Sunday, December 10, 2017
Wednesday, November 08, 2017
नोटाबंदीमुळे खूप सकारात्मक बदल- मुख्यमंत्री

- नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी साडेपंधरा लाख कोटी रूपयांची माहिती आपल्याकडे नव्हती. हे पैसे कोणाकडे आहेत आणि त्याचा उपयोग कशाप्रकारे होत आहेत, याची कोणतीही नोंद नव्हती. मात्र, नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला. नोटाबंदी झाली नसती तर ही रक्कम कधीच सापडली नसती. यापैकी काही रक्कम संशयातित असून त्याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे यामध्ये काळा पैसा सापडल्यास त्याच्यावर करवसुली करणे शक्य होईल, असे फडवणीस यांनी म्हटले.
- तसेच नोटाबंदीमुळे बेहिशोबी पैसा मोठ्या प्रमाणावर समोर आला. हे पैसे बँक खात्यामध्ये आल्यामुळे त्याचा नेमका स्त्रोत कळाला. त्या आधारे आयकर विभागाने कारवाईला सुरूवात केली. या कारवाईदरम्यान आपल्याकडील बेकायदा संपत्ती स्वत:हून उघड करण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले. तर कारवाई करून पकडण्यात आलेल्या बेहिशोबी रक्कमेचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले. काळा पैसा हुडकून काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईत एकूण २९, २१३ कोटी रूपये हाती लागल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
- तत्पूर्वी केंद्र सरकारनेही नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि
काळ्या पैशावर लगाम लावण्यात यश आल्याचा दावा केला आहे. नोटाबंदीनंतर
लोकसंख्येपैकी ०.०००११ % लोकांनी देशातील उपलब्ध एकूण रकमेच्या ३३ टक्के
रक्कम जमा केल्याचे सरकारने म्हटले आहे. हा आकडा ५ लाख कोटींच्या घरात
असल्याचा दावा सरकारने केला.
- नोटाबंदीमुळे खूप सकारात्मक बदल घडले आहेत, या काळात सर्वसामान्य जनतेने जी साथ त्याबद्दल सर्वांचे आभार, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मनमोहन सिंग मोठे अर्थशास्त्री असले तरी भारतीय अर्थशास्त्राची बदनामी त्यांच्याच काळात झाली, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. मनमोहन सिंग मोठे अर्थशास्त्रज्ञ असले तरी भारतीय अर्थशास्त्राची बदनामी त्यांच्याच काळात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
- मुख्यमंत्र्यांनी यावेळी नोटाबंदीचे गोडवे गात या काळातील आकडेवारी सादर केली. नोटाबंदी नंतर १५ कोटी २८ लाख रुपये परत आले, तर १५ हजार कोटी रुपये परत आले नाही. तसेच २.६९ लाख कोटीचे व्यवहार संशयस्पद आढळले. नोटाबंदीमुळे हा पैसा समोर आला आहे. मोदी सरकार येण्याआधी ३ कोटी लोक टॅक्स भरायचे त्यांचे प्रमाण आता ६ कोटीपर्यंत गेले आहे.
जे साडे पंधरा लाख कोटी रुपये बॅंकेत जमा झाले आहे. या पैशांचा स्त्रोत सापडला आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली.
Sunday, November 05, 2017

सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवीचे नाव
अखेर ना. महादेव जानकर यांच्या लढ्याला यश...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
नागपूर/संजय कन्नावार -
२००५ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकरांच्या नेतृत्वात सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्यासाठी महामोर्चा काढला होता. १९९९ साली दिल्लीत धनगर आरक्षणासाठी पहिला मोर्चा महादेव जानकरांनी काढला होता. जानकर आज सत्तेत असले तरी ह्या मागण्यांसाठी असलेला त्यांचा हट्ट आजही कायम आहे. आज नागपूर मध्ये धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी या मागण्यांचा पुन्हा उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांनी आजच सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर धनगरआरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. नामकरणाप्रमाणेच ना. जानकर धनगर आरक्षणासाठी लढा कायम ठेवतील, हा समाजाचा विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. महादेव जानकर यांचे धनगर समाजातर्फे सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांच नाव देण्याबद्दल स्वागत करण्यात आले.