटुंब, बालविवाह कुप्रथा बंद, हुंडा पद्धती बंद, स्त्रीभ्रूण हत्या बंदी यासारखे फार मोठे सामाजिक कार्य करून समाजात एक आगळेवेगळे स्थान त्यांनी मिळविले आहे. बाबांचे महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीशगड, आन्द्रप्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, गोवा तशेस भारताच्या इतर राज्यात लाखो कुटुंबातील लोक सेवक आहेत.

महानत्यागी बाबा जुमदेवजीनि मानव धर्माची स्थापना केली. मानवधर्माचा उगम हा मध्यप्रदेश मधील होसंगाबाद जिल्यात पचमडी तालुक्यातील सातपुडा पर्वतावर महाशिवरात्रीच्या पर्वावर झाला. हि यात्रा करून बाबा नागपूरला परतले व मानव धर्माची रीतसर स्थापना केली. अश्या प्रकारे महानत्यागी बाबा जुमदेवजी हे या देशातील मानव धर्माचे संस्थापक ठरले. मानव धर्माच्या रक्षणाकरिता बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरची दि ४ डिसेंबर १९६९ मध्ये स्थापना केली. माझ्यानंतर मंडळ माझे कार्य करील आणि मानव धर्माचा प्रचार व प्रसार करील असे बाबांनी सेवकांना सांगितले. तसेच एक्तेले दर्शन घडवून एकमेका साह्ये करू अवघे धरू सुपंथ या मनिप्रमाणे बाबांनी मानव सेवा हिच खरी सेवा संजून बाबांनी शेवटचा स्वास घेईस्तोवर मानवाची सेवा केली. अशा महामानवास वयाच्या ७५ व्या वर्षी ३ अक्टू १९९६ रोजी देवाज्ञा झाली.



मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य प्राथना स्थळ

मौदा येथे आश्रमाच्या दक्षिण पूर्व भागात भव्य प्राथना स्थळ उभारण्याचे काम सन २००७ पासून सुरु असून काम पुर्नत्वाश आले आहे.हे प्राथना स्थळ गोलाकार आकाराचे असून त्याचा व्यास ७० फुट व उंची ५१ फुट तसेच तीन मजलीचे आहे. प्राथना स्थळात जाण्याकरिता तीन भव्य जिने पायरी असून पायथ्याशी कुत्रिम झरा तयार करण्यात येत असून प्राथना स्थळात जाणार्या भाविक सेवकांचे पाय कुत्रिम झार्या मधून वाहणाऱ्या गार व शुद्ध पाण्याने धुतले जाणार आहेत. मानवाच्या पायाचा थेट संपर्क मेंदूशी असून तळपाय शांत झाले तर मानवाचे डोके शांत होईल व एक चित्त, एक लक्ष्य, एक भगवान या बाबांच्या शिकवणीप्रमाणे शांत चिताने मानव चिंतन व मनन करू शकेल हि या मागची कल्पना आहे.

मौदा आश्रमात रस्त्याच्या बांधकामात व सौंदर्यकरण यामध्ये शासन व मंडळ पुढे

हे आश्रम महामार्ग क्र. ६ पासून १ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. रस्त्याच्या काठाने खांब गाडून विजेचे प्रकाष्मया वातावरण असते. जेणेकरून रात्रीला येणाऱ्या जाणार्या सेवकांना त्रास होणार नाही. आश्रमात जाण्याच्या रस्त्यावर मातोश्री वाराणशी आई उद्यान याचे निर्माण करण्यात आलेले आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे रंगीबेरंगी फुलांचा बगीचा, बगीच्यात असलेले प्राणी, लहान मुलांना खेळण्याकरिता झुला, घसरणपट्टी हे आहेत.

व्यसन मुक्ती सरकारने केली नाही ती बाबांनी केली.

भारतामध्ये सरकारने व्यसन मुक्ती मोहीम राबविली परंतु व्यसन दूर झाले नाही. परंतु या मार्गात येणाऱ्या व्यक्तीला व्यसन बंद करून आपले दुख दूर करावे लागते. त्यामुळे या मार्गात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वेसन दूर झाले. त्यामुळे प्रत्येक सेवक संमेलनात चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात कि व्यसन मुक्ती सरकारने केली नाही ती बाबांनी केली.

महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या जयंती निमित्य शासनाने सरकारी सुट्टी मंजूर करावी.


३ एप्रिल ला बाबांची जयंती सर्व देशात मनविली जाते. शोभा यात्रा भरपूर प्रमाणात निघते यामध्ये बाबांचे सेवक असतातच. परंतु इतर लोकपण असतात. यामध्ये शासनाची नौकरी करणारे लोक पण आहेत. शाळकरी मुले असतात यांना बाबांच्या जयंतीचा भरपूर फायदा घेता येत नाही. त्यामुळे शासनाने ३ एप्रिलला जयंती निमीत्य शासनाने सरकारी सुट्टी द्यावी अशी मागणी मंडळाची व सर्व सेवकांची आहे.




पुरुषोत्तम डोरले मौदा

 अरुण शेंद्रे, धानला

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.